Skip to main content

"तेलुगु शिकण्यासाठी" WhatsApp समूह

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/04/2017 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
तेलगू शिकण्याची-शिकवण्याची आवड, गरज, इच्छा असलेल्यांसाठी तेलुगु शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करीत आहोत. समुहात सामील व्हायला इच्छूक असलेल्यांनी मला व्यनि करुन आपला WhatsApp क्रमांक कळवावा. इतर मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहेच!

वाचने 4765
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

उत्तम प्रयोग. हिंदी व मातृभाषेव्यतिरिक्त १-२ भारतिय भाषा अवगत असल्या पाहिजेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझा मुलगा चेन्नईत असल्यामुळे मला हे फारच जाणवत आहे. असाच तामिळ भाषेसाठी धागा काढा.

In reply to by विनटूविन

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी हा तामिळ भाषेसाठी धागा आहे आणि संबंधित WhatsApp समूह आहे. In fact, त्या धाग्यावरूनच मला तेलगू शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.

मिपावर गुणवत्ता आहे असे हे म्हणतात ते खोटे नाही.

In reply to by पुंबा

'उद्धरेदात्मनात्मानम' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :)) अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे. जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.

In reply to by पुंबा

'उद्धरेदात्मनात्मानम...' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :)) अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे. जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.

तेलुगु शिकण्यासाठी या WhatsApp समूहाला भरघोस प्रतिसाद देत असल्याबद्धल मिपाकरांचे धन्यवाद. प्रत्यक्ष जीवनात परिचित नसलेल्या लोकांना जोडून एक WhatsApp समूह बनवणे आणि तो चालवणे याचा मला काहीच पूर्वानुभव नव्हता, पण आता हळूहळू शिकतोय. समूहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विनंती, मला आपल्या फोन नंबरसोबतच आपले पूर्ण नाव पाठवावे म्हणजे मला आपला नंबर सेव करणे सोपे जाईल. काहीजणांचा मिपावरील आइडी हा कॉन्टॅक्ट यादीत व समूहावरील प्रतिसादांमध्ये दिसणे थोडे विचित्र वाटते. मिपावरून सुरु झालेल्या इतर समूहांचे Admins, अपरिचित लोकांचे नंबर कोणत्या नावाने सेव करतात?

असंच आवाहन मी तमिळ शिकण्यासाठी इथं केलं होतं.त्यावेळी डांगे साहेब लै भडकले. हे नैतिकतेला धरुन नाही वगैरे! मिपावर काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय याला महत्व आहे असं म्हणतात ते खोटं नाही. असो. वामन साहेब तुमच्या उपक्रमास खुप सार्‍या शुभेच्छा!