एक प्रश्न
मिपावर जो टंक सर्वसंमत आहे त्यापेक्षा तुम्ही वेगळया रंगाचा टंक (फॉन्ट ) का वापरला आहे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य का ?
बाकी 'दिल दोस्ती दूनियादारी' मालिकेवरील आक्षेप न पटण्यासारखे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात तीन मुलगे आणि तीन मुली एकत्र राहतात असे दाखवले, ते निव्वळ परिस्थितीतून उद्भवलेल्या गरजेतून. आणि ते चांगल्या मित्र मैत्रिणीप्रमाणेच राहतात ..लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे यातील कोणत्याही मुलाचा , कोणत्याही मुलीशी शारिरिक जवळीक नसते. फार काय माझ्या आठवणीप्रमाणे या मालिकेत कुठलीही अॅडल्ट कॉमेडी सुद्दा नव्हती.
मालिकेचे सध्याचे सत्र मी बघत नाहीये, त्यामुळे त्यावर आक्षेप असतील तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण वरील लेखात नोंदवलेले आक्षेप हे पहिल्या सत्रावरच वाटत आहेत.
बाकी दुनियादारी हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी १९७२ च्या आसपासची असावी
शक्यतो मी कुठल्याच मालिका पाहत नाही आणि पाहिल्या तर त्या कॉमेडी मालिका समजुनच पाहते. याच काय कुठल्याही मालिका स्फोटकच आहेत. सासु, सुन, शेजारणी , आज्जे सासु यांची कट कारस्थानं हे सगळं ही स्फोटकच पण कॉमेडी मालिका समजुन पाहिली की इतके प्रश्न पडत नाहीत.
सासु, सुन, शेजारणी , आज्जे सासु यांची कट कारस्थानं
हे जास्त स्फोटक आहे. हे असले कुटुंब दाखवतात ते तुम्हाला चालतं आणि निखळ मैत्री असणारे ६ तरूण मुले मुली एकत्र राहतात आपली सुख दु:खे वाटून घेतात, एकमेकाला आधार देत नव्या उमेदीने संकटांना सामोरे जातात हे तुम्हाला खुपतं. असो. तुमच्या स्वातंत्र्याचा आदर आहे.
तुम्ही नक्की ही सिरीयल बघितलीये ना? कारण नवर्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळून मानसीकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या मुलीला आधार देणारे ५ दोस्त हीच या मालिकेची थीम आहे. हे सोडलं बिडलं कुठून काढलंत? जाऊ द्या, हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी भरलेला आहे की मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचीदेखील इच्छा उरली नाही.
हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी भरलेला आहे की मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचीदेखील इच्छा उरली नाही.
+ ११११
5 वर्षाच्या मुला पासून 85 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून पाहावी अशी मालिका लेखकाला अजिबात कळलीच नाही , आता काय डोंबल प्रतिवाद करणार :)
आशु जोग,
तुमचं म्हणणं पटलं. इथे इंग्लंडमध्ये कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे १९६० च्या दशकात सुरू झालेली लैंगिक क्रांती. या क्रांतीमुळे किती कुटुंबं उद्ध्वस्त झाली याची गणती अशक्य आहे. हिचा पाया तथाकथित स्त्रीमुक्तीमध्य आहे. आज कुटुंबव्यवस्था नष्ट वा सीमित झाल्यामुळे नवयुवकांचा कल एकट्याने राहण्याकडे वाढतो आहे. असे युवक उचित मातापिता बनू शकंत नाहीत. कारण त्यांच्यासमोर आई व बापाचं उदाहरण नसतं. अशी मुलं गुन्हेगारीकडे सहजपणे ओढली जातात. सामाजिक स्थैर्यासाठी कुटुंब सबळ रहाणं अत्यावश्यक आहे.
तर, कुटुंब नाकारण्याचा प्रकार भारतातही चालू द्यावा का? थेट लैंगिक स्वैराचार (म्हणजे लिव्ह इन) उदात्त रंगात रंगवला जात आहे. जेव्हा आपण कुटुंबव्यवस्थेस नाकारतो तेव्हा भावी पिढी गुन्हेगारीकडे ढकलंत असतो. तुम्ही म्हणता तशा या मालिका अनाठायी उदात्तीकरणास उत्तेजन देतात. यावर एक उपाय म्हणजे लोकजागृती करणे. दुसरा उपाय म्हणजे कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व यथोचितपणे अधिरेखीत होईल अशा मालिका बनवणे.
आ.न.,
-गा.पै.
त्याच मालिकेमधून मुलांना कठीण परिस्थितीत सुद्धा पाय रोवून संकटांवर मत करून उभं राहण्याचा संस्कार मिळू शकतो. अर्थात तो अर्थ त्याला/तिला तिच्या पालकांनी समजावून दिला पाहिजे. फक्त टी व्ही पाहून मुलांवर संस्कार होत नाही. टी व्ही मधल्या गोष्टींवर घरात/मित्रांमध्ये काय चर्चा होते त्याचा आपल्या जीवनाशी संपर्क कसा येतो या वरून संस्कार होत असतो. पालकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास त्या मालिकेतून तरी चांगल्या आणि घेण्यासारख्या खूप गोष्टी सापडतील. तुम्ही सकारात्मक विचार करता कि नकारात्मक या वर सगळं अवलंबून आहे.
बाकी दुनियादारी सिनेमाबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. सिनेमा बघायचा कि नाही आणि कोणता बघायचा हे मार्गदर्शन पालक करूच शकतात आणि वेळप्रसंगी विशिष्ट गोष्टींवर बंदी सुद्धा घालू शकतात. म्हणून एखाद्या सिनेमाच्या (किंवा बऱ्याचशा सिनेमांच्या) आशयावर आक्षेप असेल तर त्या सिनेमावर बंदी आणावी, पण म्हणून इतरांना नावं ठेवणं योग्य नाही. त्यांना आवडतं ते त्यांनी बनवलं, तुम्हाला बघायचं तर बघा नाही तर सोडून द्या.
आणि सोडून देणं जमत नसेल तर तुम्हाला आवडतं तसं बनवण्याची जबाबदारी घ्या (अर्थात आर्थिक, साहित्यिक, आणि तांत्रिक सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. ). वांझोटी टीका करून काहीही फायदा नाही.
1960 च्या सुमारास हर्बर्ट मार्कस ने"ग्रेट रिफ्युजल" थिअरी मांडली.. साधारणतः यात इतिहासाची पुनर्मांडणी, संविधानीक लोकशाहीवर हल्ला, नॅचरल लाॅ, बहुमताला विरोध, लिमीटेड सरकार वगैरे मुद्दे होते..
यासाठी ग्रामची, अल्थसेर, होगार्ट, हाॅल, थाॅमसन वगैरे लेखकांचा आधार होता.. यांनी मार्क्सची पुनर्मांडणी केली. यांनी कल्चर मध्यभागी आणले, आणि बाकीचे सुपरस्ट्रक्चर आहे, असे मानले.. यामुळे, जर सोशल रिफाॅर्म हवा असेल, तर कल्चरल रिफाॅर्म आवष्यकच आहे..
याला त्यांनी "न्यू लेफ्ट" म्हटले..
आता जे सांस्कृतिक बदल दिसत आहेत, ते या न्यू लेफ्टचाच परिणाम आहे...
सिरीयल पटत असेल
म्हणजे नेमकं काय?
दिल दोस्ती दुनियादारी मधे समाजाच्या मान्यतांना असेच धक्के दिले आहेत. एकाच फ्लॅटमधे कॉलेजच्या वयाची ३ मुले आणि ३ मुली एकत्रपणे राहत आहेत. एका मुलीच्या आईबापाचे एकमेकांशी पटत नाही. तिच्या वाढदिवसालाही ते येत नाहीत. मग रूम मेट्सच तिचा वाढदिवस साजर करतात. म्हणजेच जन्मदाते आईबाप शत्रू पण बरोबर राहणारे रूम मेट्स हेच खरे आधार. एकीने नवर्याला किंवा नवर्याने तिला सोडले आहे. आता ती या मुलामुलींच्या खोलीवर रहायला आली आहे. तिसर्या मुलीच्याही आईबापांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. मुलग्यांचेही घरच्यांशी फारसे पटत नाही. इ. इ.
तुम्हाला असे म्हणायचे आहे का, कि ही सिचुएशन शक्यच नाही आहे?
मनिमौ,
जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी असू शकतात. पण ते प्रत्येकाला मिळतीलंच असं नाही. याउलट जिवाला जीव देणारं आपलं कुटुंब मात्र प्रत्येकाजवळ असतं. कौटुंबिक मूल्यांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना?
आ.न.,
-गा.पै.
एक प्रश्न,
तुमचा प्रॉब्लेम काय आहे? ही (किंवा अशा) मालिका मराठीत आहे/आहेत म्हणून का?
म्हणेज सेम आशयाची सीरिअल इंग्रजी/हिंदी मध्ये असती तरी पण आक्षेप असला असता का? मग आपल्याकडची तरुण मुले कोणत्या इंग्रजी मालिका बघतात याची तुम्हाला कल्पना आहे का?
कौटुंबिक मुल्य म्हणजे काय तर अडचणीत सापडलेल्या लोकाना मदत करा. एकमेकांना समजून घ्या. परस्पर नात्यांचा आदर करा. आताच्या जमान्यात पण तुम्ही केवळ आई वडिल भाऊ बहीण याच नात्यांना कुटुंब मानत असाल तर बोलणे खुंटले
मनिमौ,
अगदी अचूक बोललात पहा! पाश्चात्यांच्या जीवनशैलीत नेमक्या याच मूल्यांचा ऱ्हास घडून आलेला आहे.
इथे इंग्लंडमध्ये वय वर्षे पंधराची मुलगी जेव्हा आपल्या दुप्पटतिप्पट वयाच्या पुरुषावर टवके टाकू लागते, तेव्हा तिच्या घरात कुठेतरी कुठल्यातरी कौटुंबिक मूल्यांना कसर लागलेली असते. पित्याचं प्रेम मिळालं नाही की मुलगी घराबाहेर प्रेम शोधायला जाणारंच. तिचा काही दोष नाही यांत.
आ.न.,
-गा.पै.
लोकसत्ताच्या चतुरंग मधे प्रसिद्ध झालेला हा लेख पहा . .
‘फिराक’ हा तिच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीचा पहिलावहिला चित्रपट गुजरात येथे झालेल्या दंगलीवर भाष्य करत मानवी भाव-भावनेचं चित्रण करतो. या चित्रपटास अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रॉडक्शन कंपनीबाबत बोलताना नंदिता सांगते की, ‘आपण चित्रपटांना काही साच्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. नाच, गाणी पाहणारे अनेक लोक आहेत. ती त्यांची आवड आणि पर्यायही आहे. हे वास्तव असलं तरीही १० टक्के लोक असेही आहेत ज्यांना खरोखरीच संवेदनशील विषयावरील अर्थपूर्ण चित्रपट आवडतात. त्या लोकांना पर्याय देण्यासाठी म्हणून ही कंपनी सुरू केली आहे.
नंदिता चर्चेत आली ती तिच्या दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ या चित्रपटाच्या वेळी. यात लग्नसंस्थेत फसलेल्या दोघी जणी एकमेकींच्याच प्रेमात कशा पडतात याची कहाणी तीही समलैंगिक संबंधांवर भाष्य करत पुढे सरकते. यातील एका समलैंगिक स्त्रीची भूमिका नंदिताने स्वीकारली आणि ती उत्तमरीत्या साकारही केली.
हटके विचार
फारच गंभीर प्रश्न म्हणायचा की हा!! खरंतर झी वाल्यांनी "सांस भी कभी बहु थी" मराठीत डब करुन दाखवायला हवं, म्हणजे मराठी मनावर कुटुंब व्यवस्थेचे संस्कार घडतील आणि त्यामागोमाग एक प्रवचनांचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम ठेवायला हवा, म्हणजे आध्यात्म ही शिकायला मिळेल. नै त्याचं काये, मालिका बघून समाज घडत असेल तर त्यांनी हे करायलाच पाहिजे.
कौटुंबिक मूल्यांची घसरण व हानी दाखवणाऱ्या कार्यक्रमास इतका टीआरपी मिळावा का असा प्रश्न आहे. त्यातनंच लेखकाचा पूर्वग्रह उत्पन्न झाला आहे. हा पूर्वग्रह एक प्रकारची बचाव यंत्रणाच (= डिफेन्स मेक्यानिझम) आहे म्हणा ना.
आ.न.,
-गा.पै.
मला तसं वाटत नाही. जगण्याची एखादी विचारधारा आहे ( उदा. सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन) आणि तीला शह म्हणून दुसरी विचारधारा निर्माण केली जाते आहे (उदा. लीव-इन). या दोन्हींचा समग्रतेनं विचार केला आहे त्यानं स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडणं म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करणं नाही. जर विरोधी विचारसरणीच्या लोकांनी त्याला निरुत्तर केलं तर त्यांच्या विचाराच्या प्रभावीपणाला अनुयायी मिळतील.
पण आपल्या स्वास्थ्याचा मूळ आधार असलेलं वैवाहिक जीवन ही पाश्चात्यांना खुपणारी गोष्ट आहे हे नक्की. आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नांवाखाली लीव-इन आणि आता हे नवं `ग्रुप लीव-इन' या कल्पना विवाह या बेसिक विचारधारेला सुरुंग लावण्याचं काम करतायंत यात शंका नाही. एखाद्याला उगीच संस्कृती रक्षणाची फालतू लेबलं लावण्यापेक्षा विरोधी विचारधारेच्या लोकांनी दिस-वर्सेस-दॅट अशी सरळ चर्चा केली तर खरा निष्कर्श निघेल.
लीव इनवर चर्चा होणार असेल तर तुम्ही प्रतिवादाची आशाच सोडा. आणि सत्कार वगैरेची भाषा बाजूला ठेवून खरी तयारी असेल तर तुमचा याविषयीचा जो काय अनुभव असेल त्यावर एक स्वतंत्र धागा काढा.
यू ट्यूबवर मी पाच-सात मिनीटं त्या सिरियलमधला एपिसोड पाहिला. वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो. त्यामुळे माझा हा मूळ मुद्दा ....
जगण्याची एखादी विचारधारा आहे ( उदा. सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन) आणि तीला शह म्हणून दुसरी विचारधारा निर्माण केली जाते आहे (उदा. लीव-इन).
जरी वॅलीड असला तरी या पोस्टला तो सरळ अॅप्लीकेबल नाही हे मान्य करतो. अर्थात, तुम्ही लीव-इनच्या सार्थकतेवर धागा काढा म्हणजे रंगतदार चर्चा होईल आणि नव्या पिढीचे काय उदात्त विचार आहेत ते जाहीर होईल .
अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं. काही जणांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. पण दिल दोस्तीबद्दल बोलल्याने एवढ्या प्रमाणात भावना दुखावत असतील असं वाटलं नव्हतं !
दिल दोस्ती मालिका लिव्ह इन वर आहे हे म्हणणारे धन्य आहेत. यात त्या प्रकारचे काहीही दाखवलेले नाही. परिस्थितीने सगळ्यांना एकत्र आणले व रोजच्या जीवनातील अडचणींवर ते एकमेकांच्या आधाराने कशी मात करतात हे दाखवलंय. त्यामधले कोणीही टीनएजर वगैरे नाहीत ना कोणाची आपसात प्रेमप्रकरणे चालू आहेत. कुठल्याही प्रकारची, अगदी आडून आडून वा सूचक सुद्धा, शारीरिक जवळीक नाहीये. त्यामुळे एकतर मालिका नीट बघितली नाहीये किंवा ऐकीव माहितीवर मत बनवलेलं आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात नुसती मैत्री असूच शकत नाही या जुनाट विचाराच्या प्रभावातून बाहेर या.
आक्षेपच घ्यायचा तर, माझ्या नवऱ्याची बायको, खुलता खुळी खुलेना या मालिकांना घ्यावा. कारण त्यात विवाहबाह्य संबंध, पार्टीमध्ये दारू जास्त प्यायल्यावर आलेल्या संबंधामुळे लग्नाआधी गरोदर राहिलेली मुलगी यासारखे प्रसंग आहेत.
दिल दोस्ती मालिका लिव्ह इन वर आहे हे म्हणणारे धन्य आहेत.
माझा वरचा प्रतिसाद न वाचताच लिहीलेलं दिसतंय !
यू ट्यूबवर मी पाच-सात मिनीटं त्या सिरियलमधला एपिसोड पाहिला. वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो.
तुम्हीही फक्त पाहिलंच वाक्य वाचलेलं दिसतंय.
बादवे - पाच सात मिनिटं बघून एका वर्षापेक्षा जास्त चाललेल्या मालिकेवर अधिकारवाणीने मत व्यक्त करताय म्हणजे भारीये. "वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो" या वाक्याचा अर्थ ही मालिका वरकरणी तशी वाटत नसली तरी छुपा उद्देश तोच आहे असा वाटतोय.
प्रतिक्रिया
एक प्रश्न
हि मालिका इंग्रजी मालिका
In reply to एक प्रश्न by मराठी कथालेखक
शक्यतो मी कुठल्याच मालिका
एक नंबर.
In reply to शक्यतो मी कुठल्याच मालिका by कविता१९७८
वरील प्रतिसाद लेखाला आहे.
In reply to एक नंबर. by पुंबा
मालिकाच त्या
एकीने नवर्याला किंवा नवर्
...
In reply to एकीने नवर्याला किंवा नवर् by पुंबा
हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी
In reply to एकीने नवर्याला किंवा नवर् by पुंबा
अच्छा. संस्कारपटू.
कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य
...
In reply to कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य by गामा पैलवान
अगदि योग्य मत आहे.
In reply to कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य by गामा पैलवान
ते मराठी दिग्दर्शक कोण?
वांझोटी टीका
प्रसन्न देशपांडे...
सगळ्या विद्यापीठांमधे
सगळ्या विद्यापीठांमधे humanities किंवा मानवता वगैरे विद्याशाखांचा उदय झालाय.कधी पासून? १९८०? १९६०? १९४०?1960..
In reply to सगळ्या विद्यापीठांमधे by अत्रे
सिरीयल पटत असेल
सिरीयल पटत असेलम्हणजे नेमकं काय?दिल दोस्ती दुनियादारी मधे समाजाच्या मान्यतांना असेच धक्के दिले आहेत. एकाच फ्लॅटमधे कॉलेजच्या वयाची ३ मुले आणि ३ मुली एकत्रपणे राहत आहेत. एका मुलीच्या आईबापाचे एकमेकांशी पटत नाही. तिच्या वाढदिवसालाही ते येत नाहीत. मग रूम मेट्सच तिचा वाढदिवस साजर करतात. म्हणजेच जन्मदाते आईबाप शत्रू पण बरोबर राहणारे रूम मेट्स हेच खरे आधार. एकीने नवर्याला किंवा नवर्याने तिला सोडले आहे. आता ती या मुलामुलींच्या खोलीवर रहायला आली आहे. तिसर्या मुलीच्याही आईबापांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. मुलग्यांचेही घरच्यांशी फारसे पटत नाही. इ. इ.तुम्हाला असे म्हणायचे आहे का, कि ही सिचुएशन शक्यच नाही आहे?आशु जी
जिजीदे
In reply to आशु जी by मनिमौ
...
In reply to आशु जी by मनिमौ
एक प्रश्न,
गामा जी
अचूक बोललात पहा
In reply to गामा जी by मनिमौ
...
In reply to अचूक बोललात पहा by गामा पैलवान
फारच गंभीर प्रश्न म्हणायचा की
छान, उत्तम सुविचारी लेख!
सूडराव आणि डांगे भौंशी सहमत!
अज्यातैनषि ण्येमी परमाने
In reply to सूडराव आणि डांगे भौंशी सहमत! by अजया
पूर्वग्रहयुक्त लेख
...
In reply to पूर्वग्रहयुक्त लेख by गामा पैलवान
डिफेन्स मॅकेनिझम हे तुम्हाला पटलं असलं तरी
In reply to ... by आशु जोग
...
In reply to डिफेन्स मॅकेनिझम हे तुम्हाला पटलं असलं तरी by संजय क्षीरसागर
मी टिवी अजिबातच पाहात नाही
In reply to ... by आशु जोग
`ग्रुप लीव-इन'
In reply to मी टिवी अजिबातच पाहात नाही by संजय क्षीरसागर
दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन"
In reply to `ग्रुप लीव-इन' by सूड
दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन"
In reply to दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन" by आदूबाळ
दादा,
In reply to दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन" by सूड
जगण्याची एखादी विचारधारा आहे ( उदा. सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन) आणि तीला शह म्हणून दुसरी विचारधारा निर्माण केली जाते आहे (उदा. लीव-इन).जरी वॅलीड असला तरी या पोस्टला तो सरळ अॅप्लीकेबल नाही हे मान्य करतो. अर्थात, तुम्ही लीव-इनच्या सार्थकतेवर धागा काढा म्हणजे रंगतदार चर्चा होईल आणि नव्या पिढीचे काय उदात्त विचार आहेत ते जाहीर होईल ....
In reply to दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन" by सूड
?
In reply to ... by आशु जोग
...
In reply to ? by संजय क्षीरसागर
...
आजो,
कुटुंब व्यवस्था हे जर या समाजाचे बलस्थान असेल तर त्यावर आघात करा म्हणजे समाज आतून कमकुवत होइल. असे सोपे सरळ सूत्र आहे.हे निरीक्षण १००% बरोबर आहे !...
कोणी कोणाची किव करत असेल तर
ओह आय सी.
धन्य आहे
.
In reply to धन्य आहे by ट्रेड मार्क
दिल दोस्ती मालिका लिव्ह इन वर आहे हे म्हणणारे धन्य आहेत.माझा वरचा प्रतिसाद न वाचताच लिहीलेलं दिसतंय !यू ट्यूबवर मी पाच-सात मिनीटं त्या सिरियलमधला एपिसोड पाहिला. वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो.तुम्ही नसेल म्हणलं तर कशाला अंगावर घेताय?
In reply to . by संजय क्षीरसागर
वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो" या वाक्याचा अर्थ ही मालिका वरकरणी तशी वाटत नसली तरी छुपा उद्देश तोच आहे असा वाटतोय.दादा,
In reply to तुम्ही नसेल म्हणलं तर कशाला अंगावर घेताय? by ट्रेड मार्क
...
In reply to धन्य आहे by ट्रेड मार्क