Skip to main content

विवाह मंडळ

लेखक सचिन७३८ यांनी बुधवार, 12/04/2017 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आंतरजातीय व आंतरधर्मिय एखादे चांगले विवाह मंडळ असल्यास जाणकारांनी सुचविणे. पत्रिका व विधी यांवर विश्वास नाही. थोडक्यात कोर्ट मॅरेज करण्यास तयार. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत…

वाचने 4216
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

तुमचा हेतू शुद्ध आहे. नजर शोधक असली आणि थोडं धाडस असलं की मॅरेज ब्यूरोची गरज नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

धाडस? सावधान ! असा सल्ला दिला तर चालेल का हो धागा लेखक? :P

In reply to by स्रुजा

सावधान ऐकून पळू नका. संकट हारतुरे घेऊन पलीकडे उभे असते. ते टाळल्यास शेजारी. कुठेतरी गाठेलच. तर आता तुम्ही सुंदर संकटाच्या शोधात आहात.

In reply to by संजय क्षीरसागर

ते ठीक आहे हो. पण तरणी पोरे गळ टाकून जरासुद्धा वाट पाहात नाहीत हल्ली. सकाळी मुलीशी ओळख झाली की संध्याकाळी यांना लगेच लॉजवर जायचे असते. मग पोपट होतो आणि इथे धागे काढत बसतात.

In reply to by प्रसाद गोडबोले

इन्स्टा समजुस शकतो मार्क्या, हाऊ स्नॅपडिल? काय गिफ्टा वगैरे देऊन चॅट करावे लागते काय? का अ‍ॅज अ प्रॉडक्ट म्हणून? दुन्या लैच पुढं चालली राव. :(

आजकाल बरेच विवाह मंडळ आंतरजातीय झाले आहेत. फक्त त्यात अपेक्षा वाचून ठरवायचे कॉन्टॅक्ट करायचा कि नाही. प्रोफाइलमधे लिहिले असते जातीची अट आहे की नाही वगैरे.

वायूमंडल धाग्याखाली विवाहमंडळ धागा पाहून आधी विडंबन वगैरे आहे कि काय वाटले! :) मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या आजूबाजूला असणारे काही महत्वाचे थर पार करणे महत्वाचे! भ्राताम्बर: जसे स्थितांबर अतिनील किरणे शोषून घेऊन त्यांना गायब करते तसाच हा थर मुलीच्या आजूबाजूला असणाऱ्या अति-nill मुलांना बाहेर फेकतो. हे करताना त्याचे तापमान वाढून वातावरण गरम देखील होत राहते. बाकी मग पितांबर :P मातांबर असे वेगळे थर आहेतच... पण लैच्च विषयांतर होतंय... तुम्हाला शुभेच्छा!