Skip to main content

ताज्या घडामोडी - ३

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/10/2016 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

वाचने 66984
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

प्रेम करणे अनैतिक कृत्य केव्हापासून झालं...? आपलं यथासांग उपभोगून झालं की किंवा आपलं काहीच ठिकठाक नाही झालं तर असले नैतिक-अनैतिक, संस्क्रुती बचाव वगैरे चाळे सुचतात रिकामटेकड्या जळावू लाकडांना.

In reply to by संदीप डांगे

ज्यांना अनेकवेळा प्रयत्न करूनसुद्धा मुलगी पटत नाही, पटविता येत नाही त्यांनाच मत्सरातून असली नैतिकता-अनैतिकता सुचते.

In reply to by गामा पैलवान

याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?
प्रेम व्यक्त करायचा आग्रह कोण करत आहे? किंबहुना प्रेम केलेच पाहिजे किंवा प्रेम व्यक्त केलेच पाहिजे असा कोणावरही आग्रह कसा करता येईल हेच समजत नाही.
जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार्‍या ९०% नाही ९९% प्रेमी युगुलांना ही गोष्ट माहित नसेल. मुळातील गोष्ट काहीही असली तरी १४ फेब्रुवारीला "प्रेमाचा दिवस" म्हणून ते सगळे मानत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.

In reply to by गामा पैलवान

याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?
अहो गा. पै, मी म्हणतो, कोण आग्रह करतंय साजरा करण्याचा? जोपर्यंत कुठला कायदा मोडला जात नाही तोवर लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन येऊ नये एवढंच. आणि कायदा मोडला तरीही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयांनाच फक्त. व्हॅ डे साजरा करू नये याचा तुमच्यासारखा अहिंसक प्रचार करणार्‍यांबद्दल काही आक्षेप नाही.
दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना?
दारू पिऊन नाचले म्हणून कुठल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालीये हो?
संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
बरं मग? तरीही ज्या लोकांना करायचा अहे हा दिवस साजरा, त्यांनी का नाही म्हणे करायचा? एक प्रश्नः तुमच्यामते प्रेम करणे नैतीक आहे की नाही?

In reply to by गामा पैलवान

दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही.
दारू पिऊन अचकट विचकट नाचावे, गर्दीत मुलींची छेड काढावी, त्यांच्या अंगचटीला जावे हे तरी संविधानात लिहिले आहे का? व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असेसुद्धा संविधानात कोठेही लिहिलेले नाही.
तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
कोण प्रयत्नशील असतो? कोणत्या मंडळाने रस्त्यावर खड्डे करून मांडव न टाकता स्वतःच्या दिवाणखान्यात सार्वजनिक गपपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला आहे का? कोणते मंडळ वाहतुकीला अडथळा होऊ नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. गणपती रस्त्यावरच बसविण्याचा आग्रह कशासाठी? त्
यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत.
ज्यांना हिंदू उत्सव साजरे करायचेत त्यांनी ते चार भिंतीच्या आड खुशाल साजरे करावेत. रस्त्यावर येऊन समाजाला उपद्रव देऊ नये.

In reply to by गामा पैलवान

नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे? जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय? गणपती उत्सवात दमदाटी करून प्रसंगी मारहाण करून वर्गणी (खंडणी) वसूल करणे, वर्गणीतील पैशांचा अपहार करणे, त्याच पैशातून दारू ढोसणे, प्रचंड ध्वनीप्रदूषण करणे, आकडे टाकून वीज चोरणे, रस्त्यावर खड्डे करून मांडव टाकून रस्ते अडविणे असे अनेक उपद्रवी प्रकार चालतात. तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी? किंबहुना सार्वजनिक गणपती उत्सव बंद व्हायलाच हवा, पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.व्हॅलेंटाईन डे असल्या सार्वजनिक उत्सवांपेक्षा शतपटीने चांगला. निदान या उत्सवात समाजाला उपद्रव तर होत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुम्ही गणेशोत्सव आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्ही सणांच्याबाबतीत सरसकटीकरण करत आहात असे नाही वाटत? गणेशोत्सवात फक्त दारू पिऊन धिंगाणाच चालतो असे आपले म्हणणे आहे का? पुण्या-मुंबईतील ठराविक(खरेतर राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी चालवलेली) गणेशमंडळे आणि त्यांचे १० दिवसाचे सादरीकरण म्हणजेच गणेशोत्सव का? कितीतरी गणेश मंडळे अत्यंत सुंदरपणे सामाजिक जाणिवेचे भान ठेवून कितीतरी सामाजिक कार्यक्रम चालवतात तेही बंदच करायला हवेत का? अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये या १० दिवसांमध्ये लोक एकत्र येऊन एकोप्याच्या भावनेने सण साजरा करत नाहीत का? तसेच, व्हॅलेंटाईन डे ला जसे काही मनाचे मिलन होऊन प्रेमाचा बहर फुलतो तसंच ज्यांचा नाही फुलाला त्यांच्यात वितुष्ट येऊ शकतं, प्रकरणं हाताबाहेरही जातात. ज्या वयात प्रेम करायला हवं त्या वयात प्रेम करायला मिळायला हवं हे खरं आहेच. पण प्रेमाच्या यशाचं टोक म्हणजे त्या वयात त्यांना शरीरसुख मिळायला हवं हे परिमाण बरोबर वाटत नाही. आपल्या समाजाची लैंगिक शिक्षणाबाबतीतील परिस्थिती आपण जाणतोच. अशा शिक्षणाच्या अभावामुळे होणारी गुंतागुंत निस्तरण्याची तयारी बरेच वेळेस त्या वयात नसते. बऱ्याच वेळेस अशा गोष्टी निस्तरण्याची वेळ पालकांवर येते. तेव्हा प्रेम ही गोष्ट जरी निखळ असली तरी ती शोभून दिसते जबाबदारी आणि धीराने असे माझे वैयक्तिक मत आहे. तस्मात, व्हॅलेंटाईन डे जरूर साजरा करावा पण आपल्या सामाजिक परिस्थितीचं, समाजाच्या लैंगिक जडणघडणीचं आणि पालकांच्या मनस्थितीचं भान राखून! सार्वजनिक ठिकाणी "उत्स्फूर्त" प्रेम करताना बाजूला असलेली आधीची पिढी हि आपली कोणीच नसली तरी आपल्या आई-वडीलांसारखीच आहे हे समजलं तरी पुरे!

श्रीगुरुजी, १.
नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे?
बहुसंख्य हिंदू जनता. २.
जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय?
व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा? ३.
तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी?
कारण की हा हिंदूंचा देश आहे. ४.
पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.
असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बहुसंख्य हिंदू जनता.
हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.
व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा?
या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय? तो मोडकातोडका साजरा करायचा का पूर्ण साजरा करायचा का अजिबात साजरा करायचा नाही हे लोक ठरवतील. मुळात हा सण वगैरे नसून एक इव्हेंट आहे. तुम्हाला पटत नसेल तर नका साजरा करू किंवा तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे "बाजीराव-मस्तानी दिन" साजरा करा. तसे करायला कोणीही अडविले नाही.
कारण की हा हिंदूंचा देश आहे.
हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको.
रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा. बादवे, नवरात्र, गणेशोत्सव, पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, रिक्षावाल्यांचे श्रावणातले सत्यनारायण, दहीहंडी, दिवाळीतले फटाके, लग्न्याच्या मिरवणुका व कार्यालयात लावलेल्या काळ्या भिंती इ. मुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेत प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता. साधारणपणे ३-४ मिनिटे बांग सुरू होती. अशी बांग दिवसातून ४-५ वेळा दिली जाते. म्हणजे एका दिवसात बांगेचा एकूण कालावधी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नाही. याउलट वर नमूद केलेल्या कोणत्याही एका उत्सवात बांगेच्या कमीतकमी हजारपट ध्वनीप्रदूषण होते. एखादा अपघातात जखमी झाला असेल तर जिथे किरकोळ खरचटले आहे तिथे उपचार करण्यापेक्षा आधी भळभळ वाहणार्‍या जखमेवर उपचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे १५-२० मिनिटांचे किरकोळ ध्वनीप्रदूषण करणार्‍या बांगेकडे लक्ष देण्याआधी काळ्या भिंती उभारून कानठळ्या बसविणारे प्रकार आधी बंद करणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद वाचले की प्रश्न पडतो की तुमचा हा विवेकी विचार राजकीय चर्चांच्या वेळी तुम्ही खुंटीला टांगून का ठेवता? :) एक राजकीय अंधभक्ती सोडली तर तुमचे इतर बाबतीतील विवेकी विचार हे आज स्वतःला विज्ञानवादी, विवेकवादी म्हणणार्‍यांच्या विचारांपेक्षाही अधिक परखड आणि अनुकरण करण्यासारखे आहेत.

व्हॅलेंटाईन डे सोडून कोणी प्रेमच करत नाही का बाकी वर्षभरात . का कुठल्या अनैतिक(?) गोष्टी करत नाही. मुळात एक छोटी कन्सेप्ट आहे हि तरुणपिढीला भावत असेल तर काय हरकत आहे त्यांनी साजरा करायला . हिंदूंचेच सण साजरे करा हे सांगणारे आपण कोण आणि कशाला जबरदस्ती. उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा नाही झाला तर नंतर असणाऱ्या त्या भावना संपणारेत का दुसऱ्या दिवशी असं तर नाही ना ? बाकी साजरा करायचा कि नाही हे ज्याचे त्याचे सुज्ञ पणे ठरवू डे त्यांनाच .व्हॅलेंटाईन डे म्हणजे गैरप्रकारच असतो असा काही ग्रह आहे का?.

गॅरी ट्रुमन,
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.
हाहाहा, मला तुमच्या डोक्यात स्थान दिल्याबद्दल आभार! :-) इथली अनेक लोकं मला कुणाकुणाच्या कसल्याकसल्या अवयवांत जागा द्यायला उत्सुक असतील. त्यामानाने तुमचं डोकं हे खूपंच सुरक्षित स्थान आहे. विनोदाचा भाग सोडतो. संस्कृतीरक्षण का करावं ते सांगेन म्हणतो. त्याचं काय आहे की पाश्चात्य देशांत कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यातून पुढे गुन्हेगारी वाढते. केवळ एकदोन पिढ्यांत विवाहबाह्य रीतीने जन्मास येणाऱ्या बालाकांचं प्रमाण भयावह प्रकारे वाढलंय. अमेरिकेत ७०+% मुलं एकपालकी कुटुंबातली आहेत. अशा वेळेस संगोपनाचा सगळा भार एकाच पालकावर पडतो. मुलांकडे योग्य तऱ्हेने लक्ष देता येत नाही. अशी दुर्लक्षित मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका असतो. हीच मुलं पुढे त्यांच्या मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांनाही आईवडिलांच्या भूमिका (जेंडर रोल्स) ठाऊक नसतात. हे दुष्टचक्र चालूच राहतं. ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं.
आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल. असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.

In reply to by गामा पैलवान

संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे म्हणणार्‍यांनी नवरात्रीच दांडीया बंद करा :) त्या ९ रात्रीमधे उद्योगाचे प्रमाण फार वाढते .

ओरिसात भाजपने अनेकवेळा आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आजपर्यंत तिथे भाजपला स्वबळावर अत्यंत किरकोळ यश मिळाले होते. अगदी मोदी लाटेत सुद्धा ओरिसात भाजपला २१ पैकी फक्त १ जागा मिळाली होती तर बिजदला २० जागा होत्या. त्याला मुख्य कारण होते ते मुख्यमंत्री नवीन पटनाईकांची स्वच्छ छबी व जनतेत त्यांना असलेले अनुकूल मत. २००० पासून जवळपास गेली सलग १६-१७ वर्षे नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत व त्यांनी लागोपाठ ४ निवडणुकात बहुमत प्रचंड बहुमत मिळविले आहे. परंतु गेल्या काही दिवसात झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये वेगळाच बदल दिसून येत आहे. ओरिसात ५ टप्प्यात होत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या दोन्ही टप्प्यात बिजद प्रथम क्रमांकावर असला तरी अनपेक्षितपणे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १८८ जागांपैकी भाजपने अनपेक्षितपणे ७१ जागा जिंकल्या तर दुसर्‍या टप्प्यातील १६६ पैकी ५५ जागा जिंकल्या. यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिजदने ६५२, काँग्रेसने १२८ तर भाजपने जेमतेम ३६ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१७ मध्ये पहिल्या २ टप्प्यातच भाजपने १२६ जागा जिंकलेल्या आहेत. बिजदने पहिल्या २ टप्प्यात १९७ जागा जिंकून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. परंतु आजतगायत दुसर्‍या क्रमांकावर असलेली काँग्रेस जेमतेम ३० जागा मिळवून तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. भाजपचे जुएल ओराम यांनी अथक परीश्रम करून भाजपला यश मिळवून दिले आहे. नवीन पटनाईकांना आपल्या कारकीर्दीत प्रथमच आव्हान मिळाले आहे. http://indiatoday.intoday.in/story/odisha-panchayat-polls-bjps-naveen-p…

श्रीगुरुजी, तुमचा वरचा संदेश वाचला. १.
हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.
जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील. २.
या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय?
हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच. ३.
हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही. ४.
रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा.
सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे. ५.
प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता.
मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा? तुमच्याइतकं सर्वधर्मसमभावी मला बनता येत नाही. एव्हढं बोलून ही चर्चा माझ्याकडून आवरती घेतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील.
हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच.
जरूर करा. तो करण्याचा हक्क तुम्हाला आहेच. पण हिंसक विरोध नको. तरूण मुलामुलींना व्हॅलेंटाईन डे चे निमित्त सांगून मारहाण करणे हे विकृतीचे लक्षण आहे.
हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
वर्तन स्वैर आहे का नाही याचा निर्णय देण्याचा हक्क तुम्हाला नाही. त्याचप्रमाणे एखाद्याचे वर्तन स्वैर आहे हे स्वतःच ठरवून मारहाण करून शिक्षा देण्याचा हक्क तुम्हाला नाही. वर्तन स्वैर आहे असे वाटत असेल तर पोलिसात किंवा न्यायलयात तक्रार करता येईल.
सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे.
हा विशिष्ट दिवस अजिबात उपद्रवकारक नाही. याउलट मी वर यादी दिलेले सर्व समारंभ अत्यंत उपद्रवी आहेत. त्या समारंभातून ध्वनी व हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतेच, पण त्यातून मानवी जीव जाण्याचे (उदा. दहीहंडी) व स्वैराचारणाचे प्रकारही घडतात. असले घातक सार्वजनिक समारंभ बंद करण्याला सर्वात जास्त प्राथमिकता द्यायला हवी.
मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा?
मुस्लिमांचे मतांसाठी लांगूलचालन करणे ही काँग्रेसची खूप जुनी विकृती आहे. मी हिंदुत्वनिष्ठ असलो तरी कडव्या व सनातनी विचारांचा नाही आणि तर्कहीन व कालबाह्य प्रथांना आणि परंपरांना माझा विरोध आहे. काही मूठभर कडव्या लोकांमुळे हिंदू धर्माची हानी होत आहे. काळ्या भिंती लावून कान फुटतील एवढ्या आवाजात घाणेरडी गाणी लावून अचकट विचकट नाचणे, वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणे, महिनोमहिने रस्ते अडवून समाजाला उपद्रव देणे हा हिंदू तत्वज्ञानाचा भाग नाही.

श्रीगुरुजी, १.
वर्तन स्वैर आहे असे वाटत असेल तर पोलिसात किंवा न्यायलयात तक्रार करता येईल.
निवासीसंकुलातले कुटुंबवत्सल लोकं उच्चभ्रू वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना जागा देण्यास राजी नसतात. जरी वेश्याव्यवसाय बेकायदेशीर नसला तरीही कोणी वेश्येला घराबाजूला राहू देत नाहीत. २.
हा विशिष्ट दिवस अजिबात उपद्रवकारक नाही.
तो उपद्रवकारक होईपर्यंत थांबावं का असा प्रश्न आहे. जर नवरात्र आणि रंगपंचमीसारख्या सणांच्या वेळेस मुलीबाळींना त्रास होतो तर व्हयाडेला काय हालत होईल! ३.
असले घातक सार्वजनिक समारंभ बंद करण्याला सर्वात जास्त प्राथमिकता द्यायला हवी.
मान्य. पण म्हणून इतर कमी घातक कृत्यांकडे दुर्लक्ष करू नये हेही खरंच. ४.
आणि तर्कहीन व कालबाह्य प्रथांना आणि परंपरांना माझा विरोध आहे.
व्हयाडे ही तर्कहीन आणि कालबाह्य परंपरा आहे. ५.
काळ्या भिंती लावून कान फुटतील एवढ्या आवाजात घाणेरडी गाणी लावून अचकट विचकट नाचणे, वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणे, महिनोमहिने रस्ते अडवून समाजाला उपद्रव देणे हा हिंदू तत्वज्ञानाचा भाग नाही.
शंभर टक्के सहमत आहे. आ.न., -गा.पै.

गॅरी ट्रुमन, १.
आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल.
यासंबंधी काही विदा मिळेल काय? माझ्या मते दलितांच्या शिक्षणाचा विषय तत्कालीन चर्चेत नसावा. स्त्रियांचं म्हणाल तर घरच्या घरी शिक्षण द्यायला लोकांची ना नसावी. झाशीची राणी, आनंदीबाई, अहिल्याबाई, निजामाचा जनाना, आदिलशाहीक बडीसाहेबा, ताराबाई, जिजाबाई, नगरची चांदबीबी वगैरे महिला अशाच शिक्षणपद्धतीतनं पुढे आल्या होत्या. २.
असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.
धन्यवाद. व्हयाडेच्या नावाखाली स्वैर वर्तनास प्रोत्साहन मिळंत आहे. म्हणून माझा विरोध आहे. नवरात्रीत स्वैरप्रकारे साजऱ्या होणाऱ्या दांडियांनाही माझा विरोधच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यासंबंधी काही विदा मिळेल काय?
अनेकदा आपल्याकडे लोक मुळात प्रॉब्लेम होता हे मान्य करायलाच तयार नसतात आणि त्यातून असे प्रश्न पुढे येतात. नाही माझ्याकडे विदा. आणि तो गोळा करण्यात मला इंटरेस्टही नाही. पण जर आपल्याच समाजात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे, महात्मा फुले इत्यादी अनेक समाजसुधारक होऊन गेले आणि स्त्रीशिक्षण यासारख्या गोष्टीवर त्यांनी आपले आयुष्य वेचले असेल तर मुळात प्रॉब्लेम होता हे मान्य करायला मला तरी काहीही अडचण वाटत नाही. जर सगळे आलबेल असते तर इतके समाजसुधारक मुळात लागलेच का असते? सावित्रीबाई फुलेंवर दगडांचा आणि शेणाचा मारा का झाला असता? असो.
व्हयाडेच्या नावाखाली स्वैर वर्तनास प्रोत्साहन मिळंत आहे. म्हणून माझा विरोध आहे. नवरात्रीत स्वैरप्रकारे साजऱ्या होणाऱ्या दांडियांनाही माझा विरोधच आहे.
यात विरोधाभास नाही? पहिल्या वाक्यातून वाटेल की स्वैर वर्तनास विरोध आहे. जर स्वैर वर्तनास विरोध म्हणून व्हॅलेन्टाईन डे ला विरोध असेल तर तोच प्रकार नवरात्रातही काही ठिकाणी होत असेल तर त्याच न्यायाने नवरात्रालाही विरोध हवा. पण तसे न होता विरोध "स्वैरपणे होणार्‍या दांडियांनाच" आहे मुळातल्या नवरात्राला नाही. याचे कारण नवरात्र हिंदूचा सण म्हणायचे का? असो. मी आणि बेस उर्फ रोझ (पूर्वाश्रमीची हिलरी) दरवर्षी न चुकता व्हॅलेन्टाईन डे साजरा करत असतो. यावर्षीचे आमचे व्हॅलेन्टाईन डे कार्ड हे होते--- 1 खरे तर आम्हाला व्हॅलेन्टाईन डे ची पण गरज नसते. कारण--- 2

गॅरी ट्रुमन, Every day is Valentine's Day when you are in the right relationship. हे वाक्य उद्धृत केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं. पण द्रव्यलोभी वृत्तीच्या काही लोकांना याचा बाजार मांडून पैसे कमवावेसे वाटतात. त्यासाठी भले स्वैरपणास प्रोत्साहन मिळालं तरी चालेल, अशी त्यांची मनोवृत्ती असते. माझा या मनोवृत्तीला विरोध आहे. बाकी नवरात्रीचं म्हणाल तर हा सण प्राचीन काळापासून चालंत आलेला आहे. याउलट व्ह्याडे हे विसाव्या शतकातलं गल्लाभरू खूळ आहे. आ.न., -गा.पै.

गुजरात दंगलीला या वर्षी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दंगलीने, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या राष्ट्रनिर्मीतीच्या प्रोजेक्टला बारीकसे का होईना तडे गेले. प्रत्यक्ष दंगलींत हजारो लोकांचा बळी गेला, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचली, मुस्लिमांमधील कडव्या मुलतत्ववादाचा प्रभाव वाढला, पुर्वीचे हिंदू मुस्लिम साहचर्य संपून घेट्टोज निर्माण झाले, हिंदूंमध्ये देखील मुलतत्त्ववादाला राजकिय अधिष्ठान मिळाले. तेव्हा या दु:खद प्रकारापासून आपण काही शिकलो आहोत का? अल्पसंख्यांकांचे जे खरे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्याने ही दरी बुजेल काय? आणि सर्वात महत्त्वाचे असे प्रकार होऊ नयेत, मनुष्यहानी, वित्तहानी टळण्यासाठी, सामाजीक सौर्हार्द टिकावे यासाठी कोणते उपाय योजले जावेत?

In reply to by पुंबा

सौरा, त्याचं काय आहे की प्रत्येक दंगल मुसलमान मोहोल्ल्यात सुरू होते. अपवाद फक्त १९९२/९३ च्या मुंबईच्या आणि २००२ च्या गुजरात दंगलींचा. या दंगलींत हिंदूंनी सुरू केल्या आणि मुस्लिमांना ठेचून काढलं. म्हणून फुरोगामी फक्त या दोन दंगलींचा उल्लेख करतात. जणूकाही गुजरात सोडून इतरत्र दंगली झाल्याच नाहीत! त्यांच्या नादी लागू नका. बाकी काही नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बरं..
सर्वात महत्त्वाचे असे प्रकार होऊ नयेत, मनुष्यहानी, वित्तहानी टळण्यासाठी, सामाजीक सौर्हार्द टिकावे यासाठी कोणते उपाय योजले जावेत?
ह्याचं काय?

आ य ला म्हणजे चोरा ला सोडुन सन्याश्यालाच धरत होतो आपण आता पर्यंत, याचा अर्थ २६/११ ला मुंबईत झालेला हल्ला हा हल्ला होता त्यामागे पाकिस्तानातुन आलेले अतिरेकी नव्हते, त्या अगोदर मुंबईत झालेले सर्व बाँबस्फोट तसेच पार्लमेंटवरचा हल्ला हा हल्ला होता, देशाबरोबर पाकिस्तानने केलेले युद्ध नव्हत तर .

लोकहो, एका गंभीर बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. पानसरे खून खटल्यात समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे या सनातन संस्थेच्या निरपराध साधकांना गोवल्याचं सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. खटला चालू होऊ नये म्हणून अनेक युक्त्या अवलंबण्यात आल्या. त्यावर मात करून खटला सुरू झाला. आता सनातन संस्थेने वकिलाच्या नियुक्तीत झालेला घोटाळा उघड केला आहे. शिवाजीराव राणे यांची शासनाने विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेलीच नसतांना हा माणूस खटला लढवायला शासनातर्फे न्यायालयात उभा राहिला आहे. यास सनातन संस्थेने जोरदार आक्षेप घेतला. बातमी इथे आहे : http://www.pudhari.com/news/kolhapur/134429.html सनातन प्रभात वृत्तपत्रात हिंदूराष्ट्राबद्दल जरा काही बातमी छापून आली की स्पष्टीकरण मागणारे न्यायमूर्ती एल. डी. बिले या प्रकरणात कडक भूमिका घेणार का? च्यायला, कोणीही उठतो आणि सरकारी वकील म्हणून उभा राहतो? आयशप्पत, हे न्यायलय आहे का हजामखाना? तिथे केस कापायला एखादा न्हावी नसला तर दुसरा कोणीही चालतो. शासनातर्फे अशी काही वकिली व्यवस्था न्यायालयात चालू झाली आहे काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दाभोळकर खून प्रकरण आणि नंतर पानसरे खून प्रकरण या दोन्ही प्रकरणांच्या तपासाला सुरवातीपासूनच एक विशिष्ट दिशा दिली गेल्यामुळे (अजाणता की जाणूनबुजून?) त्या खुनांचा आजवर तपास लागलेला नाही. दाभोळकरांच्या खुनानंतर काही मिनिटातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "ज्या विचारसरणीने गांधीजींना मारले त्याचे विचारसरणीने दाभोळकरांना मारले आहे" असे जाहीर विधान करून तपासाची दिशा दाखवून दिली होती. हे विधान करताना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे, धागेदोरे नव्हते. तरीसुद्धा संशयाची सुई हिंदुत्ववाद्यांवर व विशेषतः सनातनवर वळविण्यात ते जाणता/अजाणता यशस्वी झाले. सनातनवर संशय धरून तपास करायचा हे काही तासातच नक्की झाल्याने तपास यंत्रणांनी खुनामागील इतर शक्यता लक्षात न घेतात पुढील काही आठवडे सनातनला लक्ष्य केले. त्यामुळे खर्‍या खुन्यांना पळून जाण्यात, खुनाचे धागेदोरे नष्ट करण्यात पुरेसा वेळ मिळाला. अर्थात खुनानंतर जवळपास साडेतीन वर्षे लोटल्यानंतर सुद्धा सनातनविरूद्ध निर्णायक ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे तपास अधांतरीच आहे. खुनानंतर काही दिवसांनी तपास यंत्रणांनी काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संभाव्य खुन्यांची खालील चित्र प्रदर्शित केली होती. http://www.dnaindia.com/mumbai/report-cbi-releases-sketches-of-suspects… या चित्रातील व्यक्ती आजतगायत सापडलेल्या नाहीत. परंतु खुनानंतर ४-५ महिन्यांनी तपासयंत्रणांनी एका शस्त्रविक्रेत्यांच्या टोळीतील मनीष नागोरी व विकास खंडेलवाल या दोघांना संशयावरून अटक केली. परंतु त्यांच्याविरूद्ध कोणताच पुरावा न मिळाल्याने त्यांना अटकेत ठेवून ९० दिवसानंतर सोडावे लागले. त्यानंतर सनातनच्या वीरेंद्र तावडेला जून २०१६ मध्ये खुनाच्या आरोपावरून अटक केली व तो आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहे. परंतु आजतगायत त्याच्याविरूद्ध खुनासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्याचे ऐकिवात नाही. नंतर काही दिवसांनी सनातनच्या सारंग अकोलकर व विनय पवार यांचे नाव संशयित म्हणून पुढे आले. त्यांची माहिती देणार्‍यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. सुरवातीस दिलेली मूळ संशयितांची चित्रे आणि अकोलकर व पवार यांची चित्र पाहिली तर लक्षात येईल यातील चारही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सुरवातीला दोन अज्ञात संशयित, नंतर खंडेलवाल व नागोरी, नंतर वीरेंद्र तावडे आणि आता अकोलकर व पवार असा तपासयंत्रणांचा तपास भरकटलेला आहे. या खुनामागे सनातन व फक्त सनातनच आहे या गृहितकावरच विसंबून तपास केल्याने आजवर खुनी सापडलेले दिसत नाहीत. ज्याक्षणी तपासयंत्रणा सनातनऐवजी किंवा सनातनच्या बरोबरीने इतर दिशेलाही शोध घ्यायचा प्रयत्न करतील त्याक्षणी खुनाचे गूढ उलगडायला सुरूवात होऊ शकेल. आता जर अकोलकर व पवार संशयित असतील तर वीरेंद्र तावडेला ९ महिने तुरूंगात अडकवून ठेवण्याचे कारणच काय? तावडेप्रमाणेच पानसरे खुनासाठी समीर गायकवाडला गेली दीड वर्षे विनाजामीन तुरंगात ठेवले आहे. या दोघांना पकडूनसुद्धा, पोलिसांना खुन्यांचा तपास करण्यात अपयश आले आहे अशी दाभोळकर व पानसरे कुटुंबियांची टीका सुरू आहे. म्हणजे हे दोघे खुनी नाहीत किंवा नसावेत अशी यांना खात्री आहे. असे असेल तर त्यांना जामीन द्यायला व खटल्याची सुनावणी सुरू करायला यांचा विरोध का? एकंदरीत दाभोळकर व पानसरे कुटुंबियांचा दबाव, सामाजिक दबाव इ. दबावाखाली येऊन पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये नाहक सनातनच्या काही निरपराध संशयितांचा बळी जात आहे.