संकल्प मत्स्यपुराणाचा

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
17 Feb 2009 - 7:37 pm

गेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्‍याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्‍या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या "खाणेबल" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती. त्याला अनुसरून एक मत्स्यपुराण लिहिण्याचा संकल्प सोडीत आहे.

केवळ माशांची जंत्री देण्यापेक्षा, त्यांची नावे (मराठीतील वैकल्पिक नावांबरोबरीनेच शक्य असल्यास इंग्लीश नावेदेखिल), बाजारात गेल्यावर ते मासे ओळखता यावेत याकरीता त्यांचे फोटो आणि त्या माशांच्या काही प्रसिद्ध पाकृंची नावे (विस्तृत पाकृ येथे अपेक्षित नाही), असे देण्याचा विचार आहे.

हे काम एकहाती करणे अगदीच अशक्य नसले तरी जिकीरीचे ठरेल. तेव्हा, जाणकार मिपाकरांनी हातभार लावावा, ही विनंती.

अपेक्षित असलेली मदत येणेप्रमाणे -

१) मी दिलेल्या यादीत यथायोग्य भर / सुधारणा.
२) फोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे!).
३) तुमच्या आवडत्या पाकृंची नावे.

खार्‍या पाण्यातील मासे
कर्ली
काटेरी
कोलंबी / झिंगा (प्रॉन्स / श्रिम्प्स)
खेकडा / चिंबोरी / कुर्ल्या (क्रॅब)
जवळा
तारली
पापलेट (पॉम्फ्रेट)
पेडवे (सार्डिन)
बांगडा (मॅकरेल)
बोंबिल (बॉम्बे डक)
मांदेली
मुडदुशा / नगली
मोरी (शार्क)
रावस (सामन)
शिंपली / तिसर्‍या (क्लॅम)
शेवटे (म्युलेट)
सुरमई (किंग फिश)
हलवा

गोड्या पाण्यातील मासे
हिल्सा
रोहू
बेटकी
कटला
जिताडा

परदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे
तिलापिया
हॅलिबट

सर्व उपयोग्य सुचनांचे संकलन करून, एक बराचसा परिपूर्ण लेख दोन-एक आठवड्यात तयार व्हावा, ही अपेक्षा.

संस्कृतीसंदर्भ

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2009 - 7:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परमेश्वराच्या पहिल्या अवताराच्या कृपेने मत्स्यपुराण लिहिण्यासाठी आपणांस लवकरात लवकर वेळ लाभो.

(शाकाहारी) अदिती

लिखाळ's picture

17 Feb 2009 - 7:43 pm | लिखाळ

असेच म्हणतो :)

फोटोंमध्ये मासे हातात धरुन उभी कोळीण असली तर आमची हरकत नाही हो !:)
-- (पूर्वीचा मत्स्याहारी) लिखाळ.

सहज's picture

17 Feb 2009 - 7:42 pm | सहज

वाचनखुण साठवली आहे. लवकरात लवकर कोष्टक पुर्ण करावे.

अजून काही नावे:

हॅडॉक
ग्रूपर
रेड स्नॅपर
व्हाईट स्नॅपर
स्वॉर्ड फिश
हेरिंग

('मसल्स' ला मराठी नाव काय? आणि तो भारतात मिळत असावा?)

आणि मोरी म्हणजे कॉड नव्हे का?

संदीप चित्रे's picture

17 Feb 2009 - 8:02 pm | संदीप चित्रे

हे मासे राहिले की ....
सामन (स्पेलिंगप्रमाणे उच्चार साल्मन !)
-----
'मोरी' म्हणजे कॉड नाही.
माझ्या माहितीप्रमाणे 'मोरी' मासा म्हणजे 'शार्क'.

नूतन सावंत's picture

11 Sep 2019 - 10:55 pm | नूतन सावंत

('मसल्स' ला मराठी नाव काय? आणि तो भारतात मिळत असावा?)
शिनाया

मोरी म्हमजे शार्क.

सागर's picture

17 Feb 2009 - 9:12 pm | सागर

लॉब्स्टरला मराठीत काय म्हणतात माहित नाही...
पण चवदार सी-फूड मधे लॉब्स्टर मला आवडतो
(मत्स्यप्रेमी) सागर

घाटावरचे भट's picture

18 Feb 2009 - 6:24 am | घाटावरचे भट

लॉबस्टरला शेवंड म्हणतात बहुतेक.

सागर's picture

18 Feb 2009 - 12:56 pm | सागर

धन्यवाद भटोबा :)
आणि वाचकबुवांना ही....

आता लॉब्स्टर (चुकलं ... आपलं शेवंड) मराठीतून मागून खाता येईन... हा हा :)

वाचक's picture

17 Feb 2009 - 9:41 pm | वाचक

बाकी उत्तम धागा :)

नाटक्या's picture

17 Feb 2009 - 9:45 pm | नाटक्या

ट्यूना फिश राहीला की? अमेरिकेत तर त्याचा वापर बर्‍याच पाककृतींमध्ये करतात. टुना सलाड्/सँडविच ...

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 10:27 pm | विसोबा खेचर

फोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे!).

हे बाकी मस्त! :)

आपला,
(साधना कोळणीचा लाडका!) तात्या.

आयला सुन्या, आजच काही कामानिमित्त वांद्र्याला गेलो होतो. तिथून हायवेच्या जवळच असलेल्या 'हाय वे गोमांतक'मध्ये पोटभर जेवलो. आत्ता तेथूनच येतो आहे. तुझ्या यादीत जवळा हे नाव वाचलं. आज मी पण जवळा खाल्ला रे! हा बघ फोटू..
(चांगली थाळी समोर आली की मोबाईलवर फोटू काढून ठेवायची आमची सवय!) :)

पापलेटचं कालवण, कांद्यामिरचीवर परतलेला जवळा अन् बोंबिल! :)

आपला,
तात्या तांडेल.

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 10:36 pm | संदीप चित्रे

तात्या !!!
त्रास आहे रे ही थाळी म्हणजे .... तोंडाला पाणी सुटलं ना !

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2009 - 10:35 pm | प्रभाकर पेठकर

तारली (सार्डिन)
पेडव्यांना सार्डीन म्हणत नसावेत. (काय म्हणतात माहित नाही.)

हलवा (ब्लॅक पाँफ्रेट)

काही राहिलेले मासे:

पाकड (काईट फिश)
टोके (डोक्याकडे चोचीसारखा भाग असणारे)
मोदकं
भिंगी
डोमा

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 10:42 pm | विसोबा खेचर

गोब्रा मासा!

हा मासा म्हणजे स्थूल, अति लठ्ठ पापलेटाचाच एक प्रकार. मुंबैत क्वचितच मिळतो, खूप महाग असतो..

आपला,
(स्थूल) तात्या.

chipatakhdumdum's picture

17 Feb 2009 - 11:19 pm | chipatakhdumdum

गोब्रा आणि पापलेटचा काहीही सम्बध नाही. पापलेट गोब्र्यापेक्षा खूप महाग असत. गोब्रा सिन्धुदूर्ग जिल्ह्यासमोरच्या समुद्रात मिळतो. एकदम स्वस्त असतो आणि जरा बोयट्यासारखा गोडा असल्याने मुम्बै पर्यन्त बर्फातून टिकत नाही.

( आता तात्या विचारणार.. बोयटा हा मासा कुठला.. तर सिन्धुदूर्गात खाडीच्या तोन्डावर ज्या लहान आकाराच्या गुन्जल्या मिळतात, त्याना बोयटे म्हणतात. बोयट्याच तिखल ...वा वा वा वा..)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2009 - 10:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामट
मर्‍हळ
चोपडा मासा ( गंगावरी)

लवंगी's picture

18 Feb 2009 - 5:42 am | लवंगी

भारतातले मासे..
निवटि
बोय
मोदकं
करंदि
शिंगाळे ( हा आमच्या गावी मिळतो.. मुंबईला कधी पाहिला नाहि.. याच्या तोंडावर मोठे शिंग असते)

अमेरीकेतले मासे
क्वाड
बटर फिश ( पापलेटचा भाऊ )

हरकाम्या's picture

18 Feb 2009 - 12:18 am | हरकाम्या

तुझे पुराण लवकरच पूर्ण होवो ही परमेश्वराच्या प्रथम अवताराकडे प्रार्थना .

बेसनलाडू's picture

18 Feb 2009 - 12:22 am | बेसनलाडू

परदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे
(परदेशस्थ)बेसनलाडू

पक्या's picture

18 Feb 2009 - 2:37 am | पक्या

क्यालामारी हा स्क्वीड चा प्रकार आहे . मासा नाहीये तो,

बेसनलाडू's picture

18 Feb 2009 - 4:36 am | बेसनलाडू

मला वाटते येथे सी फूड / समुद्री खाद्य हा व्यापक विषय चालू आहे. क्यालामारी मासा नाही, माखली आहे; कोळंबी/झिंगे, खेकडे वगैरे सुद्धा मासे नाहीतच ना? की आहेत?
(चिकित्सक)बेसनलाडू

पक्या's picture

19 Feb 2009 - 6:39 am | पक्या

>>क्याट् फिश् आणि क्यालामारी - परदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे
असं तुम्ही लिहिल्याने मी लिहीले कि क्यालामारी मासा नाहीये. ज्यांना क्यालामारीबद्द्ल माहीत नाही त्यांना तो मासाच आहे असे वाटू नये एवढाच हेतू. तुम्ही प्रतिसाद नीट वाचला नाही बहुतेक.

पक्या's picture

18 Feb 2009 - 2:36 am | पक्या

स्वोर्डफीश
माहीमाही (mahi mahi) (भारतात मिळत नसावा बहुतेक किंवा मिळत असल्यास भारतीय नाव माहीत नाही.)

इतर खाल्ले जाणारे सीफूड म्हणजे स्कॅलॉप , स्क्विड , ऑइस्टर , ऑक्टोपस
कॅव्हिअर (caviar) तर सीफूडमधलं डेलीकसी समजलं जातं.

लवंगी's picture

18 Feb 2009 - 5:36 am | लवंगी

म्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला.

इथल्या माश्यामध्ये सि-बास विसरले होते.. खूपच चविष्ट मासा आहे. सार्डिन पण छान लागतात.

पक्या's picture

19 Feb 2009 - 2:44 pm | पक्या

>>माहीमाही म्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला.

डॉल्फिन नसावा. डॉल्फिन पण खाल्ला जातो हे कधी ऐकले नाही अजून.

विंजिनेर's picture

18 Feb 2009 - 4:53 am | विंजिनेर

१. ब्लो-फिश (जपानी मधे "फुगु"/कोरियन मधे "बोगु") - हा विषारी असतो(अगदी प्राणघातक) पण कुशल सुशी-गुरूच्या हाती ह्याचे अलगद काढलेले पातळ/पारदर्शक तुकडे जिभेला चरचरवून(किंचित असलेल्या विषामुळे) जातात. सजावटसुद्धा भान हरपवणारी असते.
हा मासा हाताळायला परवाना लागतो. तो परवाना मिळवण्यासाठी गुरुच्या हाताखाली सरासरी २-३ वर्षे उमेदवारी करणे जरूरीचे असते. उमेदवारीचे सुरवातीचे काही महिने मासा फक्त पाण्यात स्वच्छ धुवावा कसा यात जातात. मग यथावकाश त्याचे कलात्मक काप करावे कसे, त्यातला विषारी भाग काढावा कसा यात जातात.
सर्वात शेवटी परिक्षा म्हणून स्वतः कापलेला आणि विषारी भाग काढलेला असा मासा स्वतःलाच खावून दाखवावा लागतो! (३०% परीक्षार्थी उत्तीर्ण होतात :)).

उपहारगृहातला सुशी/साशीमीचा मुख्य हा एकूणच अतिशय आदराच्या स्थानी असतो. त्यात फुगु माशाच्या साशीमीचा गुरु तर अजून वरचा!!
आपण तेथे गेल्यावर पहिल्यांदा त्याला रामराम घालयाचा. त्याच्या बरोबर घोटघोट बियर नाहीतर साके (तांदूळापासून बनविलेली दारू) घ्यायची. मग त्यालाच विचारयचे "काय बाबा, आज काय खाऊ?" तो तुमच्या साधारण आवडी निवडी, त्यादिवशीचा "बाजार", दिवसाची वेळ ह्याचा अंदाज घेउन स्वतः ठरवतो की कुठली सुशी/साशिमी सयुक्तिक. मग धीरे धीरे एकेका सुशीचा आनंद घेत चवीने २-३ तास जेवण चालते(सुशीचे जेवण जर पटकन उरकले तर सुशी-गुरूचा तो अपमान होतो :)).

एकूण काय, सुशी आणि साशीमी हा प्रकार भारतीय संगीताच्या फार जवळ जातो. त्यासाठी करावी लागणारी दीर्घ उमेदवारी, ख्याल गायकी ढंगाने जाणारे ते जेवण, पंचेद्रियांना सुखवणारी ती सजावट, माशाची चव, तुमच्या एखाद्या जवळच्या सहचर्‍या/मित्रा/मैत्रिणीबरोबर बरोबर निवांत गप्पा मारत आणि जोडीला उत्तम दर्जाची साके/वारूणी यांचा आस्वाद घेत ते केलेले जेवण ..अहाहा... स्वर्ग याहून वेगळा नसतो!
(सौजन्यः अनुभव स्वतःचे + काही मजकूर विकीपीडीयातला)
छायाचित्र सौजन्यः गुगल सेवा
fugu sashimi
२. यलो-क्रोकर(गुलबी/चिम-जोगी) - हा पापलेट सारखाच श्वेतमांसाचा मासा पण अजून चविष्ट. कोरियात हा उत्तम दर्जाचा आणि महागडा मासा "चुसक" (आपल्या दिवाळी सारखा सुगी नंतर येणारा सण)च्या वेळी भेट देतात (तळहाताएव्हढ्या आकाराच्या ७ माशांची किंमत असते ३,५०० रु. फक्त!!)
समुद्र काठच्या खार्‍या थंड आणि दमट हवेत तो काही महिने "वाळवतात" त्याची खुमारी अजूनच वाढते(त्याचे सूप खल्लास लागते पण त्याची पाकृ. पुन्हा कधीतरी).
परवाच मी तो आणला (नशीब जोरावर होते म्हणून स्वस्त मिळाला !!)
छायाचित्र सौजन्यः स्वतः

PB270017

सुनील's picture

18 Feb 2009 - 9:00 am | सुनील

हां हां म्हणता बराच विदा गोळा झाला. आता याचे संकलन, पृथःकरण, वर्गिकरण आदि करून संकल्पित कोष्टकाचा पहिला रकाना (माशांची नावे) पूर्ण करण्याचे काम लवकरच सुरू करतो.

राहिला प्रश्न कोष्टकातील दुसरा रकाना (फोटो) आणि तिसरा रकाना (पाकृ) यांचा.

फोटोचा मूळ हेतू हा नवागताला बाजारात मासे ओळखणे सोपे जावे हा असल्यामुळे, फोटो हे कच्च्या माशांचे हवेत.

पाकृंबद्द्ल - सविस्तर पाकृ स्वतंत्रपणे द्याव्यात. येथे फक्त त्यांची नावे (आणि दुवे) संकलित करण्याचा विचार आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 10:41 pm | संदीप चित्रे

ही विनंती ....वाट बघतोय :)

जागु's picture

20 Feb 2009 - 11:56 am | जागु

खार्‍या पाण्यातील
घोळ
बोईट
बिळज
शार्क (मुशी)
ढोमा
निवटे
बला
वाकटी
कालेट
कडकड्या
हेकरु
खरबी
कांटा
शिवल्या
खुबे
खुबड्या
कालव
पालकं
कोलिम

गोड्या पाण्यातिल
चिवणे
अजुन आठवुन सांगते.
तुम्हाला मत्स्यपुराण लिहण्यासाठी शुभेच्छा. अजुन काही मला माहीती हवी असल्या मला देण्यासारखी असली तर नक्की देईन.

अजुन आठवले
राणी मासा - हा गुलाबी रंगाचा असतो.
पिळसा - हा सापासारखा असतो.
भाकस - हा एका पुढे साधारण माशासारखा असुन ह्याची पाठ काळपट आणि चपटी असते.

नरेन's picture

18 Feb 2009 - 2:45 pm | नरेन

गोड्या पाण्यातील अजून एक चवदार मासा खदरा काटे कमी असतात नदी मध्ये मिळतो. एकदम चविश्ट.