मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वसंतोत्सव

जागु · · मिपा कलादालन
ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव. १) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो. Photo: २) करंजाची हिरवीगार कोवळी पालवी परीसरात जणूकाही रोषणाईच. Photo: ३) Photo: ४) काटेरी पांगारा वर्षभर काट्यावर राहून वसंतात मात्र लाल पुष्पपताकांनी बहरतो. Photo: ५) Photo: ६) काळाकुडा बहरताना आपल्या नावातील काळा रंग झाकून टाकताना दिसतो. Photo: ७) पांढर्‍या कुड्याची फुले डोंगर दर्‍यात डोकावताना दिसतात. Photo: ८) Photo: ९) पळस उर्फ फ्लेम ऑफ फॉरेस्ट पहाता अगदी मशाली पेटवल्याचा भास होतो. Photo: १०) काटेसावर उर्फ शाल्मलीची फुले नववधूप्रमाणे लाजरी-गईजीरी वाटतात. Photo: ११) करवंदाच्या जाळीतून फुलांचा दरवळणारा सुगंध हवा हवासा वाटत असतो. Photo: १२) वसंतातल्या सुगंधाची राणी म्हणजे सुरंगी असे वाटते मला. वर्षातून एकदाच मिळणारा सुरंगीचा सुगंध अनुभवणे म्हणजे स्वर्गसुख. Photo: १३) ही तर आपल्या फांद्यांनाही नैसर्गिक गजर्‍यात गुंफते. Photo: १४) गगनाच्या सुशोभीकरणासाठी गिरीपुष्प भरभरुन फुलतो. Photo: १५) गगनाला भिडण्याची आस ठेवणारा पांढर्‍या रंगातील गिरीपुष्प Photo: १६) Photo: १७) बाळकैर्‍या बाळसं धरतायत. Photo: १८) ऐटदार कांचन. Photo: १९) पर्जन्य वृक्षावर पुष्पवर्षाव. Photo: २०) उन्हात जणू चांदण पसरलय अस पैशाच झाड म्हणजे वावळ. Photo: २२) Photo:

वाचने 3060 वाचनखूण प्रतिक्रिया 12

पैसा Tue, 03/21/2017 - 17:22
WebP फाईल फॉर्मॅट्मधली चित्रे फायरफॉक्स ब्राऊझरवर दिसत नाहीत.

जागु Wed, 03/22/2017 - 12:58
कंजूस हो तो डोंगर गिरीपुष्पांनी भरला आहे. तुम्ही गेला होतात का ? रुस्तम, अबोली, दिलीप, किसन शिंदे, स्रुजा, मदनबाण धन्यवाद. पैसा क्रोम मधे दिसतील फोटो. संजय पिकासा फंक्शन बंद झाल्याने आता साईज सिलेक्शन कठीण झाल आहे.

सत्यजित... Mon, 05/15/2017 - 18:15
अतिशय सुंदर,मनमोहक,जिवंत छायाचित्रे व मांडणी! या निमित्ते,आम्हीही एक वसंतोत्सव जगलो! धन्यवाद,शुभेच्छा!