✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तहान

प
परशु सोंडगे यांनी
Fri, 03/24/2017 - 23:20  ·  लेख
लेख
कथा आणि व्यथा ****************************** तहान त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडपाट बाभळी होत्या.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती. गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता. त्यात वशिल्यावाल्याला... नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं. टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता...पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच... आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला. सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं. आता या बापुडया कुठून पाणी आणणार...मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ? तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय... तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ? पाणीचं कुठं दिसेना. आता त्यांनी मोर्चा...काॅलनीतल्या घरांकडे वळवला. अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या...पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं.ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ? भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत. मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं...आणी कुणी बोलतं ही नव्हतं. आता हे काय करणारं ? मला उत्सुकता लागली होती. देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद...टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून... त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही. त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला पाण्याला कमी नव्हतं. आमची सत्ता...आमचं माणसं... आमचं पाणी... असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी देणं शक्य नव्हतं. पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक ... लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर...रागानं त्यांच्याकडे पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले. " दादा दे ना पाणी. " " पळा.. पाणी बिणी काय नाही." " दे ना रे...एक एक डराम दे फक्स्त..." " पळा हे पाणी फुकाटचं नाय.... " दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे..." " आता पळता का कसं .." तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट.... मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम...एक प्रौढ बाई पळाली नाय. अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं .." " पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं" "मग विकते देते काय ," " जाती की नाय .आयघाले ..." देवगावकर डायरेक्ट शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली. देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला. ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं. एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर...लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले. मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण... त्यांची तहान....? या जगात असे किती लोक असतील...ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी पाणी नाही. पाणी... आणि ....काही काही आठवत राहिले. दारात आलो तर... पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देलगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला ...हंडा . ...सांडलेलं पाणी...माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं. तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर....भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती....ती माणसाच्या रक्ताची ही असू शकते. पाणी हे जीवन जपून वापरा. ते प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते याचे भान ठेवा. ****************************** परशुराम सोंडगे, पाटोदा( बीड ) हह 9673400928
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2707 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

तुमच्या कथांमधून जाणवणाऱ्या

एस
Fri, 03/24/2017 - 23:34 नवीन
तुमच्या कथांमधून जाणवणाऱ्या व्यथा टोचतात खरं. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

+1 दमदार!!!

जव्हेरगंज
Fri, 03/24/2017 - 23:48 नवीन
+1 दमदार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अभारी आहे

परशु सोंडगे
Sat, 03/25/2017 - 06:59 नवीन
अभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१११

भिंगरी
Fri, 03/24/2017 - 23:39 नवीन
+१११
  • Log in or register to post comments

:(

स्रुजा
Sat, 03/25/2017 - 00:13 नवीन
:(
  • Log in or register to post comments

कथा आणि वास्तव

गामा पैलवान
Sat, 03/25/2017 - 03:49 नवीन
परशुराव, कथा म्हणून सरळसोट आहे, तर वास्तव म्हणून दाहक आहे. पाणी नसल्याने कशी खराब हालत होते ते अनुभवलंय. आमच्याकडे घरी पाण्याचं कधीच दुर्भिक्ष्य नव्हतं. ट्रेकमध्ये वाट चुकलो आणि पाणी संपलं तेव्हा तोंडचं पाणी पळालेलं होतं. तेव्हढ्या एका अनुभवावरून कल्पना करता येते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परशु सोंडगे
Sat, 03/25/2017 - 07:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भयानक!

कंजूस
Sat, 03/25/2017 - 05:57 नवीन
भयानक!
  • Log in or register to post comments

दाहक वास्तव

सिरुसेरि
Sat, 03/25/2017 - 12:32 नवीन
दाहक वास्तव .. डोळे उघडायला भाग पाडणारं लेखन .
  • Log in or register to post comments

दाहक कथा

कविता१९७८
Sat, 03/25/2017 - 12:43 नवीन
दाहक कथा
  • Log in or register to post comments

कथा / गोष्ट काही खराब नाही

समाधान राऊत
Sat, 03/25/2017 - 21:46 नवीन
कथा / गोष्ट काही खराब नाही पण शेवटी तकिया कलाम म्हणुन मोबा. खटकला म्हणुन एक प्रतिसाद कमी
  • Log in or register to post comments

मनाला चटका लावणारी कथा

ज्योति अळवणी
Sun, 03/26/2017 - 00:55 नवीन
मनाला चटका लावणारी कथा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा