Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 10/02/2017 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
a निळकंठबुवा बिदरकर ..संगीत क्षेत्रातील एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व . बुवांचे नाव घेताच अनेक जाणकार गायक, वादक , रसिक श्रोते कानाची पाळी पकडत . एक निर्माता आपल्या शास्त्रीय संगीतावरील चित्रपटामध्ये बुवांनी गावे यासाठी इच्छुक होता . पण चित्रपटसंगीतातील बंधनांमुळे बुवा राजी नव्हते . अखेरीस आर्थीक गरजांमुळे ते तयार झाले . तो चित्रपट आणी बुवांचे गाणे खुप गाजले . एका मैफीलीला बुवांनी ईश्वरवंदना करुन रागदारीला आरंभ केला . "बुवा ..आधी तुमचे " सुरचंद्रमा" पिच्चरमधलं " सावनकी बहारें" होउन जाऊदे ." पहिल्या रांगेतील मानाच्या कोचावरील देणगीदाराने फर्माईश केली . बुवांनी संताप आवरला . सप्तसुरांना वंदन करुन अर्धवट राहिलेली रागदारी त्यांनी पुनश्च आरंभ केली .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1847
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आपल्या प्रतिसादांबद्दल आभार . सर्व कथा लेखकांचे अभिनंदन . कथेबद्दल --- "मैफल" हि कथा "दॄष्टिकोन" या विषयाशी / छायाचित्रावर बेतलेली / संबधीत आहे . संगीताकडे पाहण्याचा गायकाचा व समाजातील इतर घटकांचा दॄष्टिकोन वेगवेगळा असु शकतो . या फरकामुळे त्यांच्यामध्ये मतभेद होउ शकतात. असा या कथेचा आशय आहे .