Skip to main content

निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज

लेखक अनुप ढेरे यांनी शुक्रवार, 13/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील. आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे. काँग्रेससाठी पंजाब महत्वाचं असेल कारण त्याच एकाठिकाणी त्यांना जिंकायचे चांन्सेस आहेत. उ.प्र.मध्ये काँग्रेसची अखिलेश बरोबर युती होईल असा अंदाज आहे. मुख्यतः तिरंगी लढतीत काँग्रेसच्या ५-६% मतांनी स.पा.ला भरपूर फायदा होऊ शकेल. भाजपासाठी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचे असतील. उत्तराखंडमध्ये भाजपा जिंकायची शक्यत असताना उत्तर प्रदेशात काय होईल हे कोणाच्या बा ला नक्की सांगता येणार नाही. २०१४मध्ये ७४ सीट घेणार्‍या भाजपा+ ला इथे हारणं लाजिरवाणं ठरेल. इथला पराभव हा थेट मोदी आणि डिमनिटायझेशनवर प्रश्न उपस्थित करेल. ( गेल्या दोन वर्षातल्या प्रत्येक निवड्णुकीबद्दल हेच म्हटलं गेलय की त्या मोदींच्या परिक्षा होत्या. पण यावेळी हे खरच आहे असं वाटतय. मोदी स्वतः उ.प्र. मधले खासदार आहेत.) समाजवादी पक्षातल्या यादवीचा भाजपावर काय परिणाम होईल त्याचा वेध घेणारा लेख वाचला. http://www.thehindu.com/news/national/other-states/BJP-watches-Yadav-fe… लेखात म्हटलय की भाजपाला एकत्र स.पाशी लढायला आवडेल. त्रिकोणी लढत भाजपाला हवी आहे. हे पटलं नाही. माझ्यामते स.पा. तले तुकडे भाजपाच्या पथ्यावर पडतील.

वाचने 63231
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

In reply to by फेदरवेट साहेब

हिच शंका मंजे कोणती शंका? टिळक म्हणले का "उत्तर ध्रुव + पुणे + रत्नागिरी" = टीळकीस्तान. मी दिलेलं ते शाळेचं उदाहरण नीट वाचा. आपण मागे कधीतरी कुठून तरी आलो असे काहीबाही शोध लावणं वेगळं आणि अशा बाहेरून आलेल्या (चला आपण मान्य करू हो) लोकांशी आजही युद्ध चालू आहे असं (उगाचच) मानून वेगळी चूल थाटणं वेगळं. अहो, पेरियारना देशद्रोही नाही मानलं तर आंबेडकर मूर्ख ठरतात. आंबेडकरांनी अख्खा समाज सुधारावला, धर्म बदलला पण कधी द (फॉर दलित्स्थान) नाही काढला. आज ते भारताचे हिरो आहेत. आज दक्षिणेत दलितस्थान /द्रविडस्तान/द. पाकिस्तान असता तर काय झालं असतं? ती फाळणी कशी असती? आजचे रिलेशन कसे असते? त्या बेटावरच्या श्रीलंकेने एवढा भंड आणून सोडलाय... ============== व्यक्तिशः मला आंबेडकरांच्या शेजारी पेरीयारांचे नाव लिहिलेले अजिबात आवडत नाही. बनिया लोकांनी ब्राह्मण लोकांचा द्वेष करावा आणि इंग्रजांनी रचलेले अशास्त्रीय असिद्ध वर्गीकरण चेपून, बनिया चालवत असलेल्या काँग्रेसला ब्राह्मणी म्हणत, द्रविड / दलित, उत्तर /दक्षिण असे/घोळ घालत, वेगळे राज्य मागावे आणि मरेपर्यंत भूमिका न बदलणे ....

In reply to by arunjoshi123

पेरियार वैगेरे मंडळी देशद्रोही होती. त्यांना दक्षिण भारत हा वेगळा देश पाहिजे होता.
भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्‍याच चळवळी होत्या. पेरीयार रामस्वामी नायकर हे द्रविड चळवळीचे पितामह होते. त्यातूनच जन्माला आलेल्या डीएमके पक्षाचीही मागणी (सुरवातीच्या काळात) त्याच स्वरूपाची होती.पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. उत्तरपूर्व भारतातील फुटिरतावादी चळवळीच्या नेत्यांनीही आपली फुटून निघायची मागणी सोडून दिल्यावर ते मुख्य प्रवाहात आले. लालडेंगासारखे मिझोरामचे मुख्यमंत्रीही झाले. तेव्हा पूर्वीच्या काळी कधीतरी फुटून निघायची मागणी केली होती हे आयुष्यभर देशद्रोही असल्याचा शिक्का कपाळावर वागवावा लागण्यासाठी पुरेसे आहे का? जर का काही दहशतवादी कृत्ये केली असतील तर जरूर कारवाई करावी. पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?
या कर्मठ नास्तिकाचे सारे तत्त्वज्ञान आता कचर्‍यात निघालेल्या आर्यन इन्व्हेजन थेरीवर आधारित होते.
आपल्या परंपरेप्रमाणे कर्मठ अस्तिक असणे आणि कर्मठ नास्तिक असणे या दोन्ही गोष्टी तितक्याच मान्य करता येण्याजोग्या आहेत. त्यामुळे ते कर्मठ नास्तिक होते हे आक्षेप घेण्यायोग्य कारण असू नये. शेवटी नास्तिकांनाही आपल्या परंपरेत स्थान आहेच. दुसरे म्हणजे त्यावेळी जरी आर्यन इन्व्हेजन थिअरी खोटी आहे हे सिध्द झाले असले तरी कोणाला ती खरी आहेच असे म्हणून आपली मते मांडायची असतील तर त्याकडे 'तो वेडा आहे' असे म्हणून दुर्लक्ष करणेच सर्वात श्रेयस्कर नाही का? समजा आज कोणी सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो असे गृहित धरून अशी कोणती मांडणी केली तर त्याला 'ठार वेडा' सोडून दुसरे काय म्हणणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्‍याच चळवळी होत्या.
संस्थाने म्हणजे वैचारिक लोकांच्या चळवळी नव्हे हो! आणि मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.
की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते.
जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.
पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?
मूळ प्रवाहात येऊन फार कै उपकार नै केले. एकतर तर दाक्षिणात्य राज्ये कधीच भारत बाह्य संस्कृतीची नव्हती. या लोकांनी शुद्ध ब्राह्मणद्वेषापोटी तसा हंगामा उभा केला. शंभरदा खोटं बोलायचं!! यांच्यामुळे हिंदी भारताची राष्ट्रभाषा झाली नाही आणि स्थानिक लोकांना ज्ञान आणि सत्त्तेतून बाहेर ठेवले गेले. आजही ब्रह्मद्वेषाचे वीष तामिळनाडूत संहत आहे. यात वैचारिक देखिल काही नाही. चार दक्षिणेतल्या राक्यातले ब्राह्मण उत्तरेचे एजंट! काहीही? खाज थांबल्यावर ती होत होती तेव्हाची स्थिती वाइट ती वाइटच.

In reply to by arunjoshi123

मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.
मिझोरामची केस जेन्युईन होती आणि तामिळनाडूची केस जेन्युईन नव्हती हे तुमच्या दृष्टीने विचार केला तर. अशा चळवळी करणार्‍या प्रत्येकाला आपली केस जेन्युईन आहे असेच वाटत असते.
जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.
स्वतंत्र द्रविड राष्ट्र व्हावे अशी पेरियार रामस्वामी नायकरांची मागणी होती. एका अर्थी जीनांच्या स्वतंत्र पाकिस्तान व्हावी या समकक्ष मागणीमुळे पेरियारांनी जीनांबरोबर हातमिळवणी केली होती. पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही. दुसरे म्हणजे जीनांचे समर्थन म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन हा अर्थ मी घेतो. स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारे सगळेच देशद्रोही का? अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का? बरं त्रावणकोरचे दिवाण सी.पी.रामस्वामी अय्यर यांचे काय? त्रावणकोर संस्थानच्या राजाने १९४७ मध्ये संस्थान स्वतंत्र देश होईल असे जाहिर केले होते त्यावेळी सी.पी.रामस्वामी अय्यर यांनी जिन्नांशीही बोलणी केलीच होती. लोकमान्य टिळकांच्या वेळी पाकिस्तानची संकल्पना अर्थातच लोकप्रिय झाली नव्हती.पण त्यांनी लखनौ करार करून मुस्लीम लीगच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे सर्वमान्य आहे. त्यांचे काय? लाला लजपत रायांचे काय? ते सगळेही देशद्रोहीच का?

In reply to by गॅरी ट्रुमन

हे तुमच्या दृष्टीने विचार केला तर
अहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते? काय तरीच काय?
पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही.
१. कास्मिरात एक नेता आहे. तो त्याच्यामते हिंसाचारवादी नाही पण भारतविरोधी आहे. असले गांधी जास्त डेंजर नाही का? तो विषय नाही. २. दक्षिणेत दक्षिण पाकिस्तान नव्हता. आणि लीगची ज्या निजामाला सहानुभूती होती तो आंध्रच द्रविडस्तान मधे हवा होता या लोकांना. शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता. प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.
अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का?
हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे. अविभाजित भारताकडे पाहू. भारतात राहिलेल्या आणि पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांत काय फरक आहे? म्हणजे १९४७ मधे होता? बलोच, पंजाब, सिंध, पूर्ब बंगाल इथे राहणारे मुस्लिम कमी भारत प्रेमी आणि उत्तर प्रदेश आणि आंध्रचे जास्त देशप्रेमी असा हिशेब होता कि काय? जे लोक पाकिस्तानात गेलेल्या घाणीपासून आपण बचावलो असे विचार करतात ते आज देशात असलेल्या मुस्लिमांशी देखिल गद्दार आहेत असा सरळ अर्थ निघतो. उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही. काँग्रेसने देश तोडला नि उपकार झाले म्हणणारे बरेच आहेत. पण लोक विसरतात कि "पाकिस्तानी तालिबान्यांचे (ही जगातली सर्वात हाय टर्बिडीटीची घाण)"आजोबा पणजोबा "पूर्व पाकिस्तान असू शकतो तर पश्चिम भारत का नाही?" असे म्हणत. बाय द वे , घाण गेली नाही, ती उराशीच आहे आणि सुसज्ज आणि सशस्त्र आहे. तेच जे मुसलमान भारतात आहेत ते कूल आहेत. त्यांना कोनतेही वाईट डोहाळे लागलेले नाहीत. ही पाकी घाण (?) गेली नसती तर भारतात चार पंतप्रधान मुसलमान झाले असते, आणि विश्वशांती राहिली असती. असो. ============ रामस्वामी अय्यर नक्कीच देशद्रोही आहेत. ============== लखनौ करारात काय राष्ट्रद्रोही मला आढळ्ललं नाही.

In reply to by arunjoshi123

अहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते?
तुम्ही मिझोरामची केस जेन्युईन होती असे म्हटले आहेत. जर द्रविड लोक उत्तर भारतात खूप ब्राह्मण आहेत हे त्यांच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्याचे कारण मानत होते तर मिझोरामचे लोकही भारताच्या इतर भागातील लोक आपल्या वंशाचे नाहीत म्हणून आम्ही भारतीय नाही हे एक कारण मानत होते. जर मिझो लोकांचे बरोबर असेल तर द्रविड लोकांचे काय चुकले?
शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता.
नक्की?
प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.
का बरं? अयोध्येच्या शुजाच्या पदरी हिंदू सैनिक होते ते पानिपतमध्ये मराठ्यांविरूध्द अब्दालीच्या बाजूने लढले होते. राजा मानसिंग अकबराच्या बाजूने राणा प्रतापविरूध्द लढला होता इत्यादी इत्यादी.... हिंदूंमधील दुही ही शतकानुशतकांपासून चालत आलेली आहे म्हणूनच परकीयांचे राज्य आपल्यावर होऊ शकले.
उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही.
अजिबात नाही. पाकिस्तान होऊन घाण गेली असे म्हणायचे कारण हे की त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे काहीही करण्यासाठी १९४७ म्हणजे खूप उशीर झाला होता. जर रामपूर, अमरोहा, देवबंद येथील पाकिस्तानशी सहानुभूती बाळगणारे लोक जर पाकिस्तानात चालते झाले तर नक्कीच घाण गेली असे म्हणू पण जर त्यांना वेगळा उत्तर पाकिस्तान हवा असेल तर मात्र ते नक्कीच चालायचे नाही. त्यांना अगदी दयामाया न दाखवता निर्दयपणे ठोकून काढले पाहिजे. पश्चिम उत्तर प्रदेशात (आणि कदाचित बंगालमध्ये) अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे परिस्थिती अजूनही सांभाळता येऊ शकेल.पण पश्चिम पंजाब इत्यादी भागात १९४७ मध्ये तसे नव्हते. इट वॉज टू लेट. जे पश्चिम पंजाबमध्ये झाले तेच बंगाल, आसाम आणि इतर ठिकाणी होऊ द्यायचे की नाही हे आपल्याच हातात आहे.
हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे.
उठल्यासुटल्या सगळ्यांना देशद्रोही म्हटल्यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर देशद्रोही हा शब्द अगदीच बुळबुळीत बनून जातो.आणि दुसरे म्हणजे या कारणामुळे राष्ट्रवादाचे समर्थक स्वतःला हास्यास्पद बनवितात. जर का आता म्हणजे २०१७ मध्ये जर कोणी वेगळा देश वगैरे मागत असेल तर तो नक्कीच देशद्रोह झाला.पण आजच्या काळाचे परिमाण आपण १९४७ च्या परिस्थितीशी लावू शकत नाही. सी.पी.रामस्वामी अय्यरटाईप लोकांना स्वतंत्र देश हवा होता म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतील हे पूर्णपणे उलगडले होते का?की ब्रिटिश राजवटीत संस्थानिकांना त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत स्वातंत्र्य होते तशाटाईपचे स्वातंत्र्य १९४७ नंतरही आपल्याला उपभोगायला मिळेल अशी त्यांची कल्पना होती?तसे असेल, त्यांना या मागणीचे नक्की परिणाम काय होतील हे त्यावेळी जाणवले नसेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या या मागण्यांमुळे हिंसा झाली नसेल आणि सरदार पटेलांनी दांडुका हातात घेतल्यानंतर का होईना त्यांना आपली चूक उमगली असेल आणि ते मेनस्ट्रीममध्ये आले असतील तर अशांना देशद्रोही मानणे अयोग्य आहे असे मला वाटते. हैद्राबादचा निजाम मात्र याला अपवाद आहे. एकतर त्याच्या रझाकारांनी हिंदूंवर अत्याचार केले होते आणि १९४७-४८ मध्येच हैद्राबादचा प्रश्न यु.एन मध्येही नेला गेला होता. असे काही इतर संस्थानिकांनी केले होते का? मग सगळ्यांना एकजात देशद्रोही असे लेबल चिकटवले तर त्या लेबलची किंमत कमी होईल.

आज राहुल गांधींनी पंजाबमधील मजिठा विधानसभा मतदारसंघात केलेल्या प्रचारसभेतील भाषणात एक महत्वाची घोषणा केली. आणि ती म्हणजे कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. ही घोषणा करायला इतका उशीर का केला हे समजत नाही. खरे तर प्रतापसिंग बाजवा विरूध अमरिंदर या अंतर्गत भांडणात अमरिंदर यांची बाजू हायकमांडने घेतल्यावर ही घोषणा करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. असो. जे काही असेल ते. आता यापुढे तरी अमरिंदर आडपडदा न ठेवता प्रचारात पूर्णपणे झोकून देतील आणि काँग्रेसला विजय मिळवून देतील ही अपेक्षा. (पंजाबमध्ये काँग्रेस जिंकावी असे वाटणारा) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता पालटणे अत्यंत गरजेचे आहे. आता आप आणि कॉग्रेसच्या भांडणात परत अकाली-भाजपा युतीच्या तोंडात सत्तेचा गोळा पडू नये म्हणजे झालं.

In reply to by पुंबा

सौरा, केजरीवाल देशद्रोही आहे. त्यातून पंजाब पडलं सीमावर्ती राज्य. ही सीमाही भारताच्या कट्टर शत्रू पाकिस्तानची. केजरीच्या हातात पंजाब पडणं अतिशय धोकादायक आहे. कोणीही येवो पण केजरी नको. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भाजप अकाली दल कोणत्याही हालतीत नको आणि आआप चालेल असे म्हणणारांस ईश्वर सद्बुद्धी देवो. =================== काँग्रेसचं कै नै. म्हणजे ती जिंकली नै जिंकली तरी चालतं. शेवटी (१०० चूका केलेला का होइना पण) तो राष्ट्रीय पक्ष आहे. पण आम आदमी पक्ष? पाकिस्तानच्या सीमेवर? आर यू इन यूर सेन्सेस?

In reply to by गामा पैलवान

देशद्रोही आहे की नाही ते माहित नाही पण आपच्या ताब्यात पंजाब जाऊ नये असे वाटते. कॅ. अमरींदर सिंगांमुळे काँग्रेस जिंकू शकते आणि जिंकावी असे वाटते. पण भाजप- अकाली नको. पण अनेक लोक सांगतात त्याप्रमाणे पंजाबच्या युवा वर्गात केजरीवाल भयाण फेमस आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी? मंजे असे तुम्हाला का वाटते? ===================== आर्थिक प्रगती, राजकीय स्थेर्य, दहशतवाद, सामाजिक समता, सामाजिक सुधार, लॉ अँड ऑर्डर, वा अशा कोणत्या महत्व्वाच्या बाबतीत अकाली-भाजप सरकारने अशी अक्षम्य चूक केली आहे कि ते पुनः सत्तेवर येऊ नयेत असे वाटावेत? ==================== बाय द वे, मणिपूरमधे आता मात्र काँग्रेस येऊच नये असे तुम्हाला वाटायला पाहिजे. अति झालं हसू आलं असा प्रकार असला तरी तिथे भाजप येऊ नये असे वाटते का?

In reply to by arunjoshi123

लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक अकाली दलाचे आमदार प्रत्यक्ष या धंद्यात आहेत असे वाचले आहे.

In reply to by पुंबा

+१ पंजाबात लॉ अँड ऑर्डर मुळातच किचकट प्रकार आहे. शीख धर्माच्या तत्वानुसार धार्मिक शीख शस्त्रधारी असणे हा एक नियम आहे (कृपाण धारण करणे) त्यामुळे बरेच प्रॉब्लेम असावेत असे वाटते.

In reply to by फेदरवेट साहेब

पंजाबातली विधिव्यवस्था हा विषय चर्चेला घेतल्यावर खूप उप मुद्दे पुढे येतात १. स्त्री सुरक्षा, मागे खूपशा केसेस मध्ये चालत्या बस मधून स्त्रियांना फेकून देणे वगैरे प्रकार झाले होते. ह्यातल्या बहुतांशी बसेस ह्या बादल कुटुंबियांच्या, त्यांच्या नातलगांच्या वगैरे होत्या असेही रिपोर्ट्स होते. २. एनआरआय लोकांनी पंजाबी मुली मारणे, हुंडाबळी वगैरे प्रश्नांवर बादल सरकार ने काही खास केल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by फेदरवेट साहेब

फार डावी वृत्तपत्रे वाचत जाऊ नका. भारताच्या अन्य ठिकाणांच्या मानाने ह्या सगळ्या गोष्टींत पंजाब फार बरा आहे.

In reply to by पुंबा

अकाली दलाचे कित्येक आमदार? आम आदमी पार्टी सोडून इतर कोणीही केलेले असे आरोप दाखवता येतील का? एखाद्या आरोपीने नाव घेतले म्हनून अकाली दलाचेनेते गुन्हेगार ठरत नाहीत.

In reply to by arunjoshi123

बरं.. ईडी चौकशी करतच आहे, येतील अजून लोक जाळ्यात.इथे आणि इथे थोडी अधिक माहिती मिळेल या भोला स्कॅमबद्दल.

In reply to by पुंबा

मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू आहे.
K S Makhan and Jagsir Sidhu are not the only leaders who have been summoned by the ED. Earlier the cabinet minister and brother-in-law of deputy chief minister Sukhbir Badal was also summoned.
संदर्भः इंडीया टुडे

In reply to by पुंबा

आगा बयो, म्हणून पंजाबात काँग्रेसचं सरकार हवं? अहो , जगातल्या (जगातल्या बरं, भारतातल्या नाही.) मादक पदार्थांमुळे बट्ट्याबोळ झालेल्या सर्वात वाईट जागांमधे मणिपूर ही एक आहे.)तिथे काँग्रेसची १५ वर्शे सत्ता आहे. म्हणजे मणिपूरचा ड्रग प्रॉब्लेम १०० पैकी ८० असेल (जस्ट एक स्केल मांडायचा म्हणून) तर पंजाबचा २ ते ३ देखिल नाही. ड्रग्जच्या समस्येच्या ज्या लोकांना इतका पुळका आला आहे त्यांनी पंजाब विसरून (हो, पूर्णतः विसरून) मणिपूरमधे काँग्रेस पाडा असा तीव्र प्रचार केला पाहिजे. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/12284227 Although Manipur makes up only 0.91% of the country's population, the state's intravenous drug account for 23.1% of the nation's HIV cases. Manipur has an estimated 30,000 drug addicts, approximately 1/2 of which are intravenous drug users. लक्षात घ्या, ज्या राज्याची लोकसंख्या देशाच्या १% देखिल नाही तिथे २३% ड्र्ग रिलेटेड एच आय वी केसेस आहेत. भारतात ड्रग अ‍ॅडिक्शन रेट ०.२५% आहे, पंजाबात ०.८०% आहे, मणिपूरमधे २.०% आहे. वास्तवात हा दर अजूनच जास्त आहे कारण मणिपूरमधे लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्ट नाही आणि क्राइम रिपोर्टींग नाही. ============= अकाली पाकी टॅक्टीकला तोंड द्यायला फेल होताहेत, पण काँग्रेसी तर म्यानमारी टॅक्टीकपुढे फेल झालेत. ते पंजाबात आले तर पंजाबची वाट लावणार यात वाद नाही. अकालायांच्या एक दोन लोकांना ड्र्ग्ज लॉबीने फोडले आहे, पण काँग्रेसच्या काळात अख्खा पक्ष लॉबीच्या खिशात असेल. (कॅप्टन सोडून बहुतेक) ================ आआप बद्दल बोलायची लायकी नाही माझी. ड्र्ग घ्या पण आम्हाला मते द्या, ड्र्ग घ्या पण जातीयवाद करू नका, ड्र्ग्ज घ्या पण भ्रष्टाचार करू नका, इ इ एकायला मिळेल.

In reply to by arunjoshi123

अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय. मणिपुरमध्ये काँग्रेस यावी कोण म्हणतंय? उगाच मणीपुर कशी जगातली सगळ्यात भयानक जागा आहे हे कशाला सांगताहात? पंजाबची केस अशी आहे की, सलग दहा वर्षे सत्तेत राहील्याने अकाली-भाजप युती आणि ड्रग माफिया यांच्यात चांगलंच साटंलोटं निर्माण झालं आहे. अनेक पाहण्यांनुसार, सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये ड्रगची समस्या अतिशय उग्र आहे. मात्र अकाली-भाजप हे सतत नाकारत आहेत. पंजाबमधील सत्य परिस्थिती सांगणार्‍या प्रत्येक जण शिख धर्माची इमेज खराब करण्यासाठी हे करत असल्याचा कांगावा करत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठलीही ठोस पावले उचलली गेली तर नाहीतच वर सत्ताधार्‍यांमधीलच अनेक नेते या माफियांशी संगनमत करून असल्याचे सिद्ध होते आहे. अशा वेळी अमरिंदर सिंग मात्र आपण ही समस्या पुर्णपणे सोडवू असं आश्वासन देत आहेत. माझ्या मते, एक स्ट्राँग नेता ज्याचे असे हात असे ड्रग माफियांनी ओले केलेले नाहीत( असा आरोप कुणीही केलेला माहित नाही, तुम्हाला असेल तर सांगा), तो या समस्येशी निश्चितच लढू शकतो. १० वर्षे अनिर्बंध सत्ता उपभोगल्यावर आता पंजाबी लोकांनी भाकरी फिरवून कॅ. ना संधी द्यावी असे वाटते, जर ते यात अपयशी ठरले तर पुन्हा पाच वर्षांनी हाकलता येइलच की. सारा भारत काँग्रेसमुक्त व्हावा आणि सगळीकडे भाजपच सत्तेवर यावा असले काही मत नसल्याने मी प्रत्येक केसचा स्वतंत्र विचार करू शकतो.

In reply to by पुंबा

जो पक्ष आपल्या एका राज्याला जगातले सर्वात भयानक ड्रगपिडित राज्य होण्यापासून वाचवू शकत नाही त्याला दुसरीकडे तीच समस्या सोडवण्यासाठी निवडणे म्हणजे विनोदी प्रकार आहे.
अनेक पाहण्यांनुसार, सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये ड्रगची समस्या अतिशय उग्र आहे.
नाही हो. आकडे कळत नाहीत का तुम्हाला?
सारा भारत काँग्रेसमुक्त व्हावा आणि सगळीकडे भाजपच सत्तेवर यावा असले काही मत नसल्याने मी प्रत्येक केसचा स्वतंत्र विचार करू शकतो.
हे चांगलं आहे.

असं पण केजरीवालांचा एक आश्वासन आहे ज्याला अनेक जणांनी पाठिंबा दिलाय कारण बादल सरकार ने अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या होत्या . त्यात छोट्या बांदलांचा मेहुणा हाच ड्रग तस्कर आहे असेही पटवून देण्यात केजरीवाल यशस्वी झालेत . तरी हि कित्येक ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवशी डेरा सच्चा सौदा आणि बाकी धर्मगुरूंच्या आदेशानुसार मतदान होत. त्यामुळे पाहणं रोचक आहे .काँग्रेस ला बहुमत नाही मिळणार पण आप पेक्षा एक जागा जास्त मिळावी किमान . अवांतर - आप बद्दल काहीच अनुमान काढता येत नाहीये अजून दिल्ली ला गेलो तर कित्येक लोक खुश आहेत सरकार वर अजूनही . आणि काही सडकून टीका करतात पण अजूनही खुश असणाऱ्यांचा प्रमाण जास्त आहे . पंजाबी काही मित्र आहेत ते असच चर्चेत सांगत आहेत ये टाइम झाडू . गोव्यात आव्हान उभं केलाय . व्यक्तिशः मला तरी त्यांचा आक्रस्ताळी आणि अनेक उलट्या सुलट्या निर्णयाचं राजकारण नाही आवडत .

सपामधील यादवीमध्ये नक्की काय चालू आहे हे खरोखरच कळेनासे झाले आहे. जेव्हाजेव्हा वाटते की ही सगळी फिक्स्ड मॅच आहे तेव्हा मधूनच अशी एखादी बातमी येते त्यातून गोंधळ वाढतो. आजच मुलायमसिंग यादवांनी त्यांना अखिलेशने काँग्रेसबरोबर केलेली युती मान्य नाही आणि ते युतीसाठी प्रचार करणार नाहीत असे म्हटले आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांविरूध्द निवडणुक लढवा असे आपल्या समर्थकांना सांगितले आहे अशीही बातमी आहे. एकूणच काय चालू आहे हे समजत नाही.

असंही म्हणाले. शिवपाल यादव डिसेन्ट आहेत, आणि माझ्या मुलाच्या हातात मी सर्व दिलंय नाहीतर बादलांकडे बघा पंजाब मध्ये अजूनही मुख्यमंत्री पद सोडत नाहीत हे सगळं नेताजी बोले . प्रचार करणार नाही कारण सपा सक्षम होता सत्तेत यायला म्हणजे आता नाही आला तर अखिलेश वर ह्याची जबाबदारी असणार . ज्या अर्थी निवडणूक आयोगापर्यंत जावं लागलं त्या अर्थी नेतांजींच्या मनाला ह्या वयात तरी लागली आहे हि गोष्ट त्यामुळे फिक्स नक्कीच नाहीये . निवडणुकांनंतर बॉल परत आपल्या कोर्टात यावा असेच त्यांना वाटत असणार .

गॅरी ट्रुमन,
पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले.
याचं आजून एक कारण आहे. ते म्हणजे श्रीलंकेतल्या तामिळींचा होणारा छळ. १९५६ पासून या छळास सुरुवात झाली. पुढे दहाएक वर्षांत त्याने उग्र स्वरूप धारण केलं. तामिळींना भारताचा पाठिंबा हवा असेल तर उर्वरित भारतापासून स्वतंत्र होण्याची खाज आवरली पाहिजे. हे दिव्यज्ञान नायकरांना झालं खरं, पण यासाठी श्रीलंकी तामिळींना भरपूर किंमत मोजावी लागली. :-( आ.न., -गा.पै.

कोणत्याही निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळणार नाही. एक मोदी सोडले तर या पक्षाकडे योग्य चेहेरा नाही.

गॅरी ट्रुमन,
त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होते
ही साफ चुकीची धारणा आहे. आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो तिथे राहणाऱ्या मुस्लिमांनाही वेगळा पाकिस्तान नको होता. कसं ते पाहूया : १. पंजाब मध्ये सिकंदर ह्यत खान (पै.वासी) याची युनियानिस्ट पार्टी सत्तेत होती. नावंच तिचं मुळी युनियानिस्ट! तिचा भारतातून फुटून जायला विरोध होता. तिथे जिनाने दंगे करून ते सरकार पाडलं. २. सिंध प्रांतिक समितीने (= स्टेट असेंब्ली = हल्लीच्या भाषेत विधानसभा) भारतास जोडून राहायचा निर्णय घेतला होता. सिंधमध्ये तसेच दंगे घडवून आणू म्हणून धमक्या देऊन जिनाने हा निर्णय बदलण्यास भाग पाडलं. ज्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जी.एम.सईद यांच्या नेतृत्वाखाली जियो सिंध चळवळ सुरू झाली. ३. बलुची स्वत:ला स्वतंत्र समजत होते. तसे ते आजही स्वत:ला पाकिस्तानी मानंत नाहीत. ४. पख्तुनी लोकांना पाकिस्तानात आजीबात जायचं नव्हतं. त्यांचे नेते खान अब्दुल गफारखान (=सरहद्द गांधी) यांनी मोहनदास गांधी व नेहरूंची निर्भर्त्सना केली. तुम्ही आम्हांस लांडग्यांच्या तोंडी दिलंय, असे उद्गार काढले. हे उद्गार पुढे पाकिस्तानी सरकारने सार्थ केले! ५. बंगालात सुहारावार्दी सत्तेत होता. त्याला स्वतंत्र बंगाल हवा होता. त्याला जिनाने कसाबसा काही आश्वासने देऊन फोडला. पण लोकसंख्येच्या आधारे पाकिस्तानात निवडणुका होतील ही मागणी त्यानं पदरात पडून घेतली. कारण की पूर्व बंगालची लोकसंख्या उर्वरित पाकिस्तानपेक्षा अधिक होती. बघा, ही घाण नसून भारताचे हितैषी होते. त्यांना दूर लोटून आपण काय मिळवलं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ही घाण नसून भारताचे हितैषी होते.
अरे बापरे. ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला? इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात का झाला?बरं असे म्हटले की ते सगळे अगदी मूठभर लोकांनी घडवून आणले पण मग जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला? पाकिस्तानातील सगळे लोक नक्कीच हिंदूविरोधी दंगलींमध्ये सामील नव्हते.पण तरीही भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले? दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होता त्यामुळे त्या कॉमन शत्रूला पिटाळून लावीपर्यंत ते एकत्र होते पण नंतर भांडायला लागले. अशी कित्येक उदाहरणे बघायला मिळतील. अफगाणिस्तानात रशियन असेपर्यंत सगळे अफगाण रशियनांविरूध्द लढत होते. पण एकदा रशियन परत गेल्यावर कोणी पश्तून होता तर कोणी ताजिक आणि त्यांच्यातच यादवी सुरू झाली. त्यांच्यात यादवी सुरू झाली म्हणून ते रशियनांचे हितैषी होते असे म्हणता कसे येईल? तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या. त्यांचा सिकंदर हयात खान हा नेता जास्त लोकप्रिय होता या कारणाने म्हणा की अन्य कारणाने मुख्यमंत्री युनियनिस्ट पक्षाचा झाला. त्या सरकारला युनियनिस्ट सरकार म्हणता येणार नाही. आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?

१९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी चळवळींकडे आपण २०१७ च्या परिप्र्येक्षातून का पाहत आहोत? तेव्हा संस्थाने खालसा करुन इंग्रजांनी देश (आयमीटुसे प्रशासनव्यवस्था) एकत्र बांधली होती. इंग्रज यायच्या आधी जशी वेगवेगळी सत्ताकेंद्रे होती तशीच इंग्रज गेल्यावर होतील असा काही भाव तेव्हा असावा काय? त्यामुळे इतक्या वेगवेगळ्य लोकांनी आपआपले भूभाग वेगळे मागितले.. वेगळ्या भूभागाच्या इतक्या मागण्या बघून 'भारत एकसंध व एकमत होता, समाज एकमेकांशी सहिष्णुपणे वागत होता' हे पटणे कठिण जाते मग.... काही प्रश्न उभे राहिले या चर्चेमुळे... इंग्रज घालवणे हा स्वातंत्र्यचळवळीचा मुख्य उद्देश असल्याने इंग्रज गेल्यावर नक्की काय चित्र असेल यावर विचार केला नव्हता कोणीच?

In reply to by संदीप डांगे

चर्चेचा ओघ जिथे न्यायचा आहे ते ठिक आहे पण पण ...
तेव्हा संस्थाने खालसा करुन इंग्रजांनी देश (आयमीटुसे प्रशासनव्यवस्था) एकत्र बांधली होती.
का हो, इंग्रजांनी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले असे कायसे देखिल काही आहे काय?

गॅरी ट्रुमन, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं व्यक्त करेन म्हणतो. १.
ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला?
त्यांना फसवून. आणि खोट्यानाट्या कथा रंगवून. खुद्द (खरा) गामा पैलवान भारतातलं ठीकठाक जीवन सोडून पाकिस्तानात राहायला गेला आणि विपन्नावस्थेत मरण पावला. २.
जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला?
पाकिस्तानी प्रस्थापितांना राज्य करायला मिळावं म्हणून. ३.
भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले?
तेंव्हाही हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढेच होते. स्वातंत्र्योत्तर फारसा फरक पडला नसता. उलट उद्यमशील हिंदूंना हाकलून लावल्याने पाकिस्तानची अपरिमित हानीच झाली आहे. ४.
दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होता
तसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का? ५.
तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या.
काँग्रेस आणि इतर पक्ष फाळणीच्या विरोधात होते. मग मुस्लीम लीगला इतकं महत्त्व कशाला दिलं गेलं? मोठा पक्ष असली तरी ती बहुमतात नव्हती. बहुमतातलं लोकनियुक्त शासन दंगली करून पाडण्यात आलेलं दिसतंय ना? मग फाळणी मान्य करणं म्हणजे दंगेखोरांसमोर गुढघे टेकणं आहे. युक्रेनमध्ये २०१४ साली यानुकोव्हिच निवडणुकीत पराभूत झाला. खुद्द पुतीन यांनीही त्याला बाजूला व्हायला सांगितलं. तो लोकशाही मार्गाने चुपचाप निघाला असतांना दंगेखोरांनी रशियाच्या सीमेवर दंगली सुरू केल्या. काय कारण होतं त्यामागे? लोकांना फाट्यावर मारून दहशत फैलावून सत्ता हातात घेणं हेच ना? पुतीनने मग लगोलग क्रीमियात हस्तक्षेप केला. तिथल्या लोकांना रशिया की युक्रेन अशी निवड करायला मिळाली. अगोदर दंगली शांत मगच निवडणूक. मात्र पंजाबात बरोबर उलटं घडलं. आधी निवडणूक मग दंगली. आज अमेरिकेतही हेच घडतंय. पुतीन आणि ट्रंप दंगेखोरांचे लाड करणारे नाहीत. पण आपले नेहरू पंतप्रधान बनायला निघाले होते ना! मग पंजाबातल्या दंगली काबूत आणायच्या कोणी? ६.
आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?
यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोव्हिएट रशियासारख्या पोलादी पंज्यातील प्रस्थापितही त्यांची सत्ता ७० वर्षेच टिकवू शकले. त्या मानाने पाकिस्तानी प्रस्थापितांची ताकद आणि देशातील दहशत कमीच आहे. १९७१ सारख्या प्रसंगी पाकिस्तानचा पराभव झाला आहे, बांगलादेश वेगळा झाला आहे, नियाझीने शरणागती पत्करली आहे, हजारो युध्दकैदी भारताच्या ताब्यात आहेत अशी परिस्थिती असतानाही मग पाकिस्तानातील तथाकथित भारतप्रेमी लोकांच्या दबावापुढे उरलासुरला पाकिस्तानही कोलॅप्स झाला असता. तो अगदी १९७१ मध्येही झाला नाही ते का? रच्याकने लष्करी बळावर कोणाही जनतेला तिच्या इच्छेविरूध्द फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. परक्या देशात तर असे करता येत नाही हे रशियाच्या अफगाणिस्तान आणि चेचेन्यातील उदाहरणावरून, अमेरिकेच्या इराकमधील उदाहरणावरून सिध्द झालेच आहे. आपल्या देशातील जनतेला अशा बळाने फार काळ नियंत्रित करता येत नाही हे रशिया आणि पूर्व युरोपातील उदाहरणावरून सिध्द झाले आहे. अशा परिस्थितीत जर भारतप्रेमी तत्वे इतकी बलिष्ठ असती तर त्यांना जवळपास ७० वर्षे पाकिस्तानातील प्रस्थापित ताब्यात ठेऊ शकले असे म्हणायचे आहे तर तुम्हाला!!
तसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का?
कसा काय? जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होते यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांना कॉमन शत्रू मानत होते असा अर्थ कसा निघतो?
यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं.
तुमचे हे म्हणणे तुम्हालाच लखलाभ असो. मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, १.
मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.
पण तरीही तुम्हाला बांगलादेशी घाणीसोबत रहावंच लागतं. मग आपणंच पुढाकार घेऊन सगळीच घाण साफ केलेली काय वाईट? एका फटक्यात करायची गरज नाही. २.
जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होते
मुस्लीम बहुसंख्य नसलेल्या ठिकाणीही (म्हणजे भारतातही) ते हिंदूंना आपला शत्रूच मानतात ना? मग शत्रूचं संख्याबळ खच्ची करायला हवं ना? सगळे मुस्लीम शत्रू नाहीत. यांच्यातल्या सहानुभूतीदारांना आपल्या बाजूला वळवून घ्यायला नको का? खान अब्दुल गफारखानांना आणि बलुचींना गांधीनेहरूंनी वाऱ्यावर सोडलं म्हणून आपणही सोडायचं? ३.
जर भारतप्रेमी तत्वे इतकी बलिष्ठ असती तर त्यांना जवळपास ७० वर्षे पाकिस्तानातील प्रस्थापित ताब्यात ठेऊ शकले असे म्हणायचे आहे तर तुम्हाला!!
हो हो हो !!! नेमकं हेच म्हणायचंय मला. भारताने पुढाकार घेतला असता तर आज पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे राहिले नसते. ४.
लष्करी बळावर कोणाही जनतेला तिच्या इच्छेविरूध्द फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. परक्या देशात तर असे करता येत नाही हे रशियाच्या अफगाणिस्तान आणि चेचेन्यातील उदाहरणावरून, अमेरिकेच्या इराकमधील उदाहरणावरून सिध्द झालेच आहे.
१९६५ साली पश्चिम पाकिस्तानातला बराच मोठा गट आणि १९७१ साली सबंध पूर्व बंगाल भारतीय सैन्याला मुक्तिदाते मानंत होते. या परिस्थितीचा फायदा उठवला गेला नाही. याची कारणं वेगळी आहेत. असो. मागे संदीप डांग्यांनी एके ठिकाणी विचारलं होतं की १९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी चळवळींकडे आपण २०१७ च्या परिप्र्येक्षातून का पाहत आहोत म्हणून. त्याचं उत्तर असं की त्यावेळेस जो खेळ चालू होता नेमका तोच आताही चालू आहे. औवेश्या स्वत:ला प्रति जिना समजतो. त्याला लीगप्रमाणे मुस्लिमांचा एकमेव तारणहार व्हायचं आहे. जेणेकरून भारताचा आजून एक लचका तोडता येईल. १९४२ साली कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे व्हायला हवे होते (कृपया क्रिप्स मिशन आठवावे.). आजही कम्युनिस्ट जनेवित उघड घोषणा देण्यात येतात की 'भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला'. मग अशा वेळेस भारताच्या हितचिंतकांना एकत्र बांधायलाच पाहिजे. मग ते पाकिस्तान/बांगलादेश/भारतातले हिंदू असोत, बलुची असोत, वा पठाण, वा आगाखानी खोजे, वा शिया, वा जियोसिंधवाले, वा इतर कोणीही असोत. त्यांची दयनीय अवस्था पालटणं हे आपलं (वैचारिक) कर्तव्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे सगळे इतके सोपे आहे का गापै? सुरवातीच्या काळात कराचीमध्ये पाकिस्तानला कटकटी निर्माण करतो म्हणून एम.क्यू.एम विषयी फार चांगले मत होते. पण नंतर झाले काय? त्याच एम.क्यू.एम आणि कट्टर भारतद्वेष्टा परवेझ मुशर्रफ यांचेच गुळपीठ जमले. भारतातून गेलेले मोहाजीर आणि सिंधी एकमेकांविरूध्द ठाकले. म्हणावे तर सिंधी पाकिस्तानविरूध्द आणि मोहाजीरही पाकिस्तानविरूध्द. त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात फार काही गैर नाही. पण ते फार भारतप्रेमी आहेत असे मानायचेही काही कारण नाही. एक प्रश्नः हा खरं तर यापूर्वीच विचारायला हवा होता. हिंदू आणि शीख पाकिस्तानातून भारतात आले आणि जवळपास तितकेच मुस्लिम भारतातून (विशेषतः पंजाब आणि उत्तर भारताच्या इतर भागांमधून) पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतप्रेमी लोक असतील तर त्यापैकी कोणीही (मुस्लिम धर्मीय) फाळणीच्या वेळी भारतात कसे स्थलांतरीत झाले नाहीत? असे कोणी लोक तुम्हाला माहित आहेत का? एक जालिंदर जलालाबादी सोडले तर मला असे कोणीही माहित नाही. याविषयी काही लिहिलेत तर बरे होईल. शत्रूचे संख्याबळ नक्कीच खच्ची करायला हवे. पाकिस्तानातील खरोखरच तिथल्या प्रकाराला कंटाळलेले आणि भारतात यायची खरोखरची इच्छा असलेल्यांबरोबर जरूर हातमिळवणी करावी. पण त्याचवेळी एक लक्षात ठेवायला हवे की खान अब्दुल गफार खानांच्याच वायव्य सरहद्द प्रांतात आज तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात 'भारत-पाकिस्तान एक व्हावेत आणि त्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा' असे म्हणताना आपण नक्की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचे म्हणत आहोत त्याचाही विसर पडू देऊ नये इतकेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात 'भारत-पाकिस्तान एक व्हावेत आणि त्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा' असे म्हणताना आपण नक्की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचे म्हणत आहोत त्याचाही विसर पडू देऊ नये इतकेच.
+१. आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, तुमचा वरील प्रतिसाद तसेच त्याखालची अरुण जोशींची सहमतीही वाचली. माझी मतं सांगतो. १.
सुरवातीच्या काळात कराचीमध्ये पाकिस्तानला कटकटी निर्माण करतो म्हणून एम.क्यू.एम विषयी फार चांगले मत होते. पण नंतर झाले काय? त्याच एम.क्यू.एम आणि कट्टर भारतद्वेष्टा परवेझ मुशर्रफ यांचेच गुळपीठ जमले. भारतातून गेलेले मोहाजीर आणि सिंधी एकमेकांविरूध्द ठाकले. म्हणावे तर सिंधी पाकिस्तानविरूध्द आणि मोहाजीरही पाकिस्तानविरूध्द. त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात फार काही गैर नाही. पण ते फार भारतप्रेमी आहेत असे मानायचेही काही कारण नाही.
मलाही हेच सांगायचं होतं. यांचा वापर आपल्या राजकारणासाठी घ्यायला हवा. २.
हे सगळे इतके सोपे आहे का गापै?
आजीबात सोपं नाहीये. म्हणूनंच करायला हवंय. कठीण गोष्टी केल्याने आत्मविश्वास येतो. ३.
पाकिस्तानात इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतप्रेमी लोक असतील तर त्यापैकी कोणीही (मुस्लिम धर्मीय) फाळणीच्या वेळी भारतात कसे स्थलांतरीत झाले नाहीत?
भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये. ४.
खान अब्दुल गफार खानांच्याच वायव्य सरहद्द प्रांतात आज तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.
मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी तालिबानपेक्षा जास्त भ्रष्ट आणि बेभरवशाचे आहेत. म्हणून तालिबानला पाठींबा मिळतो. दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार आहे. शिवाय तालिबान = अमेरिका हे समीकरण अफगाण्यांच्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे. त्यामुळे तालिबान्यांप्रती सहानुभूती भारताकडे वळवणं अगदी अशक्य नाही. ५.
आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.
१९४७ साली आपला खंडप्राय भारत घिसाडघाईने कापण्यात आला. तेव्हा हिंदूंना वेळ मिळाला नाही. त्यामुळे आत्ताच खरी संधी आहे. कारण की पाकिस्तान जिच्या जोरावर टिमकी वाजवत होता ती अमेरिका नामे शक्ती उघडपणे इस्लामविरोधी भूमिका घेऊ इच्छितेय.

In reply to by गामा पैलवान

भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये.
तरीही हा पूर्णपणे वन-वे स्ट्रीटच होता. हिंदू आणि शिखांचे स्थलांतर भारताकडे आणि मुस्लिमांचे पाकिस्तानकडे असे आणि असेच होते. आणि तसे करणार्‍यांचा आकडाही थोडा नव्हता. दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?
मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे.
यातून नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही. अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला? तुम्ही म्हणत आहात की १९४७ मध्ये खान अब्दुल गफार खानांच्या प्रभावामुळे वायव्य सरहद्द प्रांतात भारताविषयी चांगली भावना असलेले लोक होते. यात नाकारण्यासारखे काहीच नाही. भारत की पाकिस्तान याविषयावर तिथे सार्वमत झाले त्यात पाकिस्तानच्या बाजूने थोडीच जास्त मते पडली होती.पण आता २०१७ मध्ये त्याच प्रांतात तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. अफगाणिस्तानात तालिबानला पाठिंबा फार नाही हे स्पष्टच आहे. पण त्या मुद्द्याचा या चर्चेशी संबंध नाही. दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.

पंजाब आणि गोव्यात मतदान केव्हाच संपलं आणि निकाल यायला बराच वेळ आहे (११ मार्च!). पोस्ट-वोट एक्झिट पोलची काही बातमी नाही. युपी / उत्तराखंड वगैरे ठिकाणच्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आयोगाने बंदी वगैरे घातली नाही ना?मणिपुर'वर तर काहीच फरक पडणार नाही. युपी / उत्तराखंड वर पण खूप प्रभाव पडेल असं नाही. मग नक्की काय कारण असावे. वाहिन्यांनी मतदानोत्तर एक्झिट पोल्स दाखवायला हवेत.

गॅरी ट्रुमन, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.
ही तत्कालीन घटना आहे. लांब पल्ल्याच्या धोरणांत अशा घटनांच्या विरुद्ध प्रभावी उपाययोजना करणं (म्हणजे मुशर्रफला आवरणं) फारसं अवघड नाही/नसावं. २.
अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला?
कारण की पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातली ड्युरांड सीमारेषा १९९४ साली कायद्याने कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वायव्य सीमा प्रांताचा (म्हणजे खैबर पख्तूनखवाचा) उल्लेख करतांना गांधारप्रांताचा संबंध येणारंच. शिवाय अफगाण लोकांची पाकिस्तानला आजीबात सहानुभूती नव्हती. तेव्हाही नव्हती, आणि आज तर नाहीच नाही. वायव्य सीमा प्रांतात जे सार्वमत घेण्यात आलं होतं त्यावर खान अब्दुल गफारखानांनी बहिष्कार घातला होता. म्हणून हा भाग पाकिस्तानात गेला. ही खानसाहेबांची भयाण चूक आहे. तिच्या परिणामांपायी त्यांना पुढे आयुष्यभर पाकिस्तानच्या कैदेत राहावं लागलं. ३.
दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?
प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाकी सगळं पटणेबल आहे.
प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे.
हे तर खासच. पण आम्ही ज्याला होपलेस म्हणालो ते संभव का वाटते यावर विस्ताराने मत हवं. ते या धाग्यावर नको. भारत पाक का एक व्हावेत, होतील का, आता का व्हावेत, कसे व्हावेत, आणि नंतर अखंड भारत कसा असेल, असा नवा धागा असावा.

In reply to by गामा पैलवान

एकूणच काय की तिकडच्यांना भारताविषयी प्रेम वाटतच होते आणि काही मूठभर भारतद्वेष्ट्या मंडळींमुळे पाकिस्तान अस्तित्वात आला हाच ग्रह तुम्ही करून घेतलेला दिसतो. जर पाकिस्तानातील बहुसंख्य लोकांना भारताविषयी प्रेम वाटत असेल तर उघडपणे भारताची बाजू घेणारा एकही पक्ष/संघटना अस्तित्वात का आली नाही, उलट हाफिज सईदसारखे लोक लाहोरजवळ मुरिदके सारख्या ठिकाणीही आजही हजारोंचे मेळावे कसे भरवतात, १९७१ मध्ये पाकिस्तानचा मोठा पराभव झाल्यावरही अशा भारतप्रेमी तत्वांचा रेटा कसा बसला नाही, १९४७-४८ मध्ये दंगलींचा पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील भारतप्रेमी लोक इथे आले नाहीत तरी १९६५ पर्यंत भारत-पाकिस्तानात एकमेकांच्या नागरीकांना जायला-यायला आजच्या इतकी आठकाढी नव्हती (ती १९६५ च्या युध्दानंतर आली) अशावेळी तरी हे लोक भारतात कसे आले नाहीत (आपल्या पंजाबचे नंतर मुख्यमंत्री झालेले भीमसेन सच्चर भारतात १९४८ मध्ये आले तर जोगेन्द्रनाथ मंडल त्याहूनही नंतर आले पण तथाकथित भारतप्रेमी मुस्लिम तत्वे का आली नाहीत) इत्यादी सगळ्या प्रश्नांना 'असे काही नाहीच' अशा स्वरूपाचा तुमचा आग्रह दिसतो. ठिक आहे. अशा मॅट्रिक्समध्ये राहायचे असेल तर काहीच ना नाही पण या विषयावर अजून काही चर्चा करून काही स्वारस्य आहे असे वाटत नाही. त्यामुळे यावर आणखी काही लिहित नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, समजा कोणी पाकिस्तानात भारतासाठी मेळावा भरवला तर त्याला पाक सरकार जिवंत सोडणार आहे का? हे कार्य भारतालाच हाती घ्यावं लागेल. लोकांना भ्रामक स्वप्नं दाखवून पाकिस्तान ओरबाडून घेतला गेला आहे. तो चालवायची जराही अक्कल तिथल्या राज्यकर्त्यांना नाही. याला जर तुम्ही लोकांची निवड म्हणंत असाल तर ते मला पटंत नाही. शिवाय, भारताकडे कल असणे म्हणजे नेमके काय? इंडोनेशियामध्ये भारतमाता की जय अशी घोषणा देणे राष्ट्रद्रोह मानला जात नाही. तसाच पाकिस्तानही जोडून घ्यावा लागेल. हे तुम्हाला मान्य होत नसेल तर आपापले मार्ग वेगळे आहेत असं म्हणूया. आ.न., -गा.पै.

दैनिक जागरणवर गुन्हा आणि छापे पडले आहेत. Exit polls प्रसिद्ध करायला बंदी असून देखील यांनी पहिल्या टप्प्यात भाजपा वरचढ आहे दाखवणारा पोल प्रसिद्ध केला. (चुकून झाला असं पेपरचं म्हणणं आहे. :) ) या बातमीचा भाजपाला नक्की फायदा होऊ शकेल कारण भाजपाची हवा आहे असा संदेश पुढील टप्प्यात लोकांना मिळू शकतो. म्हणूनच पोलीस इतक्या तत्परतेने छापे घालत आहेत.

In reply to by अनुप ढेरे

जागरणच्या संपादकांना अटक झाली असून इतर २-३ वार्ताहरांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

In reply to by अनुप ढेरे

काय होईल ते नुकसान भरुन देण्याची तयारी, आणि त्यावर बर्‍यापैकी बिदागी, अशा भांडवलावर असे रिपोर्ट्स प्रसवणं काहि कठीण नाहि... :)

In reply to by अर्धवटराव

सरळ आहे. चार दोन पत्रकारांवर तोंडदेखली कारवाई होईल.... प्रोपगंडा प्रकाशित झाला त्याला दुनिया की कोई भी ताकत रिवर्स करु शकत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते हेच दिसून येत आहे. हे तर उघड उघड होतंय.. पडद्यामागे काय होत असेल अमितशा जाने!

In reply to by संदीप डांगे

जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे सरळ सोपे आहे आणि त्याचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होत असेल तर मग बाकी मंडळी हा मार्ग का बरे घेत नसतील म्हणे? म्हणजे थोडक्यात भाजप सोडून इतर पक्ष निवडणूक जिंकायला या वरील किंवा त्यापेक्षा खालील थराला जाऊ शकत नाहीत असं म्हणणं आहे आपलं तर! तरी बरे वरील केस मध्ये इतर पक्ष म्हणजे सपा, बसपा आणि काँग्रेस याबद्दल आपण बोलत आहोत. वरील प्रकरणामागची कुठलीही अधिकृत माहिती नसताना फक्त रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल दाखवला आहे म्हणून हा रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असे म्हणणे म्हणजे कशाचे लक्षण मानावे बरे? अवांतर : भाजपला कडवी टक्कर देतोय किंवा हरवू शकतो म्हणून भाजपविरोधक येणाऱ्या काळात सपा आणि अखिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल दाखवला आहे म्हणून हा रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असे म्हणणे म्हणजे कशाचे लक्षण मानावे बरे?
>> संदर्भः दिल्ली निवडणुकीचे एक्झिट पोल्स. जिथे भाजपला २५+ जागा मिळतील असे दाखवत होते 'एक्झिट' पोल. ३ जागा मिळाल्या. आदर्श स्थितीत एक्झिट पोल म्हणजे मतदान केल्यानंतर पोलबूथमधून बाहेर पडणार्‍या मतदारांचा सर्वे असतो. कोणाचे 'खयाली पुलाव' नसतात. २५+ जागा भाजपला मिळतील असे सांगत होते तेव्हा, आणि ६७ सीट मिळवणार्‍या आपबद्दल कोणीही जवळपासचेही भाकित केले नव्हते. आजकाल एक्झिट पोल्स हे पेड असतात हे मानायला भरपूर संदर्भ आहेत. एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल याची तुलना करुन बघावी, मग कोणी त्या पोलसाठी पेमेन्ट केलं ते समजते. या ठिकाणी भाजपला अव्वल दाखवले आहे. सपा-कॉन्ग्रेस, मायावतीला दाखवले असते तर मी तसेही म्हटले असते. दैनिक जागरण ची मागची तीन-चार वर्षातली वाटचाल बघितल्यास असले प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by संदीप डांगे

दिल्ली व बिहार या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष एखादा अपवाद वगळता पूर्णपणे चुकलेले होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एकूण १० वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. त्याव्यतिरिक्त इंडियन एक्सप्रेसचे संपादक सुरजित भल्ला यांनी एक मोठा लेख लिहून स्वत:चा अंदाज दिला होता. त्यांचा अंदाज जवळपास १००% बरोबर आला. १० वृत्तसंस्थांच्या अंदाजापैकी ९ जणांचे अंदाज पूर्ण चुकले होते. दिल्लीतही तसेच झाले होते. काही वृत्तसंस्थांनी तर भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज दिला होता. दिल्लीतीलही सर्वच अंदाज चुकले होते. दैनिक जागरणचा अंदाज हा पेड आहे का नाही हे अजूनतरी माहित नाही. तो रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असा निष्कर्ष अजूनतरी काढता येणार नाही. २०१५ च्या कटू अनुभवानंतर मी कोणत्याही सर्वेक्षणाच्या अंदाजावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

In reply to by संदीप डांगे

चुकीचे आलेले एक्झिट/ओपिनिअन पोल्स हे पैसे देऊन करून घेतलेले असतात असे मानायचे ठरवलेच असेल तर प्रश्नच संपला. पण चुकीचे सॅम्पलिंग केल्यामुळेही एक्झिट/ओपिनिअन पोल्स चुकीचे येऊ शकतात. २०१४ मध्येही कोणाही एक्झिट/ओपिनिअन पोलने उत्तर प्रदेशात भाजपला ८० पैकी ७१ (आणि मित्रपक्षाला २) जागा मिळतील असे भाकित केले नव्हते. म्हणजे या पोलवाल्यांना विरोधी पक्षांनी विकत घेतले होते असे म्हणायचे का?

In reply to by संदीप डांगे

गल्लत होतेय डांगेसाहेब! एक्सिट पोल्स कसे होते/आहेत/कसे केले जातात हा विषय वेगळा आहे. वरील सर्वे भाजप ने स्वतःच्या स्वार्थासाठी करवला असे आपले म्हणणे आहे. वरून तुम्ही भाजप कोणत्याही ठरला जाऊ शकतो असेही म्हणत आहात. तर मला असा प्रश्न पडला आहे की मग एवढा सोपा मार्ग बाकी पक्ष का बरे घेत नसतील? आणि भाजप असा कोणत्या ठरला जाऊ शकतो ज्याला सपा, काँग्रेस किंवा बसपा जाऊ शकत नाहीत? भाजप या सगळ्यांपेक्षा खालच्या ठरला जाऊ शकतो याला पुष्टी देणारी काही उदाहरणे दिलीत तर तो मुद्दा समजू शकेल. आता राहिला मुद्दा दिल्लीच्या एक्सिट पोल्स चा तर तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही. म्हणजे भाजपच्या बाजूने दिलेले पोल्स नंतर चुकीचे आले की ते भाजपने पे केलेले होते असं काहीसं म्हणायचं आहे का? आणि जे बरोबर येतात पोल्स त्यांचं काय? शिवाय तुम्ही दिल्लीच्या उदाहरणाने तुमच्या यूपीच्या प्रकरणाबाबतीतील मताला कॉन्ट्रडीक्ट करत नाहीयेत का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

भाजपला कडवी टक्कर देतोय किंवा हरवू शकतो म्हणून भाजपविरोधक येणाऱ्या काळात सपा आणि अखिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
दीड वर्षापूर्वी जवळपास सगळ्या मोदीविरोधकांनी लालू यादवचा कसा उदोउदो केला होता हे बघितले असेलच. अगदी मोठ्या मोठ्या अभ्यासू लोकांनीही बिहारमध्ये लालू जिंकावा असे म्हटले होते. आता २०१९ मध्ये शिवसेना विरोधी पक्ष म्हणून लढेल आणि सगळे बुबुडाविपुमाधवि "शिवसेना कशी चांगली" असे गोडवे गायला लागतील आणि irony परत एकदा १०० मरणे मरेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील
भविष्यकाळाची गरज नाही. हे सुरू झालेलं आहे. इकॉनॉमिक टाईम्स वाचा आजकालचा. राजदीप सरदेसाईनी अखिलेश यादवची मुलाखत घेतलेली वाचा.

In reply to by अनुप ढेरे

आज अखिलेश ला समर्थन मिळत आहे . यु पी मधील तरुण मुले त्याच्याकडे आकर्षित होत आहेत . अगदी मुंबईतील कुठल्या भैय्या ला विचारलेत तरी तो म्हणतो अखिलेश अच्छा काम कर राहा .ह्या सर्वाना बुद्धीजीवी म्हणणार का?निकाल काहीही असला तरी जनतेची भावनाही महत्वाची आहे ना. अगदी बिहारचाही उदाहरण घेतलात तरी जनतेने निवडून दिलाय ना त्यांना . ह्यात भाजपविरोधी भूमिका अली कुठे ? अथवा बुद्धीजीवी असेच म्हणार हे कुठून आलं ?जनता काय ह्यांच्या मतांवर मतदान करते का? सेम अँप्लिकेबल टू आप . दिल्लीकरांनी निवडून दिलाय काम करतायत. अजून तरी कुठला दिल्लीकर खूपच नाराज आहे कामावर असं पाहण्यात नाही आलंय . त्यामुळे बुद्धिजीवी असेच बोलणार , भाजप विरोधक असेच बोलणार हा ग्रह काढून घ्या .

स.पा. आणि कॉं च्या युती ला जय वीरु ची उपमा दिली आहे. आणि शेवटी जय साहेब च काय होत तसंच होणार असे दिसतंय.