शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती,
ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या,
फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता.
तिला समुद्र आवडतो, मनापासून..
त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता,
जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ..
तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?"
तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी,
समोर अथांग समुद्र.. त्याला भेटू शकत नाही,
लाटांच्या या पायघड्या त्याने अंथरल्यात, त्यांवर चालू शकत नाही."
"बस, इतकंच.."
त्याने हलकेच तिला व्हीलचेअरवरून उचलून घेतलं,
मग वाळूत खुणा उमटवीत दोघे चालू लागले,
तो त्याच्या पावलांनी, तीही त्याच्याच.
प्रतिक्रिया
छान !
कथा आवडली. हळुवार एकदम.
सुंदर !
तो त्याच्या पावलांनी, तीही
तो त्याच्या पावलांनी, तीही त्याच्याच.क्या बात है. सुरेख.आवडल्या गेली आहे
आवडली
लेखक /लेखिका कोण आहे ??
मग वाळूत खुणा उमटवीत दोघे
Role reversal