Skip to main content

शब्दच केवळ

शब्दच केवळ

Published on सोमवार, 06/02/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
जोवर ना ती तेज दुधारी कट्यार दु:ख्खाची मज चिरते तोवर माझे शोकगीतही शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना ती रिमझिमणारी श्रावण सर मज चिंब भिजविते तोवर माझे पाऊसगाणे शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना मज दुमदुमणारी हाक अनाहत ऐकू येते तोवर रचिले सूक्त जरी मी शब्दच केवळ, काव्य नव्हे ते प्रतिभेचे लखलखते लेणे जोवर या झोळीत न येते तोवर स्फुरला मंत्र जरी मज शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
लेखनविषय:

याद्या 765
प्रतिक्रिया 2
काव्यरस