Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
aa "अरे नुसती मजा. तुला सांगतो. हि अशी...उंssच लाट यायची..." नातू ‘आ’ वासून ऐकतोय. “पाण्याची?” "मग!!! इथल्यासारखं नाही... शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू... अगदी मुबलक!!" "बर आता चला हं. वेळ संपत आली, घरी जायचं ना?" पुढच्या काही क्षणात समोरचा समुद्र आणि पायाखालची वाळू नाहीशी झाली. ...समोर पुन्हा मंगळावरची लाल रेताड भकास जमीन दिसू लागली. आजोबा आणि नातू अर्थ सिम्युलेटरमधून बाहेर पडले. अंतराळयानात बसल्यावर हेल्मेटच्या काचेवर आतून वाफ सोडत छोट्यानं आजोबांना विचारलं, "ग्रँडपा, ग्रॅनी कुटे अशते?" आजोबा दोन बोटं अंतराळयानाच्या एयरटाइट खिडकीवर ठेऊन दुरदुर जाणाऱ्या एका फिकट निळ्या ठिपक्याकडे बघत होते. यानाच्या एक्झॅास्टमुळे खिडकीची काच आता धुरकट व्हायला लागली होती...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2658
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान.

In reply to by जव्हेरगंज

सगळे मिपाकर पंच आहेत. मिसिंग नाहीत, वाचून निकाल देतील, तेव्हा समजेल हो पंच मिसिंग का दिसिंग ते! :P

भनाटच कल्पना.. लेखक गेस करतोय. बघू या बरोबर लगतो का टोला ते..