शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
त्याचं विचित्र वागणं आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं. दिवसभर समुद्रावर भटकणार्या मोहनला लोक एव्हाना वेडा म्हणायला लागले होते. एकटा मुरुगप्पाच रोज रात्री मोहनला आपल्या घरी घेऊन जाई, जेवायला घाली आणि मुलासारखं थोपटून झोपवी. मित्रत्वाच्या व्याख्येपलिकडे जाऊन तो मोहनला जपत होता; बायकोचा रोष ओढवूनही. एका अशाच संध्याकाळी मुरुगप्पा मोहनला शोधत किनाऱ्यावर आला. मोहन वाळूत घर बनवत होता. दर लाटेगणिक ते तुटत होतं, आणि तो पुन्हा पुन्हा नवीन बनवत होता.
बराच वेळ बघून मग एक उसासा टाकत मुरुगप्पा मोहनच्या बाजूला बसला. त्याने मोहनच्या खांद्यावर हात ठेवला. मोहनचे वाळूतले हात सावधपणे थांबले.
स्तब्धपणे जमिनीकडे बघतच मोहन म्हणाला, 'का आली रे सुनामी, माझ्या घरावर?'
प्रतिक्रिया
आवडली !!!
छान.
कल्पना आवडली!!!
छान
+१
आवडली!
छान कथा...