परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय. कधी ओळखणार आपण ह्या किल्ल्यांची किंमत, एकेठिकाणी आधुनिक शिवसमारक उभारताना त्याच अरबी समुद्रात आपल्या अस्तित्वाची लढाई देत अजूनही ठामपणे उभ्या असलेल्या मराठांच्या वारसदारांची आर्त हाक केव्हा ऐकू येईल आपल्याला?? शेवटी काळ बदलला असला तरी शिवरायांचे गडकील्ले मात्र अजूनही लढत आहेत, त्यावेळी गनिम होते आणि ह्यावेळी निसर्ग. कधी संपेल आपल्या किल्ल्यांची लढाई?? कधी येतील त्याना अच्छे दिन? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधत जड अंत:कर्णाने सिंधुदुर्गाचा निरोप घेतला...
वाचने
1697
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीयाना आपल्या इतिहासाविशयी
अगदी अगदी...आपल्या भाषेचाही
In reply to भारतीयाना आपल्या इतिहासाविशयी by दिगोचि
मोकलाया... आठवले!
In reply to अगदी अगदी...आपल्या भाषेचाही by टवाळ कार्टा
खरंय! आपले गढ आणि किल्ले
अहो प्रयत्न करणे