तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला.
“आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात.
“आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ
“सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका
“जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन
“ते आपले मित्र असावेत.” भारत
“ही भारताची चाल.” पाकिस्तान
काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला-
“लढायला तयार रहा.”
यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला.
जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून-
किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले.
ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.
वाचने
5010
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा. आवडली शतशब्दकथा. डॅन
डॅन ब्राऊन ? ज्यूल्स व्हेर्न
In reply to वा. आवडली शतशब्दकथा. डॅन by एस
ज ब र द स्त !
जबरदस्त कथा !!
एकच नंबर
मस्त !
कचऱ्याचे ढीग, मेलेली न
In reply to मस्त ! by सस्नेह
अगदि हेच मनात आलं
In reply to मस्त ! by सस्नेह
हो ना.. दही सुद्धा लागायची
In reply to अगदि हेच मनात आलं by रामपुरी
फारच मस्त, कायच्या काय
मस्तच .
मस्त!
आवडेश
भारीच