Skip to main content

मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक अव्यक्त यांनी बुधवार, 15/02/2017 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित. वरील विषयावर साधक बाधक चर्चा होणे अगत्याचे आहे. जास्तीत जास्त पर्याय सुचवावे आणि ते का योग्य आहेत ह्याचा उहापोह झाल्यास दुधात केशरच…. मिपाकर आणि मिपा व्यासपीठाचा आभारी ! ता.क. - MI -४ note च्या specifiaction सारखे अजून कोणते मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत ह्याविषयी ऊहापोह व्हावे ही नम्र विनंती.

वाचने 12464
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

नवीन मोबाइलची माहिती ( reviews ) देणाय्रा साइट्स. यांत बजेट/कॅम्रा/फ्लॅगशिप ढालगज प्रमाणे यादी पाहा. वापरण्याचा युझर इंटरफेसमुळे वापरण्यास सोपा /अवघड होतो. मेमरी कार्ड स्लॅाट असलेले/नसलेले बघा. अडचण वाढते. बॅटरी काढता येत असेल तर एक स्पेअर बॅट्री नेता येते. प्रत्येकात काहीतरी गोची असतेच. वैयक्तिक मत देत नाही. १ ) Mobiles Reviews, Latest Mobiles Reviews: NDTV Gadgets360.com :http://m.gadgets.ndtv.com/mobiles/reviews २ ) Digit: Technology Advice, Product Reviews, Latest News, Free Downloads :http://www.digit.in/ सध्याचा ट्रेन्ड - Qualcom 410 processer असलेले १०हजार, 620 : १३हजार, 808/820/ : १८हजार रु

In reply to by कंजूस

धन्यवाद कंजूसजी, अपेक्षेप्रमाणे प्रथम अभिप्राय नोंदवल्याबद्दल त्रिवार वंदन... (१.) MI-note ४ ह्या स्पेसिफिकेशनशी मिळते जुळते अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत सध्या बाजारात. (२.) online खरेदीचे फायदे आणि तोटे कोणते आहेत माझ्या सारख्या नवख्या online ग्राहकाला.

In reply to by अव्यक्त

संक्षी आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल. अजून काही best expert कंमेंट्स...
श्युअर्ली यु आर जोकींग, मि. अव्यक्त.

In reply to by संजय क्षीरसागर

तेच ना संजयजी, एमाय ४ नोट भारीच आहे पण त्यांना फोनपेक्षा प्रतिसाद अन उहापोह पाहिजे.

"फोनपेक्षा प्रतिसाद अन उहापोह पाहिजे." ??? अपेक्षा काय आहेत? अगोदरच्या फोनमध्ये काय चांगले होते हे कळले तर पुढचे सांगतील मिपाकर. काही फोन्स access साठी तर काही creations साठी चांगले असतात.

जो आवडलाय तो घेऊन टाका, चांगला फोन आहे तो असे वाटते. फार फार तर मोटोरोला चा एखदा फोन आहे का बघा. सॅमसंग चे चांगले फोन महाग आहेत.

त्यात काय असतंय.... घ्यायचा कुठला तरी, कितीही चांगला घेतलात तरी वर्षभरात बंडाचं (किंवा बंदच सुद्धा) निशाण उगारणारच तो भ्रमणध्वनी. :(

शामशुंग जे ७ न्यु २०१६ घ्या. एक तर ब्याटरी ३३०० एमएच. आहे. सध्या वाट्सप आणि तत्सम सर्च करीत राहण्यामुळे मोबाईलची ब्याटरी लवकर ढूस होती आणि आपला मुड जातो आणि मोबाईलला काड्या आणि किडे करायचा नाद असेल तर त्याच्या इतका जबरा फ़ोन नाही, असे माझं व्यक्तीगत मत आहे. रुट केल्यावर तर मरणाच्या ओएस बदलता येतात. (हा जोखमीचा खेळ असतो, हे विसरु नये. बाकी, पैसा आपका, मर्जी आपकी. फ़ीचर्स आणि किंमत गुगलून घ्यावी ही नम्र विनंती.. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (शामसंग ज७ २०१५ एक वर्षापासून वापरत असलेला ग्राहक)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामसुंगच्या फोनना अँड्रॉइडचे अपग्रेड झेपत नाहीत अशी बरेच जणांची बोंब आहे.

In reply to by सतिश गावडे

अँड्रॉइडचे अपग्रेड हे एक कॅाझ्मेटिक प्रकरण आहे असं बरेच लेख वाचल्यावर वाटू लागलं आहे. जेलिबिननंतर किटकॅट मोठी झेप होती म्हणतात. नंतर मेमरी कार्ड ते फोन मेमरी अॅप कशी सरकवायची याचाच कोड बदलत आहेत. काही कंपन्या ओएस 'कस्टमाइज' करतात ते खरंतर 'कॅाम्प्रमाइज' असावं.

In reply to by रॉजरमूर

लावासाठी कष्टम रोम कोणी उपलब्ध करुन देत नाही, म्हणून लावा नाद सोडला. अजुनही लावा वापरतो. आणि त्याच्यावर लव आहेच. :) -दिलीप बिरुटे

भौ! माझ्या अल्प माती प्रमाणे, आपली गरजा बघून, आपल्या अंथरुणा प्रमाणे आपल्या तंगड्या पसराव्या. या इथे शंभर जण एक हजार प्रकारचे मोडेल सुचवतील....

फोन घ्यायला जास्त आसुसलेले असाल तर Asus ghya.. ASUS ZENFONE MAX ची नवी सिरीज जरा लैच भारी आहे.. ब्याट्री स्पेशल हा फोन २ दिवस ब्याट्री पुरवतो आणि ह्यांग पण होत नै.. धा हजाराच्या आत मावेल बघा हा आसुसलेला फोन.. बाकी इतर फोन बद्दल विचार कराच. घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं. उगीच आमचा मिपा सुटायला नको मधल्या मध्ये !! बाकी नोकिया चा बटन वाला फोन परत येतोय असं ऐकलं, तुम्ही तो घेतलात तर जास्त आनंद मला होईल.

In reply to by बटाटा चिवडा

घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं. हे बाकी झकास !

In reply to by बटाटा चिवडा

पैसे वाया घालवायचे असतील तर असुस घ्याच! थोडक्या किंमतीत काय काय कोंबतात हे असुसवाले!

मोटोरोलाचा कुठलाही फोन घ्या. एक तर फोन मजबूत असतात...लहान पोरांना गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग करायला लागतात ना दुसरं म्हणजे जास्त कस्टमाइज्ड नसतात...रॅम वर अतिरिक्त भर नाही येत तिसरं जेन्युईन अँड्रॉइड वापरायला भारी वाटते आणि अपडेट्स लवकर मिळतात.

In reply to by विश्वजीत कदम

तुम्ही मोट्टा ग४ अधिक स्वतः वापरताय का ? स्मार्ट टीव्ही सोबत कास्ट-स्क्रीन करुन पहिलेय का ? कसे करायचे ?

In reply to by चौथा कोनाडा

मी ग२ कास्ट करुन वापरतो आणि अनुभव ऊत्तम आहे. त्यावरुन ग४ चांगलाच असेल असा अंदाज आहे.

जास्त विचार करत किंवा लोकांना विचारत बसलात तर confusion होईल. आपले अंथरून किती मोठे आहे त्यानुसार फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वर फिल्टर लावायचा आणी जी मॉडेल्स येतील समोर त्यातला एक ऑर्डर करून टाकायचा. कुठलाही फोन १००% चांगला किंवा १००% वाईट नसतो. एखाद्याला जो फोन खूप चांगला परफॉर्मन्स देईल तोच फोन दुसऱ्या कुणाला तरी अतिशय वाईट अनुभव देऊ शकतो किंवा vice versa .

Red mi note 4 ghya changala aahe + Pts 13000rs 1.5 day battery jate medium internet use karat asal tar -pts Motha aahe , handling la thoda tras hoto Pantchya khishat neet mavat nahi Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto

Red mi note 4 ghya changala aahe + Pts 13000rs 1.5 day battery jate medium internet use karat asal tar -pts Motha aahe , handling la thoda tras hoto Pantchya khishat neet mavat nahi Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto

Red mi note 4 ghya changala aahe + Pts 13000rs 1.5 day battery jate medium internet use karat asal tar -pts Motha aahe , handling la thoda tras hoto Pantchya khishat neet mavat nahi Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto Kuthun ghyal Www.flipkart.com Or Www.mi.com

कमी आकार वालं काही सांगा ना आणि संगणक आणि मोबाईल यामधे काही फरक असेल की नाही. आपण संगणकाच्याच सगळ्या अपेक्षा मोबाईलकडून ठेवतो.