शब्दप्रधान गायकी : यशवंत देव
पुस्तकाला मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी लिहीलंय, `कवितेची चाल बाहेर नसतेच मुळी, ती त्या कवितेतच असते, मी फक्त ती शोधून काढतो असं देव म्हणतात'. आणि ते पुढे लिहीतात, आपल्या जीवनाभूतीतून कवी गीत निर्माण करतो, मग संगीतकार या निर्मितीशी कलात्मक इमान राखून स्वरांची बंदीश निर्माण करतो आणि त्यानंतर ही दुहेरी बंदीश एकात्म रीतीनं उमजून गायक किंवा गायिका गाणं निर्माण करते.
या पुस्तकात अशी प्रकरणं आहेत : भावगीत गायन, गेय कविता, संगीत दिग्दर्शन, गायकीचा पदविका अभ्यासक्रम, आणि सिंहावलोकन व उपसंहार. पैकी पहिली दोनंच प्रकरणं, क्वचित गायक आणि कधेमधे कवी होणार्या आपल्यासारख्या लोकांना उपयोगी आहेत म्हणून फक्त त्यांचाच वेध या लेखात घेतला आहे. पुढची प्रकरणं आपल्या उपयोगाची नाहीत पण ज्यांना त्यात रस असेल त्यांनी ती पुस्तकातून अभ्यासावीत.
देवांच्या मते गाण्याचा परिणाम न होण्याचं एकमेव कारण म्हणजे गायकाचं स्वतःच्या गाण्याकडे अवधान नसणं ! आपण सहज चालावं तसं गातो, सैनिक जसा प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक टाकतो आणि त्यामुळे त्याचं चालणं उठावदार होतं, तसं गाणं गातांना गायकानं ते अखंडपणे ऐकायला हवं. पुढे देव म्हणतात, अनावधानानं गाणार्याचा परिणाम (हवेत) विरतो आणि जाणीवपूर्वक गाणार्याचा परिणाम (रसिकांच्या मनात) मुरतो.
डोळे उघडे असतांना आपली नजर अनेक वस्तुंवर भिरभिरत असते आणि असे जाणीवेचे काही क्षण सलग झाल्यामुळे वस्तु दिसल्याचा भास होतो पण क्षणभरासाठी का होईना आपली जाणीव जेव्हा एखाद्या वस्तुशी निगडीत होते तेव्हा ती वस्तु आपल्याला खर्या अर्थानं दिसलेली असते. तद्वत, गायन चालू असतांना आपल्याला ते ऐकू येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची सवय करुन घ्यावी लागते. आपण गातो म्हणजे ऐकत असणारच हे गृहितक बरोबर नाही. अभावितपणे आपण म्हटलेले स्वर आपल्या कानावर पडतात खरे पण ते आपण ऐकलेले असतातच असं नाही.
यासाठी गाणं कंठस्थ करुन स्मरणात ठेवलं पाहिजे आणि नुसती चाल ढोबळमानानं लक्षात ठेवण्याऐवजी, गाण्याच्या प्रत्येक शब्दामधे नव्हे तर हरेक अक्षरात असणारा स्वर आपल्या लक्षात आला तरच ते गाणं आत्मसात होतं.
पुढे गायनाची प्रक्रिया आणखी सुबोध करतांना देव म्हणतात, गायक शब्द गातो म्हणण्यापेक्षा तो शब्दाचा `अर्थ गातो' तेव्हाच श्रोते मोहित होतात म्हणून शब्दाचा नेमका अर्थ गायकाला माहिती हवा. आणि भाव अर्थापेक्षा गहीरा आहे त्यामुळे त्या भावनेचा थांग गायकाला लागला किंवा नाही हे जाणकार श्रोते आणि रसिक लगेच जाणू शकतात.
रियाजाच्या बाबतीत देवांचं अवलोकन असंच भारी आहे. ते म्हणतात, आपण प्रथम आवडणारं म्हणायला घेतो आणि अवघड वाटणारी गाणी टाळतो. ते झाल्यावर मग सम हाऊ, अवघड गाण्याचा प्रयत्न करायला घेतो आणि त्यातल्या न जमणार्या जागा दोन-चार वेळा म्हणून बघतो. थोड्याफार प्रयत्नांती त्या जमल्या नाहीत तर मग एकूणातच गाण्याचा नाद सोडून देतो. अशा तर्हेनं कितीही गाणी म्हटली तरी मग आपण पूर्वी होतो तिथेच राहातो. काल न जमलेली गाण्यातली जागा जर आज घेता आली तरच खरा रियाज झाला बाकी फक्त टाइमपास झाला. रियाज करतांना स्पष्ट आणि भावपूर्ण गाण्याची आणि गातांना ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. मैफिलीत गातांना जसे अवधानपूर्वक गातो तसा रियाज हवा म्हणजे लोकांसमोर गातांना जीव आतून घाबरलेला राहाणार नाही.
खरं तर`आ' हाच `सा' आहे, तो एकदा नक्की आणि सर्वकाळ सारखा लावता आला की बाकीचे स्वर त्या रेफरंसनी आपोआप लावता येतात. त्याबद्दल यशवंत देव म्हणतात, घशातून नुसती हवा बाहेर फेकतांना त्यात सहज एखादा स्वर मिसळता येतो का ते पाहा. हा सूर मग हळूहळू पण विनासायास, खालचा लावता येतो का ते पाहा. यामुळे स्वर स्पष्ट आणि सहज होईल आणि गळ्यावर यत्किंचितही ताण जाणवणार नाही ! एकदा मंद्र स्वर नीट लावता येऊ लागले की तार सप्तकात शिरण्याची उर्मी आपसूक येते आणि ती उर्मीच उंच स्वर लावण्यासाठी गळा आणि श्वास यावर अवधान साधायला मदत करते.
कोणताही स्वर निर्माण होतांना स्वरयंत्राच्या पोकळीतून हवा बाहेर फेकली जात असते. या हवेचा स्पर्श गातांना सतत जाणवला पाहिजे. शुद्ध `आ' तेव्हाच उच्चारला जातो जेव्हा तोंड संपूर्ण उघडलेले असते आणि स्वरयंत्राच्या संपूर्ण परीघाचा पूर्ण उपयोग केला जातो. बाहेर जाणारी हवा स्वरयंत्राच्या संपूर्ण परीघाला स्पर्श करुन जाते. परीघाचा कोणताही भाग अस्पर्शित राहात नाही. `आ' हा संगीताचा पहिला धडा आहे आणि त्यानंच स्वतःच्या आवाजाची ओळख होते. ही ओळख पक्की असेल तर त्यावर गायनाची इमारत भक्कम उभी राहाते.
आपला आवाज किती उंच चढू शकतो ? देव म्हणतात, आपला आवाज किती उंची गाठेल याचं आपलं ज्ञान म्हणजे केवळ कल्पना असते. कधी एखाद्या डोंगराच्या मोकळ्या पठारावर जाऊन, दूरवरच्या कुणाला तरी, आवाज न फाटू देता, हाक मारुन पाहा म्हणजे तुम्हाला आपल्या आवाजाच्या ताकदीची नक्की कल्पना येईल. ते पुढे म्हणतात की रागानं किंवा दु:खानं कंठ अवरुद्ध होतो तेव्हा स्वरयंत्राला शक्ती देणारी इच्छा विकेंद्रित झालेली असते, अन्यथा प्रकटीकरणाची संभावना स्वरयंत्रात असतेच. तस्मात, स्वरयंत्र जरी कमी-अधिक ताकदीचे असेल तरी एकसंध इच्छाच स्वरनिर्मितीचं काम करते. यामुळे उत्छ्वासावर लक्ष केंद्रित करुन, लागलेला स्वर पुढे नेत राहाणं हे वरचे स्वर घशाला ताण न पडता, सहजपणे लागण्याचं रहस्य आहे. जो स्वर लावायचा त्याकडेच अवधान असू दे, इतके की आपणच तो स्वर आहोत अशी प्रचिती व्हावी, म्हणजे स्वराला सामर्थ्य लाभेल. गाणार्याची जाणीव हीच कोणत्याही स्वरामागची शक्ती आहे. गाणार्याच्या जाणीवेत पक्का उभा राहीलेला स्वर किंवा शब्दच ऐकणार्याला त्याची समान अनुभूती देतो.
देवांच्या अनुभवानं कविता मोठ्यानं वाचणं आणि गाणं म्हणणं यात फक्त दोनच गोष्टींचा फरक आहे. (१) गायकानं शब्दाला चिकटवलेला सूर आणि (२) दोन स्वर वेगवेगळे करुन दाखवण्यासाठी गायकानं स्वरांना दिलेलं अवधान !
मायक्रोफोनबद्दल यशवंत देवांचे विचार तितकेच अनोखे आहेत. ते म्हणतात मायक्रोफोन हा एक सुजाण श्रोता आहे. तो एक तयार कान आहे आणि आपण त्याला गाणं ऐकवतोयं असं समजा. मग उंच स्वर लावतांना आपसूकपणे तुम्ही त्या सुजाण कानापासून थोडे मागे व्हाल आणि खालचे स्वर लावतांना त्या कानाशी कुजबूज करावी इतपत जवळ जाल.
पुढे देव आणखी बारकाव्यात शिरतात. प वर्गातली अक्षरं (प, फ, ब,भ, आणि म) त्यातही फ आणि भ चे उच्चारण होतांना हवा जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा उच्चारण सुस्पष्ट ठेवून मायक्रोफोन किंचित डाव्याबाजूला करावा म्हणजे हवेचा आघात त्यावर होणार नाही. तसंच ख, घ, छ, ढ, थ, ध पैकी छ सोडता इतर सर्व शब्दांनाही तोच नियम लागू होतो.
भावदर्शन आणि अलिप्तता हा पेच देव लिलया सोडवतात. पाण्यात पोहतांना पाण्यात बुडावेच लागते, तसेच तरंगावेही लागते. तद्वत, गायकानं गाण्यात इतकंही रंगू नाही की त्याचं अवधान सुटेल. भावना जरी गायकाचं सर्व अस्तित्व वेढून असली तरी गायक स्वतः कायम निर्लेपच राह्यला हवा. तन्मयतेची किमान आणि कमाल पातळी ओळखण्या इतपत जागरुकता गायकाला असणं जरुरी आहे.
शेवटी यशवंतजी म्हणतात की गायन हा एक योग आहे. जेव्हा तो जमतो तेव्हा श्रोता आणि गायक हे द्वंद्व संपलेलं असतं. गायक स्वतःच श्रोता झालेला असतो आणि श्रोत्यांच्या मनात गाणं सुरु झालेलं असतं. In reply to अरे वा. यशवंत देव यांनी by एस
In reply to यशवंत देव व ओपी नय्यर by चौकटराजा
In reply to यशवंत देव व ओपी नय्यर by चौकटराजा
मी ५० टक्के महत्व शब्दाना. २५ टक्के गायक व वाद्यवृन्दाला व २५ टक्के मला घेतो!"ह्यात अरेंजर वर अन्याय होतोय असे वाटते. ओपी च्या बाबतीत तर जी एस कोह्लीला विसरणे अशक्य आहे.
In reply to मी ५० टक्के महत्व शब्दाना. २५ by मराठी_माणूस
In reply to ओपी आणि यशंवत देव या दोन भिन्न निर्मिती प्रणाली आहेत by संजय क्षीरसागर
In reply to असे नाही .. by चौकटराजा
In reply to म्हणजे दोघंही एकच म्हणतायंत ! by संजय क्षीरसागर
In reply to असे नाही .. by चौकटराजा
In reply to असे नाही .. by चौकटराजा
In reply to वा! मस्त आणि आवश्यक ओळख, by संदीप डांगे
श्वास आपण दिवसभर घेत असतो तसं गाणं हवं, त्यात आत्मा हवा, तर ते गाणं, नाहीतर फक्त बजावणे होऊन राहतं...
हे विदेह होऊन कृत्य करणं हाच कृत्यातला आनंद आहे.In reply to व्वा.. मिपावरच्या संगीत विषयक by सही रे सई
In reply to पण हे सगळं ज्याला मुळात by संदीप डांगे
पण हे सगळं ज्याला मुळात गाणारा गळा मिळाला आहे त्याच्यासाठी लिहिलं आहे देवांनी. त्यानी त्यातली प्रक्रिया कितीही सुलभ करून सांगितली तरी गाण्याचा आवाज नसताना किंवा गाण्याचे एखादे अंगच गळ्यात नसताना (जसे की फिरता गळा) हे सगळं करण शक्य नाही.तुम्ही माझ हे वाक्य मनाला लावून घेतलेल दिसतयं. पण ते नकारात्मक अर्थानं नाही लिहलेलं हे सांगू इच्छीते. कारण त्या पुढे मी हे लिहिलं आहे.
आत्मानंदासाठी मात्र कोणीही गाण म्हणावे. पण त्याला खूप नियम वगैरेची गरज नाही.त्यामुळे जेव्हा आत्मानंदासाठी गाऊ तेव्हा त्यात आत्मा ओतला जाणारच आहे. उलट मी म्हणत्ये कि नियम वगैरे ची तशी आवश्यकता नाहीच.
In reply to पण हे सगळं ज्याला मुळात by सही रे सई
In reply to पण हे सगळं ज्याला मुळात by सही रे सई
In reply to देवांच्या पुस्तकाची समिक्षा एक बहाना आहे by संजय क्षीरसागर
In reply to जर पब्लिकनं अनुभव गाण्याचे लिहीले by संजय क्षीरसागर
In reply to उत्तम पुस्तक परिचय by प्रदीप
अरे वा. यशवंत देव यांनी