Skip to main content

जिओच ठेवायचं की. . . .

लेखक उपयोजक यांनी रविवार, 26/03/2017 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे. आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्‍याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत. तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का? जिओमुळे बर्‍याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत. आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय. आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील. https://www.jio.com/ आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे. या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील. संभ्रमावस्था वाढेल. तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं? फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी! तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?

वाचने 37951
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

जिओमुळे लोक तिकडे जाऊ नये म्हणून इतर कंपन्या भरपुर डेटा प्लान देत आहेत. साधारण पाचशे सहाशे रुपयांत प्रत्येक कंपनीचे चांगले combo 3g data+ calls plan होतेच आणि आहेत. खरी तुलना जिओच्या वेलकम ओफर संपल्यानंतरच करता येईल. फक्त मोबाइल नेटचीच तुलना करायला हवी. जियोच्या फक्त ४जी volte ची सर्वव्यापी ३/४जी सर्वीसशी तुलना होऊ शकत नाही. २) सर्व सरकारी बँका,कार्यालये यांना अजुनही bsnl ची सेवा घ्यावी लागते. ३) घरचे ब्रॅाडबँड घरीच राहाते आणि भारतात प्रवासात शेवटी मोबाइलचे ३जीच उपयोगाला येते. ४) उद्या रेल्वे/ कॅालेज/शाळांमधून ब्रॅाडबँड दिले तर ते बहुतेक bsnl चे असेल. इतर कंपन्या सब्सिडाज्ड नेट सर्विस देतील का?

(For some reason, whatever I write is not being converted to Devnagari, hence my response in English.) (a) it has almost zero coverage in Konkan which I visited frequently in the recent past, (b) I doubt if the speed is even 2G, forget about 4G; e.g., streaming takes hell of time while watching HFM video songs on YT on my laptop (it works okay with the not so good MTNL broadband), (c) often, the signal is weak; the middle LED is rarely green, (4) my iPad VERY RARELY WORKS with Geo- it simply indicates 'no internet connection'. So no point to continue beyond today.

"Every Jio Prime member - when they make their first paid recharge prior to 15th April using Jio's Rs 303 plan (or any higher value plan) - will get services for the initial 3 months on a complimentary basis. Your paid tariff plan will be applied only in July, after the expiry of the complimentary service," Reliance Industries Chairman Mukesh Ambani said.

In reply to by जव्हेरगंज

मुकेशभाईनं हे जरा उशीराच जाहिर केलंय! तोवर बर्‍याच जणांनी आयडीयाला स्विच केलंही असेल!

हचीसन मॅक्स ते ऑरेंज ते व्होडाफोन असा प्रवास मी पाहिला आहे... आता आयडिया + व्होडाफोन मधुन चांगली अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी ! ते व्होडाफोनचं यडं कुत्तरडं आपल्याला लयं आवडता बघा ! ;) ते जाहिरात येण्या आधी पासुन मला आवडतं व्हतं बघा ! कसं ? तर... असं... हा व्हिडियो एकदा फुल स्कीन करुन पहाच ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]

माझा jio च्या कार्डावरून कॉल लागत नाहीये...इंटरनेटमात्र व्यवस्थित सुरू आहे, सिम नवीन होते तेव्हा VOLTE असे लिहून यायचे ते आता दिसत नाहीये माझ्याकडे lenovo के४ note आहे

In reply to by टवाळ कार्टा

मलाही हाच प्रॉब्लेम आला आहे. VOLTE आणि त्याच्याशी रिलेटेड सेटींग दिसत नाहीये. आणि LTE च्या जागी 4G दिसत आहे. SIM Card Damage झाले आहे असे सांगण्यात आले आहे. Mobile Data मात्र व्यवस्थीत चालतो. Calls आणि Outgoing SMS चालत नाहीयेत. मोबाईल: Motorola G4 Plus

In reply to by टवाळ कार्टा

मलाही हाच प्रॉब्लेम येत होता. फोन बंद करुन पुन्हा चालू केल्यावर झाले सुरळीत.

In reply to by ५० फक्त

USB
हे जिओ फायने डेस्कटॉपला कसं कनेक्ट करता येईल, मार्गदर्शनाची गरज आहे.
USB पोर्ट ला डायरेक्ट कनेक्ट करता येते . त्यासोबत डेटा केबल येते त्याच्या साहाय्याने. मी वापरतोय याच पद्धतीने ..... ब्रॉडबँड कनेक्शन बंद करून आता जिओफाय वापरतोय . अतिवेगवान स्पीड मिळतोय आधीच्या ब्रॉडबँड पेक्षा. त्याच प्रमाणे पी सी ला USB वाय फाय अँटेना लावूनही वापरता येते.

जिओफाय हे डेडीकेटेड हॉटस्पॉट आहे असं समजा. तुम्ही मोबाईलमधून हॉटस्पॉट ऑन करण्याच्या ऐवजी या डिव्हाईसचे हॉटस्पॉट ऑन कराल. नाकी सारे सेम.

In reply to by सतिश गावडे

डेस्क टॉप पीसी विचारलं त्यांनी... मला वाटत वाय फाय कनेकटर लागेल

In reply to by संदीप डांगे

>> मला वाटत वाय फाय कनेकटर लागेल होय. हा मुद्दा माझ्याकडून निसटला. बहुतेक नविन डेस्कटॉपमध्ये ही सुविधा असावी. नसल्यास अजून एक उपकरण खरेदी करणं आलं. मी माझ्या एका अश्मयुगातील डेस्कटॉपला TP-Link TL-WN725N 150Mbps Wireless N Nano USB Adapter बसवला आहे. asdf हे छोटे उपकरण युएसबी पोर्ट्मध्ये टाकायचे. हे झाले हार्डवेअर. पहील्या वेळी हे उपकरण प्लग केले की ते त्याचे सॉफ्टवेअर (डिव्हाईस ड्रायव्हर) इन्स्टॉल करते. हे झाले की सॉफ्टवेअरचे स्कॅन बटन क्लिक केले की ते उपलब्ध वायफाय दाखवते. पुढची प्रक्रिया मोबाईलवरुन वायफायला कनेक्ट करण्यासारखीच.

In reply to by सतिश गावडे

सर्वांना धन्यवाद, कालच संध्या काळी ह्या यंत्राचा वापर सुरु केला आहे, खिडकीजवळ ४ ते ५ एम्बिपिस आणि कोप-यात ०.४ ते ०.५ अशी रेंज आहे पण हे फक्त डाउनलोडला, अपलोडला कुठेही ७ ते ९ एम्बिपिस दाखवतंय, हे काय भानगड आहे कळाले नाही. आज रात्री डेस्क्टॉपला जोडुन पाहतो काय होतेंय ते.

सध्या तरी जिओ फायद्याचेच आहे. रीलायंस ने मोबाईल रेट मधे क्रांतीच घडवून आणली. आठवा,४० पैसे कॉल,दुनिया मुठ्ठी मे तेच आताही घडतेय.२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ?तेव्हा आपली जुनी सीम कार्ड बंद न करता त्या मधे अत्यावश्यक कॉल साठी कमी कीमतीचे टॉप अप भरावे.आणि नेट साठी जिओ ऊत्तम ! मी माझ्या जिओ मार्फत यु ट्युब , न अडकता पाहतो. समस्या येते ती एच डी लाईव्ह पाहताना. रेल्वे रीझर्वेशन,लाईट बील ,एल आई सी, इ. सर्व सोपस्कार व्यवस्थीत पार पडताहेच की सर्फीगलाही अडचन येत नाही.मोठ्या फाईल डाऊनलोड करण्यासाठी चालू ठेऊन ईतरही कामे करू शकतो. तेव्हा माझे म्हणणे सध्या तरी जीओ च ऊत्तम !

सध्या तरी जिओ फायद्याचेच आहे. रीलायंस ने मोबाईल रेट मधे क्रांतीच घडवून आणली. आठवा,४० पैसे कॉल,दुनिया मुठ्ठी मे तेच आताही घडतेय.२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ?तेव्हा आपली जुनी सीम कार्ड बंद न करता त्या मधे अत्यावश्यक कॉल साठी कमी कीमतीचे टॉप अप भरावे.आणि नेट साठी जिओ ऊत्तम ! मी माझ्या जिओ मार्फत यु ट्युब , न अडकता पाहतो. समस्या येते ती एच डी लाईव्ह पाहताना. रेल्वे रीझर्वेशन,लाईट बील ,एल आई सी, इ. सर्व सोपस्कार व्यवस्थीत पार पडताहेच की सर्फीगलाही अडचन येत नाही.मोठ्या फाईल डाऊनलोड करण्यासाठी चालू ठेऊन ईतरही कामे करू शकतो. तेव्हा माझे म्हणणे सध्या तरी जीओ च ऊत्तम !

In reply to by मिलिंद के

सहमत. मी ही माझा व्हॉइसचा एअरटेलचा पोस्टपेड चालूच ठेवून डेटासाठी जिओ वापरतो. >>२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ? केवळ यासाठी आपण जिओचे आभार मानायला हवेत. :)

आता RCom ने रु २९९/महिना अनलिमिटेड ३जी डेटा + अनलिमिटेड कॅाल्स दिले आहे त्यासाठी आहे तो ३जी फोन वापरता येणार आहेच. त्यांचा स्पीड ७/३असतोच. एमटिएनेलने ९९/२८ दिवस प्रिपेडमध्ये २जिबी ३जी नेट दिलं आहे. स्पीड ३/३ असतोच. कल्याण स्टे फ्री वाइफाइ एक तासभर ४०/३० एमबिपिएस देते।तिथे सहा जिबी कंटेंट झटकन डाउनलोड होते.

जिओने आज "धन धना धन" योजना जाहीर केली आहे. आधीच्या ३०३ आणि ४९९ च्या योजनेत ट्रायच्या नियमांचे उल्लंघन होत होते. आता ३०९ आणि ५०९ च्या योजनेत नाही होणार. कसे ते ट्राय आणि रिलायन्सलाच माहिती :)

>>ट्रायच्या नियमांचे उल्लंघन होत होते.>> प्रमोशनल ओफर ठेवण्याच्या मुदतीवर बंधन आहे ठराविक महिन्यांचे. जियोवाले नाव बदलून स्किम चालवतात त्यावर एरटेलने आक्षेप घेतला आहे.

इतर नेटवर्क सारखा जीओचा स्पीड दिवसभर कमीजास्त होत नाही, बहुतेक वेळेस चांगला मिळतो , 1 gb खाऊन झाले की तो धापकन 128 kbps ला येतो. कॉल dropping चा मात्र खूप त्रास आहे. फुकटे गेले कीं त्रास संपणार ह्या आशेवर आहे. जिओ नेटवर्क अजून सगळीकडे उपलब्ध नाहीये. ह्या सगळ्या वर कधी मात होणार देव जाणे.