✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉक्युमेंटरी संबंधी माहिती.

इ
इरसाल कार्टं यांनी
Mon, 02/20/2017 - 15:25  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, मिपावर मी मागे टाकलेला एक धागा एक गरजू शाळा ला खूप चांगला प्रदिसाद मिळाला. समस्त मिपाकरांचे त्याबद्दल आभार. तर, झाले असे कि आपल्या मिपाची एक वाचक(सदस्य नाही) या निमित्ताने माझ्या संपर्कात आली. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिच्या कंपनीने CSR अंतर्गत शाळेला काही मदत करायचे आश्वासन आम्हाला दिले आणि शाळेची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी येऊनही गेली. त्यात तिला खरोखरच वाटले कि जेवढी मदत ते करणार आहेत तेवढी मदतही खूप थोटकी आहे. म्हणून तिने माझ्यावर एका जबाबदारी टाकलीय, शाळेबद्दल एका डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याची. तिच्या म्हणण्यानुसार हि डॉक्युमेंटरी फिल्म ती तिच्या लंडनस्थित मुख्यालयाला पाठवेल आणि जर त्यांना आमची गरज कळाली तर त्यांच्या कंपनीच्या स्वयंसेवी संस्थेकडून शाळेला भरघोस मदत मिळू शकेल. तसेच मलाही ती फिल्म ऑनलाईन कॅम्पेन साठी वापरता येईल. त्यांचे म्हणणे मला खरोखरच पटले. खरंतर मलाही असं काही करायची कल्पना आधीच सुचली होती पण साधनं आणि कौशल्य या गोष्टींपायी अडलोय. त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या व्हिडीओ एडिटर्सचे साहाय्य मला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मला खूप मदत होईल पण तरीही या सगळ्या प्रक्रियेत माझी भूमिका महत्वाची असेल. म्हणूनच, कृपा करून मला कोणी खालील शंकांचं निरसन करून देईल का? डॉक्युमेंटरी फिल्म किती मिनिटांची असावी? प्रामुख्याने मला शाळेची परिस्थिती मांडायची आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करू? त्यात माझं/शिक्षकांचं/विद्यार्थ्यांचं काही सेकंदांचं मनोगत/मुलाखत वगैरे असावं का? सबटायटल्स साठी काय करू? तुमच्या बघण्यात असली कुठली डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर कृपया त्याची एखादी लिंक द्याल का? या एका प्रकल्पाने एक अख्खी शाळा उभी राहू शकते त्यामुळे मला माझे सर्व प्रयत्न पणाला लावायचे आहेत. आताशा मी फोटोग्राफी शिकतोय पण मित्र फोटोग्राफी करतो, खासकरून इव्हेंट फोटोग्राफी. एक मित्र एडिटिंगही करतो, पण डॉक्युमेंटरी फिल्म ला अजून त्यांनीही हात घातला नाही कधी. त्यामुळे हे मलाच समजावून सांगावं लागेल तेवढ्यासाठी हा पसारा... तर मग जाणकारांनो लागा कामाला.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2851 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

डॉक्युमेन्टरी तयार करुन

संदीप डांगे
Mon, 02/20/2017 - 15:47 नवीन
डॉक्युमेन्टरी तयार करुन देण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. फक्त खर्चाचं तुम्हाला बघायला लागेल.. बाकी काही काळजी नको. आपण मिळून एक चांगली फिल्म कमी खर्चात बनवू. मी एक दोघांशी बोलतोय कॅमेरा व इतर साहित्यांबद्दल.. मदत तत्वांवर मिळाले तर उत्तमच होईल.. थोड्या वेळात टंकतो सविस्तर.
  • Log in or register to post comments

शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत

संदीप डांगे
Mon, 02/20/2017 - 16:02 नवीन
शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत तत्त्वावर मिळाले तर जास्त खर्च येणार नाही. अ. स्क्रिप्ट आणि स्टोरीबोर्ड मी करेन, कुणी मदतीस येणार असेल तरीही आवडेल. ब. शूट साठी लागणारे साहित्य १. कॅनन ७०० डी किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा कॅमेरा २. ५० एम एम, ५५-२५० एम एम, १८-५५ एम एम लेन्सेस ३. ट्रायपॉड ४. व्हॉइस रेकॉर्डिंग साठी माइक (मुलाखती-बाईट्स साठी) ५. काही लेन्स फिल्टर्स शक्यतो २-३ ६. रिफ्लेक्टर्स ७. लाइट्स (गरज पडल्यास. हे तिथल्या विजिटनंतर ठरेल) क. डॉक्युमेंटरीस लागणारा व्हॉइसओवर आपल्याकडे अनेक मिपाकर आता तरबेज झालेत. इंग्रजी, हिंदी व मराठी तीनही भाषेतून व्हॉइसओवर द्यावा लागेल. ड. दिग्दर्शन व संकलन (डिरेक्शन व एडिटिंग) दिग्दर्शन मी करतो, संकलनासाठी मदत लागेल. इ. प्रोडक्शन- निर्मिती संभाळणारे, विविध असिस्टंट्स-सहाय्यक, फ. जेवणाची व्यवस्था व वाहतूक. बाकीचे नंतर लिहितो.
  • Log in or register to post comments

शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत

इरसाल कार्टं
Mon, 02/20/2017 - 17:11 नवीन
शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत तत्त्वावर मिळाले तर जास्त खर्च येणार नाही. अ. स्क्रिप्ट आणि स्टोरीबोर्ड मी करेन, कुणी मदतीस येणार असेल तरीही आवडेल. कुठल्या प्रकारची मदत? ब. शूट साठी लागणारे साहित्य १. कॅनन ७०० डी किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा कॅमेरा २. ५० एम एम, ५५-२५० एम एम, १८-५५ एम एम लेन्सेस ३. ट्रायपॉड : या सगळ्या गोष्टी आहेत मित्राकडे कंफ्युगरेशन चेक करतो. ४. व्हॉइस रेकॉर्डिंग साठी माइक (मुलाखती-बाईट्स साठी) होईल उपलब्ध ५. काही लेन्स फिल्टर्स शक्यतो २-३ हेही होतील उपलब्ध बहुदा ६. रिफ्लेक्टर्स फोटो स्टुडिओ मध्ये असतात तेच ना? आहेत. ७. लाइट्स (गरज पडल्यास. हे तिथल्या विजिटनंतर ठरेल) आहेत क. डॉक्युमेंटरीस लागणारा व्हॉइसओवर आपल्याकडे अनेक मिपाकर आता तरबेज झालेत. इंग्रजी, हिंदी व मराठी तीनही भाषेतून व्हॉइसओवर द्यावा लागेल. ड. दिग्दर्शन व संकलन (डिरेक्शन व एडिटिंग) दिग्दर्शन मी करतो, संकलनासाठी मदत लागेल. इ. प्रोडक्शन- निर्मिती संभाळणारे, विविध असिस्टंट्स-सहाय्यक, हे फोनवर बोलू आपण. 9225849032 फ. जेवणाची व्यवस्था व वाहतूक. झालीच समजा उद्या तुम्हाला शाळेचे फोटो पाठवू का? थोडी अजून कल्पना येईल.
  • Log in or register to post comments

चांगले आहे की... बरंच साहित्य

संदीप डांगे
Mon, 02/20/2017 - 17:20 नवीन
चांगले आहे की... बरंच साहित्य उपलब्ध होतंय तर...! वर दिलेला तुमचा नंबर व्हॉट्सपवर आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

हो

इरसाल कार्टं
Mon, 02/20/2017 - 17:24 नवीन
हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डॉक्युमेंटरी फिल्म किती

संदीप डांगे
Mon, 02/20/2017 - 17:43 नवीन
डॉक्युमेंटरी फिल्म किती मिनिटांची असावी? >> वेळेचे बंधन नसते. पाच मिनिटे ते ३ तास असा कितीही कालावधी असू शकतो. काय, किती व कसे दाखवायचे आहे त्यावर अवलंबून असते. प्रामुख्याने मला शाळेची परिस्थिती मांडायची आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करू? >> सर्व गोष्टींची यादी करा. त्याबद्दल लिहून काढा. तुम्हाला काय काय मांडायचे आहे ते सर्व येऊद्या. त्यात माझं/शिक्षकांचं/विद्यार्थ्यांचं काही सेकंदांचं मनोगत/मुलाखत वगैरे असावं का? >> नक्कीच. तो तर अतिआवश्यक भाग आहे. सबटायटल्स साठी काय करू? >> भाषांतरासाठी मिपाकर मदत करतील, एडिटर ते विडियोत टाकून देतील तुमच्या बघण्यात असली कुठली डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर कृपया त्याची एखादी लिंक द्याल का? >> युट्यूबवर खूप मिळतील.
  • Log in or register to post comments

लागतो kamala

इरसाल कार्टं
Mon, 02/20/2017 - 23:43 नवीन
सर्व गोष्टींची यादी करा. त्याबद्दल लिहून काढा. तुम्हाला काय काय मांडायचे आहे ते सर्व येऊद्या.
करतो सुरुवात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्या मते तुम्ही तुमच्या

कंजूस
Mon, 02/20/2017 - 20:27 नवीन
माझ्या मते तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या किती जवळ जाताय हे दाखवा. मोबाइलचा एचडी व्हिडिओ,फोटो चालतील. कॅाझ्मेटिक डॅाक्युमेंटरीची गरज नसते. १) तुमचा अगोदरचा हेतू राबवण्याला काय कारण झाले? अगोदरची परिस्थिती दाखवणारे जुने फोटो हवेत. २) काय अडचणी होत्या त्या तात्पुरत्या कशा निवारल्या ते बदल दाखवणारे फोटो. ३) पालकांची मते सांगणाय्रा क्लिप अर्धा - एक मिनिटाच्या. ४) विद्यार्थ्यांत काय फरक झाला त्याचे फोटो. हे सर्व मोबाइलने करून विसेक मिनिटांची डॅाक्यु पाठवा. बय्राच काळातले कलेक्शन हवे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Mon, 02/20/2017 - 23:35 नवीन
धन्यवाद, आपण मनोगतांमध्ये पालकांची भर घातलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

उत्तम प्रकल्प!

चतुरंग
Tue, 02/21/2017 - 01:47 नवीन
मनोगतांमध्ये शाळेतल्या सेवकवर्गाला विसरू नका. अगदी मूलभूत अडचणींना तेच बर्‍याचदा सामोरे जातात आणि त्यांना ते सांगायला कुठेच संधी मिळत नाही.
  • Log in or register to post comments

नक्कीच

इरसाल कार्टं
Tue, 02/21/2017 - 12:23 नवीन
नक्कीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

तुम्हाला शुभेच्छा !

स्रुजा
Tue, 02/21/2017 - 02:31 नवीन
तुम्हाला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Tue, 02/21/2017 - 12:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

डांगेअण्णा आहेतच पण समजा

पिलीयन रायडर
Tue, 02/21/2017 - 02:38 नवीन
डांगेअण्णा आहेतच पण समजा वाटलंच तर मिपावर अ‍ॅरि फिल्म्सच्या आयडीलाही संपर्क करु शकता. चित्रकथी ही फिल्म त्यांनीच बनवली आहे. जेव्हा ही फिल्म बनवाल तेव्हा आपल्या युट्युब चॅनलवर नक्की टाकुया. :)
  • Log in or register to post comments

अर्थातच.

इरसाल कार्टं
Tue, 02/21/2017 - 12:28 नवीन
या सगळ्यात मिपाचा वाट सिंहाचा आहे, मी फक्त एक माध्यम आहे शाळेसाठी तुमच्यापर्यंत पोचण्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा