Skip to main content

मराठी भाषा दिन २०१७: मई (वर्‍हाडी)

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 26/02/2017 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
1

मई

नाल्या काठचं साजरं असं वावरं मईचं वानं म्हनूनं पीकाची नाई पळतं कईचं नाई गरजं खताची बसे गायाचाचं थरं टाका पेरुनं बियानं वाढे पीकं भरं भरं पुरुस पुरुस धांडा छात्या यवढी पराटी मांड्या मांड्या वाढे मुंगं त्यातं तुरं करे दाटी जरी पुरातं वावरं गेलं सारचं वाहूनं नाई फरकं काईचं रब्बी पीके खन्नाऊनं रब्बी नाईतं खरीपं नाई हारतं काईचं नाई ठेवतं उपाशी असं वावरं मईचं . 1

वाचने 7685
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुंदर कविता! अल्लाळ शेतीबद्दल एक लेख होता मागे त्याची आठवण झाली.

सुंदर रब्बी नाईतं खरीपं नाई हारतं काईचं नाई ठेवतं उपाशी असं वावरं मईचं अगदी पटले

छान आहे कविता