Skip to main content

शांत समय अन्...

लेखक Pradip kale यांनी रविवार, 19/03/2017 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई, माझ्या कविता आणिक गाणी शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती -प्रदिप काळे. माझा ब्लॉग: मुक्त कलंदर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2057
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मस्त !!