✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे

र
रातराणी यांनी
Wed, 02/01/2017 - 19:32  ·  लेख
लेख
aa "अगं पण का? माझं काय चुकलंय?" "अरे तुझं नाही काहीच चुकलेलं, पण मी शब्द दिलाय त्याला.." "तुझ्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलीये... आजतरी नको जाऊस..." "त्यांच्यासाठीच थांबले होते इतकी वर्ष, फक्त एक वाढदिवस मला माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करू दे..प्लीज" सागरकिनारे... गुणगुणत घराबाहेर पडलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पहातच राहिला. आयुष्यात अनपेक्षित क्षणी प्रेमात पडलेले दोघे, कर्तव्याच्या, समाजाच्या जाणिवेनं दुरावलेले. दोघांनाही तारून नेणारं तिचं वचन, साठावा वाढदिवस फक्त त्याच्याबरोबर. त्यांच्या ठरलेल्या समुद्रकिनारी ओळखीच्या पाऊलखुणा पाहून ती सुखावली. तिनं त्याच्या पावलांवर चालत विरहाची एकेक वर्ष पुसून टाकली. दोघांनी हातात हात घेऊन नवीन पाऊलखुणा बनवल्या. एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न, एक प्रवास पूर्ण झाला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2479 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

मस्त

ज्योति अळवणी
Wed, 02/01/2017 - 19:46 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

हायला....मलापण कोणीतरी असे

टवाळ कार्टा
Wed, 02/01/2017 - 21:24 नवीन
हायला....मलापण कोणीतरी असे म्हणालेले... मग मी विचारले...जेवताना एकाच कवळी वापरायची का?
  • Log in or register to post comments

हायला....मलापण कोणीतरी असे

टवाळ कार्टा
Wed, 02/01/2017 - 21:38 नवीन
हायला....मलापण कोणीतरी असे म्हणालेले... मग मी विचारले...जेवताना एकाच कवळी वापरायची का?
  • Log in or register to post comments

ठीकठाक.

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2017 - 21:56 नवीन
ठीकठाक.
  • Log in or register to post comments

नाही आवडली

साहेब..
गुरुवार, 02/02/2017 - 08:30 नवीन
सॉरी
  • Log in or register to post comments

आवडली

निओ
गुरुवार, 02/02/2017 - 13:02 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे.

भाऊजी
गुरुवार, 03/23/2017 - 18:47 नवीन
स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा