Skip to main content

ताज्या घडामोडी : भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 25/02/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

वाचने 62617
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

गापै, दाऊदच्या पैशावर चालणार्‍या बॉलीवूडविरूद्ध लोकभावना होती का? मग संजय दत्त, सलमान खान वगैरे दाऊदशी थेट संबंध वगैरे ठेवणार्‍या स्टार्सचे चित्रपट असे सुपर डूपर हीट कसे व्हायचे हो? मग तेव्हा विरोध न केलेल्या जनतेच्या आता केलेल्या विरोधाला किंमत का द्यावी?

In reply to by प्रसाद_१९८२

एकूणच प्रशांत किशोर या मनुष्याला गरजेपेक्षा जास्त चढविले गेले होते हे अगदी सुरवातीपासूनच वाटत होते. अनेकांना २०१४ मध्ये मोदी जिंकले ते प्रशांत किशोरमुळेच असे वाटायला लागले होते. त्याविषयीचा साधा प्रश्न--- प्रशांत किशोर इतके पॉवरफूल असते तर त्यांनी स्वतःलाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणून स्वतःच ३०० सीट्स का आणल्या नाहीत? ती मोदींची लाट होती प्रशांत किशोरची नव्हती. प्रशांत किशोरमुळे प्रचाराला दिशा नक्कीच मिळाली पण त्याच्यामुळे सव्वातीनशे पेक्षा जास्त सीट्स एन.डी.एला आल्या हे म्हणणे कैच्याकै झाले. काही लोक चांगल्या घोडे कुठचे हे इतरांपेक्षा लवकर लक्षात घेतात आणि त्यावर पैसे लावतात. प्रशांत किशोरने २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार या चांगल्या घोड्यांवर असेच केले. पण उत्तर प्रदेशात राहुल गांधी या बद्दू घोड्याला पहिले कसे आणणार? तिथेच प्रशांत किशोरची मर्यादा उघड झाली. या निवडणुकांमध्ये अनेक फुगे फुटले त्याप्रमाणेच प्रशांत किशोर या फुग्यालाही टाचणी लागली हे चांगलेच झाले.

सौरा,
दाऊदच्या पैशावर चालणार्‍या बॉलीवूडविरूद्ध लोकभावना होती का? मग संजय दत्त, सलमान खान वगैरे दाऊदशी थेट संबंध वगैरे ठेवणार्‍या स्टार्सचे चित्रपट असे सुपर डूपर हीट कसे व्हायचे हो? मग तेव्हा विरोध न केलेल्या जनतेच्या आता केलेल्या विरोधाला किंमत का द्यावी?
बरोबरे तुमचं. माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती. लोकं शहाणे झालेत. म्हणूनंच भंडसाळ्यास वेळच्यावेळी आणि प्रखर विरोध करताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै, भन्साळीचा सेट जाळणे वगैरे प्रकार विरोध नाही vandalism आहे. सरकार नालायकासारखे फक्त बघत आहे हे असले प्रकार घडताना हे सरकारने घेतलेल्या लोकांच्या प्रॉपर्टीचे रक्षण करण्याच्या शपथेचे उल्लंघन आहे.
माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती.
याच्याशी सहमत.

संजय क्षीरसागर,
या भानगडीत ते राममंदीर ही देशाला नवी डोके दुखी होईल.
खरंतर राममंदिराचा मुस्लिमांशी कसलाही संबंध नाही. बाबरी मशीद नावाची कुठलीही वास्तू कधीही अस्तित्वात नव्हती. रामजन्मभूमीच्या जागी राममंदिर होतं याचे अनेक पुरावे सापडले आहेत. काफिरांच्या प्रार्थनास्थळी मशीद बांधणे हे इस्लाममध्ये महाभयंकर पाप आहे. बाबर क्रूर असेल, त्यानं राममंदिर बाटवलं असेल, पण तो तिथे मशीद बांधण्याइतका बावळट खचितंच नव्हता. त्यामुळे रामजन्मभूमीवरून हिंदू विरुद्ध मुस्लीम असं भांडण व्हायलाच नको मुळातून. उलट सच्च्या मुसलमानाने बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्या सदस्यांचे (शरियानुसार) हातपाय तोडायला पाहिजेत. इस्लामी पापाचं प्रवर्तन केलं म्हणून. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मशीद काय की मंदीर काय ते नव्यानं बांधून काय फरक पडतो ? पण एकदा मतं त्या कामासाठीच घेतलीयेत म्हटल्यावर सत्ता टिकवायची तर पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार. आणि एकदा का हे लफडं सुरु झालं की त्याला अंत नाही. एकतर जातीवादाचा विळखा हा देशाच्या मुख्य प्रॉब्लम्सपैकी एक आहे. मंदीरामुळे तो आणखी प्रखर होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

>>पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार. पब्लिक आपली अपेक्षापूर्ती होते आहे असं स्वतःच मानून घेत असतं की !!

खरे डॉक्टर, तुमचा इथला संदेश पटला. मुस्लिमांच्या पाठिंब्याशिवाय कोणीही निवडून येऊ शकंत नाही असा आपल्या प्रसारमाध्यमांचा लाडका निष्कर्ष आहे. यांस मोदींनी २०१४ त सुरुंग लावला. हिंदूही एकगठ्ठा मतदान करू शकतात. मोदी मुस्लिमांच्या विरोधात आहेत असा माध्यमांचा आजून एक सिद्धांत आहे. माध्यमांनी गुजरात दंगलींचं भांडवल करून मोदींवर दोषारोप करण्यात कसलीही कसूर ठेवली नाही. या सिद्धांतासही मोदींनी छानपैकी सुरुंग लावला आहे. सुरुवात २०१४ ला झालीच होती. गुजरातेत भाजपने २६ च्या २६ जागा जिंकल्या होत्या. अगदी विरमगाम व करजन सारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपच जिंकले. मात्र माध्यमांनी या निकालाकडे डोळे उघडे ठेवून बघायचं नाकारलं. परिणामी मोदींनी उत्तर प्रदेशात मुस्लिमविरोधसिद्धांताच्या पेकाटात परत एकदा सणसणीत लाथ घातली. आ.न., -गा.पै.

संजय क्षीरसागर, १.
आणि एकदा का हे लफडं सुरु झालं की त्याला अंत नाही. एकतर जातीवादाचा विळखा हा देशाच्या मुख्य प्रॉब्लम्सपैकी एक आहे. मंदीरामुळे तो आणखी प्रखर होईल.
मला नाही वाटंत तसं. मुस्लिमांना विश्वासात घेऊन राममंदिर विनाविरोध बांधता येईल. २.
पण एकदा मतं त्या कामासाठीच घेतलीयेत म्हटल्यावर सत्ता टिकवायची तर पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार.
मी नेमक्या याच गोष्टीच्या विरोधात आहे. राममंदिर हा मतं गोळा करायचा विषय असू शकंत नाही. रामाच्या नावावर हिंदूंची मतं मिळतात हे कळल्यावर कोण कशाला मंदिर बांधेल? २.
मशीद काय की मंदीर काय ते नव्यानं बांधून काय फरक पडतो ?
पडतो. रामामुळे हा देश अखंड राहिला आहे. राम राष्ट्रपुरुष आहे. आ.न., -गा.पै.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आज लोकसभेत भाषण केले. ते गोरखपूरमधून निवडून आलेले लोकसभेचे सदस्य आहेत आणि अजून त्यांने लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. हा प्रकार थोडासा खटकलाच. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले (याच मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते) त्यावेळी ओरिसाचे मुख्यमंत्री गिरीधर गामांग लोकसभेत उपस्थित होते. ते १९९८ मध्ये ओरिसातील कोरापूट मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. या विश्वासदर्शक ठरावापूर्वी दोन महिने ते ओरिसाचे मुख्यमंत्री झाले होते आणि या ठरावापर्यंत त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. त्यावेळी भाजप खासदारांनी त्यांच्या लोकसभेतील उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. १९७२ मध्ये सिध्दार्थ शंकर रे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना असेच लोकसभेत हजर राहिले होते आणि त्यांना अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यांवर भाषण करायचे होते. त्यांना लोकसभा अध्यक्ष गुरदयालसिंग धिल्लन यांनी भाषण करायला मनाई केली. तसेच एकदा वसंतदादा पाटीलही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर लोकसभेत उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीवरच मधू दंडवतेंनी आक्षेप घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वसंतदादांना सभागृहातून जायला सांगितले होते. लालकृष्ण अडवाणींनी लोकसभा अध्यक्ष जी.एम.सी.बालयोगींच्या निदर्शनास या दोन गोष्टी आणून दिल्या. बालयोगींनी त्यांच्या निर्णयात म्हटले की राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर गेल्यावर लोकसभा सदस्याने लोकसभेत हजर राहू नये हा संकेत झाला पण तसा नियम नाही त्यामुळे उपस्थित राहावे की नाही आणि वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर मतदान करावे की नाही हा निर्णय बालयोगींनी गिरीधर गामांग यांच्यावर सोडला. अर्थातच गामांग यांनी वाजपेयी सरकारविरोधात मतदान केले. कदाचित त्यांनी ते मत दिले नसते तर लोकसभेत २६९ विरूध्द २६९ असा टाय होऊन लोकसभा अध्यक्षांनी सरकारच्या बाजूने मत देऊन वाजपेयी सरकार तरले असते. एप्रिल २०१० मध्ये भाजपने काँग्रेसचा हा डाव उलटवायचा प्रयत्न केला. डिसेंबर २००९ मध्ये झारखंडमध्ये शिबू सोरेन मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळी मनमोहनसिंग सरकारने आणलेल्या अर्थसंकल्पावर भाजपने कपात सूचना आणली होती. ही कपात सूचना मंजूर झाली तर सरकार पडते. या कपातसूचनेवरील मतदानासाठी भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री असलेल्या शिबू सोरेन यांना लोकसभेत आणले. पण या उद्योगात भाजपचा 'पोपट' झाला कारण (बहुदा नेहमीच्या सवयीनुसार) शिबू सोरेन यांनी मनमोहनसिंग सरकारच्या बाजूने मत दिले!! बहुदा योगी आदित्यनाथ यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी निरोपाचे भाषण करायचे असावे. पण तरीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी लोकसभेत उपस्थित राहणेच खटकले. निरोपाचेच भाषण करायचे असेल तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी करायला हवे होते. अशा संसदीय संकेतांचे उल्लंघन शक्यतो होऊ नये असे वाटते.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंगांनी नवज्योतसिंग सिध्दूला मंत्री केले खरे पण आता तो मंत्रीपदावर असताना कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये काम करत राहण्यावर अडून बसला आहे. मी जर सकाळी ९ वाजता ऑफिसमध्ये पोहोचत असेन तर संध्याकाळी ६ नंतर काय करतो यावर कुणाचा आक्षेप असायचे कारण नाही असा दावा सिध्दूने केला आहे. इतकेच नव्हे तर अधिकृत बैठकांना मंत्री किंवा आमदार किंवा सरकारी अधिकारी यापैकी कोणीही नसलेल्या आपल्या पत्नीला-- नवज्योत कौरलाही बरोबर घेऊन गेले तर त्यात काय बिघडले, शेवटी ती माझी अर्धांगिनी आहे असाही अजब दावा नवज्योतसिंग सिध्दूने केला आहे. एकूणच कपिल शर्माचा शो टिव्हीवरून प्रत्यक्षात आलेला दिसतो आहे.

शाब्बास! याला म्हणतात खरा मर्दमावळा! असे धाडस केवळ निधड्या छातीचा वाघच करू शकतो. आम्हाला अशा स्वाभिमानी मर्दमराठ्यांचा अभिमान वाटतो!!!

In reply to by श्रीगुरुजी

संजय राऊत ना संरक्षण मंत्री पदाच्या शर्यतीत तगडी स्पर्धा ...... ... ... .. .. .. .. .. .. .. .. .. ... ... रवींद्र गायकवाड यांची

Gaikwad punched and hit a 60 year old Air India Duty manager with his slippers nearly 20 times and tore his shirt at IGI airport just because

he could not travel business class in an all economy flight.

if he was not ready to deboard, CISF ने ह्याच्या दुकानावर लाथा मारुन ह्याला बाहेर काढुन २ - ३ तास डिटेन करुन ह्याला तो वाला फिल द्यायला हवा होता. ग चि गां मर्दमावळा ६० वर्ष वृद्ध ड्युटि मॅनेजर ला २० वेळा चपलेने हा भिकारचोट मारत असताना एअरलाईन ने सिक्योरिटि कॉल का नाही घेतला ? चीमायबिन ह्या देशात सामान्य माणुस मग तो आपल्या करियर मध्ये कितिहि चांगल्या पदावर का असेना एक पोलिस हवालदार कायद्याचा धाक दाखवुन त्याच्या तोंडाला फेस आणतो आणि त्याच देशात असले अडाणचोट "डिप्लोमॅट स्टेट्स" मिळवुन नंगानाच करतात ?

ह्या गायकवाडचा माज, बेमुर्वतखोरपणा डोक्यात तिडीक आणत आहे. ह्याची लायकी लोकांनीच दाखवून दिली पाहिजे. अशी काही तरतूद नाहीये का की ज्यामुळे त्याला लाथ मारून लोकसभेतून हाकलून देता येईल? खरोखर लाज वाटते आपल्या समाजाची. कसल्या घाणेरड्या लोकांना निवडून देतो आपण.

In reply to by पुंबा

एकटा गायकवाडच माजलेला नसून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपासून जवळपास सर्वचजण अत्यंत उन्मत्त व माजलेले आहेत. अशांना चाबकाने फोडून काढायला हवे.

वाईच थांबा. दुसरा भाग संध्याकाळी ४.१५ वाजता प्रसारीत होणार आहे.

वाली लोकं डोळ्यासमोर आली. कोणालाच सोडायचं नाही .अमित शहांना पण फोडू . जे जे चूक त्या सर्वाना . गायकवाड असेल चूक पण सगळ्यांना एका लाईन मध्ये उभं करू . सर्वपक्षीय ...

लोकहो, इथे म्हटलंय की ऐन वेळेस विमानयान बदलल्याने व्यवसायवर्गातल्या जागा उपलब्ध नव्हत्या. पूर्ण विमान जनतावर्गाचं होतं. अशा वेळेस पूर्ण परतावा दिला जातो अथवा व्यवसायवर्गाचे प्रवासी तसेच जनतावर्गाने जातात. दुवा : https://youtu.be/FFnZfzvvU6E?t=2m15s आता इथे एक प्रश्न उद्भवतो. जर संबंधित प्रवाशाने जनतावर्गाने जाण्याचा पर्याय पत्करला तर त्याचे व्यवसायवर्गासाठी मोजलेले अतिरिक्त पैसे फुकट गेले म्हणायचे. बहुधा हाच रवींद्र गायकवाड यांचा मुद्दा असावा. मात्र हमरीतुमरीवर न येता याचा यथोचित निकाल लागलेला बघायला आवडलं असतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

याने व्यवसायवर्गासाठी किंवा जनता वर्गासाठी स्वतःचे पैसे मोजलेच नव्हते. त्याला व्यावसायिक वर्गाचे ओपन डेट असलेलं मोफत कुपन मिळालेलं होतं. त्यामुळे त्याचा स्वतःचा एकही पैसा गेलेला नाही. स्वतःच्या खिशातून तिकीट काढलेलं नव्हतं तरीसुद्धा माज प्रचंड होता. आपण एका ६० वर्षाच्या व्यक्तीला चपलेने मारहाण करून काही चूक केली आहे हे त्याला मान्यच नाही. तो प्राध्यापक होता म्हणे आणि वर्गात एखाद्या विद्यार्थ्याची काही चूक झाली तर त्याला तो थोबाडीत मारायचा म्हणे. महाविद्यालयात शिकणार्‍या मोठ्या वयांच्या मुलांना थोबाडीत मारणारा मुळातच डोक्याने सरकलेला व भडकू डोक्याचा असावा. असले माजोरडे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहेत ही शरमेची गोष्ट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>>त्याला व्यावसायिक वर्गाचे ओपन डेट असलेलं मोफत कुपन मिळालेलं होतं. हे सरकारने "सांसद" आहेत म्हणून दिले होते की अन्य कांही कारणाने मिळालेलं होतं..?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी त्याला व्यावसायिक वर्गाचे ओपन डेट असलेलं मोफत कुपन मिळालेलं होतं. त्यामुळे त्याचा स्वतःचा एकही पैसा गेलेला नाही. स्वतःच्या खिशातून तिकीट काढलेलं नव्हतं ब बा बे (बडे बाप के बेटे) यांची लायकी काहीही नसताना अशाच श्रेणीतून प्रवास करतातच ना मग जो लोक प्रतिनिधी २० - २५ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो आहे त्याला व्यवसाय वर्गाचे (executive class) तिकीट सरकारने पुरवू नये हे काही पटत नाही. हे तिकीट आपल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा सनदी आणि लष्करी अधिकारी यांनाही मिळतात. मग त्यांच्या वर अंकुश ठेवणाऱ्या लोकनियुक्त प्रतिनिधींना नसावेत हे पटत नाही. प्रत्येक माणसाने त्याला आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी एक रुपया जरी दिला तरी तो पैसे त्याला ५ वर्षे याहुन इतर अनेक सुविधा देण्यासाठी पुरेसा आहे. खासदारांची लायकी हि तो प्रतिनिधित्व करणाऱ्या जनतेच्याच लायकीची असते म्हणून त्यांना या जनतेने काहीच सुविधा पुरवू नयेत असे नव्हे. माझ्या मते एखाद्या खासदाराची लायकी काडीचीही नसेल तरीहि काही लाख लोकांनी त्याला आपला प्रतिनिधी म्हणून निवडले आहे या लोकेच्छेचा मान ठेवणे आवश्यकच आहे.

In reply to by सुबोध खरे

मला वाटते मुळात तिकीट हा मुद्दाच असू शकत नाही. संबंधच काय तिकीट स्वतःच्या पैशाने आले कि सरकारच्या पैशाने? विरोधच करायचा म्हणून काहीही का? मोदींसकट सगळे याच तिकिटांवर फिरत आहेत ना? कि स्वतःच्या पैशाने घेतात तिकिटे? त्यांचा तो अधिकार आहे संविधानाने दिलेला.

विमान कंपन्यांंनी गायकवाडवर बंदी घातल्याने त्याला मुंबईला येण्यासाठी आगगाडी पकडावी लागली. गुरकावणाऱ्या वाघाची शेळी झाली. http://news.rediff.com/commentary/2017/mar/24/barred-from-flying-sena-m…

In reply to by श्रीगुरुजी

हिंदी न्युज च्यानेलवर ह्या रविंद्र गायकवाडचे "चप्पलमार सांसद" , "जुतामार सांसद" असे मथळे देऊन लायकी काढणे सुरु आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे रवींद्र गायकवाड फक्त शिवसेनेचे आहेत म्हणून त्यांच्यावर यथेच्छ टीका करायची असेल, तर नक्कीच चालू द्या. बाकी या घटनेला दुसरी बाजू असू शकते हे मान्यच नसेल तर मग विषयच राहतो. अत्यंत मुजोर आणि सरकारी नोकरी आहे, काय फरक पडतो या मानसिकतेने अत्यंत टुकार आणि माजुरडी सेवा पुरवणाऱ्या असल्या कंपन्यांकडून काय अपेक्षित आहे म्हणा. आणि वरून सर्व पातळ्या सोडलेली माध्यमे! रवींद्र गायकवाड हे दोन वेळेला आमदार व नंतर राजकारणात राहण्याची इच्छा नसताना सेना नेतृत्वाच्या आग्रहाखातर खासदारकीला उभे राहून निवडून आले आहेत. प्राध्यापक असेलेले रवी गायकवाड हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी वीज आणि पाणी या गोष्टींवर केलेल्या कामासाठी ओळखले जात होते. परंतु वैयक्तिक बाचाबाचीतून झालेली मारहाण (तीही 25 वेळेला वगैरे नसावी, वाहिनीला उपरोधीकपणे दिलेल्या वक्तव्याचा वापर करण्यात येतोय असे विडिओ बघून माझे वैयक्तिक मत झाले आहे) म्हणजे जणू काही आकाश कोसळले या थाटात वापरणे आणि तेही का तर तिथे शिवसेना नाव चिकटले आहे, हे म्हणजे भारतीय माध्यमांची अवस्था दर्शवण्यास पुरेसे आहे. मागे संसदेतल्या कँटीनच्या पोळ्याबद्दल शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला रोजा असताना मुस्लिम माणसाच्या तोंडात पोळ्या कोंबल्या वगैरे रंग या माध्यमांनी दिला होता, तिथेही रवी गायकवाडांचे नाव होते. तिकडे मंत्रालयात आलेल्या शेतकऱ्याला सुरक्षारक्षकांकडून झालेली बेदम मारहाण यांच्या खिजगीनतीतही नाही. रवी गायकवाडांवर गुन्हे दाखल झाले असताना, त्याची न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्याची वाट न बघता, सर्व विमान कंपन्यांनी "नो फ्लाय" नावाचा केलेला प्रकार अत्यंत निषेधार्य आहे असे मला वाटते. त्यात काही सो कॉल्ड लिबरल्स रेल्वेनेही त्यांच्यावर बंदी घालून त्यांना सायकलने जाण्यास भाग पाडावे अशी मागणी करत आहेत. अत्यंत हास्यास्पद आहे हे. अरेरावीतून सुरु झालेल्या या भांडणाचा वापर करून घेतला जातोय असे दिसते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गालिया खानेके लिये, मै बिजेपी का सांसद थोडी हूं, मै शिवसेना का सांसद हूं ......

In reply to by प्रसाद_१९८२

रवींद्र गायकवाडांना विचारले तसे प्रश्न विमान कंपनीला विचारून त्यांच्यावर आसूड ओढले जात नाहीत यातच सगळे आले.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे रवींद्र गायकवाड फक्त शिवसेनेचे आहेत म्हणून त्यांच्यावर यथेच्छ टीका करायची असेल, तर नक्कीच चालू द्या.
परफेक्ट रे प्रसाद, आपल्या उद्दामपणाचा व गलथान कारभाराचा सामान्य नागरिकांना वेळोवेळी प्रत्यय देणारी एअर इंडीया आता लोकप्रतिनिधींशीही माजुरडेपणे वागते हे कळले ते नशीब. बीजेपीचाच मंत्री अथवा खासदार असता तर विमान कंपन्यानी हेच पाऊल उचलले असते का? आता प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना मारले म्हणून माजुरडेपणा दिसतो. एबीव्हीपीच्या पोरांनी मास्तर, प्राचार्य, अगदी शिक्षणमंत्र्यापर्यंत काळे फासलेले तेंव्हा कुठे गेले होते गुरुजीसंस्कार? बाकी कै नै जसजसे बीजेपीचे निवडणूक निकाल येत गेलेत अन स्वबळावर काहीही करु शकतो असे दिसायले की सेनेची गरज संपत गेलीय. मग त्यांच्यावर ठरवून विखारी टिका सुरु झालीय हे येत्या काही दिवसातल्या प्रतिसादावरुनही लक्षात येतेय.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे फक्त शिवसेनेचे आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होत नसून त्यांनी केलेली मारहाण आणि मारहाणीचे केलेले बिनदिक्कत समर्थन यामुळे टीका सुरू आहे. आपण केलेल्या कृत्याचा त्यांना जराही पश्चाताप झालेला नसून आपण योग्य तेच केले असा त्याचा अट्टाहास आहे. सरकारी नोकर मुजोर असले तरी त्यांना चपलेने मारणे व विमान अडवून ठेवणे हेसुद्धा मुजोरपणाचेच लक्षण आहे. मुजोरपणाचे उत्तर मारहाण असू शकत नाही. गायकवाडने मतदारसंघात काय काम केले आणि किती काम केले याचा या कृत्याशी संबंधच नाही. त्यांची कामे हा मारहाणीचा बचाव होऊच शकत नाही. त्यांनी केलेली मारहाण हा गुन्हा आहेच, परंतु त्यानंतर त्यांनी दाखविलेला माज अत्यंच संतापजनक आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सदनमध्ये खराब पोळ्या मिळाल्यामुळे ज्या शिवसेनेच्या खासदारांनी तिथल्या वाढप्याच्या तोंडात पोळी कोंबण्याचे प्रकार केले त्यात सुद्धा हे महाशय होते. मुळात महाराष्ट्र सदनात अमराठी व्यवस्थापक व अमराठी आचारी व सेवकवर्ग ठेवल्यानंतर असे होणारच. तक्रार करायची असेल तर ती महाराष्ट्र सरकारकडेच करायला हवी. वाढप्यावर गुरकावून प्रश्न सुटणार नाही. महाविद्यालयात असताना तरूण विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकारही त्यांनी केल्याचे समोर येत आहे. त्यांच्याविरूद्ध महाविद्यालय व्यवस्थापनाकडे तक्रारसुद्धा दाखल झालेली होती. एकंदरीत दांडगाई व मारहाण करून प्रश्न सोडवायचे असाच यांचा खाक्या दिसतो. असा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून अयोग्य आहे. शिवसेनेची ख्याती मारहाण, गुंडगिरी, तोडफोड यासाठीच आहे. हे महाशय शिवसेनेचे खासदार आणि त्यांनी आपल्या पक्षाचीच पद्धत वापरल्याने त्यांच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे आणि टीका व्हायलाच हवी.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा समजून घ्या! गायकवाडांनी केलेले कृत्य हा कायद्याने गुन्हा आहे, आणि तो नोंदही झाला आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही वर लिहिलेल्या प्रतिक्रियांमध्ये एकदाही विमान कंपन्यांच्या मुजोरपणाबद्दल मत व्यक्त केले नाही. जर तुम्हाला उद्दामपणाबद्दल चीड आहे तर ती सगळ्यांच्या उद्दामपणाबद्दल व्यक्त केली तर ती संयुक्तिक ठरेल. ते प्राध्यापक म्हणून कसे होते वगैरे ऐकिवात गोष्टींवर मते बनवून अशी टोकाची टीका हि नक्की कशासाठी? म्हणजे माध्यमे दाखवतील तेच फक्त खरे आणि एक संसद सदस्य सांगतायत त्यावर मात्र कणभरही विश्वास नाही. असशील तू एमपी, आधी खाली उतर नाहीतर मोदीकडे तक्रार करेन हि अरेरावी नाहीये का? अशा मुजोर लोकांपुढे सामान्य लोक हतबल असतात. एक संसद सदस्य असल्या कारणाने रवी गायकवाड कायदा हातात घेऊन हात उचलू शकले. नाहीतर असली मुजोर सेवा बघून प्रत्येक सामान्य माणसाची कानाखाली मारायचीच इच्छा व्हावी. जर विमान इकॉनॉमिक क्लासचे आहे तर तिकीट बिझनेस क्लासचे का विकले हा मूळ मुद्दा बाजूलाच! बाकी मारहाणीने प्रश्न सोडवयाचं म्हणाल तर आधी कायद्याचे राज्य आणावे आणि मग असल्या अपेक्षा ठेवाव्यात ह्या मताचा मी आहे. सामान्य माणूस अत्यंत सहजपणे त्याला होणाऱ्या प्रत्येक त्रासासाठी कायद्याची मदत घेऊ शकेल तेव्हा कोणीही असे बाहेरचे मार्ग शोधणार नाहीत आणि असे मार्ग अवलंबवणारे नेतेही निवडून येणार नाहीत.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

या विशिष्ट प्रकरणात विमान कंपनीने मुजोरपणा केल्याचे दिसत नाही. ज्याप्रमाणे बिझनेस क्लास व जनता क्लास असे दोन्ही क्लास असलेली विमाने असतात त्याप्रमाणे सर्व आसने एकसारखी फक्त जनता क्लासचीच असलेलीही विमाने असतात. या विविष्ट विमानात फक्त जनता क्लासचीच आसने होती असे दिसते. गायकवाडांना जनता क्लासचे विमान असताना बिझनेस क्लासचे तिकीट विकले हा गैरसमज आहे. मुळात खासदार, आमदार इ. लोकप्रतिनिधी तिकीट विकत घेत नाहीत. त्यांना प्रवासासाठी फ्री पास दिलेला असतो. त्या पासावर ते ट्रेन किंवा विमानाने प्रवास करू शकतात. खासदारांना दिलेल्या पासानुसार त्यांना बिझनेस क्लासने प्रवास करण्याची परवानगी आहे असे दिसते. जर विमानात सर्व आसने जनता क्लासचीच असतील तर तिथे बिझनेस क्लास आणणे शक्य नाही. अशा प्रसंगी गायकवाडांनी त्या विमानातून प्रवास न करता ज्यात बिझनेस क्लासची आसने आहेत अशाच विमानातून प्रवास करायला हवा होता. जर त्यांना दिल्लीला पोहोचायची निकड होती तर मिळेल त्या विमानाने मिळेल त्या क्लासने जाणे योग्य आहेत. जर या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम जनता क्लासने प्रवास करण्यास भाग पाडले असते तर त्यांची तक्रार योग्य होती. परंत विमानात जर सर्व आसने जनता क्लासचीच असतील तर त्यांच्या तक्रारीला अर्थ नाही. एकतर त्यांनी अशा विमानात इतरांप्रमाणे जनता क्लासमधूनच प्रवास करायला हवा होता किंवा ज्या विमानात बिझनेस क्लासची आसने आहेत अशा विमानातून प्रवास करायला हवा होता. दुसरा मुद्दा म्हणजे प्रवास सुरू करण्यापूर्वीच त्यांनी आक्षेप घ्यायला हवा होता. प्विमानात बिझनेस क्लासची आसने नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या विमानातून प्रवास करणे टाळायला हवे होते. हे न करता ते त्याच विमानातून दिल्लीला गेले. प्रवास पूर्ण झाल्यानंतर मला बिझनेस क्लास का नाही असा आरडाओरडा करून कर्मचार्‍याला चपलेने मारहाणे करणे व नंतर कोणताही खेद न दर्शविता मारहाणीचे समर्थन करणे हे अत्यंत अयोग्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गोव्याचे मुख्यमंत्री असताना पर्रीकर सुद्धा जनता क्लासमधून प्रवास केल्याचे उदाहरण आहे. फडणविस सुद्धा जनता क्लासमधून गेल्याचे वाचले आहे. मुख्यमंत्रीपदासारख्या मोठ्या पदावर असूनसुद्धा या दोघांनी साधी नाराजी दर्शविल्याचे सुद्धा ऐकिवात नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुमच्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती असेल तर द्या. इथे आणि इथे थोडीशी माहिती आहे. इथे थोडीशी वेगळी माहिती आहे. Goa Chief Minister Manohar Parrikar has spent Rs 3 lakh from his personal kitty on air travel since the time he assumed office in March 2012 . इथे फडणविसांबद्दल माहिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मी गायकवाडांच्या प्रकरणाची माहिती घ्या असे म्हणालो. तूर्तास हि खालील बातमी वाचा. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-… भांडण सुरु होण्याचा पॉईंट माझ्या माहितीप्रमाणे "तू एमपी असशील घरचा, आधी खाली उतर नाहीतर मोदीकडे तक्रार करेन" हा होता. त्यामुळे ह्या भांडणाला इकॉनॉमिक क्लास दिला म्हणून लगेच चप्पल काढून मारलं असा रंग देणे म्हणजे स्वतःची अजेंडायुक्त पोळी भाजून घेणे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. माध्यमांनी यापेक्षा वेगळं काही केलं नाही. माझ्यामते हे भांडण हे इकॉनॉमिक क्लास दिला म्हणून नाही तर अरेरावीला अरेरावीने दिलेले उत्तर आहे. बाकी पर्रीकर आणि फडणवीसांचे उदाहरण इथे टाकण्याचे प्रयोजन कळले नाही. ज्यांच्या बातम्या येत नाहीत ते नेते कित्येक वेळेला विमानांमध्ये चांगलेच वागत नसावेत का? आतापर्यंत नो फ्लाय लागला नाही तो कधी?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जाऊ द्या हो प्रसाद जी. गायकवाड हे शिवसेनेचे खासदार होते भाजप चे नव्हे. भाजप चे असते तर एअर इंडिया ला कसा दणका दिला या माथाळ्या खाली बातमी आली असती.

In reply to by विशुमित

चप्पलमार गायकवाड भाजपचे खासदार असते तर त्यांनी चपलेने मारहाण केलीच नसती कारण त्यांनी स्वतःच मोठ्या फुशारकीने सांगितले आहे की "ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे".

In reply to by श्रीगुरुजी

ती वरची हवाईसुंदरीची बातमी वाचली का तुम्ही? आणि भाजपचे खासदार धुतल्या तांदळाचे आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

अवांतर : दुसऱ्या फोटोत तो डाव्या रांगेतला माणूस फडणवीसांच्या ढेरीकडे किती कुतूहलाने पाहतोय =)) =))

श्रीरुजी,
याने व्यवसायवर्गासाठी किंवा जनता वर्गासाठी स्वतःचे पैसे मोजलेच नव्हते. त्याला व्यावसायिक वर्गाचे ओपन डेट असलेलं मोफत कुपन मिळालेलं होतं. त्यामुळे त्याचा स्वतःचा एकही पैसा गेलेला नाही. स्वतःच्या खिशातून तिकीट काढलेलं नव्हतं तरीसुद्धा माज प्रचंड होता.
तिकीट हातात असेल तर असा माज असायलाच हवा. रीतसर तक्रार करण्याचा प्रयत्न करून झाला आहे. तरीपण दाद लागली नाही. एका खासदाराची ही स्थिती तर माझी काय हालत होईल असा विचार मनात येतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्याची नक्की कशाबद्दल तक्रार होती? विमानात सर्व आसने इकॉनॉमीचीच असतील तर याला बिझनेस क्लासमधील आसन कोठून देणार? याला विमानात त्यातल्या त्यात चांगले आसन मिळाले होते (बकहेड रो मध्ये विंडो सीट). या व्यतिरिक्त अजून काय हवे होते? याच्या एकट्यासाठी बिझनेस क्लास असलेले विमान पाठवायचे होते का? एकतर फुकट्या आणि त्यातून माज, असे कसे चालेल?

In reply to by श्रीगुरुजी

खासदार आहेत ते अजून. आरोप सिध्द झाला की अरेतुरेची भाषा अन फुकट्या माजुरडा असले शब्द्प्रयोग बिनधास्त वापरावेत. तुमच्या एकट्याच्या जीवावर नाहीये तो फुकटेपणा. आणि तुमच्यामते असला तर पंतप्रधानापासून सगळेच फुकटेच आहेत. इतका राग असेल तर हुडका त्यांना अन तोंडावर बोला. . का देऊ पत्ता?

In reply to by अभ्या..

तुम्हाला का बुवा त्याचा एवढा कळवळा? अत्यंत वाईट कृत्य केल्यानंतर टीका होणारच. यांच्या पक्षाचे नेते नार्‍या, नारोबा, लखोबा असे एकेरी उल्लेख जाहीरपणे करीत होते. राणेंबद्दल यांच्याच नेत्यांनी अत्यंत गलिच्छ उद्गार काढलेले होते. यांच्या पक्षाने प्रचारात मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार केला होता. आपल्यापेक्षा वयाने असलेल्या एखाद्या व्यक्तीला चपलेने मारणे आणि त्याचे जाहीर समर्थन करणे अत्यंत संतापजनक आहे. यांच्याबाबतीत हीच भाषा योग्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कळवळा बिळवळा कै नै ओ, तसला फुकट कैवार घेऊन लिहायला जमणारही नाही. फक्त विरोधी माणसांच्या चुका अन वागण्याबद्दल मोठ्ठ्या आवाजात ओरडताना तुमचीही भाषा तसलीच आहे हे नमूद करु इच्छितो. सीमेवरच्या जवानांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणार्‍या परिचारकांबद्दल आपण मूग गिळून बसलात कारण ते बीजेपीसोबत आहेत. वयाने/अधिकाराने मोठे असलेल्या प्राध्यापकांना, शिक्षणमंत्र्यांना काळे फासणार्‍या मारहाण करणार्‍या एबीव्हीपीचे संस्काराबाबत गप्प बसलात. ह्यावरुनच आपण माणुसकी, संस्कार, नागरिकांचे हक्क वगैरेच्या आडून फक्त एका पक्षीय अजेंड्यासाठी लिहित आहात हे दिसते आहे. सो चालू राहू दे....

In reply to by अभ्या..

सीमेवरच्या जवानांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणार्‍या परिचारकांबद्दल आपण मूग गिळून बसलात कारण ते बीजेपीसोबत आहेत.
अरे हां! त्या प्रकरणावर इथे चर्चा झाली का मिपावर? झाली असेल तर दुवा द्या कुणी गरीबाला.

In reply to by अभ्या..

परिचारकांबद्दल आपण कोठे लिहिले आहे का? लिहिले असल्यास तिथे जाऊन लिहितो. ह्यावरुनच आपण माणुसकी, संस्कार, नागरिकांचे हक्क वगैरेच्या आडून फक्त एका पक्षीय अजेंड्यासाठी लिहित आहात हे दिसते आहे. सो चालू राहू दे.... तुम्ही असे समजायला माझी अजिबात हरकत नाही.

माहितीये का ? एका आयुक्तांमुळे मुख्यमंत्र्याना चक्क थांबावे लागले . ते पण ५ मिन शेतकऱ्यांसाठी नसताना पासपोर्ट विसरल्याने थांबावे लागले . १ तास . अजून एकदा काय झालं माहितीये भाजप चे हवाई वाहतूक मंत्री आहेत ना ते बोले आता मला बिनधास्त सिगरेट ओढता येते . सिगरेट पाकीट पण मी आरामात नेतो आणि सिगरेट ओढतो . अजून सांगायचंय का एकदा काय झालं??

हिरीरीने बाजू घेणारे होते काही मुख्यमंत्र्यानी आपली ताकद वापरून वैग्रे असं त्यांचं काय झालं ? बाकी महाराष्ट्र सदनासठी निवासी आयुक्त असतात . महाराष्ट्र सरकार कडे फक्त कम्प्लेंट करता येते . निवासी आयुक्त कुठल्याही विभागातले असतात आणि काही गलिच्छ राजकारणामुळे ते चुकीचे वागत होते . त्यांचं नाव मलिक .

In reply to by वरुण मोहिते

हिरीरीने बाजू घेणारे होते काही मुख्यमंत्र्यानी आपली ताकद वापरून वैग्रे असं त्यांचं काय झालं ?
+1 गुरुजींना आता वेळ नाहीय. ते गायकवाड ना शिव्या देऊन दमले कि बघतील.

श्रीगुरुजी, १.
गायकवाडने मतदारसंघात काय काम केले आणि किती काम केले याचा या कृत्याशी संबंधच नाही.
याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो. २.
एकंदरीत दांडगाई व मारहाण करून प्रश्न सोडवायचे असाच यांचा खाक्या दिसतो. असा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून अयोग्य आहे.
सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असताना यांना मुद्दाम जनता क्लासचे आसन दिले असेल तर तक्रार योग्य होती. विमानात बिझनेस क्लासची आसने नव्हती, तरीसुद्धा त्याच विमानातून जनता क्लासमध्ये बसून प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे मूर्खपणा आहे. असे करणे म्हणजे 'शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल' असा फलक लावलेल्या उपाहारगृहात जाऊन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर मला मटण वाढले नाही म्हणून आरडाओरडा करण्यासारखे आहे. सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही एक वेगळी कला आहे. रीतसर तक्रार नक्की कशाबद्दल करायची होती? माझ्याकडे बिझनेस क्लासचे कूपन असल्यामुळे विमानातील इकॉनॉमी क्लासची आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसविली नाहीत म्हणून तक्रार करायची होती का अजून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीची तक्रार करायची होती? आणि तक्रार करायची असेल तर त्यासाठी विमानात बसून राहून इतरांचा खोळंबा करणे हा तक्रार करण्याचा मार्ग नाही. हे महाशय खासदार होते म्हणून यांना सभ्य वागणू़क मिळाली. एखाद्या सामान्य प्रवाशाने जागेवरून उठण्यास नकार दिला असता तर कंपनीने पोलिसांना बालावून त्यांची विमानातून उचलबांगडी केली असती.

In reply to by कपिलमुनी

गुरुजी पळाले..!! व्हेज- नॉन व्हेज हॉटेल वर कोणी बोलले की ते परत येतील. धीर धारा..!!

In reply to by विशुमित

तुम्हाला फार घाई झाली मालक. मी पळूनबिळून जात नसतो किंवा एखाद्या ऋषीमुनींसारखा गुहेत जाऊन लपतही नसतो. काही सभासदांसारखा मी मिपावर कायम पडीक नसतो. दिवसातला फारच थोडा वेळ घरच्या संगणकावरून मी मिपावर येतो व प्रतिसाद देतो. अधूनमधून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मिपा बघतो. परंतु भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून टंकलेखन करणे खूप त्रासदायक असल्याने भ्रमणध्वनी असताना प्रतिसाद देणे टाळतो. "गुरूजी पळाले" हा तुमचा निष्कर्ष वाचून व तुम्हाला झालेला आनंद बघून उंदीरमामांची आठवण आली. पूर्वी मिपावर उंदीरमामा म्हणून एकजण होते. ते असेच केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे. आपण प्रतिसाद दिल्यानंतर पुढील २ मिनिटात माझ्याकडून प्रतिसाद गेला नाही तर लगेच "गुरूजींनी पलायन केले", "गुरूजींनी या धाग्यावरून काढता पाय घेतला" असा निष्कर्ष काढून खूष व्हायचे. तुमचंही तसंच झालेलं दिसतंय.

In reply to by कपिलमुनी

पण यावर रीप्लाय येणार नाही नेहमीप्रमाणेच केजरीवाल छाप प्रतिसाद! मुनीवर्य, आधी इथे आणि इथे रीप्लाय द्या आणि नंतर इतरांबद्दल बोला. स्वतः पळून जायचं आणि इतरांबद्दल केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे ही केजरीवाल स्टाईल आता सोडा.

In reply to by धर्मराजमुटके

ही बातमी. नक्की काय ते कळायला मार्ग नाही . १) काहीतरी गोंधळ आहे. लोकसत्तातील वरील बातमीत म्हटले आहे की "त्यानंतर गायकवाड यांनी आपली सॅंडल काढली आणि त्यांना ते मारणार होते.". परंतु मटामधील या बातमीत असे म्हटले आहे की "यातूनच वाद वाढून गायकवाड यांनी पायातील सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले, असे ही हवाईसुंदरी म्हणाली.". म्हणजे एका बातमीनुसार त्यांनी सँडल काढली होती व ते कर्मचार्‍याला मारणार होते. परंतु दुसर्‍या बातमीनुसार त्यांनी सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले. दुसरी बातमी खरी असेल तर हे कृत्य खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली येते. २) ही विशिष्ट बातमी फक्त लोकसत्ता व मटा या मराठी वृत्तपत्राच्या आंतरजाल आवृत्तीत आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत ही बातमी छापलेली नाही. या बातमीतील हवाईसुंदरीचा चेहरा लपविलेला आहे व तिचे नाव देखील छापलेले नाही. या बातमीतील हवाईसुंदरीची ओळख लपविण्याची काय आवश्यकता होती ते समजले नाही. "सकाळ" सारख्या मोठ्या वृत्तपत्राने व इतर माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. लोकसत्ता व मटा यांना शिवसेनेविषयी असलेला मृदु कोपरा सर्वश्रुत आहे. या दोन्ही वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीत जवळपास रोज "सामना"च्या अग्रलेखाचे पुनर्छापन केलेले असते व त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींवर सणसणीत प्रहार", "शिवसेनेने भाजपचे वाभाडे काढले", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांना सणसणीत टोला" असे कौतुकोद्गारही असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे बळवंतराव टिळकांनी लिहिलेले "केसरी"चे अग्रलेख किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले "मराठा"चे अग्रलेख आहेत अशी यांची समजूत असावी. फक्त याच दोन वृत्तपत्रात हवाईसुंदरीची ओळख लपवून ही बातमी छापून यावी याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही (सकाळ, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी आलेले नाही.). गायकवाडांविरूद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना मुद्दाम अशी संदिग्ध बातमी छापून शिवसेनेबद्दल असलेल्या संतापाच्या धारेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असावा. ३) समजा हवाईसुंदरीच्या दाव्यानुसार गायकवाडांना कर्मचार्‍याने अपशब्द उच्चारले व त्याची प्रतिक्रिया म्हणून गायकवाडांनीही चार शब्द सुनावले, परंतु मारहाण वगैरे झाली नाही इ. गोष्टी क्षणभर खर्‍या मानल्या तरी इतक्या उशीरा हे स्पष्टीकरण देऊन काहीही उपयोग नाही. प्रसंग घडला त्याच दिवशी हवाईसुंदरीकडून हे स्पष्टीकरण आले असते तर गायकवाडांच्या विरोधात इतका संताप निर्माण झाला नसता. परंतु प्रसंग घडल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना गायकवाडांनी मोठी फुशारकी दाखवून आपण कर्मचार्‍याला २५ वेळा सँडलने मारले, भविष्यात पुन्हा अशाच प्रसंगात अशीच मारहाण करीन, ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, आपण शिवसेनेचे खासदार आहोत अशा बढाया मारल्या होत्या. आपण जणू काही पानपताची लढाई जिंकून आलो आहोत असा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात होता. आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप किंवा खंत तर सोडाच, उलट त्यांना अभिमान वाटत होता. त्यांच्या अत्यंत संतापजनक, उर्मट बोलण्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आणि आता या हवाईसुंदरीच्या दाव्यानंतर सुद्धा त्यांच्याविरूद्द असलेल्या संतापाची धार कमी होणार नाही. ४) शिवसेनेच्या फुफु (फुसक्या फुशारक्या) संस्कृतीप्रमाणे यांच्या फुशारक्या देखील फुसक्या निघाल्या. विमान कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर, "माझ्याकडे आज दुपारी ४ च्या फ्लाईटचे तिकीट आहे व मी विमानातून मुंबईला प्रवास करणारच. बघतोच मला कोण अडवतो ते." अशा पोकळ बढाया त्यांनी मारल्या होत्या. प्रत्यक्षात ते घाबरले व विमानतळावर ते फिरकलेच नाहीत. विमानाऐवजी गुपचूप आगगाडीने ते मुंबईला रवाना झाले. अर्थात आगगाडीतही त्यांना वार्ताहरांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे वापीलाच आगगाडीतून उतरून खाजगी मोटारीने ते मुंबईकडे रवाना झाले. तेव्हापासून या क्षणापर्यंत ते लपून बसले आहेत. वार्ताहरांसमोर शूरपणाचा आव आणून मारलेल्या फुशारक्या शेवटी पोकळच ठरल्या. अशा व्यक्तीने किंवा इतरांनी त्याच्या बाजूने आता काहीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नाही. आपल्या कृत्यामुळे व नंतर मारलेल्या उर्मट बढायांंमुळे त्यांची भरपूर बदनामी झालेली आहे आणि आता त्यातून सुटका नाही. _______________________________________________________________________ मुनीवर्य आणि विशुमित, पळून न जाता प्रतिसाद दिल्याने तुमचा हिरमोड झाला असेल व तुमच्या आनंदावर मी विरजण घातले याची मला कल्पना आहे.