Skip to main content

ताज्या घडामोडी - ३

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/10/2016 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

वाचने 66983
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

गांधीवाद्यांवर विश्वास ठेवायचा? ते काय राजा हरिश्चंद्राप्रमाणे किंवा सत्यवचनी रामाप्रमाणे होते का?

पण ज्या ५५ कोटींची बोलत आहेत ते उपोषणाचे कारण नव्हते . ज्या वेळी फाळणीचा निर्णय झाला त्या वेळी हिंदुस्थान प्रांताची गंगाजळी ३७५ कोटी होती (आकडा वर खाली असू शकतो ) त्या आधारावर ५५ कोटी पाकिस्तान सिंध प्रांताला मिळाले . अनेक पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे . रामचंद्र गुहा ह्यांच्या इंडिया आफ्टर गांधी ह्यात देखील आहे हे एक उदाहरण पण नंतर खोटा प्रचार जास्त झाला . त्यांची तत्व वेगळी असतील त्या नुसार ते जगले म्हणून एक व्यक्ती म्हणून ते इतकेही छोटे नव्हते कि कोणीही त्यांना काहीही बोलावं . जगातल्या प्रत्येक देशात भारत म्हटलं कि गांधी आठवतात . अनेक नेते इथे आले कि त्यांच्या समाधीचा दर्शन पहिले घेतात .आजही त्यांच्या नावाची गरज पडतेच ना अगदी मोदी सरकार ला हि . असो नोबेल कमिटी ने त्यांचा निधन झाल्यावर दिलगिरी व्यक्त केली कि त्यांना नोबेल पारितोषिक दिला नाही हि आमची चूक झाली . त्यावेळी नोबेल सामाजिक क्षेत्रात कोणालाही मिळत नसे सहजा सहजी. त्यावरून त्यांचा मोठेपण सांगत नाही पण त्यांची मूल्य वेगळी होती . आणि त्यांच्याबाबत बोलताना लोक जी पातळी सोडून बोलतात ते पण योग्य नव्हे . राहता राहिला मुद्दा हरिलाल चा तर प्रकाशाची सावली हे दिनकर जोशी ह्यांचं पुस्तक आहे ते पण वाचावं. वडील आणि मुलाचा वाद असणं आणि त्याला नंतर गांधीच चूक आहेत असा अपप्रचार करणं , भांडवल करणं हे हि चूक आहे . असो लिंक नाहीत हा माझ्याकडे सगळं द्यायला .

संदीप डांगे,
म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.
मणिभवन आणि अरविंद पोतनीस कोण लागून गेलेत मोठे? मणिभवन ज्याची पोळी खातात त्याचीच टाळी वाजवणार, हे आम्हाला कळतं. रिझर्व्ह बँकेने फाळणीच्या वेळेस दोन्ही देशांचे अर्थव्यवहार हाताळले होते. बँकेच्या मते मोहनदास गांधींनी ५५ कोटी पाकिस्तानास देण्यासाठी उपास सुरू केला. त्यासंबंधी उल्लेख पान क्रमांक २६ च्या तळाशी इथे आहे : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/PDFs/89651.pdf नेहरूंनी ५५ कोटी देतांना ही भाषा वापरली : ‘Government’s contribution, to the best of their ability, to the non-violent and noble effort made by Gandhiji, in accordance with the glorious traditions of this great country, for peace and goodwill’ गांधीवाद म्हणजे टेररिस्ट फायनान्सिंगच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काय गंमत आहे बघा, एकिकडे गांधीवादी खोटारडे आणि कांगावेखोर, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचेच दाखले देऊन ते म्हणतात ते खरेच आहेत असेही बोलायचे. एक पे रहना, या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो! बाकी दुवा वाचतो आणि कळवतो.. =))

उदा. त्यांचे सत्याचे प्रयोग, ५५ कोटी, हरीदास, वडिलांंचा म्रुत्यु इ. इतके सगळे असूनही स्वच्छ भारत विकायला गांधींचेच फोटो लागतात, लोगो मध्ये त्यांचा सिग्नेचर चष्मा लागतो, बहुत काय बोलणे आता ;) माझा गांधीवादावरही विश्वास नाही अन त्यांच्या विरोधकांच्या अक्कलशून्य बौद्धिकावर सुद्धा. त्यामुळे एकमेकांचे दाखले नाचवत कोणी येऊ नये अशी आगाऊ विनंती.

बाकी, गांधींवर आलेल्या वर्तमानातील नाटकावर बोलायचं सोडून इतिहासाचा आधार का घ्यायला लागत असेल? :D

लव्ह हिम ऑर हेट हिम. त्यांची पूजा करा किंवा त्यांचे मूर्तिभंजन करा एक गोष्ट पक्की आहे. हा मनुष्य जश्या राजकीय गुगली फेकतो त्याला तोड नाही. सत्ताकारण नामे बुद्धिबळात हे नाव एक मजबूत संस्था बनून राहिले आहे हेच खरे.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांनी ७ देशांच्या मुस्लिम निर्वासितांना बंदी केली आहे. भारत असा निर्णय कसा अन कधी घेणार ? भारतात आत्ता निर्वासित कुठं आलेत ? अधिकारीक दृष्ट्या? की ज्यांना कायदा करून बंदी करावी लागेल? ऐतिहासिक चुका झाल्यात अन अजूनही बांगलादेशी घाण येत असते. ते मान्यच आहे. पण ते सगळे अनधिकृत रित्या. घुसखोर अन निर्वासित ह्या संकल्पना आपण परत एकदा वाचायची गरज आहे असे वाटते. दोन्हीना वेगळे शब्द आहेत इंग्लिश मध्ये 'Refugee' (निर्वासित) आणि 'infiltrator' (घुसखोर) असे.

कम्युनिस्टांचा अड्डा असलेल्या जवाहरखान नेहरू विद्यापीठात ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ हा काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठांनी भारतद्रोह्यांच्या नाकावर टिच्चून दणदणीतरीत्या यशस्वी केला. अधिक माहिती : http://sanatanprabhat.org/marathi/2017/02/05/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a… -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बरोबर. http://www.dnaindia.com/delhi/report-jnu-students-protest-to-call-off-e… विद्यापीठातील देशद्रोही निधर्मांधांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. परंतु त्यांना कार्यक्रम थांबविता आला नाही.

ही घडामोड ताजी नाही मात्र ऐसी वर अनु राव यांनी ह्या लेखाची लिंक दिली ती वाचली. बरे वाटले. याअगोदरही या माणसाबद्दल वाचलं होतं पण ते एवढं डिटेल नव्हतं.

In reply to by धर्मराजमुटके

फार फार धन्यवाद या लिंकसाठी. यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करीन नेहमी.

In reply to by पुंबा

त्याच त्या नालायक पक्ष अन राजकारण्यांसाच्या समर्थनार्थ भुंकत बसण्यापेक्षा अश्या सोन्यासारख्या माणसांचे हात बळकटकेले आपण तर ती खरी लोकशाहीची सेवा ठरेल. दुव्याकरता दुवा.

मोदींनी मनमोहन सिंगांवर केलेली टीका काँग्रेस नेत्यांच्या खुप जिव्हारी लागली आहे. त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही. मोदी हे २४ बाय ७ राजकारणी आहेत. त्यांची टीका ही मनमोहन सिंग या दुसर्‍या राजकारण्याच्या धोरणांवर, त्यांनी घेतलेल्या भुमीकेवर आहे. एवढे घोटाळे होत असताना, मनमोहन सिंगांची इमेज मात्र स्वच्छ राहीली यावरील ती टीपण्णी होती. ह्याला वैयक्तीक टीका म्हणणारे लोक हे जाणत नाहीत का की मोदींना खरोखर मनमोहन सिंगांच्या आंघोळीबद्दल बोलायचं नव्हतं, तर ते एक रूपक होते? याला प्रत्त्युत्तर देणे हा मनमोहन सिंगांचा विशेषाधिकार आहे. आता तो ते वापरत नाहीत हा त्यांचा पर्सनल चॉईस झाला. मात्र अश्या टीकेला उत्तर न देणे हीसुद्धा त्यांची राजकिय भुमीकाच आहे स्वतःचे प्रतिमासंवर्धन करण्याची. अश्यावेळी, बारक्या पोरांसारखं 'ह्यानं मला चिडवलं' असं रडून भेकून काय मिळणार? आणि यासाठी संसद बंद ठेवणे हा तर अक्षम्य गुन्हा आहे. फेबूवर वगैरे पण मोदी कसे असंस्कृत असा ओरडा सुरू आहे. पण या टिकेत असंस्कृत काय आहे याचं उत्तर मात्र देत नाहीत.

In reply to by पुंबा

नोटाबंदीवरच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नये म्हणून केलेल्या ह्या खेळीत मोदी जिंकणार (आणी नोटाबंदीचे प्रश्न व सामान्य नागरिक हरणार) असेच दिसते.

In reply to by संदीप डांगे

सहमत... मोदींना घेरण्याची संधी विरोधक प्रत्येक वेळी गमवतात. इतके मुरलेले काँग्रेजी दरवेळी मोदींच्या जाळ्यात कसे फसतात हे कळत नाही. कालही खर्गे " तुम्ही असं काऊन बोलले" हे विचारायला मोदींना भेटले. हे असं " आम्ही कट्टी..थांब तुय नाव आईले सांगतो" टाईप राजकारण काँग्रेस किती दिवस करणार?

In reply to by चिनार

सब मिले हुये है जी... नोटाबंदीच्या काळात राहुल गांधी मोदींना भेटला आणि त्यानंतर लगेचच राजकिय पक्षांना जुन्या नोटा आपल्या खात्यात भरायला मुभा आहे असं जाहिर झालं... विरोधकांना घेरायचेच नसेल किंवा घेरायला गेले की ब्लॅकमेल होत असेल. सोनिया-राहूल-जावाइ-सिंग ह्या सर्वांवर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी म्हणून २४बाय७ (सत्ता आली तरी अजूनही ) तोंडसुख घेणारेभाजपे तीन वर्ष होत आली तरी कोणतेही खटले दाखल करत नाहीयेत.. यावरुन काय ते समजून घ्या. तेरीभी-चूप-मेरी-भी-चूप असा प्रकार आहे. शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.

In reply to by संदीप डांगे

तसंही असेल.."जावई" काँग्रेसला खरंच महागात पडलाय हे नक्की..
शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.
खरं सांगू का, त्या भ्रष्टाचाऱ्याला जेलमध्ये टाका, फाशी द्या, जंगलात सोडा किंवा मोकाट सोडा त्याने काहीही फरक पडत नाही. पण त्याने दाबलेले पैसे परत आले पाहिजे. दुर्दैवाने त्यासाठी कायदा नाही.

In reply to by चिनार

बर्‍याच केसमधे घोटाळा हा सरकारला झालेले नुकसान असते, त्यासाठी संबंधित मंत्री-अधिकार्‍याला जी रक्कम मिळते ती त्यामानाने खूप कमी असते. समजा दहा हजार कोटीचा प्रकल्प सहा हजार कोटीमधे होतो, हे वरचे चार हजार कोटी अनेक प्रकारे सरकारकडून काढले जातात, त्यात संबंधित मंत्र्याला-अधिकार्‍याला किती रक्कम मिळाली हे कधीच सिद्ध होऊ शकत नाही. फार तर भुजबळ टाईप मालमत्ता आणी इन्कम यांचं गुणोत्तर गंडलं तरच पकडू शकतेत... दुसरं उदाहरण. एखाद्या प्रकल्पात समजा सरकारला दहा हजार कोटी फायदा होणार असेल पण तो तेवढा नाही हे दाखवायचे असेल तर संबंधित अधिकारी-मंत्री फारतर दहा टक्के रक्कम कंपनीला होणार्‍या फायद्यातून मिळवत असतील... कंपनीने सरकारकडून मिळवलेला निधी हा शंभर टक्के व्हाईट असतो, रितसर बिलं देऊन घेतला असतो... कायद्यात पकडणे मुश्किल असते. फारच झाले तर एखादं शालेय गणवेषाचे कंत्राट, बाहेर बाजारात ५०० रुपयाचा उत्तम गणवेष मिळतो पण सरकारला ७५० लावला जातो आणि प्रत्यक्ष डीलिवर झालेल्या गणवेषाचा दर्जा १०० रुपयांचा असतो, त्यात भ्रष्टाचार स्पष्ट दिसून येतो व सिद्धही करता येतो मात्र हेही खूप किचकट आणि फिर्यादीचा कस-दमखम पाहणारे काम असते.... चिक्कीचे उदाहरण ताजेच आहे....

In reply to by संदीप डांगे

न्यायप्रक्रिया अत्यंत संथ असल्याने हे खटले कूर्मगतीने चालतात. लालूला शिक्षा जाहीर होऊन ३ वर्षे होऊन गेली. दोनअडीच महिने तुरूंगात काढल्यावर तो जो सुटला तो अजून जामिनावर बाहेरच आहे. जयललिताचा खटला इतका रेंगाळली की ती वर गेली तरी अजून निकाल आलेला नाही. शिबू सोरेनवर गुन्हा सिद्ध होऊन ७-८ महिने तुरूंगात काढल्यानंतर तो अपीलात सुटला. एका दुसर्‍या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा सिद्ध होऊनसुद्धा त्याचे वय लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला शिक्षा दिली नाही. नरसिंहरावांनी १९९३ मध्ये लोकसभेत विश्वास ठरावावर आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी झामुमोच्या ५ खासदारांना प्रत्येकी १ कोटी रूपये लाच दिल्याचे सिद्ध होऊनसुद्धा गुन्हा संसदेच्या सभागृहात घडल्याने न्यायालय शिक्षा देऊ शकले नाही. मागच्याच आठवड्यात झारखंडच्या एका माजी मंत्र्याला ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. छगनबाप्पा व त्यांचे पुतणे जवळपास वर्षभर तुरंगात आहेत. राष्ट्रवादीचा रमेश कदमसुद्धा जवळपास वर्षभर आत आहे. थोड्या प्रमाणात व अत्यंत संथ गतीने का होऊना पण काही जणांना तरी शिक्षा होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कृती करायची वेळ आली की न्यायालयाला व संथ गतीला पुढे करायची चाल नेहमीची झाली आहे आता. धमक असेल तर खटले दाखल तर करावेत भाजपने, कोर्टात काय तो निकाल लागेल तो लागेल तेव्हा लागू देत. पुरावे आहेत ना मग सडवा सगळ्यांना आत, पुरावे नसतील तर मग उठसूठ आरोप करणे हा खोटारडेपणा आहे असे समजावे. कालच मोदी हरिद्वारच्या सभेत म्हणाले: मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है। म्हणजे काय कुंडली आहे ह्यांच्याकडे पण माझ्यावर टिका कराल तर याद राखा, उघड करेन... का रे बाबा, देशाच्या गद्दारांच्या कुंडल्या स्वतःवर टिका होऊ नये म्हणून ब्लॅकमेलिंगसाठी वापरायच्या आहेत का? हीच का तुमची देशसेवा, देशभक्ती? करा ना उघड, होऊ दे दूध का दूध पानी का पानी. तुमची आणि त्यांची सगळ्यांचीच असलियत बाहेर येईल... जनतेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल... तोवर ह्या नुसत्या गफ्फा हाणत बसा.

In reply to by संदीप डांगे

काही जणांवर खटले सुरू आहेत (छगनबाप्पा, समीर, रमेश कदम, सोनिया, राहुल व इतर इ.) तर काही जणांची चौकशी सुरू आहे (वडेरा, वीरभ्रद सिंह पतिपत्नी, कृपाशंकर, अजितदादा, तटकरे, अशोक चव्हाण इ.). उशीरा का होईना निकाल लागेलच.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा सर्वोच्च न्यायालयाने स्वतः सहारा श्री सुब्रोतो रॉय एक वर्षांपासून तिहारमध्ये बसवले आहे. तरीही त्यांच्या कडून सर्व पैसे अजून वसूल झालेले नाहीत कि खटला पूर्ण झालेला नाही. काळ्यापैशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली विशेष तपासणी समितीचे खोदकाम अजून चालू आहे. हे सर्व सकृतदर्शनी न्यायालयाला मान्य असलेले पुरावे असलेल्या केस मधील कहाणी आहे. नॅशनल हेराल्ड केसमध्ये सकृतदर्शनी पुरावे असल्याने न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून त्याचे गुऱ्हाळ चालू आहेच. या केसेस मध्ये खटले दाखल करणारी व्यक्ती किंवा न्यायालय स्वतः रस घेत असून आणि सकृतदर्शनी पुरावे असूनही हि स्थिती आहे. राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला. तसेच २००२ सालची दारू पिऊन गाडी चालवल्याच्या केसचा निकाल १३ वर्षांनी लागून २०१५ मध्ये सातासच सुटला. असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.

In reply to by सुबोध खरे

साहेब, सुब्रतो राय २८ फेब्रुवारी २०१४ पासून जेलमधे आहे. तुम्ही एक वर्षापासून म्हणत आहात. मोदीसरकारच्या नावाखाली खपवायचे आहे काय सहारा प्रकरण?
राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला.
बरोबर. जो न्याय सलमान खानला तोच नरेंद्र मोदींना २००२ च्या दंगलीतल्या सहभागाबद्दल लावता येतो, तो आपल्याला पटेल काय? 'जगाला माहित आहे' एवढ्या भांडवलावर कोणाला दोषी किंवा निर्दोष ठरवायचे-मानायचे हे पब्लिक-मीडिया ट्रायल सोयिस्कररित्या बदलते असे निरिक्षण आहे.
असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.
हा हा हा, तुम्हाला काय पूर्वग्रह द्वेष दिसून येतो तो येत राहो. वरचा प्रतिसाद ज्याला आपण उत्तर दिले आहे त्यात नरेंद्र मोदींचे स्वतः केलेले 'ताजे' वक्तव्य आहे. आणि ते वक्तव्य देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून केले आहे. मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है। हे ते वक्तव्य. हे जर खरे असेल तर जन्मपत्री उघड का करत नाहीत, कसली वाट बघत आहेत? जर खोटे असेल तर एवढ्या जबाबदार पदावर बसून असल्या पोकळ गफ्फा मारणार्‍या माणसाबद्दल काय विचार करावा ते तुम्हीच सांगा. निवडणुकीतली भाषणांकडे जास्त लक्ष देऊ नये असे म्हणत असाल तर मोदीजी गेले तीन वर्ष एकच रेकॉर्ड घासत आहेत. ते रेकॉर्ड ऐकून भूलून जाऊन लोकांनी त्यांना निवडून दिले.. सत्तेवर बहुमताने बसले तरी आपले 'परत परत' अशीच विधाने करत आहेत. माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीचा द्वेष वगैरे बघण्याच्या फंदात पडण्यापेक्षा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे वर्तन बघा. एकीकडे देशभक्तीच्या नावाखाली अश्रू ढाळण्याची नाटके करणे आणि दुसरी कडे अशा धमक्या देणे विसंगत आहे. असल्या माणसांवर अंधप्रेम करणार्‍यांवर, आणि लगेच बचावाला सरसावणार्‍यांवर आता दयादेखील येत नाही.

In reply to by संदीप डांगे

कधी कधी असं वाटतं की मोदी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा टाळावी यासाठी मुद्दाम काहीतरी वादग्रस्त विधान करतात व लगेच विरोधक तेच विधान धरून बसतात व त्यामुळे संसद बंद पाडणे, त्याच विधानावर सातत्याने बाईट देणे इ. प्रकार करीत राहतात. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो व मोदी त्यातून अलगद निसटतात.

सौरा,
त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही.
कुठला रेनकोट आणि कुठली आंघोळ ते तुम्हाला आजूनही कळलेलं नाहीये. ;-) शेवटी काँग्रेस चोर आहे आणि चोराच्या मनात चांदणे! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदींनी केलेली "रेनकोट घालून अंघोळ करणे" ही टिप्पणी नक्कीच इतिहासात अजरामर होणार आहे. भविष्यात अनेकवेळा या टिप्पणीचा संदर्भ दिला जाईल. अडवाणींनी "स्युडो सेक्युलर" हा एक नवीन शब्द जन्माला घातला. व्ही के सिंह यांनी "प्रेस्टिस्ट्यूट" हा अत्यंत चपखल शब्द तयार केला. त्याचप्रमाणे ही नवीन टिप्पणी आहे.

भारत अणुशक्ती शहर उभारत आहे हा पाकिस्तान ने आरोप करायच्या बर्याच अगोदर, २०१५ साली एका विश्वसनीय स्थळावर (foreignpolicy) लिहिलेला हा एक लांबलचक रिपोर्ट. कर्नाटक मध्ये उभ्या राहिलेल्या दोन अति गुप्त संस्था त्याच्याभोवती होणार्या सैनिकी तळ या विषयी हि माहिती विस्तृत रित्या दिलेय. काही गुप्त कागदपत्रे, अमेरिकन satelite images यांचा हि हवाला दिला आहे. हे स्थळ thermonuclear शस्त्र विकसित करण्यासाठी आहे असा बर्याच जणांचा होरा आहे. Indian Nuclear City ह्या रिपोर्ट मधली माहिती sensitive असली तरी बर्याच देशांना आणि लोकांना माहित असल्याने देशाच्या सुरक्षेस धोकादायक नाहीये.

In reply to by अमितदादा

अमितदादा, तुम्ही दाखवलेल्या अहवालात औष्माण्विक (=थर्मोन्यूक्लियर) अस्त्र असा मोघम उल्लेख आहे. मात्र त्यासाठी शुद्ध युरेनियमची गरज पडंत नाही. त्यामुळे हे अस्त्र उत्तेजाण्विक (=बूस्टेड न्यूक्लियर) असावे असा अंदाज आहे. उत्तेजाण्विक अस्त्रासंबंधी इथे एक लेख आहे : https://qz.com/588519/why-its-so-difficult-to-build-a-hydrogen-bomb/ आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शुद्ध युरेनिम म्हणजे उरेनिम-२३५ जे thermo nuclear bomb साठी वापरल जात. (वाचा विकीपेडिया). बाकी मी दिलेली लिंक वरवरची नसून खोलवर माहिती आहे . तसेच तयार होणार केंद्र हे अणुशक्ती (nuclear) चे संशोधन केंद्र हि असणार आहे, लष्करी तळ हि असणार आहे. बाकी वरील बातमी विश्वसनीय न वाटल्यास हरकत नाही. २०१५ सालची आणखी एक बातमी News report

In reply to by अमितदादा

अमितदादा, माझ्या मते संमीलन (=फ्युजन) बॉम्बसाठी अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियमची तितकीशी गरज पडंत नाही. मात्र उत्तेजाण्विक (बूस्टेड न्यूक्लियर) बॉम्बमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. संमीलनध्वम (= फ्युजन बॉम्ब = हायड्रोजन बॉम्ब)थेट फोडता येत नाही. त्याला चालना म्हणून अगोदन एक छोटा भंजनध्वम (= फिशन बॉम्ब = युरेनियम बॉम्ब ) फोडावा लागतो. तर पहिल्या भंजनध्वममध्ये हानी घडवून आणायचं उद्दिष्ट नसल्याने उच्च प्रतीचं युरेनियम वापरायची काहीच गरज नाही. याउलट उत्तेजाण्विकध्वम (= बूस्टेड न्यूक्लियर बॉम्ब) मध्ये पहिली पायरी छोटा भंजनध्वम, दुसरी पायरी छोटा संमीलनध्वम आणि तिसरी पायरी पुनश्च पण मोठा भंजनध्वम अशी असते. तर तिसऱ्या पायरीच्या भंजनात अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियम वापरलं जातं. दोन्ही तंत्रज्ञानं उच्च प्रतीची आहेत. एकावर प्रभुत्व मिळवलं की लगेचच दुसऱ्यावर मिळवता येतं. त्यामुळे भारताचे दोन्ही आघाड्यांवर घोडदौड चालू आहेसं म्हणायला हरकत नाही. आ.न., -गा.पै.

पाकिस्तानी आयएसआयचा भारतीय हस्तक एक भाजप कार्यकर्ता? मध्यप्रदेश (भाजपशासित) एटीएस ने अवैध टेलिफोन एक्स्चेंज चालवणार्‍या एका टोळीला अटक केली असून त्यातल्या ११ संशयितांमधे हा एक आहे. विशेष बाब म्हणजे आयएसआय चे हे कथित हस्तक मुस्लिम नव्हेत... http://aajtak.intoday.in/crime/story/one-of-the-isi-operatives-arrested…

बरोबर १ वर्षापूर्वी दिल्लीत ज. ने. विद्यापीठात राडा झाला होता. आधी महिषासुर जयंती समारंभ व नंतर ११ फेब्रुवारीला अतिरेकी अफझल गुरू पुण्यतिथी साजरी करणे व त्यावेळी देशद्रोही घोषणा देणे यामुळे सर्वत्र रणकंदन माजले होते. या कार्यक्रमांना आधी अभाविपने विरोध करूनसुद्धा विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अट्टाहासाने हे कार्यक्रम घडवून आणले होते. त्यानंतर २-३ महिने जे रामायण झाले ते सर्वश्रुत आहे. यावर्षी सुदैवाने असले देशद्रोही कार्यक्रम झाल्याचे वाचलेले नाही. बहुतेक मागील वर्षीच्या अभाविपच्या दणक्याने यावर्षी असले कार्यक्रम पुन्हा करण्याची 'सर्वांदेखत रस्त्यावर लघुशंका' फेम कन्हैया कुमार व त्याच्या टोळीतील कोणाचीही हिंमत झालेली दिसत नाही. असले कार्यक्रम पार पडले असल्यास कोणत्याही वाहिनीवर किंवा वृत्तपत्रातून त्याविषयी सांगण्यात आलेले नाही. त्यावेळी या देशद्रोह्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या पप्पू, केजरीवाल इ. नी सुद्धा त्याबद्दल मौन बाळगलेले दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

हा धागा ताज्या घडामोडींबद्दल आहे की सोयिस्करपणे चिखलफेक करण्यासाठी व गाडलेले मुडदे उखडण्यासाठी ? चालू घडामोडींबद्दल असेल तर तुमच्या प्रतिसादाच्या अगदीवरच एक बातमी आहे बघा, अगदी ताजी ताजी.... भाषा समजेल ना?

In reply to by संदीप डांगे

"आजतक" नावाच्या सनसनाटी बातम्या देणार्‍या वाहिनीने काहीतरी बातमी दिली आहे एवढंच समजलं. तसंही आमचं हिंदी अंमळ कच्चंच.

In reply to by श्रीगुरुजी

अस्सं अस्सं...! ते भारत तेरे तुकडे होंगे, कन्हयाकुमारची भाषणं वगैरे हिंदी समजलं होतं की जे एन यु वाल्यांनी खास तुमच्यासाठी मराठी ट्रान्सलेट केलं होतं..?

In reply to by संदीप डांगे

मराठीत भाषांंतर करायला जनेविवाले कशाला हवेत? त्यासाठी मराठी वाहिन्या व वर्तमानपत्रे आहेत की.

बायकोस ढकलपत्रातनं एक प्रस्तावपुडके ( = प्याकेज डील) आले. तिनं दाखवल्यावर वाचू जाता म्हंटलं की खास अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी निर्माण केलेलं दिसतंय. तर प्रस्ताव येथे आहे : http://www.wowcher.co.uk/email-deals/brighton/deal-2716191-detail/19-in… -गा.पै.

४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.ओपीएस ह्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

In reply to by वरुण मोहिते

अजून नाही. तुरंगात जाऊन पडायची वेळ अगदी जवळ आली, तरी शशिकला या उपटसुंभ बाईची कारस्थाने थांबलेली नाहीत. तुरूंगात जाता जाता तिने पनीरसेल्वमला पक्षातून हाकलले असून पलानीसामी नावाच्या आपल्या पित्त्याला विधीमंडळ पक्षाच्या प्रमुखपदी नेमले आहे. निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली. आज जयललिता असती तर शशिकलाच्या बरोबरीने तीसुद्दा तुरूंगात गेली असती. तामिळनाडूतील जयललिता, शशिकला, करूणानिधी, करूणानिधीची मुले (स्टॅलिन, अळगिरी, काणीमोडी), करूणानिधीचे नातू मारन बंधू, पी चिदंबरम्, मण्या अय्यर इ. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. सर्वजण अत्यंत अहंमन्य व कमालीचे भ्रष्टाचारी आहेत. एकाला झाकावा आणि दुसरा काढावा अशी परिस्थिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली. निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.

In reply to by आनंदयात्री

निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.
तथ्य आहे. आजचा अग्रलेख http://www.loksatta.com/agralekh-news/sasikala-convicted-in-da-case-140…

देशभरातून सरकारी आस्थापनांबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत असताना इस्त्रो ने मात्र स्वतःला कायमच सकारात्मक बातम्यांमधे ठेवले आहे. आज तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण करुन इस्त्रोने एक नवा अध्याय लिहिला आहे. हा मला वाटते की एक जागतिक विक्रमच असावा. इस्त्रो टीमचे अभिनंदन !

In reply to by धर्मराजमुटके

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जबरदस्त यश मिळविले. भारताला सातत्याने अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रो करीत आहे. हार्दिक अभिनंदन!

ह्या देशात म्हणे स्वातंत्र्य आहे! गुंडागर्दीचे स्वातंत्र्य असावे बहुतेक! तिकडे इस्रो १०४ उपग्रह एकाच वेळेस अवकाशात सोडून जागतिक विक्रम घडवते, इकडे ही माकडं स्वतःला काय करता आलं नाही म्हणून रामाचे नाव घेऊन दुसर्‍यांना बडवण्यात धन्यता मानतात. अच्छे दिन!

In reply to by संदीप डांगे

व्ह्यालेंटाईन डे हा तद्दन गल्लाभरू उत्सव आहे. तो बंद पाडून संस्कृतीचे रक्षण करणे मला तरी आवडते. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गल्लाभरु नसलेल्या उत्सवांची यादी मिळेल काय? प्रेमिकांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे?

In reply to by गामा पैलवान

असेल. पण मारहाण करुन बंद पाडण्याऐवजी प्रबोधन करुन किंवा जन्तेच्या खिशाला भोके पडून बंद झाला तर उत्तम. ! मारहाण करण्याचे समर्थन होऊच शकत नाही. नाही बंद झाला तरी काही फरक पडत नाही. अक्कल न वापरता कोणताही सण इव्हेंट म्हणून साजरे करणारे आणि दहशतीच्या जोरावर ते बंद करु पाहणारे दोघांनाही एकाच तराजुत तोलले तरी चालून जावे.

In reply to by गामा पैलवान

संपूर्ण असहमत. व्हॅलेंटाईन डे साजरा केला म्हणून इतरांना मारहाण करणारे गुंड आहेत. व्हॅलेंटाईन डे व संस्कृती यांचा काहीही संबंध नाही. गणेशोत्सव, होळी इ. सार्वजनिक उत्सवात मद्यपान करणारे, धागडधिंगा करणारे, स्त्रियांची छेड काढणारे हेच संस्कृतीला मारक आहेत. बंद पाडायचेच असतील तर हे सार्वजनिक उत्सव सर्वात पहिल्यांदा बंद व्हायला हवेत.

In reply to by श्रीगुरुजी

हिंदू सण योग्य प्रकारे साजरे करता येतात. व्हॅलेंटाईन डे ची गरजच काय मुळातून? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धोतर, उपरणे, करगोटा, लंगोटी, टोपी इ. हिंदू वस्त्रप्रावरणे वापरून योग्य पोषाख करता येतो. विजार, सदरा, कंठलंगोटी, पदवेश, मोजे इ. ची गरजच काय मुळातून?

In reply to by श्रीगुरुजी

प्रेमाच्या नावाखाली नवतरुणांना वासनाभिमुख करण्यापलीकडे काही घडतं का व्हया.डेत? आधीच फेमिनाझींनी हैदोस घालून कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणायचा विडा उचलला आहे. भरीस भर म्हणून लव्ह जिहाद फोफावतोय. नवरात्रीसारख्या हिंदू सणांत गैरफायदा घेणारे वासनांध बोकाळलेत. अशा वेळेस संयमाचे धडे द्यायचे की खरे पैसे खर्च करून खोट्या प्रेमाचे फुगे उडवंत बसायचं? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संयम?? कसला संयम सांगत आहात गा. पै. लग्नाची वयं आणि अटी दिवसेंदिवस वाढत चालल्यात, शहरातल्या बहुतांश मुलींची २४ व मुलांची वयं २८ च्या पुढे निघून जातात पहिला अनुभव घेईस्तो.. अर्ध आयुष्य (खरेतर संभोगसुख उपभोगायचे सर्वोत्तम वय) संपेपर्यंत संयम बाळगायला सांगताय त्या जीवांना त्यापेक्षा जन्मालाच कशाला घालायचे...? तेव्हाही संयमच बाळगायचा ना! बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!

In reply to by संदीप डांगे

२००० साली शिवसेनेनेही व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता. त्यावेळी अनेक प्रेमी युगुलांनी 'हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे' ही ग्रिटिंग कार्डे मातोश्रीवर रवाना केली होती हे पण आठवले :) एकूणच काय बजरंग दल आणि शिवसेना. दोघेही तद्दन गुडघ्यातले.

In reply to by गॅरी ट्रुमन

२००० नंतरही अनेक वर्षे शिवसेनावाले व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात होता. पुण्यात अगदी ५-६ वर्षांपूर्वी 'आर्चीज्' च्या दुकानांची मोडतोड केल्याच्या बातम्या आल्या होत्या. सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.

In reply to by श्रीगुरुजी

सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.
माझ्या माहितीने आदित्य ठाकरेंनी याबाबतीत शिवसेनेचा स्टॅन्ड दोन-तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केला आहे. शिवसेना वॅलेंटिने डेला विरोध करणार नसल्याचं त्यांनी म्हटल्याचे आठवतंय. तरीही जर कोणी इतर कोणालाही वैयक्तिकरित्या त्रास न देता विरोध-निदर्शने करणार असेल तर काय हरकत असावी? हा मार्ग सगळ्या विरोधकांना मोकळा ठेवायला आणि त्यांनी तो पाळायला हरकत नसावी.

लोकहो, सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा गिळून असदुद्दिन औवेश्या बघा कसा हुतात्मा बनायला निघाला आहे. अधिक माहिती : http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/asaduddin-owaisi-ra… सविस्तर वृत्त : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/asduddin-o… आ.न., -गा.पै.

शशीकला नटराजन यांनी तुरूंगात जाण्यापूर्वी निवडलेले एडापड्डी के. पलानीस्वामी यांना तामिळनाडूचे राज्यपाल के.विद्यासागर राव यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी होईल. त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत सिध्द करायला १५ दिवसांचा कालावधी आहे.

संदीप डांगे,
बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!
हे व्हया.डे साजरं करायचं कारण होऊ शकंत नाही. ज्यांना अनैतिक संबंध ठेवायचे आहेत त्यांनी खुशाल ठेवावेत. त्यास जाहीर उत्तेजन मिळू नये इतकाच माझा आग्रह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पण जाहीर उत्तेजन कोण देतं व्हॅ डेला? व्यक्तीला असा उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य असावे इतकेच म्हणताहोत आम्ही. जर स्वखुशीने प्रेमी जोडपे सेलीब्रेट करत असेल तर त्याला झुंडशाहीच्या बळावर मारहाण करायला लोक येऊ नयेत एवढी साधी अपेक्षा आहे. व्हॅ डे साजरा करण्यासाठी कोणी स्टायपेंड, सबसीडी, फेलोशीप असं कोणी जाहीर केलेलं नाहीये. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप होऊ नये हे पाहणं सरकारचं काम आहे, तसंच नागरी समाजाचंही..

In reply to by पुंबा

सौरा, दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे? त्यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत. आ.न., -गा.पै.