एकच अमृत घोट मिळावे
चालता चालता जरा विसावे, दाट सावलीत जरा निजावे
गंतव्यास अंतर बरेच बाकी, मागे वळून जरा पाहावे
जे राहिले मागे ते विसरावे, जे आले सोबत ते घेत चालावे
हरवले त्याची बेरीज कसली, मिळेल त्याचे आनंद असावे
पडावे प्रश्न मनी अस्तित्वाचे, ह्या गूढाचे अर्थ कळावे
अनंत आहे सागर बाकी, एकच अमृत घोट मिळावे
निनाव
१७.०३. २०१७
छान
शीर्षक वाचल्यावर......