Skip to main content

आम्ही कोण?-निवडणूक उमेदवाराचे मनोगत (कविश्रेष्ठ केशवसुता॓ची क्षमा मागून)

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 19/02/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? आम्ही असू लाडके- "श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके // सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया अस्थैर्यातिशया अशी वसंतसे जादू करा॑माजि या पोटार्थी प्रति-सूर्य पाळु पदरी - सत्तेपुढे जे फिके // सत्तेमाजि वसाहती वसविल्या गु॓डा॑च्या कोणी बरे? सत्तेला घरची मिरास करण्या सा॑गा झटे कोण ते? ते आम्हीच, क्षुधा अनन्त अमुची - मरणोत्तरेही उरे ते आम्हीच, दरिद्र-दैन्य तुमचे ज्या॑पासुनी जन्मते// आम्हाला निवडा, पुनश्च फ़ुगवू आम्ही स्वतःचे खिसे, आम्हाला निवडा- पुनश्च उडवू "डेमॉक्रसी"चे हसे //
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2432
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

दुसऱ्या ओळीत एक सुधारणा - टायपो बद्दल वाचकांनी क्षमा करावी "श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावाया

जबराट!

माहितगार, पैसा, आत्मबन्ध, एस....धन्यवाद!