“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”
“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.
मध्यरात्रीच्या सुमारास थकलाभागला जॉन घरी आला. हॉटेलमधून आणलेलं जेवण त्याने ताटात वाढलं. शुभ्रक्रांती ध्वजांच्या ढिगाऱ्यांतून मार्ग काढत तो अडगळीच्या खोलीत आला. अंधुक उजेडात अंगाचं मुटकुळं करून ती बसलेली होती. त्याने तिचा थरथरणारा हात हातात घेतला,
“घाबरू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही.”
अन ती गोरीपान तरूणी खुदकन हसली.
-------------------------------------------------
वाचने
1415
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पर्धेतील चित्रावर आधारित
छान आहे. आवडली.
In reply to स्पर्धेतील चित्रावर आधारित by अॅस्ट्रोनाट विनय
छान आहे कथा.
शशक म्हणून चांगलीये!
आवडली. मस्त लिहिली आहे