Skip to main content

काय करावे!!! तिच्याशी नाते जोडावे की नको???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 05/02/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे. जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे. सुरवातीला मी ओळखीत कशाला झकमारी करायची म्हणून गप्प बसलो.पण येता जाता तिची स्निग्ध नजर मला न्याहाळत असायची.मग मी ही तिच्याकडे पाहू लागलो.मधे आधे दोघेही एकमेकांना स्माईल देऊ लागलो.एक दोनदा बोललीही.तीन चार दिवसापुर्वी मला ति फिरायला येताना भेटली.मी ठरवले हीला आज विचारायचेच.मी तिला थांबवले ,इकडतिकडच्या गप्पा झाल्या,अंधारुन यायला लागल्याने व वर्दळ कमी झाल्याने तिची भीड चेपल्यावर मी सरळ तिला विचारले ,तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस का? ति फक्त हसली व शून्यात बघत राहीली.मी तिचा हात हातात घेऊन जे मनात आहे ते सांगुन मोकळा झालो.जाताना तिला परत विचारले are you interested in me?.यावर तिथोड्या दिवसांनी सांगते म्हणाली. तिच्या एकंदर बिहेविअरवरुन ती मला हो म्हणेल असे वाटत आहे.पण माझेच तळ्यातमळ्यात चालू आहे.एकतर लग्न झालेल्या बाईशी अफेअर करुन त्याचा लॉजिकल एंड काय होईल हे मला सांगता येत नाही आहे.दुसरीकडे तिच्याविषयीचे आकर्षण गप्प बसु देत नाही आहे. तिचा नवरा मला फारसा ओळखत नाही पण एकंदर तो स्वभावाने चांगला असावा.त्याला फसवने गैर् आहे असेही वाटते व तो त्याच्या बायकोला पसंत नसेल तर आपण का संधी सोडावी असेही वाटते.काय करावे कळत नाही ,मार्गदर्शन करावे. १.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय? २.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे? ३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय? ४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14774
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

आंजी हा टफि धाग्यांचा पसारा माजला सारा गमे या भ्रांत आंतर्जाली ध्रुवाचा ट्यार्पी हा तारा कधी डोकेच चालेना, कधी तांबूल विळखा जाचे भ्रमाने शेजारणीच्या विभ्रमाने टफिचे चित्त ते नाचे कधी वयाचा गिल्ट, कधी सायकोपाथ चळ लावी तर कधी नजर मांसाहाराच्या निशेने धुंदली भारी कधी सिंजि तर कधी ग्रेथिं, नानाविध अवतारी एकाच जिलेबी सवे आंतरजाली लीलया संचारी जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा मिपा ब्रम्हेच्या जिल्बी-भेंडीचा स्वाद हा न्यारा