इंटरनेट बँकींगमुळे हल्ली वर्षानुवर्ष बँकेत जायलाच लागत नाही पण काल एका पर्सनल कामासाठी जरा उशीरानं बँकेत गेलो. तिथे काम करणारी ऑफिसर ओळखीची आहे. कस्टमर्स नसल्यानं ती नेहेमीच्या सरावानं झपाझप काम उरकत होती. तेवढ्यात तिथल्या काचेच्या पार्टीशनवर लावलेल्या, सीसीटिवी इमेजसारख्या, एका फोटोकडे लक्ष गेलं.
`हे कोण ?' मी विचारलं.
`हे अनेकरुपात आणि वेगवेगळ्या बँकेत लोकांना भेटतात !' इती ऑफिसर.
`किती पैश्यावर हात साफ केलायं यांनी ?'
`नक्की कल्पना नाही पण ते एका ब्रांचला एकदाच भेट देतात' तीनं उत्सुकता वाढवली.
`काय आहे कार्यप्रणाली यांची ?' बुद्धिमत्ता मग ती कोणत्या का क्षेत्रात असेना, मला कायम इंटरेस्टींग वाटते.
'बँकेत आलेल्या सिनिअर सिटीझनला गाठायचं, आमच्या कंपनीनं सिनिअर सिटीझन्ससाठी एखादी वस्तू किंवा सेवा, मार्केटरेटच्या फिफ्टी परसेंटला देण्याची स्कीम काढलीये म्हणून सांगायचं. माणूस पटला की त्याला `तुमच्या घरी येऊन चेक घेऊन जाईन' असं सांगायचं आणि घरचा पत्ता घ्यायचा. मग घरी जाऊन रीतसर टाटा स्काय वगैरे कंपनीच्या नांवचा चेक घ्यायचा. दुसर्या दिवशी त्या व्यक्तीला कळतं की आपल्या खात्यातून ४०/४५ हजार काढले गेलेत !'
`ग्रेट! म्हणजे तुमच्याकडे असलेली कस्टमरची सही त्याच्याकडे ऑलरेडी अॅवलेबल असते ! .....पण कस्टमरचा ब्लँक चेक तो कुठून मिळवतो ?'
'कस्टमरनी चेक आणि फॉर्म भरुन दिला की त्याला पाणी मागायचं. तो पाणी आणायला गेला की समोरच असलेल्या चेकबुकमधून, एखादा मधला चेक अलगद काढून घ्यायचा.' तीनं कार्यप्रणाली विशद केली !
`भारतात जुगाड करणारे एकसोएकेत ! एकदम फ्लॉलेस आयडीया काढतात लोक्स. पण द बॉटम लाईन फॉर एवरी डिसीविंग रिमेन्स द सेम' मी म्हणालो.
`काये ती बॉटम लाईन ? तीनं विचारलं.
`सर्व आर्थिक फसवणूकीत एकच फासा काम करतो, मोह !' मी म्हणालो.
`येस ! ' मनापासून हसत ती म्हणाली.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4595
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावध केल्याबद्दल धन्यवाद .
धन्यवाद !
In reply to सावध केल्याबद्दल धन्यवाद . by सिरुसेरि
मोह कोणाला चुकला आहे. लहान
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
`सर्व आर्थिक फसवणूकीत एकच
बघतो,
In reply to `सर्व आर्थिक फसवणूकीत एकच by आदूबाळ
फसवणार्यांची बंटी बबली टाइप
In reply to बघतो, by संजय क्षीरसागर
थँक्स !
In reply to फसवणार्यांची बंटी बबली टाइप by आदूबाळ
काय हे असे कधी घडते का? कोण
तो फोटो बँकेत लावलेला आहे
In reply to काय हे असे कधी घडते का? कोण by हेमंत८२
नाही पुण्यात नाही.. पण बँक
पुण्यात आल्यावर सांगा,
In reply to नाही पुण्यात नाही.. पण बँक by हेमंत८२