Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "चल ना वं बिगी बिगी..उशीर होऊ राह्यला शाळेले" "मले त याचंच नव्हतं..भेव लागते मले..दोन-चार त पोट्ट्या असतेत तिथं.." "येतीन अजून पाय तू" "कोन म्हन्ते?" "माय सांगे..लय इनंत्या केल्यावर हे जागा देल्ली सरपंचानं..देत नौता सरपंच..पोरीले कायले शाळा पाहिजे म्हने?" "मंग?" मास्तरीन बायनी पिछा नाय सोडला..मंग द्याच लागली त्याले... पयली शाळा व्हय नं हे आपल्यासाठी..येतीन पोट्ट्या हळूहळू..." "कोन नाय येनार..पायजो" "बरं चाल तू" "हप्ताभर वाट पायते..मंग मी बी नाय येनार" "बरं" "ओ बाय...शाळा कुठं गेली?" "आत्ता माय.. इमारत कस्काय पडली? " . . . . . . . सरपंच फोनवर... "आमदार सायब..इमारत पडली..बांधा आता फार्महाउस.." "हे जमलं...अन बाई ?" "तिले गाडलं इमारतींतच"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3986
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

:)

छान...

खुप छान Different perspective