✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

D
Dr prajakta joshi यांनी
Mon, 04/17/2017 - 16:51  ·  लेख
लेख
"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण" "रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी। यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।" अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक) आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात. खर तर हे टाळणे अशक्य नाहीये.. पण जरा कठीण वाटते. त्यामुळे बाहेर जेवताना थोडा विचार केलेला बरा. म्हणूनच आज आपण घराबाहेर जेवताना काय आरोग्यदायी बदल करू शकतो, यावर चर्चा करूया. सर्वात महत्वाचे म्हणजे शक्यतो रात्री बाहेर जेवण टाळावे, किंवा जेवणानंतर किमान दोन ते अडीच तासांनी झोपावे. महिन्यातून फार फार तर 2वेळा बाहेरचे जेवण घ्यावे. वारंवार बाहेर जेवण होत असेल तर किमान व्यायाम नियमीत आणि भरपूर करावा.जीवनशैली सक्रिय ठेवावी. शक्य होईल तेवढे चालावे. बाहेर खाल्ल्यावर पुन्हा घरी काही खाऊ नये. आता बाहेर जेवताना घ्यावयाचा आहार यावर बोलू या. बाहेर जेवताना भारतात शक्यतो पंजाबी ,उत्तर भारतीय प्रकारचे जेवण मागवले जाते .त्याच अनुशंगाने विचार करूया. १) जेवणाची सुरूवात नेहमीच सलाडने करावी.रशीयन सलाड,ग्रीन सलाड हे छान पर्याय आहेत.तसेच भाजलेले पापडही चांगला पर्याय आहे. २) भाज्या मागवताना त्या आमटी (करी) प्रकारातील मागवाव्यात. कारण त्यातील तेलाचे प्रमाण मर्यादीत असतेच. शिवाय मसाल्याचा वापर योग्य असल्याने ते शरीराला जास्त हानी पोचवत नाही. ३) जेवणाचे समाधान हा आहारातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण त्यावरच आपल्या पचनाशी निगडीत जीवद्रवांची(enzymes) निर्मीती अवलंबून असते. ४) वजन कमी करताना भाज्यांचे; भुना, टिक्का, तंदुर असे रस्सा नसलेल्या भाज्याही उपयुक्त ठरतात. मसाला,पसंदा या प्रकारच्या भाज्या रस्सायुक्त (थिक ग्रेवी) असतात. त्यातील ग्रेवी सुकामेवा (काजु, बदाम) व साय (cream) यापासून बनलेली असते. त्यामुळे असे पदार्थ अहितकर असतात. ५) मांसाहार सर्व भाजलेल्या (grilled/roasted) / आमटी (curry) स्वरूपात मागवा. ६) सलाड, स्टार्टर्स आणि त्यानंतर खिचडी / दालचावल हाही चांगला विकल्प ठरेल. ७) जेवताना जेवढे मागवू इच्छिता त्याच्या निम्मेच मागवा व सेवन करा. (पोट तुडुंब होईपर्यंत जेवणे टाळा) ८) हळूहळू जेवण करा. म्हणजे जे खाता त्याचा आनंद तर मिळेलच. पण लाळेची योग्य निर्मिती होवून पचन व्यवस्थित होईल. ९) जेवणाचा शेवट ताकाने करावा. (buttermilk/masala chaas) आता संक्षेपात बोलुया बाहेरचा नाश्ता (snacks)आणि शितपेयांबद्दल. बाहेर नाश्ता घेताना शक्य होईल तितके कमी तेल, मसाल्याचे, ताजे आणि भारतीय पदार्थ घ्यावेत. उदा. उपमा, दाक्षिणात्य नाश्ता, सँडविच - चिज /बटाटा नसलेले किंवा भाजलेले. शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत. या सर्व बाबी ध्यानात घेवून जर आपण बाहेर जेवण केले तर शारीरीक अपायांचे प्रमाण कमी होईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
21693 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

नियम १ -- अति सर्वत्र वर्जयेत

सुबोध खरे
Wed, 04/19/2017 - 12:26 नवीन
नियम १ -- अति सर्वत्र वर्जयेत. बदाम हे आरोग्याला चांगले आणि पौष्टिक कारण त्यात असणारी उच्च दर्जाची प्रथिने. पण तुमची रोजची प्रथिनांची गरज जर ६० ग्राम असेल( बैठे काम करणारा माणूस) आणि तुमच्या आहारात तुम्ही पाव किलो बदाम खाऊ लागलात तर या अतिरिक्त प्रथिनांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्या यकृत आणि मूत्रपिंडावर ताण येईल. या उलट एखादा कुस्ती खेळणारा पैलवान असेल तर हेच पाव किलो बदाम त्याला अतिशय उपयुक्त ठरतील. तंबाखू हा नैसर्गिक पदार्थ असा आहे कि कितीही कमी सेवन केले तरी त्याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो. पण त्याचा वापर जनावरांच्या गोचीडी वर उत्तम तर्हेने होऊ शकतो. प्रत्येक पदार्थ संपूर्ण चांगला( पौष्टिक) आणि संपूर्ण वाईट( हानिकारक) या दोन्ही टोकाच्या मध्ये असतो तेंव्हा प्रत्येकाच्या वयोमान आणि प्रकृतिमानाप्रमाणे त्याचे सेवन केले पाहिजे. आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो आणि त्यावरच तो पदार्थ उपयुक्त कि हानिकारक हे ठरवले जाते. जुन्या औषध पद्धतीमध्ये असे काटेकोर प्रयोग न आकारात फक्त निरीक्षणावर किंवा अनुभवावर अनुमान काढले जाते आणि म्हणून ते आधुनिक रसायन/ भौतिक शास्त्राच्या कसोट्यांवर टिकत नाही. उदा बर्फ हा उष्ण कसा याचे शास्त्रीय कारण देता येत नाही. किंवा एखादा पदार्थ विरळ केला तर तो जास्त शक्तीचा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

अति सर्वत्र वर्जयेत

Dr prajakta joshi
Wed, 04/19/2017 - 13:40 नवीन
अगदी योग्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उत्तराबद्दल धन्यवाद.

मराठी_माणूस
Wed, 04/19/2017 - 12:49 नवीन
उत्तराबद्दल धन्यवाद.
आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो
ह्या बद्दल अजुन माहीती कुठे मिळेल ? (अवांतरः मधुमेहा साठी एका डॉ. नी शुगर फ्री वापरावे असे सांगातले दुसर्‍या डॉ. नी ते वापरु नये असे सांगीतले )
  • Log in or register to post comments

नक्की काय माहिती हवी आहे?

इष्टुर फाकडा
गुरुवार, 04/20/2017 - 02:09 नवीन
नक्की काय माहिती हवी आहे? असेल तर देईन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तो प्रश्न डॉ. साठी होता

मराठी_माणूस
गुरुवार, 04/20/2017 - 10:51 नवीन
तो प्रश्न डॉ. साठी होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे

सुबोध खरे
गुरुवार, 04/20/2017 - 19:03 नवीन
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. काही डॉक्टर ते वापरू नका असे सांगतात याचे कारण फार वेगळे आहे. काही लठ्ठ माणसे अन्न केवळ चवीला चांगले लागत नाही म्हणून म्हणून कमी खातात अशा माणसांना शुगर फ्री बिनधास्त वापरा म्हणून सांगितले तर त्यांच्या आहारात "सुधारणा" होते आणि याने मधुमेह नियंत्रणाबाहेर जातो. हा अनुभव सर्रास सगळ्या डॉक्टरांना आलेला असतो. एक कॅलरी मग ती साखरेतून येवो किंवा दुसऱ्या पदार्थातून शेवटी तुमच्या साखरेचं प्रमाणावर परिणाम करणारच. शुगरफ्री वापरून केलेला भरपूर खवा घातलेला गाजर हलवा मला आग्रहाने खाऊ घालणारे(आणि त्याच बरोबर स्वतः दुप्पट खाणारे) रुग्ण माझ्या परिचयात आहेत ९५% वजनदार मधुमेही लोक आपला आहार कमीच आहे/ आम्ही काहीच खात नाही म्हणून सांगत असतात.(denial) त्यामुळे डॉक्टर शुगरफ्री वापरू नका असे सांगताना मी सुद्धा पहिले आहे. हे बरोबर कि चूक यावर मी भाष्य करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मुळ शंका अशी आहे की , त्यात

मराठी_माणूस
Fri, 04/21/2017 - 10:02 नवीन
मुळ शंका अशी आहे की , त्यात (शुगर फ्री) काही "केमिकल्स' आहेत ज्याचा दिर्घ वापर हानीकारक ठरु शकतो असे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक गम्मत अशी आहे, की ज्याच्या

आनंदी गोपाळ
Fri, 04/21/2017 - 20:04 नवीन
एक गम्मत अशी आहे, की ज्याच्या बदल्यात आपण शुगरफ्री वापरणार आहोत तेही मुळात C12H22O11 नामक केमिकलच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

+१

अनुप ढेरे
Sat, 04/22/2017 - 00:00 नवीन
अगदी! केमिकल आहेत म्हणजे नक्की काय आहे ते समजत नाही. ही मीम आठवली. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

उत्तम माहिती

पैसा
Wed, 04/19/2017 - 14:47 नवीन
उत्तम माहिती
  • Log in or register to post comments

१-२ महिन्यापूर्वी एक खास

कबीरा
गुरुवार, 04/20/2017 - 10:58 नवीन
१-२ महिन्यापूर्वी एक खास सल्ला ऐकला होता काय खावे काय नाही ह्या बाबत... "साधारण हॉटेल मध्ये गेल्यावर ऑर्डर द्यायच्या आधी किंवा घरी एखादी फर्माईश सोडायच्या आधी आपले मन आपल्याला अगदी व्यवस्थित बजावत असते आपल्या शरीरासाठी काय उत्तम काय अपायकारक / काय खावे काय नाही.. तेवढी ४-५ सेकंद जिभेवर ताबा ठेऊन मनाचं ऐकावं".. ..हा सल्ला आणि रोजच अर्धा तास जॉगिंग ह्यावर २ महिन्यात 4kg वजन कमी करू शकलो.
  • Log in or register to post comments

रोचक आहे.

मोदक
गुरुवार, 04/20/2017 - 12:06 नवीन
रोचक आहे. आमच्या मनाबद्दल बोलायचे झाले तर भरपूर कोंबड्या, लोण्याची थप्पी आणि थम्सअपचा समुद्र. बास्स..! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा

आणि थोडे मासे आणि मस्त पैकी

दशानन
गुरुवार, 04/20/2017 - 17:07 नवीन
आणि थोडे मासे आणि मस्त पैकी झोपायला शांत जागा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओह्ह्ह, भारीच.

अभ्या..
गुरुवार, 04/20/2017 - 18:26 नवीन
.
  • Log in or register to post comments

काही भारी मित्रा ??

राघवेंद्र
गुरुवार, 04/20/2017 - 19:25 नवीन
काही भारी मित्रा ?? धागा ... प्रतिसाद ... लोकांचे कुतुहलात्मक प्रश्न ... लोकांचे खाण्याची पद्धती .... नुसता . मुळे काही समजायला मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे ते लोण्याची थप्पी,

अभ्या..
Sat, 04/22/2017 - 00:08 नवीन
अरे ते लोण्याची थप्पी, थम्सापचा समुंदरला भारीच म्हणायचे होते. प्रतिसादाने लिंक सोडली. णंटर लक्शात आले पण जाऊ दे म्हणले. असं ना तसं माझ्झा प्रतिसाद काय डॉक खरेंच्या प्रतिसादासारखा अभ्यासू नसणार. कोण वाचणारे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे

हेम
गुरुवार, 04/20/2017 - 20:48 नवीन
तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात. पापडातला पापडखार म्हणजे केमिकल आहे, जो सगळ्या कथित फायद्यांवर पाणी फिरवतो.
  • Log in or register to post comments

साखरेऐवजी शुगर फ्री

हेम
गुरुवार, 04/20/2017 - 21:03 नवीन
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. शुगर फ्री कशी बनते ते जरा इत्यंभूत माहित आहे कांय कुणाला? माहित असेल तर कृपया समग्र सांगा म्हणजे ठरवता येईल वापरायची की नाही ते..
  • Log in or register to post comments

sugerfree चे फायदे

Dr prajakta joshi
Fri, 04/21/2017 - 09:38 नवीन
 § Health effects Eating natural sugars like glucose and sucrose instead of a sugar substitute can have negative health effects. The consumption of added sugars has been positively associated with multiple measures known to increase cardiovascular disease risk amongst adolescents as well as adults.[41]The calories contained in sugar-sweetened beverages contribute to increases in body weight and body fat, and replacement of sugar by artificial sweeteners reduces weight.[42] Obesity contributes to diabetes and cardiovascular disease. Glucose has a high glycemic index, sucrose medium, and fructose low. There is evidence that sugar-sweetened beverages "may increase the risk of metabolic syndrome and type 2 diabetes not only through obesity but also by increasing dietary glycemic load, leading to insulin resistance, β-cell dysfunction, and inflammation," according to a 2010 meta-analysis.[43] There is "convincing evidence from human intervention studies, epidemiological studies, animal studies and experimental studies, for an association between the amount and frequency of free sugars intake and dental caries" while other sugar (complex carbohydrate) consumption is normally associated with a lower rate of dental caries, according to the World Health Organization.[44] A 2013 review found that there is insufficient evidence to suggest that replacing dietary sugar with non-caloric sweeteners alone is beneficial for energy balance, weight loss, or diabetes risk factors. The review found that restricting calories is more important than avoidance of sugar for weight management. However, the review concluded that replacing dietary sugar with non-caloric sweeteners is useful for managing blood sugar in diabetes patients. The review recommends that all sweeteners be consumed in moderation
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेम
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा