Skip to main content

पुडाच्या वड्या

लेखक मृण्मयी यांनी बुधवार, 18/02/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील) सारण: ४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर १ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक ) १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ १ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते). १ tsp तीखट पारी: दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ) अर्धी वाटी कणिक किंवा मैदा १ tsp मीठ १ tsp तीखट चिमुटभर हळद चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा तळायला तेल. कृती: सारणाचे सगळे घटक एकत्र करावे. पारीचं पीठ जमेल तितकं घट्ट भिजवून तेलाचा हात लावून मळावं आणि ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावं. पीठाचे ३ भाग करून प्रत्येकाची पोळी लाटावी. (फार पातळ किंवा फार जाडही नको). त्यावर चिंचेचा कोळ पातळ थर देण्याइतपत पसरावा. सारणाचे ३ भाग करून एक भाग ह्या पोळीवर दाब देऊन पसरावा. ( 1 इंच कड सोडून) आता ह्या पोळीची घट्ट वळकटी करावी. वळकटीच्या २ बाजू दाबून त्रिकोणी करून घ्याव्या. पाण्याचा हात लावून सगळ्या बाजुंनी नीट बंद करावी जेणेकरून तळताना बाकर बाहेर येणार नाही. काही लोक ह्या वळकटीला कापून तळतात. पण सारण फ़ार बाहेर येतं. तेव्हा लोट किंवा वळकट्या करतानाच लहान पोळ्या लाटून सगळीकडून बंद कराव्या. अश्या छोट्या वड्या पण गरम तेलात व्यवस्थीत तळता येतात. कुणाला काही variation माहीती असेल तर नक्की सुचवा.

वाचने 6673
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मृण्मयी, रेसिपी छान आहे... पण 'फोटो' नाही दिसत आहे...

अगदी वेगळा पदार्थ आहे हा! छानच असणार चवीला! फोटू दिसत नसल्याने वड्या कश्या दिसत असतील हा अंदाज येत नाहीये. रेवती

थँक्यु! फोटोबद्दल सरपंचांना विचारलय. कारण मला दिस्तोय फोटो.

In reply to by मृण्मयी

समजते आहे. तुम्हाला मूळ फोटू www.flickr.com किंवा picasa अशा ठिकाणी अपलोड करुन मग त्याचा दुवा वरच्या सूर्यास्ताच्या खिडकीवर टिचकून द्यावा लागेल. चतुरंग

करुन बघायला पाहीजे. रेसिपी वरुन तरी खुप मस्त लागेल अस वाटतय. :?

फोटू दिसेल अशी आता व्यवस्था केली आहे. लिंक चुकीची दिली गेली होती.. असो.. जबरा पाकृ.. फोटू पाहून तात्याने राम म्हटला! मृण्मयीबेन, येऊ द्यात अजूनही अश्याच पाकृ.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, धन्यवाद! राम म्हणण्याआधी फ्लोरिडाला आलात तर सावजी मटण-वडे, तंदुरी टर्की, वाट्टेल त्या कडधान्याची बिरडी, रुमाली वड्या वगैरे वगैरे खाऊ घालेन. फुटवा गायब हुई गवा!

In reply to by मृण्मयी

राम म्हणण्याआधी फ्लोरिडाला आलात तर सावजी मटण-वडे, तंदुरी टर्की, वाट्टेल त्या कडधान्याची बिरडी, रुमाली वड्या वगैरे वगैरे खाऊ घालेन. पुन्हा एकदा खल्लास झालो..! मी येणारच आहे एकदा अमेरीकेत. सिंडी क्रॉफर्ड मला अमेरीका दाखवणार आहे तेव्हा आम्ही फ्लोरिडाला तुमच्याकडेही अगदी अवश्य येऊ! :) फुटवा गायब हुई गवा! कहा गायब हुई गवा? हमका तो दिख रहा है! बाय द वे, मिपावर जो फोटू द्यायचा आहे तो आधी फ्लिकरवर चढवा म्हणजे मिपावर दिसायला काहीच अडचण येत नाही. पिकासा किंवा ब्लॉग आदी ठिकाणचा फोटू दिसायला नेहमीच प्रॉब्लेम येतो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मला नाही दिसत फुटवा..

In reply to by विसोबा खेचर

ह्यापुढे फ्लिकरचं लक्षात ठेवते. सिंडी क्रॉफर्ड येत असते इकडे फर्निचरच्या दुकानांत, स्वतः डिझाइन केलेली टेबलं, खुर्च्या, पलंग आणि सोफे बघायला. तीच्यासाठी हवंतर वाटीभर कालवण काढून ठेवीन बाजुला! :)

तू नगपूरची आहेस का? तिथे अश्या वड्या करतात. मस्त लागतात. मला सारणापेक्षा कव्हरच आवडतं. ते काय ग ,तिखट मिठाची पुरीच नाही का? मीनल.

माझा अन्दाज .... ह्या काहीशा बाकरवडी सारख्या लागत असणार...

मस्त वड्या...पण तेवढा फोटु दाखवा बाई :-)

माझ्या सासरी नागपुरला पण सासुबाई करतात अश्या वड्या पण त्याला ते सांबार वडी म्हणतात. पण मस्त पाककृती :)

खुप छान ... आई करते... नागपूर चा पदार्त का ...?

अरे आता तरी दिसतोय का फोटू? आत तो आम्ही फ्लिकरवर चढवला आहे. आपला, (फ्लिकरप्रेमी) तात्या.

आरे मला तर दिसला तुझ्या रेसिपिचा फोटो.........ही ही ह्नी.... :D :)) चान दिसत आहे.... आग मला ना १ विचरयचय तुला...विचरु का..??? :/ मला तुझ नाव खुप आवडत पन मला आर्थ नहि महिति सन्गु शकशिल का तुझ्या नवचा अर्थ..... :?

नुसते वड्यांचे फोटू काय दाखवता? प्रत्येक प्रतिसादकर्त्याला "पुडाच्या वड्यांच्या पुड्या" वानगीदाखल पाठवा की! =))