✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" ळ " च्या करामती

ऋ — ऋतु हिरवा, Mon, 04/03/2017 - 21:40
"ळ" हे अक्षर जास्तीत जास्त वापरुन मी काही रचना केल्या आहेत. छंदबद्ध किंवा चारोळी प्रकारचे हे लेखन आहे. म्हणून 'जे न देखे रवी ..' हे व्यासपीठ मी निवडले आहे. या रचना तुम्हाला कशा वाटतात बघा. सूचनांचे स्वागत आहे. "ळ" चे यमक जुळावे असा प्रयत्न केलेला नाही. १) आजोबांची कवळी अळिमिळी गुपचळी, नातू येता जवळी आजोबांची खुलली कळी २) कसलं खूळ , कोवळं मूल डावा डोळा , लोण्याचा गोळा बावळा बोका, मटकावी सगळा मुलाच्या डोळा , पाणी गोळा ३) पिवळे पातळ, निळे काठ गळा माळ पोवळ्याची | पाठी रुळे नागीण काळी माळी वळेसर बकुळीची | बाळी शोभे आगळी पाळी सजली कुड्यांनी |( पाळी .. कानाची ) भाळी टिळा रक्तवर्णी तेज निराळे मुखकमळी (ली )| नासिका चाफेकळी नथ ल्यायली हिर्याची | चाली चपळ पाउली दिसे कोवळीक वयाची | भोळा जीव खुळावला न्याहाळिता नार नखर्याची ||

प्रतिक्रिया द्या
1952 वाचन

💬 प्रतिसाद (4)

आवडल्या

पैसा
Wed, 04/05/2017 - 12:07 नवीन
रचना आवडल्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋतु हिरवा
Mon, 04/17/2017 - 17:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्तच. सगळ्याच रचना आवडल्या.

पद्मावति
गुरुवार, 04/06/2017 - 01:47 नवीन
मस्तच. सगळ्याच रचना आवडल्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पद्मवती ताई

ऋतु हिरवा
Mon, 04/17/2017 - 17:17 नवीन
धन्यवाद पद्मवती ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा