Skip to main content

चलच्चित्र

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 21/03/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्रकन इथे, भुर्रकन तिथे उडता पक्षी, काढी नक्षी एक गिरकी, एक फिरकी घेत हलकी, गळे पान की सुळूक असा, सुळूक तसा लवलवता, हलतो मासा शीतल धुंद, झुळूक मंद पहाट वारा, गुलाबी शहारा वेगवेगळी, ऊले पाकळी पहाट वेळी, खुलते कळी प्रकाश बिंदू, निशा समय उडे काजवा, ठाय लय
लेखनविषय:

वाचने 569
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

दुसऱ्या कडवे असे वाचावे ... "एक गिरकी, एक फिरकी घेत हलकी, गळे पानुली". प्रकाशित केल्यानंतर लेखनात दुरुस्ती करण्याची काही व्यवस्था आहे का?