रात्री डब्यात आलेले छोले खाऊन सोडलेली ही 'मळमळझल' पेश-ए-खिदमत आहे.
उथळ जळाची खळखळ
अटळ वळूची मळमळ
कशास या वेटोळ्या
कशास रे ही वळवळ
सुरी असे ही बोथड
उगाच का ही चळचळ?
जखम दिसावी गहिरी
खरी असावी कळकळ
झुळूक वाहत नसली
तरी असावी सळसळ
इनो जरासा घ्यावा
रुकेल तुमची जळजळ
भरून येती डोळे
प्रवाह वाहे भळभळ
कळी कळे का कोणा?
करा कशाला खळखळ?
कुटाळ टाळा 'स्वामी'
विटाळ आहे चळवळ
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1450
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरारा!
जबरदस्त!