Skip to main content

ताळेबंद

लेखक रामदास यांनी गुरुवार, 02/03/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. कुणाची तरी वाट बघत, जागलात, काही उत्तर रात्रीचे प्रहर. ते ही वळते केलेत , संधीकालाच्या वजावटीत. ओंजळीत चेहेरा झाकून रडलात , ते ही होरे जमा धरलेत, ग्रहणाच्या हिशेबात. तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. उरलं सुरलं केलं वळतं घसार्‍याच्या आकडेवारीत तसे काही बाक़ी नाही देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. (मुठभर राखुंडी हातात ठेवून आयुष्य म्हणाले, हीच काय ती गंगाजळी इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )
लेखनविषय:

वाचने 4802
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

रामदासकाकांच्या कवितेवर प्रतिसाद लिहायला मी पैला! :D बाकी, कविता डेंजोर! (तसाच, माझा प्रतिसादही..! ;) ) Sandy

आवडली

:)

आवडली.

__/\__

सुरेख!!