पुनः एक दंगल झाली, रक्त खुप वाहिले
भगवे, हिरवे, निळे सारे रंग त्याचे पाहिले
सीमेवरचे युद्ध आठवे, रक्त ज्यात सांडले
रंग नव्हता त्याला, आश्र्चर्य याचे वाटले
शहीदरंगी कफन, ज्यांच्या शवांवर टाकले
रंग रक्ताचे त्यांच्या, त्या कफनांवर माखले
दंगलीच्या रंगांचे कफन शहिदांना घातले
तिरंग्यावरील पांढ-याचे मर्म काही उमगले
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2306
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. कविते शेवटी नाव लिहीत जा..
छान
धन्यवाद. यापुढे नाव लिहेन.
In reply to छान. कविते शेवटी नाव लिहीत जा.. by Rahul D
धन्यवाद. यापुढे नाव लिहेन.
दाद
दाद
:)
In reply to दाद by माहितगार
:)
आवडली.
आवडली.
:)
In reply to आवडली. by प्राची अश्विनी
:)