Skip to main content

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या भविष्यातल्या कारकिर्दीसंबंधीचे आडाखे

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 10/11/2016 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक चढउतार पाहत व काहीशी एकाकी पण कडवी लढत देत डोनाल्ड ट्रंप यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. येत्या २०१७ च्या जानेवारीत ते अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष म्हणून जगातल्या सर्वात ताकदवान अश्या व्हाईट हाउसमधल्या ओव्हल ऑफिसचा ताबा घेतील. जगभर त्यांच्या पराभवासाठी मेणबत्त्या जाळणारे आणि "इट विल बी अ गर्ल (किंबहुना, इट बेटर बी अ गर्ल)" असे संदेश पाठविणारे अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि चॅन्सलर आता डोक्याला हात लावून ट्रंपशी मैत्रीचे पूल कसे बांधावे याचे व्यूह रचत असणार यात शंका नाही ! कारण, अमेरिकेशी फटकून वागणे कोणालाच परवडणार नाही. "ट्रंप प्रेसिडेन्सीचा जगावर काय परिणाम होईल ?" किंवा "काय होणार आता या जगाचे ?" या अर्थाचे कोडे सगळ्यांनाच पडले आहे. त्याबाबतीत अनेक भाकिते केली गेली आहेत आणि अजून बरीच केली जातील. त्या गर्दीत माझाही एक आडाखा किमान मिपावर तरी खपून जायला हरकत नाही ;) माझा आडाखा एका वाक्यात असा आहे... ट्रंप प्रेसिडेन्सीच्या पुढच्या दोन वर्षांत "अमेरिका-रशिया-भारत-जपान व छोटे पार्टनर म्हणून दक्षिणपूर्व आशियातील देश आणि खुशीने-नाखुशीने जमलेला युरोपीय समुदाय" विरुद्ध "चीन-पाकिस्तान-उत्तर कोरिया" असे गट पडून आंतरराष्ट्रीय राजकारणी दबावखेळ सुरू होतील असा माझा अंदाज आहे. अर्थातच, या सगळ्या रसायनाला, मध्यपूर्वेतील यादवी व त्यामुळे बदलत जाणारे अर्थ-तेल-सामरिक हितसंबंधांचा तडका मिळत जाणार आहेच. आता वरच्या वाक्याचा एक एक पदर थोड्या विस्ताराने पाहूया.... अमेरिकेचे अंतर्गत राजकारण केवळ विरोधकांचाच नव्हे तर स्वतःच्या पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांचा तीव्र विरोध असूनही ट्रंपला राष्ट्राध्यक्षाचा मुकुट अनपेक्षितपणे मिळालेला आहे. त्यामुळे, तो सद्या काहीश्या "नथिंग टू लूज" अश्या परिस्थितीत आहे. अश्या परिस्थितीत काहीतरी करून दाखवणे जेवढे आवश्यक असते, तेवढेच धाडशी निर्णय घेणेही तुलनेने जास्त सोपे असते. तो "काहीतरी करून दाखवेल" आणि त्याच्या जोरावर अजून एकदा निवडणूकीच्या मैदानात उतरेल याबाबत त्याने त्याच्या विजयसमारंभातल्या भाषणात "पुढची चार वर्षे... कदाचित पुढची आठ वर्षे" अश्या अर्थाचे शब्द बोलून निर्देश केला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत ट्रंपने विरोधी पक्षाच्याच नव्हे तर स्वतःच्या पक्षातील अनेक राजकीय धुरिणांच्या पायावर पाय दिले आहेत. महत्वाच्या अमेरिकन माध्यमांनी त्याच्याविरुद्ध कडवा प्रचार केला होता. ही सर्व मंडळी आता कपाळाला हात लावून "देवाची इच्छा" असे म्हणत स्वस्थ बसतील असे समजणे वेडेपणाचे होईल. आजच द न्यू यॉर्करने "An American Tragedy : The electorate has, in its plurality, decided to live in Trump’s world of vanity, hate, arrogance, untruth, and recklessness." असा कडवट मथळा देऊन पहिली तोफ डागली आहे. हिलरीचे पराभव स्वीकारणारे भाषण कितीही समंजस असले तरी, ट्रंपचा राष्ट्राध्यक्षाचा मुकुट काटेरी आणि कारकिर्दीचा रस्ता खडतर आहे, यात संशय नसावा. रशिया ट्रंप अमेरिकेचे रशियाबरोबरचे संबंध सुधारेल असा माझा अंदाज आहे. तसे झाले तर ते भारताच्या फायद्याचेच होईल. सद्या भारताची अमेरिकेबरोबर वाढणारी जवळीक रशियाला चिंताजनक वाटते आहे आणि गेल्या महिन्यात पाकिस्तानबरोबर सैनिकी अभ्यास करून त्याने त्याबद्दल नाराजी (पोस्चरिंग) व्यक्त केली आहे. तसेच त्याने चीनबरोबर दक्षिण चीन सागरात चीनबरोबर सामरिक अभ्यास करून आपण चीनच्या बाजूने झुकत आहोत असा संदेश दिला आहे. अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारले तर रशियाची भारत-अमेरिका मैत्रीबद्दलची नाराजी कमी झाल्यास ट्रंपचा विजय भारतासाठी सुवार्ता ठरेल असेच दिसते. ट्रंपचे विजय साजरा करणारे "स्टेट्समनलाईक" भाषण पाहता व त्याच्या भावी सरकारमधील नेमणुकींच्या फाइल्स अगोदर पासून तयार होत्या हे पाहता, तो वरून दिसतो इतका कच्चा खेळाडू नाही असेच दिसते. ट्रंप कसलेला व्यापारी आहे. समोरच्याला 'ब्रो बीट करण्यासाठी (पक्षी : टशन देण्यासाठी)' वरवर कडकपणा दाखवत असला तरीही खरा व्यापारी चांगला व्यवहार (डील) अंतिमतः आपल्या हातातून निसटू देत नाही. ट्रंपच्या स्वभावातला हा "स्ट्रीट स्मार्टनेस" पुतीनचेही बलस्थान आहे. एकमेकाची समान बलस्थाने जाणून होणारी मैत्री घट्ट असते. याशिवाय, दोघांना चीनची मग्रुरी टोचते आहेच. त्यामुळे त्याच्या स्वभावांचा समन्वय आणि त्याच्या सल्लागारांचा मुत्सद्दीपणा यांची उत्तम सांगड घातली गेली तर रशिया अमेरिका लंगोटी यार नाही पण काही ठराविक मुद्द्यांवर सहमत असणारे विश्वासू सहकारी होऊ शकतात. सद्या अमेरिका व नाटोच्या कट-कास्थानांनी रुष्ट झाल्यामुळे चीनकडे झुकू लागलेल्या रशियाला आपल्या बाजूला आणणे; ही अमेरिकेसाठी चीनला एकटे पाडून त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. असे झाले तरच सद्या काहीसे डळमळत असलेले अमेरिकेचे जागतिक वर्चस्व स्थिरतेकडे झुकेल आणि मगच "मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन" च्या दिशेने वाटचाल चालू होईल. चीनमध्ये रशियाच्या मदतीने कम्युनिस्ट क्रांती झाली. नंतर शीतयुद्धाच्या कालात रशिया व अमेरिका सोडून इतर कोणतीही जागतिक सत्ता नव्हती. चीन प्रथम रशियाची मदत घेणारे आणि त्यानंतरच्या काळात त्याला वाकुल्या दाखवणारे, पण तरीही जागतिक स्तरावरचे एक दुय्यम राष्ट्र होते. चीनच्या पाठींब्याने स्थापन झालेली कंबोडियातील पोल पॉटची सत्ता उलथवण्यासाठी झालेल्या व्हिएतनाम-कंबोडिया युद्धाचा व्हिएतनाम-चीन युद्ध हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यात चीनचा पराभव करण्यास रशियाने व्हिएतनामला मदत केली होती. त्यानंतरच्या काळात, अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अमेरिकन व्यापार्‍यांच्या लोभी कारभाराने चीनला आर्थिक व सामरिकदृष्ट्या सबळ केले. आज तोच चीन अमेरिकेला वाकुल्या आणि रशियाला आर्थिक लालूच दाखवत आहे. अश्या चीनशी संबंध सुधारणे ही अमेरिकेच्या कारवायांनी बेजार झालेल्या रशियाची सद्यकालीन गरज आहे. मात्र, पूर्वी आपल्या पंखाखाली असलेल्या, नंतर आपल्याला वाकुल्या दाखविणार्‍या आणि आता आर्थिक-सामरिक दादागिरी करणार्‍या देशाबरोबरच्या मैत्रीत दुय्यम स्थानी असणे रशियाला सुखकारक वाटत नसले तर फार आश्चर्य नाही. पुतीनशी "किमान समान हितसंबंधांच्या" पायावर मैत्री करण्यात ट्रंप यशस्वी झाल्यास रशियाला चीनपासून फोडून अमेरिकेला चीनविरुद्ध एक सबळ आघाडी स्थापन करता येईल. असे झाल्यास, दोन्ही देशांना, जगभर आपले महत्त्व राखण्यासाठी होत असलेला डोईजड असलेला सामरिक खर्च कमी करून देशांतर्गत विकासासाठी मोठ्या प्रमाणात धन उभे करणे शक्य होईल. जगातील इतर देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचा होणारा सामरिक खर्च त्या देशांनी विभागून घेतला पाहिजे, हे एक महत्त्वाचे सूत्र निवडणूकीत ट्रंप प्रामुख्याने मांडतं होता. Make America great again या घोषवाक्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी ट्रंप या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयास करेल. रशियाबरोबर समंजस संबंध असणे हे युरोपीय समुदायाच्या देशाच्या फायद्याचे व सुरक्षिततेचे आहे. रशिया कसाही असला तरी सामरिकरीत्या प्रबळ व गुरगुरणार्‍या (बेलिजरंट) शेजार्‍यापेक्षा विश्वासू व्यावसायिक संबंध असलेला व (मित्र नसला तरी) शत्रू नसलेला शेजारी युरोपसाठी केव्हाही जास्त चांगला असेल. (पाकिस्तान नावाच्या आपल्या शेजार्‍याबरोबरच्या अनुभवांवरून हे स्पष्ट व्हावे !) त्यामुळे अमेरिका-रशिया संबंध सुधारावेत अशीच युरोपीय समुदायाचीही इच्छा आहे. केवळ कम्युनिस्ट आहे या कारणाने रशियाच्या युरोपमध्ये किंवा मध्यपूर्वेत अजून जास्त कुरापती काढल्यास आपल्याही समस्या वाढतात हे त्यांना सद्या चालू असलेल्या मध्यपूर्वेतून येणार्‍या निर्वासितांच्या समस्येवरून पुरेपूर ध्यानात आले आहे. जोपर्यंत समस्या आपल्या घरापासून दूर असते तेव्हा नीतिमत्तेचे आणि मानवतेचे डोस पाजणे बरे वाटते, पण समस्या आपल्या घरात शिरली की आपले विचार बदलतात, हे भारताच्या अतिरेक्यांबद्दलच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पाश्चिमात्य देशांना स्वतःचे हात भाजून घेतल्यावरच पटले आहे. आता त्यांनी स्वतःच्या अतीतात्वीक भूमिकांना मुरड घालून रशियाबरोबर संबंध सामंजस्याचे होण्यासाठी प्रयत्न केले व ट्रंपला त्या दृष्टीने मदत केली (किंबहुना ढकलले / पुश केले) आणि ट्रंपने त्यांना तेवढी सूट दिली तर आश्चर्य वाटू नये. आशिया (मुख्यतः भारत, चीन, जपान आणि दक्षिणपूर्व आशिया) भारत व अमेरिकेचे संबंध गेल्या दोन वर्षांत लक्षणीयरित्या सुधारलेले आहेत. ट्रंपचे कसलेले व्यापारी असणे हे मोदींबरोबरचे चांगले संबंध अजून चांगले होण्यासाठी फायद्याचे आहे. मोदी (अच्छे दिन आनेवाले है) आणि ट्रंप (मेक अमेरिका ग्रेट अगेन) या दोघांनाही आपल्या देशासाठी चांगले दिवस आणणे आपल्या राजकीय भविष्यासाठी आवश्यक आहे. "अबकी बार मोदी सरकार" चा नारा "अबकी बार ट्रंप सरकार" असा थोडासा बदलून निवडणूकीत वापरायला हरकत नसलेल्या ट्रंपची मोदींबरोबर जोडगोळी जमायला वेळ लागणार नाही असा अंदाज चुकीचा होणार नाही. चीनचा जागतिक प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय महासागरात आणि दक्षिण चीन सागरात भारताची सक्रिय सामरिक-व्यापारी उपस्थिती आवश्यक आहे. ही भारताच्या जागतिक राजकीय-व्यापारी विकासासाठी आवश्यक आणि अमेरिकेच्या सोयीची रणनीती आहे. भारताशी दोस्ती वाढविल्यास, भारतीय महासागरातली स्वतःची उपस्थिती कमी करून अमेरिका आपला खर्च कमी करू शकेल. या एकमेकाच्या सोयीच्या वस्तुस्थितीमुळेच नुकतेच या दोन देशांत अनेक सैन्यसुविधा करार झाले आहेत. हीच वस्तुस्थिती भारत व अमेरिकेला पुढच्या दिवसांत अजून जवळ आणेल. मोदी-ट्रंप व्यक्तीगत समीकरण यात जास्त वेग आणेल. पूर्वी भारतीय महासागर आणि दक्षिण चीन सागर यांच्याबाबतीत धडाडी न दाखविल्याने आणि / किंवा अनिच्छा दाखविल्यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिणपश्चिम आशियाई देशांच्या रणनीतीमध्ये भारत नगण्य देश होता. गेल्या काही दिवसांत भारताने स्वयंनिर्णयाने स्वतःवर लादलेला हा वनवास संपवल्याने या देशांनी भारताची दखल घेणे सुरू केले आहे व भारताशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे, त्यांच्यावर चीनचा दबाव वाढेल, पण चीनच्या विस्तारवादी आणि दादागिरीच्या (हेजेमोनिस्टिक) वागणुकीमुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. मजबूत भारत-अमेरिका मैत्रीचा आधार असल्यास त्यांना वाटणारी चिंता कमी होईल व ते भारताच्या अधिकच जवळ येतील. दक्षिण चीन सागरात आणि त्या समस्येत जपान असणे हे जपानच्या दृष्टीने आपत्ती असली त्यात जपानसारखा तंत्रज्ञानात विकसित व सधन असलेला देश असणे भारताच्या दृष्टीने इष्टापत्ती आहे. कारण त्यामुळेच आता जपान भारताशी व्यापारी व सामरिक जवळीकेचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेऊ लागला आहे. यामुळे भारतात होणार्‍या परदेशी थेट गुंतवणुकीत वाढ होईल व विकासकामांसाठी मोफत/नगण्य दराने मिळणारी कर्जे शक्य होतील. नुकताच झालेले बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प हे त्या बाबतीतली उदाहरणे आहेत. दक्षिणपूर्वेतील देशांवर पाश्चिमात्य प्रभाव आहे. मात्र, सधन झाल्यानंतर काहीसे मानी झालेले हे देश केवळ भारतालाच नव्हे तर क्वचित प्रसंगी अमेरिकेलाही डोळे दाखवू लागले होते. गेल्या दशकातल्या चीनच्या वाढत्या विस्तारवादी कारवायांमुळे ते अस्वस्थ झाले आहेत. भारतात राजकीय इच्छाशक्ती वापरण्याची धमक आहे याची खात्री पटल्यानंतर त्यातले बरेच देश आता भारताशी मैत्रिपूर्ण संबंध करण्यास उत्सुक आहेत. इतकेच नाही तर जपान व व्हिएतनाम "भारताने उघडपणे दक्षिण चीन समुद्रात सामरिक व व्यापारी हालचाली कराव्या" असे म्हणत आहेत. अमेरिका-भारत संबंध सुधारल्याने या देशांच्या भारताशी होणार्‍या जवळीकेला अधिक बळ मिळेल. दक्षिण चीन सागर जागतिक वाहतुकीसाठी अनिर्बंधपणे खुला असणे भारताच्या जपान, दक्षिण कोरिया व अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याबरोबरच्या व्यापारासाठी अत्यावश्यक आहे. याशिवाय, तेथील सागरसंपत्तीच्या विकासातला (उदा. ओएनजीसी आणि व्हिएतनामचा सागरी तेल उत्पादनाचा करार) सहभाग भारताला दीर्घकालीन आर्थिक फायदाही मिळवून देईल. मध्यपूर्व मध्यपूर्व सद्या अनेक भल्याबुर्‍या हितसंबंधांची आणि गुन्हेगारीची एक विचित्र खिचडी झाली आहे. काहीतरी प्रचंड उलथापालथ झाली तरच तिचे नजिकच्या काळात समाधान निघेल. अन्यथा ही समस्या काही वर्षे किंवा दशके अशीच चालू राहील यात संशय नाही. मध्यपूर्व संघर्ष "अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देश" आणि "रशिया-इराण-सिरीया" असा सुरु झाला असला तरी त्याला स्थानिक-धार्मिक (शिया, सुन्नी, कुर्द, इ) राजकारणाचे व गुन्हेगारी अर्थकारणाचे (अवैध तेल व्यापार, अंमली पदार्थांचा व्यापार, मानवी तस्करी, स्थानिक गुंडगिरी, इ) बरेच पदर आहेत. त्यामुळे कोणत्याही देशाला तेथे एकहाती वर्चस्व मिळविता आले नाही किंवा मिळविता येणार नाही. तत्कालिक फायद्यासाठी लढणारे आणि धार्मिक धुंदीखाली तरुणांना लढवणारे अनेक मर्सिनरी गट तेथे कार्यरत असल्याने कोणत्याही देशाला "आजच्या रोजी आपल्या बाजूने कोणता मर्सिनरी गट आहे ?" याचे नक्की उत्तर देणे कठीण आहे. अशी परिस्थिती अनागोंदीतून फायदा मिळविणार्‍या काही विकृत प्रवृत्तींशिवाय कोणालाच बरी वाटत नाही. पण तिथून बाहेर निघणे व त्या विकृतींना बिनविरोध वाढू देणे अजून जास्त धोक्याचे आहे. त्यामुळे त्या संघर्षातील सर्वच देशांची आजची परिस्थिती "धरले तर चावते आणि सोडले तर पळते" अशी झाली आहे. अनिश्चित कालासाठी अनिर्बंधपणे पैसा व मनुष्यबळ खर्च करायला लागणे आणि तरीही त्याचा अंतिम परिणाम माहित नसणे यासारखी अस्वस्थ करणारी परिस्थिती दुसरी नाही. दोन्ही बाजूंना हे थांबवायचे आहे. पण हे करताना आपल्या हितसंबंधांना दुसरी बाजू धोका पोहोचवणार नाही याची खात्री कोणत्याच बाजूला नाही. किंबहुना, सद्यस्थितीत दुसरी बाजू आपल्या हितसंबंधांना नक्कीच धोका पोहोचवेल अशी खात्री प्रत्येक बाजूला वाटत आहे. असा विश्वासाचा अभाव असला की आपले हितसंबंध राखण्यासाठी क्रूर, अमानवी, अत्याचारी, मर्सिनरी गुंडांना हाताशी धरणे तुलनेने कमी अनैतिक (नेसेसरी इव्हील) वाटू लागते आणि नीतीमत्तेला डोळे मिटून मागच्या बाकावर बसायला लावले जाते. हे निर्विवाद वाईट आहे पण वास्तवातले सत्य आहे. ट्रंप-पुतीन मैत्री या विश्वासाच्या अभावातली कसर भरून काढू शकली तरी मध्य आशियाचा प्रश्न पुरता सुटेल असे अजिबात नाही, पण तेथे निदान प्राथमिक स्तराचे शासन प्रस्थापित होऊ शकेल. तसे झाले तर जगाला निदान थोडासा निःश्वास सोडता येईल. त्यामुळे रशिया, अमेरिका व इतर जगाला आपल्या अंतर्गत विकासाकडे लक्ष द्यायला मदत होईल. मात्र, यासाठी अमेरिकेला काही खालील तडजोडी कराव्या लागतील. १. रशिया : (अ) सर्वात मुख्य म्हणजे रशियाचा सिरीयावरील प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न सोडून द्यावे लागतील. सिरीया हा रशियाला भूमध्य समुद्रात प्रवेश करण्याचा एकुलता एक महामार्ग आहे. रशियाला युरोपशी जोडणारा हा सर्वात जवळचा व सुरक्षित बारमाही जलमार्ग आहे. रशियन क्रिमियापासून सुरू होणारा दुसरा जलमार्ग बॉस्फोरस सामुद्रधुनीतून जातो आणि तो रशियाचा अघोषित शत्रू असलेल्या तुर्कस्तानाच्या (यानेच काही दिवसांपूर्वी सिरियामध्ये रशियन फायटर विमान पाडले होते व युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली होती हे आठवत असेलच) ताब्यात आहे. रशियाच्या उत्तरेकडील सर्व जलमार्ग सहा ते आठ महिने बर्फाने गोठलेले असतात. रशियाच्या पूर्व किनार्‍यावरून सुरू होणारे जलमार्ग सायबेरियातून सुरू होतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त जगाला फेरी मारून युरोपला पोहोचतात. या सामरिक कारणांमुळे रशिया सिरियावरचा ताबा सोडणे अशक्य आहे. (आ) दुसरे म्हणजे पश्चिम युरोपियन देशांनी पूर्व-युएसएसआर मधील व आता स्वतंत्र असलेल्या देशांना रशियाशी संघर्ष करण्यासाठी फूस आणि / अथवा पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. एकेकाळी जागतीक स्तराची सत्ता असलेल्या व आधीच तुकडे झालेला या देशाची आपल्या उरलेल्या भूभागावर इतरांनी सांगितलेल्या दाव्यांबद्दल आणि विशेषतः: त्या दाव्यांमुळे शक्य असणार्‍या दीर्घकालीन असुरक्षेबद्दल कमालीची संरक्षणात्मक रणनीती असणे स्वाभाविक आहे. पाश्चिमात्य देश रशियाच्या या भितीबद्दल संवेदनशील झाल्याशिवाय मध्यपूर्व समस्या सुटायला सुरुवात होणार नाही. २. इराण : अमेरिकेची आणि त्याचा धाकला मित्र सौदी अरेबियाची रणनीती इराणला जितके टाचेखाली ठेवता येईल तेवढे ठेवावे अशी राहिली आहे. मोठ्या आकाराच्या, मोठ्या लोकसंखेच्या आणि दीर्घकाळ जगाची अडवणूक (सँक्शन्स) सोसण्याची चिकाटी दाखविलेल्या देशाबरोबर ही रणनीती फार काळ चालणार नाही हे ध्यानात घेऊन हल्ली अमेरिकेने थोडे नरमाईचे धोरण पत्करले आहे. मात्र, यामुळे सुन्नी सौदी अरेबिया नाखूष असून तो शिया इराणवरचा दबाव सतत चालू राहील यासाठी प्रयत्न करत राहील यात संशय नाही. इतिहास पाहता, मूलगामी धार्मिक तेढीमुळे सौदी अरेबिया व इराणमध्ये सख्य अशक्य दिसत आहे. याबाबतीत ट्रंपला सबळ राजकीय-सामाजिक-धार्मिक-आर्थिक दबावाच्या राजकारणाला तोंड द्यावे लागेल. रशियाबरोबरच्या चर्चेपेक्षा ट्रंपची बरीच जास्त कसोटी या हट्टवादाचा सामना करताना लागणार आहे. हे दोन मुख्य खेळाडू आपल्या बाजूला वळविल्याशिवाय मध्य आशियातील समस्या केवळ शस्त्रास्त्रांनी सुटणार नाही, हे नक्की. ट्रंप व्यापारी स्ट्रीट स्मार्टनेस वापरून काही प्रयत्न जरूर करेल. कारण, आपण केवळ व्यापारीच नाही तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी असल्याचे सिद्ध करण्याची ही एक नामी संधी आहे. हे केल्यास इस्लामी दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर मोठे योगदान दिले असा सबळ दावाही तो करू शकेल. "कडक, अँटी टेररिस्ट, तडजोड न स्वीकारणारा, भडक डोक्याने एखादा टोकाचा निर्णय घेणारा, इत्यादी, इत्यादी" या ट्रंपच्या छबीचा चतुर उपयोग त्याने केला तर त्याला या समस्येत बराच फायदा होईल. (झिंजियांगमध्ये इस्लामी टेररिझम मोडून काढताना चीनने कोणाची तमा बाळगली नाही, तेथे सरकारी नोकरांना रमजानचा उपवास करण्यास बंदी केली आहे, कामाच्या वेळात नमाज पढायला परवानगी नसते. या आणि इतर कडक कारवाया करताना चीनने विचारवंत आणि मानवतावाद्यांसह सगळ्या जगाला फाट्यावर मारले आहे. तरीही पाकिस्तानच्या मते चीन त्याचा "ऑल वेदर मित्र" आहे. कोणत्याही मुस्लीम देशाने त्याविरुद्ध ब्र काढलेला नाही. इतकेच काय पण कोणत्याही देशांतल्या धार्मिक संघटनांनी किंवा इसिससारख्या कडव्या अतिरेकी संघटनेने त्याबाबत दबका आवाजही काढलेला नाही, की तेथे हल्ले करून बदला घेऊ असे म्हटलेले नाही. आले ध्यानात ?) मेक्सिको मेक्सिकोबद्दल कितीही वल्गना केल्या तरी त्यासंबंधात काही मोठे बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमधली शेती मुख्यतः मेक्सिकोतून अवैध मार्गाने आलेल्या शेतमजुरांच्या जीवावर चालते. त्यात अजून भर पडते ती घरकाम करणार्‍या मेक्सिकन लोकांची. या स्वस्तात आणि मान खाली घालून काम करणार्‍या लोकांना (ते अवैध मार्गांनी आले असले व वैध मार्गांनी येऊन वैध काळ संपल्यानंतर अमेरिकेत राहत असले तरी) अमेरिकेबाहेर काढायला गब्बर शेती व्यवसायांचा आणि नवरा-बायको दोघेही काम करणार्‍या कुटुंबाचा कडा विरोध राहील. हे राजकियदृष्ट्या परवडणारे नाही. हिलरी तर त्यांना परमनंट रेसिडन्स किंवा नागरिकत्व देण्याचे गाजर दाखवत होती. यामागचे कारणे केवळ "आर्थिक" नसून, अमेरिकन नागरिक "अशी कामे, दिवसाचा इतका जास्त वेळ, इतके मन लावून करायला तयार नाहीत", हे पण आहे. हा तिढा कडक कारवाईने नव्हे तर सामंजस्याने मध्यमार्ग स्वीकारून सोडवावा लागेल. यासाठी निवडणूकीच्या काळातली वक्तव्ये विसरून ट्रंप व्यापारी मुत्सद्देगिरी वापरेल असा माझा अंदाज आहे. पाश्चिमात्य जग (मुख्यतः ब्रिटन, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया) पाश्चिमात्य जगातल्या सर्व राष्ट्रांच्या राजकारण्यांचा हिलरीबरोबर "सेक्रेटरी क्लिंटन" या नात्याने व क्लिंटन फाउंडेशनच्या निमित्ताने संबंध आलेला आहे. माध्यमांनी ट्रंपची जी प्रतिमा तयार केली आहे (ज्यात ट्रंपचा स्वतःचाही बर्‍याच प्रमाणात सहभाग आहे) तिच्या पार्श्वभूमीवर जुनी ओळख असलेल्या पोलिटिकली करेक्ट हिलरी त्यांना जास्त "सुरक्षित" वाटणे नैसर्गिक आहे. मात्र, अशी मते प्रत्यक्ष ओळखीने, भेटीतल्या वागणुकीने आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी बदलता येतात... कारण जागतिक राजकारणात स्थायी मित्र किंवा शत्रू नसतात, स्थायी असतात ते देशाचे हितसंबंध. या बाबतीतले मोदींचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच. आधी व्हिसा नाकारणारी अमेरिका आणि त्यांना "पोलिटिकल अनटचेबल" समजणार्‍या इतर पाश्चिमात्य देशांना मोदींनी एक दीड वर्षांत आपल्या मुत्सद्दीपणाच्या सामर्थ्याने आपल्या बाजूला वळवले आहे. ट्रंपच्या बाबतीत हे त्यापेक्षा सोपे आहे, कारण त्याच्या मागे अमेरिकेचे नाव आणि सामर्थ्य उभे आहे. अमेरिकेशी फटकून वागण्याचा कोणत्याही पाश्चिमात्य देश विचारही करू शकणार नाही. फक्त "आय अ‍ॅम सिन्सियर अँड आय मीन बिझनेस" हे ट्रंपने आपल्या वागण्याने आणि रणनीतीने समजावून देणे पुरेसे होईल. यापैकी प्रत्येक देशांत दुसर्‍या महायुद्धापासून अनेक मतांचे आणी स्वभावांचे सर्वोच्च नेते आले आणि गेले, पण काही प्रासंगिक कुरबुरी सोडल्यास आर्थिक-सामरिक हितसंबंधांवर आधारलेले या देशांमधिल संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत. त्यांत फार फरक पडण्याचे काही कारण दिसत नाही. असो. सद्या इतकेच पुरे. काळ सरत राहील त्याप्रमाणे वस्तुस्थितीचे खरे स्वरूप पुढे येत राहील. मग आजच्या वस्तुस्थितीवर केलेले वरचे अंदाज वास्तवात उतरतात की नाही, काही अनपेक्षित घडेल काय आणि बदललेल्या वस्तुस्थितीमुळे कोणते नवीन परिणाम वाढून ठेवले जातील, ते दिसेलच... आणि त्यावर आपली चर्चा चालू राहीलच.

वाचने 42226
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाचे पदग्रहण केल्यानंतर पाचवा फोन भारताचे पंतप्रधान मोदी यांना केला, याचा जागतिक राजकारणात अर्थ लावणे सुरु झाले आहे. त्यांनी पहिली दोन संभाषणे कॅनडा व मेक्सिको या शेजारी देशांच्या नेत्यांशी केली. या दोन देशांशी असलेल्या सीमेमुळे व त्यामुळे त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या महत्वामुळे; त्याचबरोबर मेक्सिकोच्या सीमेतून होणार्‍या अवैध घुसखोरीच्याबद्दल ट्रंप यांनी केलेल्या अनेक विधानांमुळे हे जरासे अपेक्षीतच होते. त्यांनतर त्यांनी इझ्रेल आणि इजिप्तच्या नेत्यांशी बोलणे केले. मध्यपूर्वेतील अमेरिकेचा राजकिय-आर्थिक-सामरिक कारणांसाठी असलेला रस आणि तेथे अमेरिकेचा अडकलेला पाय पाहता हे पण अपेक्षित होते. त्यानंतर मात्र, रशिया, चीन व जपान यांना मागे ठेवत ट्रंप यांनी भारतीय पंतप्रधानांशी बोलण्याचे ठरवले. यातून त्यांच्या मनातले भारताबद्दलचे महत्व अधोरेखीत झाले आहे. निवडणूकीत त्यांनी "भारत अमेरिकेचा बेस्ट फ्रेंड असेल" या दिलेल्या वचनाला वास्तवात आणणारे हे पहिले पाऊल आहे की, केवळ रशिया व चीनला संभ्रमात ठेवण्यासाठी घेतलेला पवित्रा (पोश्चरिंग) आहे, हे पुढे प्रत्यक्षात येणार्‍या कारवायांनीच स्पष्ट होईल. लेखात अगोदरच लिहिल्याप्रमाणे माझा कल पहिल्या पर्यायाच्या बाजूने आहे. पुढच्या काही महिन्यांत चित्र स्पष्ट होऊ लागेलच. http://timesofindia.indiatimes.com/india/conversation-with-donald-trump… या संभाषणात दोन्ही नेत्यांनी एकमेकाला देशात येण्याचे आमंत्रण दिले आणि स्वीकारले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यासंबंधात अमेरिकेने पाकिस्तानलाही एक संदेश दिला आहे... पाकिस्तानशी केव्हा बोलणार किंवा बोलणार की नाही हे अजुनही गुलदस्त्यात ठेवले आहे. यामुळे पाकिस्तानी शासन व लष्कर यांची केवळ जळजळ झाली असे नव्हे तर ते बर्‍यापैकी ऑक्सिजनवर गेले असतील :) यापूर्वीच्या, केवळ राष्ट्राध्यक्षच नव्हे तर शासनाच्या इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍याची भेट (डेप्युटीसेक्रेटरी, सेक्रेटरी, इ) पूर्वी प्रथम पाकिस्तान व नंतर भारत, गेल्या काही काळात प्रथम भारत व नंतर पाकिस्तान आणि अपवादाने केवळ पाकिस्तान अशी झाली आहे. या वस्तूस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला भारताबरोबर समपातळीवर असल्याचा दावा करत आला आहे. अफगाण समस्या सोडवताना पाकिस्तानची जागा मोक्याची आहे (स्ट्रॅटेजिकली इंपॉर्टंट) आहे हे नजरांदाज करता येणार नाही अशी अमेरिकेची धारणा आहे (व ती खरीही आहे). परंतू त्या वस्तूस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तान अकेरिकेला केवळ लुटतच नाही तर अमेरिकेचा विश्वासघात करत आलेला आहे, हे ट्रंप याचे वास्तविक असलेले मत केवळ निवडणूकीचा जुमला नव्हता असेच दिसते आहे. ट्रंप यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांना केलेल्या अभिनंदनाच्या फोनसंभाषणाची विनोदी/अतिशयोक्तपूर्ण जाहीरात करून पाकिस्तानाने स्वतःची जागतीक नाचक्की करून घेतली होती हे आठवत असेलच. त्या पार्श्वभूमीचाही या दुर्लक्ष करण्यामागे हात आहे, किंबहुना त्या प्रसंगाने आता पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून त्याला जरबेत घेणे जास्त सोपे झाले आहे.

US makes changes in export control laws to benefit India अमेरिकेने भारताला 'Major Defence Partner' मानल्यानंतर तिने आपल्या कायद्यांत अनेक असे बदल केले आहेत की ज्यामुळे भारताला अमेरिकेकडून, "मानव-विनाशकारी अस्त्रे (Weapons of Mass Destruction उर्फ WMD)" सोडून, इतर उच्च श्रेणीचे सामरीक सामग्री व तंत्रज्ञान देण्यातले, महत्वाचे अडथळे दूर झाले आहेत. या नवीन बदलांमुळे, भारतीय कंपनीने त्यातील अटी पुर्‍या करून एकदा "Validated End User (VEU)" हे स्थान मिळवल्यावर तिला प्रत्येक कारणासाठी परत परत परवाना घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे, कंपन्यांना व्यापार करण्यासाठी लागणारा बराच वेळ, पैसा आणि अडथळे दूर झाले आहेत. यामुळे... १. भारतिय सैन्याला उच्च स्तराचे अमेरिकन सामरिक सामान आणि भारतातील सामरिक सामान तयार करणार्‍या कंपन्यांना उच्च स्तराचे अमेरिकन तंत्रज्ञान आयात करणे सोपे होईल. २. आपल्या सामरिक गरजांसाठी अजून एक (काही बाबतीत सर्वात महत्वाचा) विक्रेता बाजारात निर्माण झाल्याने भारताची, (अ) तंत्रज्ञानाच्या उच्चतेबद्दल आणि (आ) किमतीबद्दल, घासाघीस (बार्गेनिंग) करण्याची ताकद वाढली आहे. ३. याचा "मेक इन इंडिया"शी उत्तम संगम घडवून आणल्यास (व तसे संकेत आहेत), भारतातच, उच्च दर्जाचे सामरिक उत्पादन, तंत्रज्ञानाची मालकी (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर) आणि त्यामुळे काही काळाने संशोधन होणे अपेक्षित आहे. =========================== आता टीव्हीवर चाललेल्या ब्रेकिंग न्यूज प्रमाणे, अमेरिकेने मसूद अझहरला अतिरेकी जाहीर करण्यासाठी युएनमध्ये प्रस्तावा मांडला आहे (US moves UN to declare JeM chief Masood Azhar a terrorist). यावेळेसही चीनने, सुरक्षा समितीच्या स्थायी सभासदाच्या नात्याने, त्या प्रस्तावला प्रलंबित ठेवले आहे. या वेळेस, अमेरिका केवळ भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा देत नसून, स्वतः प्रस्ताव मांडत आहे. ही कृती, सद्यातरी, मुख्यतः चीनवर दबाव टाकण्यासाठी केलेली असली तरी ही नवीन कारवाई भारताला पाकिस्तानवर दबाव निर्माण करणारे नवीन मार्ग निर्माण ठरू शकते. भारतिय मुत्सद्दी या वस्तूस्थितीचा किती आणि कसा फायदा उठवू शकतील इकडे लक्ष ठेवणे जरूर झाले आहे.

ट्रंपने ओपरा विनफ्रीच्या शो मध्ये २५ वर्षापूर्वी व्यक्त केलेल्या राजकिय मतांचा एक व्हिडिओ यू ट्यूबवर आहे, तो सद्या कायप्पावरही व्हायरल होत आहे. त्याची त्यावेळची आणि आत्ताची मते यात फारसा फरक दिसत नाही, हे पाहता आत्ताची त्याची व्यक्तव्ये "बेफाम बोलणे" आहे या समजाला तडा जातो. द फेलो इन ऑल प्रोबॅबिलिटी, मीन्स बिझनेस !

खाडी देशांचा पाकिस्तानवरचा विश्वास, त्याच्या स्वतःच्या कारवायांमुळे, अनेक वर्षांपासून कमी होत आहे. मात्र, "मुस्लिम उम्मा" तत्वांमुळे ते उघडपणे बोलणे टाळले जात होते. "इस्लामिक बाँब" बनवण्यासाठी आणि वेळ आल्यास "इस्लामी ब्रदर देशांना" मदत करण्याची आश्वासने देऊन पाकिस्तानने खाडी देश, विशेषतः सौदी अरेबियाकडून, बिलियन्समध्ये डॉलर्स उकळलेले आहेत. मात्र, मदतीची वेळ आल्यावर, येमेन संघर्षात भाग घेण्यासाठी, पाकिस्तानने स्पष्ट नकार देऊन "मुस्लिम उम्मा" तत्वाला पाकिस्ताननेच हरताळ फासला आहे. तेव्हापासून पाकिस्तान व खाडी देशांतील दरी सतत रुंदावत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नवीन बातमी लक्षवेधक ठरते... Call for closer scrutiny of Pakistanis in Saudi after 39,000 deported सौदी भूमीवर झालेल्या अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांतील पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागामुळे ही कारवाई केली गेली आहे. या बातमीत दिलेली ३९००० डिपोर्टेशन्स (जबरदस्तीने मायदेशी परत पाठवणे) केवळ ४ महिन्यांत केलेली आहेत, हे महत्वाचे आहे !

प्रेसिडेंट ट्रम्प यांनी निवडणुकी पूर्वी केलेल्या वक्तव्यांचा आणि सध्याच्या त्यांचा foreign policy मधील निर्णयांचा विरोधाभास दाखवणारा हा न्यूयोर्क time चा एक लेख. ट्रम्प बाबा हळू हळू जमिनीवर येवू लागलेत. भलेही कठोर निर्णय घेण्याची इच्छा असो परंतु ground reality पाहता ते शक्य दिसत नाही याची जाणीव होऊ लागलीय त्यांना. बगूया भविष्यात काय होतंय ते. Trump Foreign Policy Quickly Loses Its Sharp Edge

अफगाणिस्तानमधील सैन्याच्या रसदपुरवठ्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानविरुद्ध टोकाची कारवाई करणे शक्य होणार नाही असे आतापर्यंत समजले जात होते. मात्र, ट्रंप सत्तेवर आल्यानंतर वारे वेगळ्या दिशेने वाहू लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात एक महत्वाची भर पडली आहे... Bill to name 'untrustworthy ally' Pakistan state sponsor of terrorism introduced in US Congress अमेरिका-पाकिस्तान संबंध इतके कड्याच्या टोकावर पूर्वी कधीच गेले नव्हते. अमेरिकन काँग्रेस व सिनेटमध्ये अश्या अर्थाची कुजबूज बर्‍याच दिवसांपासून होत आहे. मात्र, काल हे बिल टेड पो (Chair of the House Subcommittee on Terrorism) या महत्वाच्या पदावर असलेल्या काँग्रेसमनने मांडले आहे, हे विशेष ! या "Pakistan State Sponsor of Terrorism Act of 2015" नावाच्या बिलातील काही महत्वाचे मुद्दे असे... १. Not only is Pakistan an untrustworthy ally, Islamabad has also aided and abetted enemies of the United States for years. हे उघड गुपित लेखी स्वरुपात अमेरिकन काँग्रेससमोर मांडले गेले आहे. २. "From harboring Osama bin Laden to its cozy relationship with the Haqqani network, there is more than enough evidence to determine whose side Pakistan is on in the War on Terror." पक्षी : पाकिस्तान अमेरिकेच्या शत्रूपक्षाला सामील आहे. ३. US shouldn't rush to bolster Pakistan's balance of payments via the IMF or other intermediaries, as they've done before. "Let China pay that, if the Pakistanis wish to mortgage their future in that way," "अमेरिकेने पाठ फिरवली तर आम्ही उघडपणे चीनच्या गोटात सामील होऊन त्याच्याकडून मदत घेऊ" असे ब्लॅकमेलिंग पाकिस्तान बरीच वर्षे सतत करत आहे. "तो केवळ बागुलबुवा आहे आणि असेल शक्य तर घे मदत चीनकडून" असे सरळ आव्हान या बिलात आहे ! ट्रंप त्यांच्या निवडणूक प्रचारात "कॉल पाकिस्तान्स ब्लफ्" म्हणत असत त्याच्या दिशेने झालेली ही महत्वाची जमिनी कारवाई आहे. नुसते बिल मांडले तरीही पाकिस्तानी सैन्याची पाचावर धारण बसलेली असेल. हे बिल पास होऊन खरी कारवाई सुरु झाल्यास अमेरिका-पाक-चीन समिकरण कसे वळण घेईल हे पाहणे रोचक ठरेल. काही झाले तरी, हा भारताच्या दृष्टीने उत्तम दूरगामी संकेत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजूनही अफगाणिस्तान मधील परिस्थिती खूप बिकट आहे. पाकिस्तानने यापूर्वी देखील अमेरिकेला ब्लॅकमेल करून खूप मदत उकळली आहे. अमेरिकेने केलेली आर्थिक मदत भारताविरुद्ध आणी दहशतवादाच्या प्रसारासाठी वापरली आहे. एवढे उपद्व्याप करून व ते माहीत असून देखील अफगाणिस्तान व पर्यायाने आशियामध्ये लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानसारख्या अमेरिकेच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या देशाची गरज भासेल. अशा कोणत्याही गोष्टी भारत करणे शक्य नाही. त्यामुळे आजही अमेरिकेला पाकिस्तान भारतापेक्षा जवळचा वाटतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करेल असे वाटत नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

हे बिल मांडले म्हणजे त्याचे लगेच कायद्यात रुपांतर होईलच असे नाही. पण ती कृती होत आहे आणि मुख्यतः ती महत्वाच्या पदाधिकार्‍याच्या हाती होत आहे, हे राजकारणी संकेत महत्वाचे आहेत. केवळ तोंडदेखले बोलणे (लिप सर्विस) सोडून अमेरिकेची ही पहिली महत्वाची लेखी कायदेशीर कारवाई झालेली आहे. अश्या गोष्टींची लेखी नोंद पुढच्या कारवाया किती लवकर आणि किती कडक केल्या जातील यासाठी महत्वाच्या असतात. मुख्य म्हणजे अशी उघड उघड कृती करण्याअगोदर अनेक महत्वाचे गुप्त दबाव टाकून झालेले असतात. अशी कृती फक्त तसे झाले आहे याचा उघडपणे दिलेला व लेखी नोंद झालेला पुरावा असतो. त्यामुळेच, हे बिल मांडण्याच्या अगोदरपासूनच पाकिस्तानला "पाकिस्तानच्या राजकारण्यांची अतिरेकी कारवायांत सहभाग असल्याची माध्यमांतली कबुली", "अतिरेक्यांची स्थानबद्धता", "अतिरेक्यांविरुद्ध एफआयआर", "अतिरेकी संघटनांवर बंदी", इत्यादी (बहुदा लुटुपुटीच्या का होईना, पण) जगासमोर येणार्‍या कारवायांची तडफड करावी लागली. हे सगळ्याचे भारताच्या दृष्टीने आता लगेच फार मोठे महत्व नसले तरी, भविष्यांत या कारवाया मागे घेतल्या गेल्यावर (आणि तसे होईल असा माझा अंदाज आहे) जगात (अमेरिकेच्या उघड दबावानंतर केलेल्या) पाकिस्तानच्या खोटेपणाच्या अजून एका पुराव्याची नोंद होईल. याचा परिणाम असा की, भविष्यात भारताने काही कडक कारवाई (आर्थिक कोंडी, राजकिय संबंध तोडणे, युएनमध्ये मुत्सद्दी कारवाई किंवा अगदी कडक लष्करी कारवाई, इ) करायचे झाल्यास जागतिक मत आपल्या बाजूने असावे (किंवा चीन सोडून इतरांचे मत आपल्याविरुद्ध जाऊ नये) यासाठी लक्षणिय फायदा होईल व त्या संघर्षात भारताला आक्रमक जाहीर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे, ती कारवाई केल्यावरही भारताच्या भविष्यातल्या दोन कळीच्या उद्देशांवर (युएनच्या सुरक्षा समितीचे स्थायी सभादत्व आणि एनएसजीचे सभासदत्व) वाईट परिणाम होणार नाही... या दोन्ही उद्देशांच्या यश्स्वितेसाठी कडक कारवाई केली तरीही भारत जबाबदार आणि अनाक्रमक देश आहे अशी प्रतिमा असणे जरूर आहे. असो. अमेरिका ही कारवाई भारताला केंद्रबिंदूत ठेऊन करत नाही हे माहित असूनही; एक उप-उत्पादन (byproduct) म्हणून का होईना पण पाकिस्तानच्या संबंधात, जागतिक राजकारणात, भारताच्या दृष्टीने सकारात्मक बदलाचे संकेत मिळत आहेत. त्यांना गती केव्हा आणि किती प्रमाणात मिळेल हे भविष्यातल्या पाकिस्तानच्या कृती ठरवतील... पण आता, फसवेगिरी सोडून ठोस कृती करण्याचा, पाकिस्तानवर दबाव येत आहे, आणि तो दिवसे दिवस वाढत आहे, हे फार महत्वाचे आहे.

लेखाच्या काळापासून ते आतापर्यंतच्या कालखंडात, ट्रंपतात्यांनी अनेक आढेवेढे आणि वेडीवाकडी वळणे घेतली असली तरी, या लेखात लिहिलेले अनेक आडाखे आता वस्तूस्थितीत येत असल्याचे पाहून समाधान वाटत आहे. :) आज ह्युस्टनमध्ये होत असलेल्या "हावडी मोदी" मेळावाचे स्वरूप आणि त्यामधील राष्ट्राध्यक्ष ट्रंप व पंतप्रधान मोदी यांची भाषणे, हेच अधोरेखित करत आहेत. (अ) अमेरिका, चीन, रशिया आणि इतर देश यांच्याशी सलोख्याचे संबंध स्थापन करणे आणि (आ) पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना जागतिक पटलावर उघडे पाडणेच नव्हे तर पाकिस्तानला जबरदस्त शह देणार्‍या अनेक कारवाया करणे, अश्या अनेक कुशल भारतिय मुत्सद्देगिरीच्या कारवायांचा, ही परिस्थिती तयार होण्यामागे, सिंहाचा वाटा आहे, हेवेसांन. रशिया भारताच्या जरासा दूर जाता जाता, तो सामरिक खरेदी व इतर मुत्सद्दी खेळींच्या बळावर परत भारताचा घट्ट मित्र झाला, ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र, अमेरिकन निवडणूकीत हस्तक्षेप केल्याचा संशय, सिरिया व इराणला रशिया करत असलेली मदत आणि काही काळासाठी चीनकडे दाखविलेला झुकाव यांच्यामुळे रशिया व अमेरिकेचे संबंध अजूनही दुरावलेले आहेत व अमेरिकेने रशियावरचे निर्बंध चालूच ठेवलेले आहेत. भारताचे अमेरिका व रशिया या दोघांशी जवळीकेचे संबंध आहेत. या दोन देशांना जवळ आणण्यात भारताची मदत होईल... किंबहुना, तसे करण्याने, (अ) चीनला सबळ शह बसेल आणि (आ) भारताला रशियाकडून उच्च कोटीची, स्वस्त व तंत्रज्ञान हस्तांतरणासह सामरिक सामग्री मिळेल, म्हणून ते करणे भारताची गरज आहे... पुढील काळात भारताची ती रणनीती राहील असा माझा अंदाज आहे.

हावडी मोदी हा सगळाच कार्यक्रम मला तरी पोकळ, अर्थहीन वाटला. अर्थात, तुम्ही म्हणता तसे आतली काही गणिते असतातच. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ह्याला त्यांच्या दृष्टीने किंमत नसते. पण खटकण्याजोगी गोष्ट म्हणजे, राष्ट्रगीत नीट सुरात म्हणू शकणारे लोकही अशा महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मिळत नाहीत! आपलं सगळंच 'चलता है'! आणि मोदींना कुणीतरी जरा खालच्या स्वरात बोलायला शिकवा हो!

In reply to by रविकिरण फडके

फडके साहेब अस विरोधात नसतंय बोलायचं कारण लगेच आपल्याला राष्ट्रद्रोही + विकास विरोधी + अभ्यास नसलेले + खान्ग्रेस समर्थक अशी शेलकी विशेषण मिळत्यात. यांचे प्रचारकी लेख वाचायचे आणि हसून सोडून द्यायचे बघा. एरवी उठसुठ धागे काढणारे देशात असलेल्या मंदीविषयी चकार शब्द काढत नाहीत. असो कारण शिखरावर बसल्यावर बर्याचदा जमिनीवरच्या अडचणी इसात नाही लोकांना.

In reply to by उपेक्षित

@ उपेक्षित : विषय काय, लिहिताय काय ?! कपाळावर हात मारणारी स्मायलीचीही गरज नाही, इतके हास्यास्पद आहे हे ! मिपावर प्रतिसाद देण्यासाठी कोणाही सभासदाला मुक्त परवानगी असली तरीही, प्रतिसाद देण्यापूर्वी लेख/प्रतिसाद वाचून मग काही सुसंगत लिहिले तर त्या लिखाणाला काही अर्थ राहतो. अन्यथा, वाचकांची करमणूक होते, मात्र लिहिणार्‍याच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचतो (हे अंडरस्टेटमेंट आहे), हेवेसांन. इथे तर, तुमच्या वरच्या प्रतिसादातील मजकूरावरून, लेख सोडाच, पण लेखाचे शिर्षकही वाचण्याची तसदी तुम्ही घेतलेली नाही, हे स्पष्ट आहे. या अगोदरही एक-दोनदा तुम्ही अशीच घाई करून असेच काहीबाही लिहिले होते व व्यनीने, "...मान्य आहे म्हात्रे सर, मी परत एकदा माझ्या प्रतिसादांचा विचार करिन... आशा करतो तुमचा गैरसमज दूर होईल." अशी सारवासारवही केली होती. पण, ते तुमचे शब्द व्यवहारात आलेले नाहीत, असेच खेदाने म्हणावे लागेल. दुसरे त्यांच्या आवडीने धागे काढतात, तुमच्या आवडीने/सोईने नव्हे, हे सांगायला लागत आहे म्हणजे, कमाल आहे! तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल तळमळ (किंवा जळजळ) वाटत असेल तर स्वतः काही मुद्देसूद मजकूर अथवा प्रतिवाद लिहिण्याचा प्रयत्न करा... जमेलही कदाचित्. आभासी आयडीच्या मागे लपून, अस्थायी व अनाठायी एकेरी लेबले लावण्यामध्ये, फार मोठे शौर्य अथवा हुशारी नाही, हे मात्र नक्की. त्याने फारतर फक्त, "स्वपरबळाबळ नेणुनि बालिश... " हे वचन लागू पडेल :) हे आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत किमान तीनदा सांगून झाले असावे. त्यामुळे, यापुढे, स्वतःच्या विचाराने, तर्क व पुराव्यांसह काही मुद्देसूद मजकूर लिहिलात नाही, तर त्याला 'लक्ष देण्याची तसदी घेण्यायोग्य नाही' या केवळ एकाच कारणाने फाट्यावर मारले आहे असे समजावे. जितं मया अशी गैरसमजूत करून घेऊ नये. इतर वाचकही त्याचा योग्य अर्थ लावतीलच. मोठे होण्यासाठीच्या शुभेच्छांसह.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ इस्पिकचा एक्का (हा तुमचा आभासी ID एकेकाळचा) हे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. मिपावर प्रतिसाद देण्यासाठी कोणाही सभासदाला मुक्त परवानगी असली तरीही, प्रतिसाद देण्यापूर्वी लेख/प्रतिसाद वाचून मग काही सुसंगत लिहिले तर त्या लिखाणाला काही अर्थ राहतो. अन्यथा, वाचकांची करमणूक होते, मात्र लिहिणार्यागच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचतो (हे अंडरस्टेटमेंट आहे), हेवेसांन. >>>>>>> सारखे सारखे त्याच झाडावर काय इस्पिकचा एक्का ? आणि मिसळपाव संस्थळ मुक्त आहे न ? मग तुम्ही मुक्त स्थळावर काही टाकले आणि त्यावर विरोधी मते आली तर इतके का डेस्परेट होताय ? चिल माडी इस्पिकचा एक्का त्यामुळे मी काय लिहायचे ते मला ठरवू द्या तुम्ही नका उगाच मास्तर बनून सांगू. ते आभासी आयडीचा तुमचा मुद्दा कसा दुतोंडीपणा होता हे वर माझ्या पहिल्या लाईन मध्येच स्पष्ट झाले आहे (तरीही तुम्हाला काय ते बालिश जितं मया करायचे असेल तर करा आम्ही हि काही गोष्टी फाट्यावर मारतो बरका) आणि हो ते काय ते सुसंगत वगैरे इथल्या सर्वांना ठरवू द्या उगाच किती ग बाई मी हुशार असा आव आणून मलाच सगळे कळते आणि मीच काय तो अभ्यासू आणि बाकी सगळे ढ असे दाखवायचा अट्टहास नका हो करू. या अगोदरही एक-दोनदा तुम्ही अशीच घाई करून असेच काहीबाही लिहिले होते व व्यनीने, "...मान्य आहे म्हात्रे सर, मी परत एकदा माझ्या प्रतिसादांचा विचार करिन... आशा करतो तुमचा गैरसमज दूर होईल." अशी सारवासारवही केली होती. पण, ते तुमचे शब्द व्यवहारात आलेले नाहीत, असेच खेदाने म्हणावे लागेल. दुसरे त्यांच्या आवडीने धागे काढतात, तुमच्या आवडीने/सोईने नव्हे, हे सांगायला लागत आहे म्हणजे, कमाल आहे! तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल तळमळ (किंवा जळजळ) वाटत असेल तर स्वतः काही मुद्देसूद मजकूर अथवा प्रतिवाद लिहिण्याचा प्रयत्न करा... जमेलही कदाचित्. आभासी आयडीच्या मागे लपून, अस्थायी व अनाठायी एकेरी लेबले लावण्यामध्ये, फार मोठे शौर्य अथवा हुशारी नाही, हे मात्र नक्की. त्याने फारतर फक्त, "स्वपरबळाबळ नेणुनि बालिश... " हे वचन लागू पडेल :) >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सारवासारव नाही हो इस्पिकचा एक्का इथे जाहीरपणे तुमच्याच (घाई घाई ने काढलेल्या भक्तियुक्त धाग्यात :)))) } धाग्यात मी तेच बोललो आहे जे व्यनित बोललो आहे आणि माझ्यावर संस्कार तसेच आहेत कि चुकलास तर काबुल करायचं सो मला काहीही कमीपणा वाटत नाही चूक मान्य करायला कारण तुमच्यात जो भक्तियुक्त अहंकार भरलाय तो माझ्यात नाहीये कारण मला शष्प फरक नाही पडत या गोष्टींचा. :) आशा करतो नीट समजले असेल तुम्हाला इस्पिकचा एक्का आणि अजून एक बरका इस्पिकचा एक्का तुमचा आदर करतोच मी पण म्हणून उगाच सारखे अक्कल शिकवायला येऊ नका कारण कसय मी फाट्यावर नाय मारत बघा वर्मी बसलं अस मारतो, इतके दिवस आदर म्हणून खूप ऐकून घेतले पण आता जरा आमच पण पाणी बघाच. आम्ही लहान आहोत आणि आम्हाला लहानच राहू द्या फ़क़्त तुम्ही माणूस व्हा म्हणजे झाले. :) :) ;)

In reply to by उपेक्षित

१. तुम्ही (बहुदा) सोईस्करपणे सतत दुर्लक्ष करत असलेला मुख्य मुद्दा असा आहे की, "आपला एखाद्या गोष्टीला विरोध का आहे हे काही तर्क आणि/अथवा पुराव्यासह सांगणे योग्य असते. ते केलेत तर तुमच्या मजकुराला काही वजन राहील. त्याविरुद्ध, आभासी आयडीमागे लपून वैयक्तिक उद्धट टीप्पणी करणे हे लपूनछपून दगडफेक करण्यासारखेच असते." हे तुमच्या ध्यानात येत नसले तर काळजी करण्यासारखे आहे... आणि ध्यानात येऊनही तसे करत असलात तर ते फारच जास्त काळजी करण्यासारखे आहे! २. या प्रतिसादातही, हाती काही सबळ मुद्दा नसल्याने तुम्ही परत वैयक्तिक टीप्पणी करू लागला आहात. जालावर आणि मिपावरही अनेक जण आभासी नावे लिहून तर्कशुद्ध, पुराव्यासह आणि वाचनिय असलेले उत्तम लिखाण करत आहेत. आंतरजालावर आभासी आयडी घेणे नवीन, विरळ किंवा वाईट गोष्ट नाही. वाईट आहे ती, "आभासी आयडीच्या मागे लपून खोडसाळपणा करण्याची सवय". हे तुम्हाला माहीत नाही असे म्हणून मी तुमच्या बुद्धीमत्तेबद्दल संशय घेऊ इच्छित नाही. मात्र, ते माहित असूनही तुम्ही तिकडे दुर्लक्ष करत असलात तर ते तुमच्या विश्वासार्हतेला जास्त धोकादायक आहे, हे नक्की. मी जसा माझा काही काळाकरिता घेतलेला आभासी आयडी सोडून, मी माझ्या स्वतःच्या निर्णयाने, फार पूर्वीपासून स्वतःच्या नावाने लिहू लागलो आहे. तसे केल्यावर, मिपावरचे सगळे पुढचे-मागचे लेखन नवीन आयडीवरच दिसते, हे तुम्हाला माहीत नाही का?... की माहित असूनही, कोणता सबळ मुद्दा हाती नसल्याने, तिकडे दुर्लक्ष करून, त्याबद्दल मेगॅबायटी मजकूर लिहिणे सोईचे वाटत आहे?! =)) =)) =)) तसेही, मी जेव्हा टोपणनाव सोडून खर्‍या नावाने लिहायला सुरुवात केली ते लपूनछपून नव्हे तर तसे मिपावर जाहीरपणे लिहूनच सुरुवात केली होती. हे बर्‍याच जणांना माहीत आहे व त्यातील काही मला अजूनही प्रेमाने जुन्या टोपणनावाने संबोधतात. ते काही फार मोठे गुपित नाही! =)) तेव्हा, माझ्या जुन्या आयडीबद्दल, जणू काही फार मोठा शोध लावला आहे असे दाखवण्याची, तुमची ठळक तडफड पूर्णपणे फुकट गेली आहे! त्याबद्दल मी माझी सहानभूती व्यक्त करत आहे. [माझी जुनी आयडी माहित असण्याइतके जुनेजाणते आहात पण 'मोठे होण्यासंबधिच्या मिपावचनाचा' अर्थ तुम्हाला नीट समजला नाही, हे रोचक आहे ! =)) ] तरिही, जर आयडीबद्दल तुमचे वरचे दीर्घ लेखन मनापासून असले तर, तुम्हालाही स्वतःची आभासी आयडी सोडून खर्‍या नावाने समोर येणे जमले तर बघा! तसे केलेत तरच आयडीबद्दल तुम्ही वर लिहिलेल्या लांबलचक मजकूराला जरासा तरी अर्थ येईल. अन्यथा, ते सर्व माझ्या वरच्या प्रतिसादात दिलेल्या एका खास वचनातच बसेल! *************** सर्वात महत्वाचे... १. इथे टीप्पणी करण्यापूर्वी लेखातील मजकूर, निदान त्याचे शिर्षक तरी वाचा. अंतर्गत भारतिय राजकारण हा लेखाचा विषय नाही. (हे सांगावे लागत आहे म्हणजे, अरेरे, काय दिवस आले आहेत!) २. लेखात एका गंभीर विषयावर मजकूर लिहिण्याचा मी माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केला आहे व बर्‍याच जणांनी, स्वतःचे तर्क/पुरावे देऊन त्याबाजूने/त्याविरुद्ध मते व्यक्त केली आहेत. तेव्हा, तुम्हीही विषयाशी संबध नसलेले फाटे फोडणार्‍या टीप्पण्या टाळून, तुमच्या तर्क आणि/अथवा पुराव्यांसह सभ्यपणे वादविवाद करण्याचा प्रयत्न केलात तर चर्चा करण्यास मजा येईल. अन्यथा, तुम्हाला विनामुद्दा आणि विनातर्क वैयक्तिक टीप्पणीची दगडफेक करण्यातच केवळ रस असेल तर मग, परत एकदा शुभेच्छा व राम राम !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१. तुम्ही (बहुदा) सोईस्करपणे सतत दुर्लक्ष करत असलेला मुख्य मुद्दा असा आहे की, "आपला एखाद्या गोष्टीला विरोध का आहे हे काही तर्क आणि/अथवा पुराव्यासह सांगणे योग्य असते. ते केलेत तर तुमच्या मजकुराला काही वजन राहील. त्याविरुद्ध, आभासी आयडीमागे लपून वैयक्तिक उद्धट टीप्पणी करणे हे लपूनछपून दगडफेक करण्यासारखेच असते." हे तुमच्या ध्यानात येत नसले तर काळजी करण्यासारखे आहे... आणि ध्यानात येऊनही तसे करत असलात तर ते फारच जास्त काळजी करण्यासारखे आहे! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अहो तुमची का जळजळ होतीये आभासी ID वरून ? तुम्ही कोण अक्कल शिकवणार आम्हाला कि कोणत्या ID ने लिहायचे ते ? तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचे सिम्पल मुद्दा आहे. आणि स्वतः आभासी ID आधी वापरून दिसार्याला नका हो शिकवू . आणि ते दगडफेक वगैरे बालिश मुद्दे इथे नका मला सांगू . तुमची तडफड येतीये लक्षात हळू हळू पण मी संयम सोडणार नाही आणि हो लयी नका काळजी करू माझी स्वतः कडे लक्ष द्या आधी काय ती अवस्था करून घेतली आहे भक्ती पायी :))))) ------------------------------------------------------- २. या प्रतिसादातही, हाती काही सबळ मुद्दा नसल्याने तुम्ही परत वैयक्तिक टीप्पणी करू लागला आहात. जालावर आणि मिपावरही अनेक जण आभासी नावे लिहून तर्कशुद्ध, पुराव्यासह आणि वाचनिय असलेले उत्तम लिखाण करत आहेत. आंतरजालावर आभासी आयडी घेणे नवीन, विरळ किंवा वाईट गोष्ट नाही. वाईट आहे ती, "आभासी आयडीच्या मागे लपून खोडसाळपणा करण्याची सवय". हे तुम्हाला माहीत नाही असे म्हणून मी तुमच्या बुद्धीमत्तेबद्दल संशय घेऊ इच्छित नाही. मात्र, ते माहित असूनही तुम्ही तिकडे दुर्लक्ष करत असलात तर ते तुमच्या विश्वासार्हतेला जास्त धोकादायक आहे, हे नक्की. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> वयक्तिक ? खरच ? मी सुरवात केली कि तुम्ही ? परत तेच कि लोका संगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. आणि सारखे सारखे काय आभासी आभासी लावले आहे ? किती ती तडफड शी कीव येते आता. इथल्या बर्याच लोकांना माझी ओळख माहिती आहे हो तुम्हाला माहिती नाही फ़क़्त आणि असे काही नाही कि तुम्हाला सर्व माहितीच पाहिजे ते. सो चिल man टेन्शन नका घेऊ एक दीर्घ श्वास घ्या आणि कामाला लागा. :) --------------------------------------------------------- मी जसा माझा काही काळाकरिता घेतलेला आभासी आयडी सोडून, मी माझ्या स्वतःच्या निर्णयाने, फार पूर्वीपासून स्वतःच्या नावाने लिहू लागलो आहे. तसे केल्यावर, मिपावरचे सगळे पुढचे-मागचे लेखन नवीन आयडीवरच दिसते, हे तुम्हाला माहीत नाही का?... की माहित असूनही, कोणता सबळ मुद्दा हाती नसल्याने, तिकडे दुर्लक्ष करून, त्याबद्दल मेगॅबायटी मजकूर लिहिणे सोईचे वाटत आहे?! =)) =)) =)) >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> तुम्ही कोण मला सांगणार कि मी कोणत्या ID अंतर्गत लिहायचे ? फाट्यावर मारतो मी या मुद्द्याला. :) ;))))) ------------------------------------------------------------------------ तसेही, मी जेव्हा टोपणनाव सोडून खर्याि नावाने लिहायला सुरुवात केली ते लपूनछपून नव्हे तर तसे मिपावर जाहीरपणे लिहूनच सुरुवात केली होती. हे बर्यायच जणांना माहीत आहे व त्यातील काही मला अजूनही प्रेमाने जुन्या टोपणनावाने संबोधतात. ते काही फार मोठे गुपित नाही! =)) तेव्हा, माझ्या जुन्या आयडीबद्दल, जणू काही फार मोठा शोध लावला आहे असे दाखवण्याची, तुमची ठळक तडफड पूर्णपणे फुकट गेली आहे! त्याबद्दल मी माझी सहानभूती व्यक्त करत आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> कसल गुपित ? स्वतः काहीतरी ठरवायचं आणि उग डोके आपटत बसायचं मी तो मुद्दा का लिहिला ते खरच कळल नाही? तो मुद्दा लिहिला कारण स्वतः आधी आभासी ID वापरायचा आणि दुसर्याला अक्कल शिकवायची ते करू नका हे सांगायला लिहिला आहे आणि तुम्हाला वाटते गुपित म्हणून लिहिला :) देवा अहो आज नाही आलो मी अंतर्जालावर गेली १० एक वर्ष वावरत आहे. असो तुम्हाला सांगून फायदा काय म्हणा झापड लावलेली असली कि स्वतः शिवाय काही दिसत नाही. -------------------------------------------------- [माझी जुनी आयडी माहित असण्याइतके जुनेजाणते आहात पण 'मोठे होण्यासंबधिच्या मिपावचनाचा' अर्थ तुम्हाला नीट समजला नाही, हे रोचक आहे ! =)) ] तरिही, जर आयडीबद्दल तुमचे वरचे दीर्घ लेखन मनापासून असले तर, तुम्हालाही स्वतःची आभासी आयडी सोडून खर्याज नावाने समोर येणे जमले तर बघा! तसे केलेत तरच आयडीबद्दल तुम्ही वर लिहिलेल्या लांबलचक मजकूराला जरासा तरी अर्थ येईल. अन्यथा, ते सर्व माझ्या वरच्या प्रतिसादात दिलेल्या एका खास वचनातच बसेल! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मिपाववर कशाचे काय अर्थ असतात हे मला नका शिकवू बघा जमल तर. कारण तुमच्याशिवाय बाकी लोकांना थोडे का होईना कळत बरका इस्पिकचा एक्का आणि परत तेच मी कोणत्या ID ने लिहायचे त्याची अक्कल मला शिकवू नका, आणि तुमच्या बाष्कळ वचनांचे मला काहीही कवतिक नाही सो पुढे बोला. --------------------------------------------- *************** सर्वात महत्वाचे... १. इथे टीप्पणी करण्यापूर्वी लेखातील मजकूर, निदान त्याचे शिर्षक तरी वाचा. अंतर्गत भारतिय राजकारण हा लेखाचा विषय नाही. (हे सांगावे लागत आहे म्हणजे, अरेरे, काय दिवस आले आहेत!) २. लेखात एका गंभीर विषयावर मजकूर लिहिण्याचा मी माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केला आहे व बर्या च जणांनी, स्वतःचे तर्क/पुरावे देऊन त्याबाजूने/त्याविरुद्ध मते व्यक्त केली आहेत. तेव्हा, तुम्हीही विषयाशी संबध नसलेले फाटे फोडणार्या् टीप्पण्या टाळून, तुमच्या तर्क आणि/अथवा पुराव्यांसह सभ्यपणे वादविवाद करण्याचा प्रयत्न केलात तर चर्चा करण्यास मजा येईल. अन्यथा, तुम्हाला विनामुद्दा आणि विनातर्क वैयक्तिक टीप्पणीची दगडफेक करण्यातच केवळ रस असेल तर मग, परत एकदा शुभेच्छा व राम राम !!! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> माणूस होण्यासाठी नक्की प्रयत्न करा बरका इस्पिकचा एक्का, बघा जमल तर थोडी भक्ती सोडून वेळ मिळतोय का ते ? १) इतके दिवस आदर म्हणून गप्प बसलो याचा अर्थ तुम्हाला सडेतोड उत्तर देऊ शकत नाही असा घेतला तुम्ही. सो आता सवय करून घ्या आणि परत ते दगडफेक वगैरे बाष्कळ शब्द परत नका वापरू इथे ते तिकडे भक्तांसमोर इम्प्रेशन मारायला वापरा. आपल्यालाहि शुभेच्छा माणूस होण्यासाठी (काही लागले तर या छोट्या माणसाला नक्की सांगा बरका इस्पिकचा एक्का) :))))

In reply to by रविकिरण फडके

हावडी मोदी हा सगळाच कार्यक्रम मला तरी पोकळ, अर्थहीन वाटला. अर्थात, तुम्ही म्हणता तसे आतली काही गणिते असतातच.
मलाही नेमके औचित्यच लक्षात आले नाही या कार्यक्रमाचे. मोदींच्या परराष्ट्रनीतीचा मी पंखा असल्याने हे सर्व ठीक परंतु मी स्वतः गोंधळलो आहे की देशाला काही आर्थिक फायदा होतोय की नाही याबाबत आणी लवकरच हा कळीचा मुद्दा असेल.