पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील)
सारण:
४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर
१ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक )
१ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
१ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
(आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते).
१ tsp तीखट
पारी:
दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ)
अर्धी वाटी कणिक किंवा मैदा
१ tsp मीठ
१ tsp तीखट
चिमुटभर हळद
चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा
तळायला तेल.
कृती:
सारणाचे सगळे घटक एकत्र करावे.
पारीचं पीठ जमेल तितकं घट्ट भिजवून तेलाचा हात लावून मळावं आणि ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावं.
पीठाचे ३ भाग करून प्रत्येकाची पोळी लाटावी. (फार पातळ किंवा फार जाडही नको).
त्यावर चिंचेचा कोळ पातळ थर देण्याइतपत पसरावा.
सारणाचे ३ भाग करून एक भाग ह्या पोळीवर दाब देऊन पसरावा. ( 1 इंच कड सोडून)
आता ह्या पोळीची घट्ट वळकटी करावी.
वळकटीच्या २ बाजू दाबून त्रिकोणी करून घ्याव्या.
पाण्याचा हात लावून सगळ्या बाजुंनी नीट बंद करावी जेणेकरून तळताना बाकर बाहेर येणार नाही.
काही लोक ह्या वळकटीला कापून तळतात. पण सारण फ़ार बाहेर येतं. तेव्हा लोट किंवा वळकट्या करतानाच लहान पोळ्या लाटून सगळीकडून बंद कराव्या. अश्या छोट्या वड्या पण गरम तेलात व्यवस्थीत तळता येतात.
कुणाला काही variation माहीती असेल तर नक्की सुचवा.
वाचने
6673
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
अगदी वेगळा
फोटुचं विचारलंय.
तुम्ही टाकलेला मूळ फोटू मायबोलीवर आहे असे त्या धाग्यातून
In reply to फोटुचं विचारलंय. by मृण्मयी
फुटू????????? -
सुंदर
नविन
फोटू दिसेल
ओ.. राम नंतर म्हणा..
In reply to फोटू दिसेल by विसोबा खेचर
तात्या, धन्यवाद!
In reply to फोटू दिसेल by विसोबा खेचर
राम
In reply to तात्या, धन्यवाद! by मृण्मयी
:(
In reply to राम by विसोबा खेचर
धन्यवाद तात्या!
In reply to राम by विसोबा खेचर
नागपूर
छान आहे रेसिपी !!
भारीच...
सांबार वडी
खुप छान ...
अरे आता
दिसला ग बाई दिसला..
In reply to अरे आता by विसोबा खेचर
दिसला ग बाई दिसला..
In reply to अरे आता by विसोबा खेचर
काय जबरदस्त आहे फोटो..
आरे मला तर
लवकर पाठवा
छान आहे