पण, लक्षात कोण घेतो!!!
परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. अलीकडेच POK मध्ये मोदींनी घडवून आणलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या समर्थकांनी चौकाचौकात वाटलेली साखर आठवली आणि आजही असंच काहीतरी घडलंय कि काय, म्हणून उत्सुकता अजूनच वाढली. त्या दिवशी साखर वाटणार्यांनी प्रत्येकाला साखर दिली होती पण आजची चॉकलेट्स मात्र काही निवडक लोकांच्याच हातात पडत होती. काय भानगड आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. हळूहळू ती माझ्याजवळ आली आणि हातातल्या पिशवीतून एक चॉकलेट काढून देत मला म्हणाली, 'thank you mam for wearing a helmet.' तिच्या हातातून चॉकलेट घेत तिच्याइतकीच मोठी स्माईल देत मी म्हणाले, 'i wear it for my own safety'. तिने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले अन 'but many wont understand' असं म्हणत पुढच्या हेल्मेटधारकाला चॉकलेट द्यायला निघून गेली. घ्या! म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्ही हेल्मेट वापरा हेही सांगावं लागतं लोकांना. हेल्मेट नं घालण्याची अनेक भन्नाट कारणं असतात बरं का या लोकांकडे, जसं कि आजूबाजूचे आवाज येत नाहीत, डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं, सगळ्यात भारी म्हणजे हेअरस्टाईल खराब होते! अरे, पण डोकंच शाबूत नाही राहिलं तर कसली हेअरस्टाईल अन कसलं काय. सर सलामत तो पगडी पचास, 'पण लक्षात कोण घेतो?'
याआधीही मी बर्याचदा वेगवेगळ्या एन जी वो च्या मुलामुलींनी सिग्नल वर बघितलंय, 'Thank You' नोट्स घेऊन उभे असतात बिचारे उन्हातान्हात. कधी सिग्नल पाळलात म्हणून थँक यु, तर कधी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबलात म्हणून थँक यु. आणि आज हेल्मेट घातल्याबद्दल थँक यु! बघा, म्हणजे या एन जी वो च्या निस्वार्थी पोरा-टोरांपासून लाच घेणाऱ्या अन नं घेणाऱ्या म्हणजे पावती फाडणाऱ्या पोलिसांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने वाहतुकीचे नियम शिकवत असतात, पण 'साम दाम दंड' यातली कुठलीच भाषा नं समजणारे किंवा समजून नं घेणारे महाभाग आहेतच. आणि हो पुण्याच्या नावाखाली सगळे नियम धाब्यावर बसवणारेही कमी नाहीत. एकीकडे कट्टयावर बसून पुण्यातले लोक कसे नियम पाळत नाहीत याची तासंतास चर्चासत्रं रंगवायची आणि दुसरीकडे स्वतः गाडी चालवताना पुण्यात चालतं म्हणत सगळ्या नियमांची ऐशी-तैशी करायची. :)
असो, या नियम नं पाळणाऱ्या लोकांमध्ये अजून एक मजेशीर प्रकार आहे बरं का, तो न्हणजे 'सदैव घाईत असलेले'. समोर चक्क लाल सिग्नल लागलेला असतानाही हे लोक बऱ्याचदा प्य्या-प्य्या करून हॉर्न वाजवतात. पुढे उभे राहिलेल्यांनी सिग्नल मोडून यांचा रस्ता मोकळा करावा किंवा बाजूला सरकून यांना जायला रस्ता द्यावा अशी काहीतरी अजिबो-गरीब अपेक्षा असते बहुदा या लोकांची. मी अशा लोकांच्या हॉर्नकडे मुळीच लक्ष देत नाही, बहिरीचं होते म्हणा ना. ऍम्ब्युलन्स असेल तरंच बाजूला होऊन रस्ता देते. मी सिग्नल पाळते आणि कमीत कमी अशा दहा-पाच जणांना पाळायलाही लावते :). बरं, आता एवढे हॉर्न वाजवूनही हि हालत नाहीये म्हणल्यावर गप्प बसावे कि नाही, तर नाही सिग्नल हिरवा व्हायच्या पाच-दहा सेकंद आधीच पुन्हा हॉर्न वाजवायला लागतात, जणू काही पुढच्या रांगेत उभे राहिलेल्यांना रंगआंधळेपणा आहे आणि हिरवा झालेला सिग्नल त्यांना दिसणारच नाहीये. बरं एवढं करून थांबत नाहीत बरं का हे लोक, सिग्नल सुटल्यावर निघून जाताना अस्सा लूक देतात, जणू अर्धा मिनिट सिग्नलवर उभं रहायला लागल्यामुळे यांचं एखादं ऑस्कर किंवा नोबेल पारितोषिक हुकलं आहे. हे लोक असा लूक देतात ना तेव्हा मला फार भारी वाटतं, अगदीच गुदगुल्या होतात म्हणा ना. आणि नकळत का होईना आपण या लोक्कांना सिग्नल पाळायला लावला म्हणून वेगळाच आनंद होतो. मला एक गोष्ट कळत नाही, कि या लोकांना एवढं महत्त्वाचं काम असतं तर हे लोक वेळेवर का निघत नाहीत घरातून?
हेल्मेट वापरावं, वेळेवर निघावं म्हणजे घाई होणार नाही आणि बरेच अपघातहि टळतील या सगळ्या साध्या आणि स्वहिताच्या गोष्टी, "पण लक्षात कोण घेतो?"
विद्या चिकणे ( मांढरे )
याद्या
4587
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
हौ ना या..
सहमत.
लेख आवडला
सुरू झालेला आहे..
In reply to लेख आवडला by पैसा
असं रस्त्यावर कुणी चॉकलेट
हेल्मेटमुळे गाडी चाकवणं त्रासदायक होतं
>>>एकतर बाजूचं काही पटकन दिसत
In reply to हेल्मेटमुळे गाडी चाकवणं त्रासदायक होतं by संजय क्षीरसागर
हेल्मेटची कंपनी आणि किंमत सांगा
In reply to >>>एकतर बाजूचं काही पटकन दिसत by मोदक
संक्षी
In reply to हेल्मेटमुळे गाडी चाकवणं त्रासदायक होतं by संजय क्षीरसागर
मी स्वतः गेली १० वर्ष हेल्मेट
माझे सासरे अतिशय हळु स्कूटर
आपला प्रतिसाद आवडला.
In reply to माझे सासरे अतिशय हळु स्कूटर by स्वीट टॉकर
गोडबोले,
In reply to माझे सासरे अतिशय हळु स्कूटर by स्वीट टॉकर
तत्पूर्वी एक सांगायचं राहिलं
In reply to गोडबोले, by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to तत्पूर्वी एक सांगायचं राहिलं by संजय क्षीरसागर
Kishi...????? How sweet.
In reply to तत्पूर्वी एक सांगायचं राहिलं by संजय क्षीरसागर
ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं
In reply to गोडबोले, by संजय क्षीरसागर
ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं वाचवायचा प्रयत्न करीन !असा ठरवून प्रयत्न होत नसतो संक्षी.. बॉडी रिअॅक्शन टाईम आणि रिफ्लेक्झेस वर थोडे संशोधन करा. तरीही आत्मविश्वास असेलच तर असे डोके वाचवायचे प्रयत्न करण्यापेक्षा सरळ अॅक्सीडेंट टाळायचे प्रयत्न करा - आणि "अॅक्सीडेंट टाळता आले नाही तर काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधा.तरीही आत्मविश्वास असेलच तर सरळ अॅक्सीडेंट टाळायचे प्रयत्न करा
In reply to ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं by मोदक
rare events बद्दल थोडं
In reply to तरीही आत्मविश्वास असेलच तर सरळ अॅक्सीडेंट टाळायचे प्रयत्न करा by संजय क्षीरसागर
ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं
In reply to गोडबोले, by संजय क्षीरसागर
सदस्यकाळ 10 months 5 days !
In reply to ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं by पिनाक
सुंदर लेख !
In reply to माझे सासरे अतिशय हळु स्कूटर by स्वीट टॉकर
आपण कितीही निवांत गाडी चालवली तरी बाकीच्यांचा वेग, आकार आणि शहाणपणा याची आपण खात्री देऊ शकत नाही.+१०० याला थोडे बदलून असेही म्हणता येईल की, "आपण कितीही समजाऊन सांगितले तरी बाकीच्यांची वृत्ती (अटिट्यूड), समज आणि शहाणपणा याची आपण खात्री देऊ शकत नाही." :) :(किंवा असं ही म्हणता येईल
In reply to सुंदर लेख ! by डॉ सुहास म्हात्रे
लेखन आवडले.
मला डोक नाही..
मी हेल्मेट वापरते आणि लाल
शंभर नंबरी लेखन
छान ऑबसेर्व्हशन आणि लेखन.
छान लिहिले आहे
झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे
In reply to छान लिहिले आहे by सुमीत
सिग्नल ला चार चाकी थांबली आणि