Skip to main content

बाळी घालण्याची परंपरा विजयानगरमध्ये

बाळी घालण्याची परंपरा विजयानगरमध्ये

Published on गुरुवार, 23/03/2017 प्रकाशित
विजयनगर (राजधानी, नवे आंध्रप्रदेश. पुण्यापासुन ९०० किमी) येथे एका मिटींगमध्ये २ प्राध्यापक होते, जे पन्नाशीत असावेत. त्या दोघांनी कानात बाळी घातलेली होती ... अगदी आपल्या पुण्यातील सध्याच्या फॅशनसारखी ! कुतूहल चाळवले व त्यांना नंतर सांगितले की, पुण्यात पेशव्याच्या आभूषणांत अशी बाळी घालण्याची पद्धत होती व सध्या तरुणांत ही फॅशन जोरदार आहे. त्यांनी सांगितले की, "आमचे पुर्वज १०० वर्षांहूनही आधी पुण्यातुनच इकडे आल्याचे आम्हाला सांगितले जाते. आमची नाळ पुणे आणि पेशव्याशीच जोडली गेली आहे व ही बाळी घालणे आमच्याकडे अभिमानाचे व अनिवार्य मानले जाते". साहजिकच ही माहिती अत्यंत रोचक आहे. कुणी अधिक प्रकाश टाकेल का?

याद्या 3401
प्रतिक्रिया 11

त्याना मराठी बोलता येत होते का

In reply to by पैसा

माझे संभाषण इंग्रजीत झाले त्यामुळे पुढीलवेळी विचारेन की, खाजगीतील संभाषणात ते जी तेलुगू वापरतात त्यात मराठी शब्द आहेत का की जे इतर तेलुगूभाषिक वापरत नाहीत.

In reply to by अजय भागवत

ह्या हापिसात नसतो तो आता, आणि लोकांना आपले सणवार माहीत असायची बोंब असते हल्ली; लोकांचे कुठून माहीत असायला!!

१) शिवाजीचे कुळ मूळचे राजस्थानातले. तिकडे राजस्थानात बाळी घालतात. २) शिवाजीने शेवटी गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध वाढवले त्यासाठी पिंगुळी नावाच्या वकिलाने पत्रव्यवहार केला आणि नंतर ते आणि त्याचेबरोबर काहीजण तिकडेच राहिले. बाळीची प्रथा अशी पसरली असेल???

In reply to by कंजूस

शिवाजी महाराज मुळचे रजपुत नव्हते असे संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. मागच्या आठवड्यात पेप्रात बातम्या वाचल्याचे स्मरते.

In reply to by धर्मराजमुटके

मागच्या आठवड्यात पेप्रात बातम्या वाचल्याचे स्मरते.
मुटके साहेब, छोट्या छोट्यागोष्टीवरुनही भावना दुखावतात. नेमके संदर्भ न देता, असे वरवरचे माहिती देणे टाळलेले अधिक बरे असे सुचवावेसे वाटते.