नमस्कार,
सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =))
अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल. तो इतिहास सर्वश्रृत आहेच त्यामुळे त्याचा वेगळा असा उल्लेख करत नाहीच, तरी त्या सर्व घडामोडींचा या स्पर्धेवर अगदी तसूभरही परिणाम झाला नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
अगदी न चुकता असं म्हणता येणार नाही पण, अजूनही क्रिकेट हा खेळ मनापासून आवडणारा प्रेक्षक, ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर एखादा तरी सामना पाहतोच. सुरूवातीला थोडीशी निरस वाटणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगत जाते आणि प्रेक्षकही बहुदा सुरूवातीच्या काही सामन्यानंतरच या स्पर्धेमध्ये रुची दाखवतात असं दिसून येतं.
यावेळेला थोडी गडबड झाली खरी. ;) क्रिकेटवर अगदी विस्तृत धागे काढणारे आमचे प्रिय गुरूजी सध्या दुस-या एका धाग्यावर 'व्यस्त' असल्या कारणाने आज या ठिकाणी ही जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही स्वतःच घेतलेला आहे. =)) याबद्दल गुरूजी 'उस्मानाबाद' चर्चेतून वेळात वेळ काढून आमचा हा गुन्हा माफ करतील आणि आज या ठिकाणी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो.
विषयांचे वैविध्य जपणा-या मिपा बोर्डाला, ईपीएलशी(तीच ती, फूटबाॅलची इंग्लिश प्रिमियर लिग हो!=)) ) नावसाधर्म्य असणा-या आयपीएल नामक स्पर्धेचे वावडे नसावे अशी आशा व्यक्त करतो आणि हा धागा आयपीएलमधल्या घडामोडींवर, त्यातल्या क्रिकेटच्या सामन्यांवर चर्चा करण्यासाठी मायबाप मिपाकरांकडे सुपूर्द करतो.
#पहिला सामना#
सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राॅयल चॅलेन्जर्स बँगलोर
या मोसमातल्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने कोहली, डिव्हिलियर, के.एल. राहुलविना खेळणा-या राॅयल चॅलेन्जर्स बेंगलोर संघावर ३५ धावांनी विजय मिळवला. २०८ धावांचा पाठलाग करताना राॅचॅ बेंगलोर संघाचा तुक्का म्हणवाल्या जाणा-या श्रीयुत गेल नामक राक्षसासही आपला करिश्मा दाखवता आला नाही. 'डेथ ओव्हर'मधला आमचा आवडता बाॅलर नेहरा ;), भु.कुमार आणि राशिद खाने नामे अफगाणिस्तानचा कुणी एक बाॅलर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपून सनरायझर्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी आमच्या आवडत्या युवीने २७ चेंडूत ६२ धावांची धडाकेबाज खेळी करत सनरायझर्सना २०७ धावांचा टप्पा गाठून दिला.
वाचने
4832
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा.....आता सुर्यवंशम
हो ना...आयपीएल ला नाकं
In reply to अरेच्चा.....आता सुर्यवंशम by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्थानिक खेळाडूंना खेळण्याची
हे सच्चे क्रिकेट काय असते भाऊ
In reply to स्थानिक खेळाडूंना खेळण्याची by लोनली प्लॅनेट
सच्चे क्रिकेट जाऊद्या
In reply to हे सच्चे क्रिकेट काय असते भाऊ by विशुमित
झाली का जत्रा सुरू!
आधीच दिवे कामाच्या नावाने,
एसपीएल ?
In reply to आधीच दिवे कामाच्या नावाने, by अभ्या..
अर्र लै,
In reply to एसपीएल ? by कपिलमुनी
आम्च्या सोलापुरात चिंधी बॉल
In reply to अर्र लै, by अभ्या..
काय किसनराव , जिलब्या टाकत
कसोटी सामने हेच खरे क्रिकेट.
हा प्रकार बंद झाला तर बर्याच
In reply to कसोटी सामने हेच खरे क्रिकेट. by श्रीगुरुजी
चार लोकं पैसे कमावतात हे
In reply to हा प्रकार बंद झाला तर बर्याच by किसन शिंदे
या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी
आयप्येल = क्रिकेट?
तुम्ही आयप्येलला चक्कं
In reply to आयप्येल = क्रिकेट? by गामा पैलवान
आपल्याला तर आयपीएल आवडतं बाप्पू!
क्रिकेट थोडे बाजूला ठेवू ..
In reply to आपल्याला तर आयपीएल आवडतं बाप्पू! by बोका-ए-आझम