शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही
घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत.
माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती.
"डॅडा"
माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो.
"या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? "
नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल? मी बुचकळ्यात पडलो.
"आता नोटा नाही म्हणजे पैसे नाही, म्हणून आता तुला नोकरी करावी लागणार नाही. तुला सगळा टाईम मला देता येईल ना! तू आलास की त्या लॅपिला घेऊन बसतोस.आता तुला रोज माझ्यासोबत खेळता येईल."
तिची पैशाची आणि नात्यांची गणित खरचं किती सोपी होतीवर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त !!
छान.
मस्त !!
छान
Zakas
अनुक्रमणिकेनुसार कथा वाचत आहे