साधारण १ वर्षापूर्वी(१७ मार्च२०१६) कुबेर गुर्जींनी मदर तेरेसांवर लेख लिहून एकाच दिवसात तो मागे घेण्याची किमया केली होती. आज परत त्यांनी एक लेख लिहिला आहे. लिंक बघा
http://www.loksatta.com/…/singer-nahid-afrin-is-not-afrai…/…
म्हणजे तसा लेख बरा आहे पण त्यातले हे वाक्य वाचून उगाच भ्या वाटतंय. बाबाला परत लेख मागे घेणे, दिलगिरी व्यक्त करणे अशी कसरत करावी लागते का काय कुणास ठावूक! पण तसे करावे लागले तरी तो त्यांचा सभ्यपणा बरका! लगेच असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वतान्त्र्यावर घाला म्हणून बोंब मारायची नाय... तर वाक्य हे असे
“आसाममध्ये सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली गायिका नाहीद आफरीन हिच्याविरोधात ४६ मुस्लीम मौलवींनी काढलेले पत्रक आणि संजय लीला भन्साळी या सुमार चित्रपटकाराच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविरोधात राजस्थानातील कुठल्याशा फुटकळ संघटनेने सुरू केलेले आंदोलन हा तर्कबुद्धीविरोधात सध्या सुरू असलेल्या जिहाद वा धर्मयुद्धाचाच एक भाग आहे...”
तसा गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी विकत घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात. पण गुदस्त साली माणूस मदर तेरेसांवरचा लेख मागे घेऊन आणि परत वर किरीस्ताव लोकांच्या पाया पडून पवित्र झाला आणि आपला त्याला विटाळ होईल अशे वाटून आपण जरा लांब राहून मजा बघायला लागलो.
मी शाळेत असताना बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो.( हे माझे वैयक्तिक मत आहे. आमच्या शाळासोबत्यानी दात विचकू नये... बायकोला हे असे सांगायची हिम्मत नाय आणि ती शाळा सोबती पण नाय...असो) म्हणजे अगदी कायम पहिला नाही तरी पहिल्या १०त यायचो, आपला एक लय जिगरी फ्रेंड होता. तो पण तसा आपल्यावाणी हुशार, घरी येण्या जाण्यातला, आई बापाला चांगला म्हाहीत. एकदा घटक चाचणी होती, बहुधा ५वी असेल.त्याला इंग्रजीचा पेपर थोडा अवघड जात होता, त्याने समोर बसलेल्या अनघा बापट नावाच्या पोरीच्या पेपर मध्ये तोंड घातलं अन मास्तरनं धरलं. पोरग या आधी कधी कॉपी न केलेलं त्यामुळे त्याला कुणाला न कळत बघायची ट्रीक माहित नव्हती. मास्तरनी लय हाणला. परत वर पेपर फाडला. आपण घरी येऊन आईला आणि बाबांना सगळी ष्टोरी तिखट मीठ लाऊन सांगितली. दोघांना जरा आश्चर्य वाटल थोडा राग आला, तसा आपल्याला लय चेव चढला अजून काही बाही बोललो असेल ते लक्षात नाही, पण बाबा जे म्हटले ते मात्र कायमच लक्षात राहीलं.
ते म्हणाले, “तू हुशार आहेस, चांगले मार्क पडतात. पेपर सोपे जातात म्हणून तुला कॉपी करायचा मोह होत नाही हे चांगलच. त्याचा अर्थ तू शुद्ध चारीत्र्याचाच आहेस हे खरं. पण तसाच राहशील कि नाही हे कसे कळणार? कधी तुला पेपर अवघड आला आणि आता कमी मार्क पडतील. कदाचित नापास हि होऊ, मास्तर, मित्र, आई, बाबा रागावतील, छी थू होईल असे वाटून समोरच्याचा पेपर बघायचा मोहही जेव्हा होईल तेव्हा तू कसा वागतोस ह्याच्यावर तुझा खरं चारित्र्य ठरेल.”
गिरीश कुबेरचे हि तसेच झाले असावे. नरेंद्र मोदी, भाजप, हिंदुत्ववादी हे तसे SOFT TARGETS, त्यांना लाथा घातल्या तरी तुम्हाला लोक पुरोगामी म्हणणार, पण किरीस्ताव, मुस्लीम तसे नाहीत. त्यांच्या निरीला हात घातला आणि वाट लागली कि राव. लय दबाव आला असल. आपण समजू शकतो पण आमच्या बाबांनी म्हटल्या प्रमाणे कठीण परिस्थितीत तू कसा वागतोस ह्याच्यावरच तर तुझे खरे चारित्र्य ठरते भाऊ.(आता ते लोकमत वाल्यांनी इसीस बद्दल लिहिताना पेपरात लावलेल्या पिगी बँक च्या फोटू वरून माशा उठल्या होत्या तेव्हा त्यांनी पण असच शेपूट घातलं होतं ते उगाच आठवलं...ते कशाला लोकसत्ताच्याच ६ जुलै २०१४ च्या रविवार पुरवणीत संजय पवार ह्यांनी “गरज राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्राची “ म्हणून लेख लिहिला होता. तो आता संकेत स्थळावरून गायब झालाय. – व्हायरस असेल नाहीतर आम्हाला नीट शोधता येत नसेल, माफी मागून मागे घेतला नसता का नाहीतर.... )
---आदित्य
वाचने
4084
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिंक?
बाकी, लेख काही कळला नाही. पण
जुनाच लेख
In reply to बाकी, लेख काही कळला नाही. पण by संदीप डांगे
अरेच्या! हो की!
In reply to जुनाच लेख by अनन्त अवधुत
हा हा हा
Link chalat nahiye, kadachit
Link
In reply to Link chalat nahiye, kadachit by सुखी