मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फलज्योतिष या विषयावर आपले मत काय?

प्रकाश घाटपांडे · · कौल

वाचने 3324 वाचनखूण प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

अमोल केळकर 16/02/2009 - 13:09
१ ल्या क्रमांकाला मत दिले आहे -------------------------------- अवांतर - असाच एक कौल इथे पहावयास मिळेल --------------------------------------------------

अवलिया 16/02/2009 - 13:18
आपला तर विश्वास आहे बुवा!!! (केपी तज्ञ) अवलिया
क्रमांक दोनला मत दिले आहे. काही ठोकताळे चुकतात. बदलत्या जगाबरोबर मानवी जीवन आणि स्वभाव ह्यातही जमिन-आस्मानाचा फरक होत चालला आहे. त्याचा परिणाम असावा. ग्रहगोलांच्या प्रभावाखाली एका विविक्षित काळी जसे लोकं वागत तसेच आजही वागत असतील असे वाटत नाही. ज्ञानार्जनाची माध्यमं पुर्वीच्या काळी जेवढी होती त्याहून कितीतरी जास्त हल्ली आहेत. तसेच, पाळावयाचे विधीनिषेध ही बदललेले आहेत. त्यामुळे नव्या-नव्या पिढ्यांवर होणारे संस्कारही बदलत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिसाद/प्रतिक्रियाही बदलत आहेत. म्हणूनच जुन्या ठोकताळ्यांना चिकटून बसल्यास ते चुकण्याचाच अधिक संभव आहे असे वाटते. आधुनिक जिवनशैली आणि आधुनिक सामाजिक मुल्यांचा विचार करून त्यावर आधारित ग्रहगोलांचा प्रभाव विश्लेषित करता आला तर त्या ज्योतिषाची भाकिते बर्‍यापैकी खरी ठरतील असे वाटते. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
आपण कुंडल्यांबद्दल अभ्यास करुन काही निरिक्षणे मागे नोंदवली होती ,त्यामुळे त्याच अंगाने विचार करता आम्हाला फलज्योतिष आता एक थोतांड वाटते.

विसोबा खेचर 16/02/2009 - 17:19
तो केवळ अंदाज आहे या पर्यायाला मत दिले आहे. अंदाजाने काही ठोकताळे बांधले जातात. काही खरे ठरतात, बरेचसे फसतात! आपला, (मटका किंग) तात्या.

ब्रिटिश 16/02/2009 - 19:51
तो एक धंदा हाय. विदाऊट इनवेस्टमेंट मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
घाटपांडे साहेब; तुम्हाला एखादा मानलेला ज्योतिष्य भेटला तर त्याला विचारा की पुढे मानव जातीची चंन्द्रावर या मंगळावर वसाहत झाली, आणी त्यांना तिथे अपत्ये झाली तर त्यांची कुंडली कशी बनवाल बॉ ?? :/ :/ ज्योतिष्य आम्हाला पाहुन पळतात....
ज्योतिष या विषयाला कोणि कितिही नावे ठेवली...तरी जर एखादा ज्योतिषी आपल्या समोर आला तर कोणताही मनुष्य कुतुहला पोटी का होइना पण माझ्या भविष्यात काय होणार आहे हे अगदी हटकुन विचारतो.. किन्वा आपला हात त्याच्यापुढे करुन मोकळा होतो ;)..आणि ही वस्तुस्थिती आहे.. याला कारण म्हणजे मनुष्याची आपले भविष्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा हेच आहे...आणि ते अजुन पर्यन्त तरी तंतोतंत कुणि छातिठोक पणे सान्गु शकत नाही...पण त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयन्त आपल्या पुर्वजानी ग्रह मालिकेचा सुक्ष्म अभ्यास करुन केला आहे.. पण खरा ज्योतिषी तुम्हाला तुमच्या भावी अयुष्यात घड्ण्यार्‍या गोष्टी सान्गु शकतो...पण त्या बदलु शकत नाही...आणि इथेच बरेच लोक अंध विश्वासांना बळी पड्तात...आणि नाहक आपला पैसा आणि वेळ घालवतात.. जसे आपण एखाद्या घाटा मधुन गाडी चालवताना आपल्याला धोक्याच्या सुचना देणारे फलक दिसतात..ते दिसल्यावर आपण वेळीच सावध होतो...पण जे फलक दिसुनही सावध होत नाहित त्याना अपघात घडतोच... तसेच ज्योतिष शास्त्राचे पण आहे...ज्योतिष शास्त्र हे फक्त पुढे काय होणार हे सान्ग्णारे फलक आहेत...ते फक्त घड्ण्यार्‍या घटनांची आगवु सुचना देते...त्या बदलत नाही... तेव्हा त्याच्या आहारी जाउ नये...एखाद वेळी कुतुहल म्हणुन ठीक आहे... ------------------------------------- केदार जोशी

सुनील 17/02/2009 - 07:12
फलज्योतिषाचा व्यवसाय करणारे सगळेच ते एक शास्त्र आहे असे म्हणतात. त्यापैकी काही थोडेच ते शास्त्र आहे परंतु त्याला मर्यादा आहेत असे उघडपणे म्हणतात. अन्य ते एक गुढ शास्त्र आहे त्याला विज्ञानाचे नियम लागू होत नाहीत असेच सांगत असतात. परंतु त्या सर्व मंडळींना तो केवळ अंदाज आहे याची पूर्ण कल्पना असते! फलज्योतिषांवर टीका करणारे बहुतेक लोक ते एक थोतांड आहे असेच मानतात. परंतु त्यांतील काही मंडळी मात्र तो एक मानसोपचार आहे असे मानून त्याचा त्याप्रमाणॅ कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करीतात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझा यावर थोडाबहूत विश्वास होता. आता अजून वाढला आहे. मागे (म्हणजे २००८ मधेच) जेव्हा महाराष्ट्रात पाऊस पडत नव्हता तेव्हा एका मिपाकर जोतिषाने सांगितले होते ऑगस्टच्या पहील्या आठवड्यापर्यंत नक्की पाऊस पडेल. आणि तसा पाऊस पडला. त्या सदस्याची प्रचंड टिंगलटवाळि मिपावर झाली होती. पण जसा त्याने सांगितला तसा पाऊस पडला होता. आणि त्याने त्याचे ज्योतिषाप्रमाणे विश्लेशणही दिले होते. म्हणून ज्योतिष हे एक शास्त्र आहे यावर माझा तरी विश्वास आहे. म्हणून पर्याय २ ला मत दिले आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सर्किट 18/02/2009 - 14:13
मलाही सदर ज्योतिषाविषयी खूपच आदर आहे. पण त्यांना मिसळपावावरून गचांडी मिळाली, हे त्यांना त्यांच्या कुंडलीत दिसले नाही, ह्याची गंमत वाटते. बाकी कुठलेही ज्योतिष हे थोतांड आहे, हे माझे मत. हल्लीच कुठेतरी वाचले, की हस्तसामुद्रिकावर विश्वास ठेवू नका, कारण थोट्या लोकांनाही भविष्य असते. वरील चंद्र/मंगळावरील पत्रिकांचा प्रतिसाद अतिशय अचूक आहे. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एक भविष्य खरं ठरलं हे मान्य. पण त्याबरोबर किती चुकीचं ठरलं आणि/किंवा किती वर्तवता आलंच नाही याची अचूक आकडेवारी मिळत नाही तोपर्यंततर भविष्याला शास्त्र म्हणणं अशक्य आहे. 'मी म्हणतो म्हणून हे असंच' असं शास्त्रात अमान्यच असतं. सध्यातरी एवढीच कारणं चटकन सुचत आहेत, पण पुरेशी आहेत, हे थोतांड हे मान्य करण्यासाठी. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक अचूक भविष्य वर्तवल्यावर म्हणजे सकारण वर्तवल्यावरदेखील 'संशोधकानी' ते बरोबर ठरले हे खुल्या दिलाने मान्य केले नाही. उलट थट्टाच जास्त केली. असो चालायचेच. बाय द वे मुक्तसुनीतरावांचा "आपण आणि आपले "ठराविक साचे". हा लेख मात्र पटला हो. (साचेबद्ध) पुण्याचे पेशवे मॅटर-अँटीमॅटर अशा वैज्ञानिक अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारा Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शनि-मंगळाचा पावसाशी काय संबंध, कसा संबंध याचं उत्तर मलातरी सापडलेलं नाही, कोणीही दिलेलं नाही. "ज्योतिषी सांगतो म्हणून" हे तर्कदुष्ट सोडून थोडं तर्कशुद्ध तुम्ही देणार का थोडं खोदकाम करून किंवा तुमच्या माहितीमधून? जेव्हा शनि-मंगळ युती होती तेव्हा भारताच्या इतर काही भागात पाऊस व्यवस्थित पडत होता (आणि जगाच्याही बर्‍याचशा भागात सगळं 'आलबेल' होतं), आणि इथे पाऊस नव्हता याचं उत्तर शनि-मंगळ देणार का आपण आणि/किंवा ज्योतिषी? बाकी कोणी एका माणसाने मान्य करण्याचा प्रश्नच नाही. सूर्य हा आपला जनक तारा आहे किंवा पृथ्वी गोल आहे हे कोणी माणसाने मान्य करण्याचा प्रश्नच नसतो, ते तसं "आहे", हे असं शास्त्र असतं. बाकी शास्त्राला, प्रयोगातून सिद्ध होणार्‍या विज्ञानाला अंधश्रद्धा मानली की मग सगळे भोंदू (बाबा, बुवा, ज्योतिषी, जादूगार, इ.इ.) शास्त्रज्ञ होणार आणि बिच्चारे आईनस्टाईन, न्यूटन, एडींग्टन भोंदूच ठरणार! चालू द्या ... संगणक, वर्ल्ड-वाईट-वेब, मायक्रोवेव्ह अव्हन यांचा शोध लावणारेही भोंदू आणि अंधश्रद्धच का? अदिती

In reply to by प्रकाश घाटपांडे

मृग नक्षत्र आन पावसाचा संबंध रात्री जागून तारे बघायचे तेव्हापासून हा भूगोल मला माहित आहे हो, काका! पण प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे, की शनि-मंगळ युती असताना अभद्र गोष्टी फक्त महाराष्ट्र आणि आजूबाजूचा परिसर एवढ्याच मर्यादित का होत्या, बाकीच्या जगातूनही शनि-मंगळ युती तशीच दिसत होती, मग तिकडे गोष्टी (उदा. हवामान, शेअर बाजार, इ.) सुरळीत होत्या. तर आता सांगा, शनि-मंगळ युतीला पाऊस नसण्याचं दूषण कसं देणार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे.
मुद्दा हा कि अशीच गोष्ट शनी मंगळा युतिला ही लागु आहे प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे. मुद्दा हा कि अशीच गोष्ट शनी मंगळा युतिला ही लागु आहे नाही काका ... मुद्दा बराचसा सुटलेला आहे! शनी-मंगळ युतीमुळे टोकाच्या गोष्टी होतात तर त्या जगभर व्हायला पाहिजेत ना; किंवा जिथून ही युती दिसते तिथून त्या गोष्टी दिसायला पाहिजेत ना? मग आख्ख्या जगाच्या तुलनेत टिचभर असलेल्या महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या भागात पाऊस पडत नाही, पण जगभरात अनेक ठिकाणी गोष्टी 'आलबेल' आहेत, तर मग (सोयीस्करपणे?) पाऊस न पडण्याचं स्पष्टीकरण फक्त 'शनी-मंगळाच्या युतीमुळे' असं द्यायचं, हे मला समजत नाही. टोकाच्या गोष्टी घडतात त्या फक्त महाराष्ट्रातच (किंवा ठराविक छोट्याश्या भूभागातच) का, बाकीच्या ठिकाणाहून शनी-मंगळ युती होतीच ना? खरोखरच "शास्त्र" असेल तर एक घटना -> सार्वत्रिक एकच परीणाम असं नसतं का दिसलं? सफरचंदाचं झाड मँचेस्टरमधे असेल नाहीतर जम्मूमधे, झाडावरून फळ खालीच येणार ना? चार हायड्रोजनच्या अणूंचा हेलीयम होताना दोन पॉझिट्रॉन्स बाहेर पडत असतील तर ते सूर्यात झालं काय नाहीतर फ्रान्समधल्या प्रयोगशाळेत, इलेक्ट्रॉन आणि त्यांचं अँटीमॅटर असणारे पॉझिट्रॉन्स तेवढेच बाहेर पडणार ना, प्रक्रिया सारखीच असते ना? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाऊस न पडण्याचं स्पष्टीकरण फक्त 'शनी-मंगळाच्या युतीमुळे' असं द्यायचं, हे मला समजत नाही.
ग्रह योग सुचक कि कारक असा तो चिरंतन वाद आहे. ते म्हंतात उत्तर बरुबर हाय ना! आन बंडू चा हात्चा चुकला तरी गनित कस काय बरुबर येत ब्वॉ? आस आमच म्हन्न हाय. आमी प्रोसिजर ला मार्क देतो केवळ उत्तराला नाही. प्रकाश घाटपांडे

अप्पासाहेब 17/02/2009 - 19:15
मी 'हा एक मानसोपचार आहे असे मत जरी नोंदवले असले तरि ज्योतिष्याचा माझा अनुभव ईथे नमुद करावसा वाटतो. १९९२ मध्ये मी पुण्यातल्या एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवुन भविष्य विचारले होते, त्याने अत्यंत सविस्तर असे भविष्य लेखी स्वरुपात दिले एव्हढेच नव्हे तर मी दिलेल्या सल्ला फी (रु २००) ची रीतसर पावतीही दिली , त्याही पुढे जाऊन , हे भविष्य ८०% पेक्षा कमी अचुक निघाल्यास मी दिलेले रु २०० परत देण्याची लेखी हमी ही दिली . त्या नंतरच्या काळात माझे वास्तव्य पुण्याबाहेर (परदेशात) राहील्या मुळे त्या ज्योतिष्याला परत भेटण्याची संधी मिळाली नाही . दरम्यान त्याचे भविष्य सुमारे ९०% बरोबर ठरले आहे. त्यांनी काही काही अतर्क्य घटनांचा उल्लेख केला होता त्या अगदि जशाच्या तश्या घडल्या अगदि तारखे निशी ! त्या वैळी मी त्यांना वेड्यात काढले होते पण त्यांनी सांगीतल्या बरहुकुम घडत गेले आणि मलाच वेड लागायची पाळी आली. गेल्या वर्षी पुण्यास त्या ज्योतिष्याला भेट्ण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याचा पत्ता लागला नाही. त्या ज्योतिष्याचे नाव : श्री मुकुंद अभ्यंकर, मी जेव्हा भविष्य विचारले तेव्हा ते जोगेश्वरीच्या बोळात एका जुनाट , पडक्या वाड्यात राहात , आता त्या ठिकाणी मोठे कमर्शीयल कओम्प्लेक्स ऊभे आहे. कोणाला ह्या मुकुंद अभ्यंकरां बद्द्ल माहीती असल्यास कळवावी, अत्यंत आभारी राहीन.

In reply to by अप्पासाहेब

लिखाळ 17/02/2009 - 19:22
जोरात.. तुमचा अनुभव भारीच आहे. ज्योतिषाने सर्व भाकिते अशीच खात्रीने करावित असे मला वाटते. अनेक ज्योतिषांची ढोबळ विधाने वैताग आणणारी असतात. माझे मत क्रमांक दोन या पर्यायाला आहे. (फार अनुभव घेतला नाहीये आणि फार चिकित्सा केली नाहिये.) -- लिखाळ.

In reply to by अप्पासाहेब

मी ओळखतो नव्हे मी तिथ सहा ज्योतिषी म्हणुन १९८३ मध्ये कॉलेज मध्ये असताना काम केले होते.आता कुठे आहेत माहित नाही? मोठा विषय आहे तो त्याविषयी पुन्हा कधी तरी प्रकाश घाटपांडे
तिसर्‍या ऑप्शनला मत दिले आहे दुसर्‍या ऑप्शन मधे "ते शास्त्र आहे परंतु त्याला मर्यादा आहे"" यातिल "त्याला मर्यादा आहे" हे पटल नाही, मर्यादा ज्योतिष बघु पहाणार्‍या "व्यक्तिला" असतात, शास्त्राला नाही! (असे आपले माझे मत) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

झेल्या 18/02/2009 - 17:01
फलज्योतिष हे जर निव्वळ शास्त्र आणि अनुभवसिद्ध असते तर त्याचे अभ्यासक्रम निघून त्या कोर्सेस ना एम् बी ए पेक्षा जास्त गर्दी झाली असती. हे अर्धवट हाती लागलेले ज्ञान (माहिती) असू शकेल. अनेकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतील. यशस्वी लोकांमध्ये फलज्योतिषावर विश्वास असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. यामध्ये फसवेगिरी आणि भंपकपणाला भरपूर वाव असल्या कारणाने याची शास्त्रशुद्धता (असेल तर) मार खाते. पण जर असे गृहीत धरले की हे पूर्णतः खरे आहे, तर हे शास्त्र जाणणारे लोक जगावर राज्य करताना (शब्दशः अर्थ घेऊ नये) दिसले असते. पण असे नाही. त्या लोकांवर इतरांचे भविष्य सांगत बसण्याची वेळ का यावी? का, ज्याप्रमाणे न्हावी स्वतःची कटींग स्वतः करू शकत नाही त्याप्रमाणे स्वतःचे भविष्य (भले) स्वतःला कळत नाही? -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

शंकरराव 18/02/2009 - 20:35
ते एक थोतांड आहे ह्या पर्यायाला मत दिले आहे... ...युध्दाच्या तिथ्या काढण्यात पेशवाई संपवली.. शंकरराव

In reply to by शंकरराव

आम्हि 18/02/2009 - 22:47
पेशव्यांनीच अटकेपार झेंडे गाड्ले हे विसरु नका. दिल्लीला धडक देणारे देखील पेशवेच आणि शाहू महाराजांनी पुनश्च हरिओम केल्यावर चहूबाजुला मराठेशाहीची पताका गाजवणारेही पेशवेच होते, आयुश्यात एकही मोहीम न हरणारे बाजीराव पेशवेच. त्यामुळे तिथ्या काढ्ण्याने फायदा झाला की नुक्सान ह्यावर नकारात्मक उत्तर देणे साफ चुकीचे ठरेल. पहिल्या पर्यायास मत दिले आहे.

In reply to by आम्हि

पेशव्यांनीच अटकेपार झेंडे गाड्ले हे विसरु नका गाडले की रोवले? मराठीत झेंडे रोवतात, गाडत नाहीत. (काही वेगळेच गाडतात). बाकी चालू द्या. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सातारकर

सुनील 19/02/2009 - 13:45
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

१. भगवा फडकवला २. सातासमुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा फडकवला अवांतरः हे प्रतिसाद विषय सोडून होताहेत, बाकीची चर्चा खरडफळ्यावर करु.

In reply to by सातारकर

सुनील 19/02/2009 - 14:17
माझा मूळ आक्षेप गाडला ह्या हिंदीतून विनाकारण उसन्या आणलेल्या शब्दाबद्दल होता हे तुमच्या ध्यानात आलेले नाही. असो. हे अवांतर आहे हे मी माझ्या मूळ प्रतिक्रियेच्या शीर्षकातच दिले होते. तेव्हा माझ्या दृष्टीने हा विषय आता संपला आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by आम्हि

शंकरराव 19/02/2009 - 14:08
अटके पार झेंडे रोवले ते कर्तुत्वावर.... पेशवाईला उतर्तीकळा लागली ती अंतर्गत गादी राजकारण व तिथ्यांवर अवलंबून रहायला भाग पाडणा-यां मुळे. युद्धजिंकायला सैनिकांचा उत्साह, जोश महत्वाचा. कैक दिवस तयारी असुनही तिथी येवोस्तवर सैन्य यूद्धभूमीवर ताटकळत असायचे. सैन्या चा उत्साह , रंग उतरल्यावर तिथीने तो भरुन नाही निघाला ... शंकरराव
फलज्योतिष हे असे शास्त्र आहे की कॉईन टॉस करण्यासारख आहे. चित पड्लेल जर भाकीत असेल तर आमची लाल नाही तर कॅलकुलेशनच्या चुका आहेत म्हणुन खापर फोडायचे. माझ्या मित्राने एका ज्योतिष्याला पहीले त्या ज्योतीष्याचीच पत्रीका पाहायला लावली, आणी विचारले की तुझ्या निकट आयुष्यात काही धोका आहे का. त्यावर तो म्हणाला सर्व ऊत्तम आहे. ताबडतोब माझ्या मित्राने त्याच्या मुस्काटात दिली आणी त्याला म्हणाला की तु तुझ्या आयुष्यात दोन मिनींटात काय होणार हे सांगु शकत नाही तर लोकांच्या आयुष्यात दोन महीन्यांनी काय होणार हे कसे सागु शकतो. तो बिचारा गाल चोळत राहीला..आणी मी ठो ठो हासलो.. =)) =)) ज्योतिष्य आम्हाला पाहुन पळतात....

शैलेन्द्र 19/02/2009 - 03:27
"आयुश्यात एकही मोहीम न हरणारे बाजीराव पेशवेच. त्यामुळे तिथ्या काढ्ण्याने फायदा झाला की नुक्सान ह्यावर नकारात्मक उत्तर देणे साफ चुकीचे ठरेल." बाजीरावांनी ज्योतिष खुंटीला टांगल असणार. उलटा नीपजलेला पुत्र मोगलाई पालथी घालेल असं म्हणनारे थोरले महाराज हेच त्यांचे आदर्श होते. जे बोलु ते सत्य करण्याची ताकद असणारी अशी व्यक्तिमत्वच कोणत्याही ग्रहगोलांपेक्षा जास्त प्रभावी असतात.
केदार्_जपान शी सहमत. ४० % ग्रहस्थिती आणि ६०% तर्कज्ञान यावर आधारीत असं हे एक शास्त्रच आहे. ते पुढे घटनार्‍या घटनांबद्दल सुचना देवु शकते. अर्थात त्यातली शक्याशक्यता ही ज्योतीषाचे ज्ञान आणि तर्कशक्ती यावर अवलंबुन असते. माझा विश्वास आहे या शास्त्रावर. पण त्यावर विसंबुन राहणे मला मान्य नाही. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

अभिज्ञ 19/02/2009 - 11:07
दैनिक तरुण भारत. ह्यांचे दरवर्षी (महिनावार) वार्षिक राशीभविष्य प्रसिद्ध होत असते. भविष्यकर्ते - श्री.आनंद कुलकर्णी (मत्तीकोप) गेले दोन वर्षे ,२००६ ते २००७ अन २००७ ते २००८ ह्या कालखंडाचे भविष्य मी माझ्या राशीनुसार फॉलो करत होतो. पहिल्यावर्षी ९०% भविष्य खरे ठरले, व मागच्या वर्षी ९९% भविष्य अगदि महिनावार खरे ठरले आहे. ज्योतिष-भविष्य एवढेच नाहि तर देव-कर्मकांडे हे सर्व व्यक्तिसापेक्ष अथवा परिस्थिती सापेक्ष असते. जोपर्यंत सर्व काहि ठिक चाललेले असते तो पर्यंत माणसाला ह्या गोष्टिंची विशेष गरज भासत नाहि. परिस्थितीचे फटके व चटके बसायला लागले,अचानक संकटे आलि कि भले भले ह्या गोष्टिंचा आधार घेतात. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

ज्योतिष-भविष्य एवढेच नाहि तर देव-कर्मकांडे हे सर्व व्यक्तिसापेक्ष अथवा परिस्थिती सापेक्ष असते. जोपर्यंत सर्व काहि ठिक चाललेले असते तो पर्यंत माणसाला ह्या गोष्टिंची विशेष गरज भासत नाहि. परिस्थितीचे फटके व चटके बसायला लागले,अचानक संकटे आलि कि भले भले ह्या गोष्टिंचा आधार घेतात.
असे आमचेही निरिक्षण आहे. प्रकाश घाटपांडे

सिद्धेश 19/02/2009 - 11:44
ते एक शास्त्र आहे. काही वेळा निष्कर्ष चुकतील पण त्यामुळे ज्योतिषशास्त्र अयोग्य ठरत नाही. मी वाचलेले २०००ते २१०० सालापर्यंतचे भविष्य:(हे कितपत खरे आहे हे मला माहित नाही पण आजपर्यंत त्यांचे निष्कर्ष बरोबर ठरले आहेत) *२०२०ते२०३० च्या दरम्यान तिसरे महायुद्ध होणार *यामध्ये मुस्लिम राष्ट्रे आणि चीन विरुद्ध अमेरिका भारत जपान आणि युरोपीय राष्ट्रे असतील *२०४० पर्यंत श्रीलंका बांग्ला म्यानमार पापस्तान मिळून भारताचे संघराज्य होइल *या महायुद्धात चिनची ८० व भारताची ४० % लोक मरणार * महायुद्धानंतर आशियातल्या बहुतेक मुस्लीम राष्ट्रांवर इस्राईल चे साम्राज्य येईल

In reply to by सिद्धेश

सुनील 19/02/2009 - 11:52
ह्या भविष्यवाणींचा स्त्रोत समजणे अवघड नाही!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पुर्वी हिरण्यप्पा हे तरुण भारत मध्ये नॉस्ट्रॅडॅमस ची अशी भाकित भाषांतरीत करुन लिहित. येथे प्रश्न क्रमांक ४४ वाचा प्रकाश घाटपांडे