✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

[खो कथा] पोस्ट क्र. ३

प
प्राची अश्विनी यांनी
Mon, 03/20/2017 - 08:12  ·  लेख
लेख
[खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ पॉक पॉक करून गाडी बंद केली आणि किल्ली खिशात टाकली . मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!.......... नक्की काय चाललंय? आरशात शशिकांत का दिसला? मी आणि शालूमध्ये काय घडलंय? काही कळेना. परवा तो दाढीवाला म्हातारा बुवा कसल्यातरी शापाबद्दल बरळत होता. हीच तर त्या शापाची सुरुवात नाही ना??? पुढं काहीतरी फार अभद्र घडेल असं वाटू लागलं. आणि ते थांबवायचं तर लवकर काहीतरी करायला हवंं होतं. तेही मलाच. कारण आरश्यानं माझीच निवड केली होती. पण काय करायचं? आरसा तर फुटला. आणि तो दाढीवाला बाबा कुठं असेल कोण जाणे. कुठून झाली याची सुरुवात? काही आठवत नव्हतं. The only way out is the only way in. म्हणत गाडीतून खाली पाय ठेवला. कुठच्या अरी अदृश्य शक्तीनं ओढून घेतल्यासारखा मी त्या ढगांच्या भोवऱ्यात खेचला गेलो. गोल गोल गोल गोल ....... प्रचंड वेगात फिरू लागलो.... मला गरगरायला झालं. .. जाग आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी एका अजस्त्र वृक्षाच्या सावलीत होतो. मी आजूबाजूचा अंदाज घेऊ लागलो. समोरच्या रस्त्यावरून माणसं ये जा करत होती. पण ना कुठचा चेहरा ओळखीचा होता की पेहराव. कुठं येऊन पोचलो बरं? विचार करकरून डोकं दुखायला लागलं होतं. पण काळाचं कोडं काही सुटत नव्हतं. कानात दडे बसल्यासारखं झालं होतं. उठून चालायला लागलो. मैलोनमैल पसरलेला भला भक्कम रुंद दगडी रस्ता होता. कडेला ठराविक अंतरावर डेरेदार झाडं किंवा एखादी पाणपोई. अन मध्येच कुठल्यातरी प्राण्याचं शिल्प असलेला उंचच उंच स्तंभ. अगदी थक्क करणारा. अचानक डोळ्यावर लखलखीत तिरीप आली. समोरून धारदार पाजळलेल्या कुऱ्हाडीसारखं काहीतरी शस्त्र हातात घेऊन एक बारका माणूस येत होता. मी घाबरलो. त्यानं चमकून वर माझ्याकडं बघितलं. क्षणभर थांबला. हातातली कुऱ्हाड खांद्यावर टाकली आणि पुन्हा मान खाली घालून चालू पडला. माझ्या मनातले विचार त्याला कळले की काय? तो पूर्ण नजरेआड होईपर्यंत मी जागीच खिळून होतो. मोबाईल मध्ये वेळ बघायला मी खिसा चाचपडला. मोबाईल गाडीत राहिला होता. च्यायला! आता आली का पंचाईत? सिग्रेट पेटवली. चार झुरके मारल्यावर जरा बरं वाटलं. शीळ वाजवायला तोंड उघडलं आणि एकदम ट्यूब पेटली. इतक्या वेळात आपल्या लक्षात कसं नाही आलं? सगळीकडं डबक्यासारखी प्रचंड शांतता साचून राहिली होती. माणसं, पक्षी, झाडं, वारा, आकाश सगळं चिडीचूप. म्हणूनच कान दडपल्यासारखे झाले असणार. मी शीळ वाजवली खरी पण आवाजच फुटेना. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण छे! आता मात्र टरकलो. ती शांतता आपल्याला गिळून टाकतेय की काय असं वाटायला लागलं. इतक्यात समोरून एक बाई येताना दिसली. ती माझ्या समोरच येऊन थांबली. जवळंच गाठोडं उघडायला लागली. आधी तिनं काही शेंदूर फासलेले दगड बाहेर काढले. मग मोडक्या बाहुल्या. मग एक खेळणं. खुळखुळा की काय? हो खुळखुळाच. तिनं तो माझ्या हातात दिला. आणि पुन्हा आपलं गाठोडं बांधून निघून गेली. खुळ्ळ खुळ्ळ. मी तो वाजवायला लागलो. काय आश्चर्य! मिट्ट शांततेत तो आवाज घुमू लागला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि त्या नादानं सभोवतालच्या ठिकऱ्या उडाल्या. माणसं, झाडं, रस्ता अणुरेणू बनून विखुरले गेले. प्रचंड धुरळा उठला. माझ्या मेंदूचा पण जाम चुरा झाला होता. त्यातून एकेक प्रकाशाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या .. जन्मोजन्मीच्या आठवणी होत्या त्या. चमचमणारे असंख्य काजवेच जणू. "श्या! असं कसं सांगितलं तिनं शशिकांतला? मी कधी बोललो का माझ्या बायकोला? नाही ना? या बायकांच्या पोटात एक गुपीत राहील तर शपथ. शालूला त्या दिवशी पांडवलेण्यांच्या गुहेत न्यायलाच नको होतं. हजारो वर्षांची परंपरा उगाच मोडली आपण. तिच्या गोड हसण्याला भुललो. "जे पाहिलं ते कुणाला सांगणार नाही. अगदी कुंकवाची शपथ" असं म्हणाली होती ....च्! काही प्रकाश पडेपर्यंत विझलाच तो काजवा . हे सगळं, असं काही आपल्याच आयुष्यात घडून गेलं होतं यावर विश्वासंच बसेना. बऱ्याचदा स्वप्नात यातलं काहीबाही दिसायचं खरं पण... बाजूच्या सगळ्या धुरळ्यात ते काजवे आता हरवतात की काय असं वाटू लागलं. त्यांना पकडून ठेवायची मी व्यर्थ धडपड करू लागलो. कारण आता मला पुढची दिशा दाखवायला मम्मद्याचा आरसा नव्हता. माझ्या आठवणींवरंच पुढचा सगळा खेळ अवलंबून होता. मी भराभरा काजवे गोळा करू लागलो. पण गोळा करून ठेवणार कुठं? मेंदूचा तर भुगा झालेला... ते ठेवायला म्हणून मी खिशात हात घातला तर गाडीची की सापडली.. . पॉक पॉक. मी पुन्हा गाडीत बसलो होतो. डॅश बोर्डवर मोबाईल तसाच होता. वेळ बघितली . 6 PM. मेसेज बॉक्स मध्ये एक नवीन मेसेज माझी वाट पहात होता.

Book traversal links for [खो कथा] पोस्ट क्र. ३

  • ‹ [खो कथा] पोस्ट क्र. २
  • Up
  • [खो कथा] पोस्ट क्र. ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9436 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

पुढचा खो मी निशदे यांना देत

प्राची अश्विनी
Mon, 03/20/2017 - 08:16 नवीन
पुढचा खो मी निशदे यांना देत आहे. :)
  • Log in or register to post comments

स्वीकारला आहे.

निशदे
Mon, 03/20/2017 - 21:05 नवीन
स्वीकारला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

एक तर सटासट लिहीताय म्हणुन

पिलीयन रायडर
Mon, 03/20/2017 - 21:30 नवीन
एक तर सटासट लिहीताय म्हणुन जाम मजा येतेय! त्यात काहीच्या काही चाललंय कथेत तरी सगळे मस्त पेलवत आहेत. भारीच! निशदे ह्यांना कोणत्या भागासाठी खो देताय? ४थ्या? की अजुन कोणत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

चौथा भाग.

प्राची अश्विनी
Mon, 03/20/2017 - 22:57 नवीन
चौथा भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जबरदस्त

मिडास
Mon, 03/20/2017 - 09:24 नवीन
एवढा एकच शब्द सूचतोय.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

अॅस्ट्रोनाट विनय
Mon, 03/20/2017 - 10:18 नवीन
शैली व्यवस्थित जुळली. सलगता जाणवत आहे, धागे छान जोडलेत. गुढरम्यतेच्या ढगांमध्ये मन तरंगायला लागलंय. Opposite gender च्या दृष्टीकोनातून लिखाण करणे ही अवघड गोष्ट असते. तुम्ही ती उत्तमरित्या पेलली.
  • Log in or register to post comments

मस्त

इडली डोसा
Mon, 03/20/2017 - 10:31 नवीन
हा प्रकार आवडतोय
  • Log in or register to post comments

जबरी!!! मज्जा आली!!!

जव्हेरगंज
Mon, 03/20/2017 - 10:34 नवीन
जबरी!!! मज्जा आली!!!
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Mon, 03/20/2017 - 10:45 नवीन
मस्त मस्त चाललीय कथा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

वाढिव

शेवटचा डाव
Mon, 03/20/2017 - 11:32 नवीन
कथाने अधभुत वळन घेतले
  • Log in or register to post comments

वाढिव

शेवटचा डाव
Mon, 03/20/2017 - 11:32 नवीन
कथाने अधभुत वळन घेतले
  • Log in or register to post comments

मस्त!

अजया
Mon, 03/20/2017 - 12:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

लै भारी!

पैसा
Mon, 03/20/2017 - 13:16 नवीन
लै भारी चालू आहे!
  • Log in or register to post comments

छान चाललेय ! कल्पनाशक्तीला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/20/2017 - 13:37 नवीन
छान चाललेय ! कल्पनाशक्तीला वार्‍यावर उडत नेणारा प्रकार आहे हा ! :)
  • Log in or register to post comments

एखादा भिडू तरी जमिनीवर खो देईल ?

अनन्त्_यात्री
Mon, 03/20/2017 - 14:43 नवीन
surrealism च्या "अवकाशात"च घुटमळतायत सगळे. एखादा भिडू तरी जमिनीवर खो देईल ?
  • Log in or register to post comments

मस्त

वरुण मोहिते
Mon, 03/20/2017 - 15:36 नवीन
चालू आहे .
  • Log in or register to post comments

मस्त !

उगा काहितरीच
Mon, 03/20/2017 - 18:46 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

छान

Ranapratap
Mon, 03/20/2017 - 19:11 नवीन
खो खो चा खेळ चांगलाच रंगला आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त... मजा येते आहे.

ज्योति अळवणी
Mon, 03/20/2017 - 19:14 नवीन
जबरदस्त... मजा येते आहे. येऊदे पुढचा भाग लवकर
  • Log in or register to post comments

मस्तच

रुस्तम
Mon, 03/20/2017 - 19:52 नवीन
पु भा प्र
  • Log in or register to post comments

निशदे यांच्या भागाच्या

पुंबा
Tue, 03/21/2017 - 10:48 नवीन
निशदे यांच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

+१

समाधान राऊत
Tue, 03/21/2017 - 19:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

+11

प्राची अश्विनी
Tue, 03/21/2017 - 19:53 नवीन
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ऑलमोस्ट तयार झाला आहे. थोड्या

निशदे
Tue, 03/21/2017 - 20:48 नवीन
ऑलमोस्ट तयार झाला आहे. थोड्या वेळात टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा