डॉक्युमेंटरी संबंधी माहिती.
नमस्कार मंडळी,
मिपावर मी मागे टाकलेला एक धागा एक गरजू शाळा ला खूप चांगला प्रदिसाद मिळाला. समस्त मिपाकरांचे त्याबद्दल आभार.
तर, झाले असे कि आपल्या मिपाची एक वाचक(सदस्य नाही) या निमित्ताने माझ्या संपर्कात आली. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिच्या कंपनीने CSR अंतर्गत शाळेला काही मदत करायचे आश्वासन आम्हाला दिले आणि शाळेची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी येऊनही गेली. त्यात तिला खरोखरच वाटले कि जेवढी मदत ते करणार आहेत तेवढी मदतही खूप थोटकी आहे. म्हणून तिने माझ्यावर एका जबाबदारी टाकलीय, शाळेबद्दल एका डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याची. तिच्या म्हणण्यानुसार हि डॉक्युमेंटरी फिल्म ती तिच्या लंडनस्थित मुख्यालयाला पाठवेल आणि जर त्यांना आमची गरज कळाली तर त्यांच्या कंपनीच्या स्वयंसेवी संस्थेकडून शाळेला भरघोस मदत मिळू शकेल. तसेच मलाही ती फिल्म ऑनलाईन कॅम्पेन साठी वापरता येईल. त्यांचे म्हणणे मला खरोखरच पटले. खरंतर मलाही असं काही करायची कल्पना आधीच सुचली होती पण साधनं आणि कौशल्य या गोष्टींपायी अडलोय. त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या व्हिडीओ एडिटर्सचे साहाय्य मला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मला खूप मदत होईल पण तरीही या सगळ्या प्रक्रियेत माझी भूमिका महत्वाची असेल. म्हणूनच, कृपा करून मला कोणी खालील शंकांचं निरसन करून देईल का?
डॉक्युमेंटरी फिल्म किती मिनिटांची असावी?
प्रामुख्याने मला शाळेची परिस्थिती मांडायची आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करू?
त्यात माझं/शिक्षकांचं/विद्यार्थ्यांचं काही सेकंदांचं मनोगत/मुलाखत वगैरे असावं का?
सबटायटल्स साठी काय करू?
तुमच्या बघण्यात असली कुठली डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर कृपया त्याची एखादी लिंक द्याल का?
या एका प्रकल्पाने एक अख्खी शाळा उभी राहू शकते त्यामुळे मला माझे सर्व प्रयत्न पणाला लावायचे आहेत.
आताशा मी फोटोग्राफी शिकतोय पण मित्र फोटोग्राफी करतो, खासकरून इव्हेंट फोटोग्राफी. एक मित्र एडिटिंगही करतो, पण डॉक्युमेंटरी फिल्म ला अजून त्यांनीही हात घातला नाही कधी. त्यामुळे हे मलाच समजावून सांगावं लागेल तेवढ्यासाठी हा पसारा...
तर मग जाणकारांनो लागा कामाला.
याद्या
2855
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
डॉक्युमेन्टरी तयार करुन
शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत
शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत
चांगले आहे की... बरंच साहित्य
In reply to शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत by इरसाल कार्टं
हो
In reply to चांगले आहे की... बरंच साहित्य by संदीप डांगे
डॉक्युमेंटरी फिल्म किती
लागतो kamala
In reply to डॉक्युमेंटरी फिल्म किती by संदीप डांगे
माझ्या मते तुम्ही तुमच्या
धन्यवाद
In reply to माझ्या मते तुम्ही तुमच्या by कंजूस
उत्तम प्रकल्प!
नक्कीच
In reply to उत्तम प्रकल्प! by चतुरंग
तुम्हाला शुभेच्छा !
धन्यवाद
In reply to तुम्हाला शुभेच्छा ! by स्रुजा
डांगेअण्णा आहेतच पण समजा
अर्थातच.
In reply to डांगेअण्णा आहेतच पण समजा by पिलीयन रायडर