वसंतोत्सव
ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
२) करंजाची हिरवीगार कोवळी पालवी परीसरात जणूकाही रोषणाईच.
३)
४) काटेरी पांगारा वर्षभर काट्यावर राहून वसंतात मात्र लाल पुष्पपताकांनी बहरतो.
५)
६) काळाकुडा बहरताना आपल्या नावातील काळा रंग झाकून टाकताना दिसतो.
७) पांढर्या कुड्याची फुले डोंगर दर्यात डोकावताना दिसतात.
८)
९) पळस उर्फ फ्लेम ऑफ फॉरेस्ट पहाता अगदी मशाली पेटवल्याचा भास होतो.
१०) काटेसावर उर्फ शाल्मलीची फुले नववधूप्रमाणे लाजरी-गईजीरी वाटतात.
११) करवंदाच्या जाळीतून फुलांचा दरवळणारा सुगंध हवा हवासा वाटत असतो.
१२) वसंतातल्या सुगंधाची राणी म्हणजे सुरंगी असे वाटते मला. वर्षातून एकदाच मिळणारा सुरंगीचा सुगंध अनुभवणे म्हणजे स्वर्गसुख.
१३)
ही तर आपल्या फांद्यांनाही नैसर्गिक गजर्यात गुंफते.
१४) गगनाच्या सुशोभीकरणासाठी गिरीपुष्प भरभरुन फुलतो.
१५) गगनाला भिडण्याची आस ठेवणारा पांढर्या रंगातील गिरीपुष्प
१६)
१७) बाळकैर्या बाळसं धरतायत.
१८) ऐटदार कांचन.
१९) पर्जन्य वृक्षावर पुष्पवर्षाव.
२०) उन्हात जणू चांदण पसरलय अस पैशाच झाड म्हणजे वावळ.
२२)

वाचने
3060
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मस्तच
जागूताई, अहाहाच!
लाजवाब !!!! सुरेख फोटोग्राफी
WebP
मस्तच आहेत सगळे फोटो.
सु रे ख !!!
हा माझा सगळ्यात आवडता ऋतू !
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shettyउरणच्या द्रोणागिरीवर खूप
कंजूस हो तो डोंगर
मस्तच
एकसे बढकर एक!