Skip to main content

किंडल वरची टायपिंग मिस्टेक नसलेली चांगली मराठी पुस्तके कोणती?

किंडल वरची टायपिंग मिस्टेक नसलेली चांगली मराठी पुस्तके कोणती?

Published on रवीवार, 26/02/2017 प्रकाशित
काही दिवसांपूर्वी किंडल वर "का रे भुललासी वरलीया रंगा" - व पु काळे (प्रकाशक: मेहता) हे इ-बुक विकत घेतले. त्यात बर्याच काना/मात्रा/ वेलांटीच्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. म्हणून मी म्हटले की इथून पुढे इ-पुस्तक घेण्याआधी लोकांना विचारावे आणि मगच घ्यावे. कोणी किंडल वर घेतलेली वाचनीय आणि टायपिंग मिस्टेक नसलेली पुस्तके सुचवू शकेल काय? धन्यवाद!

याद्या 4446
प्रतिक्रिया 18

https://msblc.maharashtra.gov.in/download1.html इथे .mobi पुस्तके आहेत आणि ती चांगली आहेत असा अनुभव. ही नवीन प्रादेशिक भाषांमधली पुस्तकं अजून ट्राय नाही केली, हवीत ती नाहीच आहेत अजून. चुका असतात हे सांगितलंत बरं केलं. काही काळ थांबणं बरं अजून.

मला एक सांगा, किंडल व्हाईटवर मराठी वाचता येते का ? मी एक पुस्तक किंडलसाठी विकत घ्यायला गेलो तर तसे पुस्तक नव्हते. मी पण माझे एक पुस्तक किंडल फॉरमॅटमधे तयार केले (मराठी) -अण ते मोबाईल व मशीनवर किंडल अ‍ॅपवर वाचता येते पण किंडलवर नाही. कोणाला वाचता येत असेल तर जरुर सांगावे...

In reply to by जयंत कुलकर्णी

हो. पण त्यासाठी मला किंडल सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले होते. आणि पुस्तके विकत घेण्यासाठी ऍमेझॉन.इन वर जा , सर्च बॉक्स मध्ये किंडल स्टोर वर जा , खाली INDIAN LANGUAGE सेक्शन मधे मराठी पर्याय निवडा.

In reply to by जयंत कुलकर्णी

तुमच्याकडे जर त्याची PDF असेल तर किंडल मध्ये ती फाईल पेस्ट करा. वाचता येते. मी सगळी ईबुक्स अशीच वाचतो. सगळीच पुस्तके ऍमेझॉन वॉर विकत घेणे जरुरी नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

तुम्ही किंडल८वी पिढी वापरत असाल असे वाटते. त्याचे नवीन सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. २०ं० एम बी चे आहे. त्यानंतर देवनागरी वाचता येईल. त्यानंतर अमेझॉन वरून देवदत्तचे किंवा अन्य कुठले हिन्दी मराठी सम्पल बुक वाचून बघा. मला किंन्डल खुपच आवडले. सध्यातरी काही इंग्रजी पुस्तके वाचतोय. पण लवकरच देवनागरी सुध्दा वाचता येईल असे आहे. तसेच जर तुमच्या जवळ एखादे पुस्तक .ईपब फॉरमॅटमध्ये असेल आणी ते किंडलवर वाचायचे असेल तर तुम्ही ते .मोबी फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करा. हे करण्यासाठी कॅलीबर नावाचे सॉफ्टवेअर मोफत मिळेल. कॅलीबर केवळ फॉरबदलण्यासाठीच नव्हे तर त्याचे बाकी सुध्दा उपयोग आहे. - नीलकांत

In reply to by नीलकांत

आपल्याकडे कुठले व्हर्जन आहे हे कृपया सांगाल का म्हणजे मला चेक करता येइल. कारण माझा किंडल तर अपडेटेड आहे....

त्या typing mistakes नसून rendering mistakes आहेत. जगात रोमनव्यतिरिक्त लिप्यामध्ये काही वाचनीय लिहिलं जाऊ शकतं यावर किंडळचा अजून विश्वास बसला नाहीये. त्यामुळे 'सप्रीण' हा शब्द किंडळवर 'सर्पीण' असा दिसतो. सपऱयांनी तक्रार केल्याशिवाय काही होईलसं वाटत नाही.

आधी सॅम्पल download करून बघु शकता. मला एक सांगा भारतात किंडल वर पुस्तक विकत घेताना दुसऱ्या देशातून issue केलेले क्रेडिट कार्ड वापरता येते का? आणि फक्त क्रेडिट कार्डच वापरता येते कि बाकी डेबिट कार्ड सुद्धा.

किती सुंदर! डांगराचा वेल म्हणजे काय?

किती सुंदर! डांगराचा वेल म्हणजे काय?

In reply to by पिशी अबोली

काशीफळ भोपळ्याला डांगर असेही म्हणतात. हा शब्द मी मराठवाड्यात औरंगाबादेत ऐकलेला आहे. (हे आठवणीतून त्यामुळे चूभूद्याघ्या)

In reply to by आनंदयात्री

बरोबर...! आपण मराठवाड्यातले लोक काशीफळाला डांगरच म्हणतो. -दिलीप बिरुटे