द क्लिफ !
या वेळी लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचं हा निर्णय घ्यायला अर्धांगिनीनी अक्षम्य वेळ लावला त्यामुळे जिथेजिथे फोन केले तिथेतिथे `वी आर ऑलरेडी सोल्ड आऊट, सर !' असा गोड प्रतिसाद मिळाला. पण वस्तुस्थिती कायम निर्वैयक्तिक असते, आपण तिच्याकडे पॉजिटीवली बघितलं तर ती संधी होते नाही तर अडचण ठरते हा बेसिकच फंडाये. त्यामुळे नवं डेस्टीनेशन ट्राय करु या म्हटलं. अँड इट रिअली टर्न्ड आऊट टू बी अ ग्रेट सरप्राईज !
भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल. पण एकदा आत गेलात की ती एक वेगळीच आणि एकदम निवांत दुनिया आहे. रिसॉर्टच्या पार्कींगपासून पुढे आल्यावर उजव्या बाजूला केलेलं हे मोहक लँडस्केपींग
आणि हा दर्शनी भाग
इथल्या रुम्स केवळ अप्रतिम आहेत. रुमच्या एकाबाजूला संपूर्ण ग्लासवॉल आणि बाल्कनी आहे.
रुममधून बाहेरच्या विस्तीर्ण आकाशाशी कायम संपर्क राहातो. मग ते सकाळचं कोवळं आकाश असो, दुपारचं अनंत आकाश असो की रात्रीचं चांदण्यांची शाल पांघरलेलं आकाश असो. बाल्कनीत बसून आकाशाशी आणि एकमेकांशी निमग्न होण्यात वेळेचं भान संपूर्ण हरवून जातं...
इथला स्विमींग पूल फारसा मोठा नसला तरी इतका स्वच्छ आणि सुंदर आहे की आकाशाच्या घुमटाखाली तासंतास पोहत राहीलं तरी मन भरत नाही.
मला सगळ्यात काय आवडलं असेल तर इथली दोन्ही रेस्टॉरंटस. बाहेरच्या बाजूला असलेलं हे ओपन रेस्टॉरंट. इथे सकाळची कॉफी आणि ब्रेकफास्ट जाम एंजॉय करता येतो.
आणि हे कायम निवांत असलेलं इन-डोअर रेस्टॉरंट. इथे सकाळचं आणि रात्रीचं जेवण त्या भव्यतेचा आणि तिथल्या एकसोएक पदार्थांचा आस्वाद घेत मनमुरादपणे करता येतं.
दुपारच्या वेळी कधी गप्पा मारत बसायचं असेल, सकाळी योगा करायचा असेल, संध्याकाळी एखादं वाद्य वाजवत बसायचं असेल किंवा नुसतं जरी निवांत बसायचं असेल तर इथे एक मस्त गझेबो केलायं.
हे रिसॉर्ट जरी तिथल्या मेंबर्सच्या गेस्टसाठी असलं आणि त्यानी केल्याशिवाय रुम्स बुक करता येत नसल्या तरी रेस्टॉरंट दिवसभर सर्वांसाठी खुलं आहे. फूड क्वालिटी खरंच उत्तम आहे आणि किंमती इतर रिसॉर्टसारख्याच आहेत. एखाद्या वर्कींग डे ला पत्नीबरोबर सकाळी ब्रेकफास्ट प्लस लंच किंवा संध्याकाळी स्नॅक्स प्लस डिनर मस्त एंजॉय होईल.

याद्या
5767
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
क्या बात है संक्षी, निव्वळ
एवढा डेमो दिलाय संजयजींनी.
In reply to क्या बात है संक्षी, निव्वळ by प्रचेतस
खरंच प्रसन्न ठिकाण आहे
In reply to एवढा डेमो दिलाय संजयजींनी. by अभ्या..
कल्पना खुपच अफलातून आहे. अशी
In reply to खरंच प्रसन्न ठिकाण आहे by संजय क्षीरसागर
परफेक्ट
In reply to खरंच प्रसन्न ठिकाण आहे by संजय क्षीरसागर
उनाड दिवस भरपूर जगलोय पण ते
In reply to परफेक्ट by आनंदयात्री
नक्की एंजॉय करुन पाहा. इट इज वर्थ !
In reply to उनाड दिवस भरपूर जगलोय पण ते by प्रचेतस
चेंज
In reply to खरंच प्रसन्न ठिकाण आहे by संजय क्षीरसागर
शारीरिक श्रमासाठी योगा आणि टेबलटेनीससारखे निर्धोक पर्याय
In reply to चेंज by धोणी
खर्चिक???
In reply to शारीरिक श्रमासाठी योगा आणि टेबलटेनीससारखे निर्धोक पर्याय by संजय क्षीरसागर
ट्रेक्स नाही
In reply to खर्चिक??? by प्रचेतस
उनाड दिवस
In reply to खरंच प्रसन्न ठिकाण आहे by संजय क्षीरसागर
आम्ही( मी आणि पत्नी) असे एक
In reply to उनाड दिवस by अनुप ढेरे
मस्तच.
सर
झक्कास धागा. धन्स हो संक्षी..
नुसतं धन्स म्हणून गप्प काय
In reply to झक्कास धागा. धन्स हो संक्षी.. by मोदक
हे मला तर फार सामान्य वाटलं
हे ठिकाण पुण्यापासून सत्तर किलोमिटर आहे
In reply to हे मला तर फार सामान्य वाटलं by पिलीयन रायडर
गरम गरम भाकर्या - पिठलं -
In reply to हे मला तर फार सामान्य वाटलं by पिलीयन रायडर
हा हा हा, कॉलिंग गवि :)
In reply to गरम गरम भाकर्या - पिठलं - by अप्पा जोगळेकर
खूप छान जागा आहे